बडबड गीत
लेखनविषय:
काव्यरस
एक बडबड गीत .............
बरं का ग मंदा
काय झालं एकदा,
ताई आमची चिरत होती
खसाखसा कांदा .
कांदा राहिला हातात
विळी गेली बोटात
विळी वरुन उठली,
नाचत सुटली.
धक्क्याने मोराम्ब्याची
बरणीच फुटली.
हाय हाय हाय
काचेवरती पाय.
काच गेली पायात
आता करू तरी काय?
बाबा हसले खो खो खो
आई हसली खी खी खी
ताईला आले रडू
आईने दिला लाडू
----------------------------------------
आणि हे 'बेताल बरबाद गीत' .............
बऱ का गं जनता
काय झालं एकदा
मंत्री आमचे मोडत होते
पटापटा कायदा.
कायदा राहिला बुकात
शिक्षा झाली कोकणात.
हाय हाय हाय
माझ्या पोराचे काय?
पत गेली आता
करू तरी काय?
पदावरून उठले
भांडत सुटले
धक्क्याने मेंदुवरचे
नियंत्रण सुटले.
'बाबा' हसले खो खो खो
'आई'(कोणाचीतरी)हसली खी खी खी.
मंत्र्यांना आले रडू
जनतेने द्यावा झाडू.
वाचने
5738
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्तच...
हाहा सहीच
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by भिंगरी
आभार
जमलंय बर्यापैकी!!
व्वा. !
(No subject)
दोन्ही जमलीयेत.
In reply to दोन्ही जमलीयेत. by किसन शिंदे
अहो ते पहिलं जुनं बडबडगीत आहे
In reply to अहो ते पहिलं जुनं बडबडगीत आहे by पिलीयन रायडर
असंय होय? आम्हाला वाटलं या
In reply to असंय होय? आम्हाला वाटलं या by किसन शिंदे
पैलं चांगलं जमलंय म्हण्णार
In reply to अहो ते पहिलं जुनं बडबडगीत आहे by पिलीयन रायडर
ताई/दादा.
शुं...........दल लिलश गं
मस्त
माझे नाही
In reply to माझे नाही by भिंगरी
@मी चोर नाही>>>
मजा आली वाचून. (पण कोणतेही
In reply to मजा आली वाचून. (पण कोणतेही by पाषाणभेद
ह्म्म्म्म
आता हे
भिंगरी ताई, सुरेख झालयं!
मस्तच
मस्त जमलय..