Skip to main content

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 28/06/2014 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने. राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.


  उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल)   
४ जुलै  फ्रान्स वि.जर्मनी रात्री ९:३०
४ जुलै  ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०
५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०
५ जुलै नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)
८ जुलै  ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०
९ जुलै  अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै  ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०
         अंतिम सामना  
१३ जुलै    जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany
Argentina
Argentina
1
(GK)
1
(GK)
2
3
5
6
8
8
10
11
12
(GK)
12
(GK)
13
14
15
16
16
18
18
19
19
20
20
21
21
(GK)
(GK)
22
23
23
Coach                                   Coach
Joachim LOEW (GER)                                            Alejandro SABELLA (ARG)

वाचने 51168
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेनल्टी शूट आउट दोन्ही संघांसाठी विलक्षण वेदनादायी आणि अन्यायकारक असते. सामना अतिरिक्त वेळेत संपला हे चांगले झाले.

गोल्डन ग्लव्स- नेऊर गोल्डन बॉल - मेस्सी गोल्डन बूट - जेम्स रोड्रीगेझ.

काल जर्मनी वि अर्जेंटिना.... मेर्केलबाई वचन दिल्याप्रमाणे म्याच बघायला जातीने हजर राहिल्या होत्या.. म्याचची सुरुवात झाल्यापासून दोघेही संघ सावध खेळत होते. नंतर थोडा धसमुसळेपणा वाढला पण बचाव भक्कम होता.. क्लोजला शेवटच्या ५ मि.त बदलून ग्योट्झंला आणला योगीने आणि त्याने गोल केला.. लगेच इकडे रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न्स्,पिपाण्या वाजवणे चालू झाले.. स्वाती

मस्त सामना झाला. अपेक्षेप्रमाणेच जर्मनीच जिंकले. हरल्यानंतर मेस्सीच्या चेहर्‍यावरील पराभवाच्या वेदना बघवत नव्हत्या. श्वाईनस्टायगरची कमाल आहे. कालच्या सामन्यात त्याला किमान ७-८ वेळा पाडले गेले (किंवा तो पडला). शेवटी तर उजव्या भुवईखालून रक्त पण आले. पण पट्ठ्या डगमगला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने सामना सोडला नाही. इतक्या दुखापतीनंतरसुद्धा खेळत राहण्याचा त्याचा निर्धार कौतुकास्पद होता. तशा दोन्ही संघांनी बर्‍याच संधी गमाविल्या. पण गोट्झेने केलेला गोल अप्रतिम होता आणि दोन्ही संघातला तोच मुख्य फरक ठरला.

बऱ्याच लोकांच्या मते (यात माराडोना आणि मी देखील समाविष्ट) मेस्सी ला मिळालेला गोल्डन बॉल केवळ फिफा आणि अएदिदस यांची केवळ मार्केटिंग टेक्निक आहे. माझ्या मते मास्चेरान्हो (आर्जेन्टिना) हा पुरस्कारासाठी सर्वात प्रबळ दावेदार होता. रोद्रिगेझ, मुल्लर, रोब्बेन, नेय्मार (तो गेल्याबरोबर ब्राझील चे हाल बघा) यांचा खेळ देखील उत्तम होता. मेस्सी नक्कीच या सर्वांपेक्षा अधिक गुणवान खेळाडू आहे, पण बाद फेरीपासून त्याला फारसा प्रभाव पाडता नाही आला. आणि जर्मनी, कोलंबिया, होल्लेंड एवढा आर्जेन्टिना चा गट देखील कठीण नव्हता.