✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 06/28/2014 - 09:41  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने. राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.


  उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल)   
४ जुलै  फ्रान्स वि.जर्मनी रात्री ९:३०
४ जुलै  ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०
५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०
५ जुलै नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)
८ जुलै  ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०
९ जुलै  अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै  ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०
         अंतिम सामना  
१३ जुलै    जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany
Argentina
Argentina
1
NEUER
(GK)
1
ROMERO
(GK)
2
GROßKREUTZ
2
GARAY
3
GINTER
3
CAMPAGNARO
4
HÖWEDES
4
ZABALETA
5
HUMMELS
5
GAGO
6
KHEDIRA
6
BIGLIA
7
SCHWEINSTEIGER
7
DI MARIA
8
ÖZIL
8
PEREZ
9
SCHÜRRLE
9
HIGUAIN
10
PODOLSKI
10
MESSI
11
KLOSE
11
M. RODRIGUEZ
12
ZIELER
(GK)
12
ORION
(GK)
13
MÜLLER
13
A. FERNANDEZ
14
DRAXLER
14
MASCHERANO
15
DURM
15
DEMICHELIS
16
LAHM
16
ROJO
17
MERTESACKER
17
F. FERNANDEZ
18
KROOS
18
PALACIO
19
GÖTZE
19
ALVAREZ
20
BOATENG
20
AGUERO
21
MUSTAFI
21
ANDUJAR
(GK)
22
WEIDENFELLER
(GK)
22
LAVEZZI
23
KRAMER
23
BASANTA
Coach                                   Coach
Joachim LOEW (GER)                                            Alejandro SABELLA (ARG)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51026 वाचन

💬 प्रतिसाद (151)

प्रतिक्रिया

ब्राझिलचा कोलंबियावर २-१ असा

शिद
Sat, 07/05/2014 - 03:39 नवीन
ब्राझिलचा कोलंबियावर २-१ असा विजय. डेविड लुईझ सामनावीर. आता पहिली सेमिफायनल ८ जुलैला ब्राझिल वि. जर्मनी.
  • Log in or register to post comments

बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 08:22 नवीन
बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच सर्व फूटबॉल शौकिनांसाठी लै धक्कादायक. नेमार विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर. एकंदरीत ब्राझीलच्या पुढच्या वाटचालीला हा प्रचंड धक्का आहे.
  • Log in or register to post comments

अरेरे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2014 - 10:05 नवीन
च्यायला, आमचा भरवसा नेयमारवर त्याच्या आक्रमणामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण यायचं. आता आमचं काय खरं नाय दिसत. जर्मनी जाते वाटतं अंतिम सामन्यात. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चला,सज्ज व्हा अर्जेंटीना -

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 21:11 नवीन
चला,सज्ज व्हा अर्जेंटीना - बेल्जियम सामना पाहायला. जादुगार मेस्सीमुळे हां सामना अर्जेंटीना जिंकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

चला आणखी रंगतदार सामन्यांकडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2014 - 21:15 नवीन
अर्जेंटीना वि. बेल्जियम आणि नेदरलँड वि.कोस्टारिका असे दोन्ही सामने आज रात्री होत आहेत. पैकी एक चांगला सामना आज अर्जेंटीना वि. बेल्जियम यांच्यात  बघायला मिळणार आहे. अर्जेंटीनाचा फॉर्म मधे असलेला कर्णधार मेस्सीवर सर्व सामन्याची दारोमदार आहे. Image removed.

अर्जेंटीनाचा देव लिओनेल मेस्सी

मेस्सीला संघातील खेळाडु कसे साथ देतात त्यावरही अर्जेंटीनाचा विजय अवलंबुन असेल. दुसरीकडे बेल्जियमचे ब्रुईन, ई.हजार्ड,  डी. ऑरीजी, यांच्यावर बेल्जियमची खरी भिस्त आहे. एक चांगला सामना थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. दुसरया सामन्यात नेदरलँड वि. कोष्टारिका या सामन्या नेदरलँड (नारंगी सेना) बाजी मारेल असे वाटते. नेदरलँडने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. कर्णधार रॉबीन व्हॅन पर्सी आणि रॉबेन ही जोडी सध्या फॉर्मात आहे. कोस्टारिका नेदरलँडच्या तुलनेत कमी अनुभवी असले तरी चमत्कार करु शकतात. परंतु सर्वाधिक विजयाची शक्यता नेदरलँडचीच वाटते. फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हिग्युएनचा सुरेख गोल.

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 21:47 नवीन
हिग्युएनचा सुरेख गोल. त्याआधी मेस्सिने स्वत:भोवतीच गिरक्या घेत बेल्जियनांना नाचवलं ते केवळ लाजवाब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजा येतेय. पहिला हाप संपला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2014 - 22:19 नवीन
रंगतदार सामना उत्तोरोत्तर रंगतदार होतोय. अर्जेंटीना 1-बेल्जियम 0 दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बेल्जियन लै धसमुसळा खेळ

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 22:23 नवीन
बेल्जियन लै धसमुसळा खेळ करताहेत. जाम पाडापाडी करायलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेल्जियमची शेवटचा एक मिनिट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2014 - 23:25 नवीन
बेल्जियमचा शेवटचा मिनिट आणि ते बाहेर जाणार काही प्रयत्न उत्तम होते. अर्जेंटीना सेमीफायनल मधे पोहोचले 1-0 दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा

हाडक्या
Wed, 07/09/2014 - 16:36 नवीन
फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.
बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा

हाडक्या
Wed, 07/09/2014 - 16:50 नवीन
फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.
बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं जखमेवर मिठ नका चोळू. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/09/2014 - 17:39 नवीन
च्यायला, काल ब्राझील जे हरलं त्याच्यामुळे मला करमू नै राह्यलं सालं इतका बोगस खेळ झाला की दर मिनिटाला हळहळत होतो. काल जर्मनी इतकी सुरेख खेळली की १०-० झाले असते तरी मला वाईट वाट्लं नसतं. अजिबात खेळ करता आला नाही ब्राझीलला. दुस-या हाफ मधे ब्राझीलने आक्रमण केलं परंतु तेव्हा खूप उशीर झालेला होता. संपूर्ण जर्मनी संघ गोल करायच्या मुड मधे होता आणि ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं. एक ऑसकरचा गोल सोडला आणि काही आक्रमणात गोल करण्याची संधी मिळाली परंतु गोल करता आला नाही. पण सामना केवळ सुप्पर झाला. जर्मनी निर्विवाद विजयी होते. त्यांनी ब्राझीलवासियांनाही आपल्या खेळाने वेड लावलं. असो, ब्राझील काय अन जर्मनी काय खेळेल त्याच्या बाजूने आपण नैका. आमचा झेंडा आता जर्मनीचा. :) आज अर्जेंटीना आणि नेदरलँड यांच्यात नेदरलँड जिंकेल असे वाटते. एकटा मेस्सी काही करु शकत नाही. बाकी, खेळ पाहू कालच्या सामन्यासारखा मजा यावी. म्हणजे झोपेचं केलेल्या बलिदानाचं काही वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ब्राझील कुठे कुठे झाकू असं

हाडक्या
Wed, 07/09/2014 - 19:26 नवीन
ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं
हा हा हा ..!! आमचा या वेळचा ब्राझील-विरोध (आणि नेहमीचे युरोपीय फुटबॉल समर्थन) काल कामी आले. सगळे ब्राझील समर्थक मित्र फोन बंद करून बसले होते. आज 'सिल्वा नव्हता रे' (नेमार नव्हे!), नायतर सिल्वाने दोन तीन तरी वाचवले असते म्हणे.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्जेन्टिना १-० ने विजयी

खटपट्या
Sat, 07/05/2014 - 23:26 नवीन
आर्जेन्टिना १-० ने विजयी आर्जेन्टीना चे आणखी दोन गोल सहज झाले असते. शेवटच्या मिनिटाला तर मेसिला सुवर्ण संधी होती
  • Log in or register to post comments

हॉलंड विरुद्ध नेदरलैंड अतिशय

खटपट्या
Sun, 07/06/2014 - 01:51 नवीन
हॉलंड विरुद्ध नेदरलैंड अतिशय रटाळ खेळ चालू आहे. दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्नही करत नाहीयेत
  • Log in or register to post comments

हॉलंडचा पेनल्टी शुटआऊट मध्ये

शिद
Sun, 07/06/2014 - 04:22 नवीन
हॉलंडचा पेनल्टी शुटआऊट मध्ये ४-३ ने कोस्टारीकावर विजय. आता हॉलंड ९ जुलैला सेमी-फायनल मध्ये भिडणार अर्जेंटीना बरोबर.
  • Log in or register to post comments

नेदरलँड जिंकले !!!!!!

वेल्लाभट
Sun, 07/06/2014 - 08:58 नवीन
नेदरलँड जिंकले !!!!!! पण कोस्टा रिका ने मनं जिंकली राव.... लई चिवट. जबराट !आवडले लोक. सेमी फायनल मधे कुणाला सपोर्ट करू कळत नाहीये. पण नाही; नेदरलँड च. सही खेळ करताय्त. लुई वॅन हाल.... नेदरलँड मॅनेजर... भावी युनायटेड मॅनेजर आहे ही सुखद बाब आहे.
  • Log in or register to post comments

क्रल

sagarpdy
Mon, 07/07/2014 - 11:40 नवीन
ऐन वेळी गोलकीपर बदलण्याची चाल केवळ अफलातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

पेनल्टि शूट आउट बघणे आज तरी

कंजूस
Sat, 07/12/2014 - 22:01 नवीन
पेनल्टि शूट आउट बघणे आज तरी शिर्षी मा लिख मा लिख मा लिख मेस्सी .
  • Log in or register to post comments

चला मंडळी... अंतिम सामन्याकडे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/12/2014 - 22:39 नवीन
आज ब्राझील आणि नेदरलँड यांच्यात तिसर्‍या स्थानासाठी सामना होत आहे, ब्राझील आपली आबरु वाचवतो का एवढाच तो प्रश्न. बाकी उद्या अर्जेंटीना वि. जर्मनी या सामन्यात जर्मनीची बाजू वरचढ दिसते आहे. अर्जेंटीनाकडे मेस्सी सोडला तर दुसरा खेळाडूचे नाव दिसत नाही. मेस्सीपेक्षा जर्मनांकडे भरपुर आक्रमण आहे, उत्तम पासेस आहेत आणि गोल करण्याची क्षमता त्यांच्या प्रत्येक खेळाडू दिसते. हा सामना मला जर्मनी वि. मेस्सी असा वाटतो.

Image removed.

(छायाचित्र फिफावरुन) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चला आज अंतिम सामना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/13/2014 - 17:55 नवीन

विश्वचषकात अतिशय सुरेख खेळ करणारे आणि स्पर्धेत ब्राझीलचा पराभव करुन विजय मिळवणारे नेदरलँडचे हिरो.

Image removed.Image removed. Image removed.

रॉबिन व्हॅन पर्सी                      जॉर्जिनो विनाल्ड                  डॅले ब्लिंड

 

मंडळी, कालचा ब्राझीलसाठी प्रतिष्ठेचा असलेला सामनाही ब्राझीलला ३-० ने गमवावा लागला. जर्मनीकडून झालेल्या मानहानिकारक पराभवातून ब्राझील सावरलेच नाहीत. नेदरलँडने या विश्वचषकात रसिकांची मनं जिंकली असे मी म्हणेन. रॉबिन व्हॅन पर्सी, डॅले ब्लिंडने आणि शेवटी  जॉर्जिनो विनाल्डमने गोल करुन थाटात विजयी समारोप या स्पर्धेचा केला.


आज जर्मनी आणि अर्जेंटीनाचा सामना रात्री साडेबारा वाजता होतोय. बघायला विसरु नका. जर्मनीचीच विजयाची शक्यता आहे.

-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बघणार

प्रचेतस
Sun, 07/13/2014 - 18:17 नवीन
बघणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धो डालेंगे..

स्वाती दिनेश
Sun, 07/13/2014 - 19:51 नवीन
म्याच साठी जर्मनी बिअरचे क्यान घेऊन स्टेडियम्स,स्पोर्ट्बार,ब्रांडॅनबुर्ग टोअर अशा पब्लिक व्ह्यूइंग प्लेसेस मध्ये तय्यार आहे...
  • Log in or register to post comments

चला, सामना सुरु झाला.

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 00:41 नवीन
चला, सामना सुरु झाला.
  • Log in or register to post comments

अजुन तरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 00:51 नवीन
ब्चावाचे धोरण दोन्ही संघाचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आर्जेन्टीना ने एक चांगली संधी

खटपट्या
Mon, 07/14/2014 - 00:53 नवीन
आर्जेन्टीना ने एक चांगली संधी गमावली
  • Log in or register to post comments

जर्मनीच्या क्रूसचा हा

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 00:56 नवीन
जर्मनीच्या क्रूसचा हा चुकलेला पास जर्मनीला भलताच महागात पडला असता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओफ्फ साईड

खटपट्या
Mon, 07/14/2014 - 01:01 नवीन
ओफ्फ साईड
  • Log in or register to post comments

हिग्युएनने गोल केला पण ऑफसाईड

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 01:03 नवीन
हिग्युएनने गोल केला पण ऑफसाईड असल्याने पंचांनी दिला नाही. जर्मनी परत बचावले तत्पुर्वी मध्यरक्षक श्वाईनस्टायगरला पिवळे कार्ड मिळाले.
  • Log in or register to post comments

पहिला हाफ संपतोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 01:16 नवीन
मेस्सी आणि त्याची टीम चांगले आक्रमण करते आहे, जर्मनीला आपल्या फॉर्म मधे येणे गरजेचे.
  • Log in or register to post comments

हाफ टाइम ०-०

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 01:19 नवीन
हाफ टाइम ०-० जर्मनांचा हेडर अर्जेण्टीनाच्या गोलपोस्टच्या क्रॉस बारला धडकून माघारी.
  • Log in or register to post comments

दोन्ही संघ असेच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 01:58 नवीन
खेळत राहिले तर पेनाल्टी शूटला जाईल सामना..
  • Log in or register to post comments

अगदी.

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 02:09 नवीन
अगदी. दोन्ही संघांचा बचाव भक्कम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अल्विदा क्लोस

खटपट्या
Mon, 07/14/2014 - 02:19 नवीन
अल्विदा क्लोस
  • Log in or register to post comments

Extra Time

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 02:27 नवीन
दोन्ही संघाच्या बचावाच्या धोरणामुळे सामना अधिकच्या वेळात पोहच्लाय. राहिलेल्या तीस मिनिटात कोण गोल करतंय ते पाहू या....नाही तर आहेच पेनाल्टी शूट.
  • Log in or register to post comments

आता शेवटची १५ मिनिटे,नाहीतर

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 02:46 नवीन
आता शेवटची १५ मिनिटे,नाहीतर पेनल्टी शूट आऊट.
  • Log in or register to post comments

जर्मनी 1-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 02:57 नवीन
गोयेत्जचा चांगला गोल सामना संपत येतोय.
  • Log in or register to post comments

जर्मनीच्या गोएट्झेचा अफलातून

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 02:58 नवीन
जर्मनीच्या गोएट्झेचा अफलातून गोल.छातीने चेंडू अडवून टप्पा पडू न देताच जोरदार किक. च्यान्सेलर मर्केलबै खुश.
  • Log in or register to post comments

विश्वकरंडक जर्मनीकडे.

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 03:08 नवीन
विश्वकरंडक जर्मनीकडे.
  • Log in or register to post comments

+1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/14/2014 - 03:12 नवीन
सुरेख गोल ! आणि उत्तम सांगता. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पेनल्टी शूट आउट दोन्ही

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 03:18 नवीन
पेनल्टी शूट आउट दोन्ही संघांसाठी विलक्षण वेदनादायी आणि अन्यायकारक असते. सामना अतिरिक्त वेळेत संपला हे चांगले झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोल्डन ग्लव्स- नेऊर

प्रचेतस
Mon, 07/14/2014 - 03:29 नवीन
गोल्डन ग्लव्स- नेऊर गोल्डन बॉल - मेस्सी गोल्डन बूट - जेम्स रोड्रीगेझ.
  • Log in or register to post comments

ओहो..

स्वाती दिनेश
Mon, 07/14/2014 - 10:00 नवीन
काल जर्मनी वि अर्जेंटिना.... मेर्केलबाई वचन दिल्याप्रमाणे म्याच बघायला जातीने हजर राहिल्या होत्या.. म्याचची सुरुवात झाल्यापासून दोघेही संघ सावध खेळत होते. नंतर थोडा धसमुसळेपणा वाढला पण बचाव भक्कम होता.. क्लोजला शेवटच्या ५ मि.त बदलून ग्योट्झंला आणला योगीने आणि त्याने गोल केला.. लगेच इकडे रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न्स्,पिपाण्या वाजवणे चालू झाले.. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त सामना झाला.

श्रीगुरुजी
Mon, 07/14/2014 - 12:52 नवीन
मस्त सामना झाला. अपेक्षेप्रमाणेच जर्मनीच जिंकले. हरल्यानंतर मेस्सीच्या चेहर्‍यावरील पराभवाच्या वेदना बघवत नव्हत्या. श्वाईनस्टायगरची कमाल आहे. कालच्या सामन्यात त्याला किमान ७-८ वेळा पाडले गेले (किंवा तो पडला). शेवटी तर उजव्या भुवईखालून रक्त पण आले. पण पट्ठ्या डगमगला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने सामना सोडला नाही. इतक्या दुखापतीनंतरसुद्धा खेळत राहण्याचा त्याचा निर्धार कौतुकास्पद होता. तशा दोन्ही संघांनी बर्‍याच संधी गमाविल्या. पण गोट्झेने केलेला गोल अप्रतिम होता आणि दोन्ही संघातला तोच मुख्य फरक ठरला.
  • Log in or register to post comments

शुल्लर ,मुल्लर ,मेस्सी नाही

कंजूस
Mon, 07/14/2014 - 14:23 नवीन
शुल्लर ,मुल्लर ,मेस्सी नाही क्लोस .शेवटी हिरो ठरला ग्योटझ .
  • Log in or register to post comments

सौजन्यः इ-सकाळ

शिद
Mon, 07/14/2014 - 17:18 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

आपुन तो पैलेच बोला था..

मुक्त विहारि
Tue, 07/15/2014 - 00:02 नवीन
जर्मनी
  • Log in or register to post comments

आताच टीमचा स्वागत समारंभ

कंजूस
Tue, 07/15/2014 - 17:17 नवीन
आताच टीमचा स्वागत समारंभ पाहिला ।अगदी शिस्तीत झाला .कोणीही स्वत:कडे श्रेय घेतले नाही .
  • Log in or register to post comments

पण हे झाले (आपल्या)

हाडक्या
Tue, 07/15/2014 - 21:03 नवीन
पण हे झाले (आपल्या) साहेबांच्या धोरणांमुळे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

जर्मनी जिंकले आठवत राहील तो मेस्सी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/15/2014 - 21:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा