Skip to main content

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 28/06/2014 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने. राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.


  उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल)   
४ जुलै  फ्रान्स वि.जर्मनी रात्री ९:३०
४ जुलै  ब्राझील वि. कोलंबिया
पहाटे १:३०
५ जुलै
अर्जेंटीना वि. बेल्जियम.
रात्री ९:३०
५ जुलै नेदरलँड वि.कोस्टारिका
पहाटे  १:३०

उपांत्य फेरी (सेमी फायनल्स)
८ जुलै  ब्राझील वि. जर्मनी
पहाटे १:३०
९ जुलै  अर्जेंटीना वि. नेदरलँड
पहाटे १:३०

 तिसर्‍या स्थानासाठी

१२ जुलै  ब्राझील वि. नेदरलँड
पहाटे  १:३०
         अंतिम सामना  
१३ जुलै    जर्मनी वि. अर्जेंटीना
रात्री १२:३०

Germany                                                                         
Germany
Argentina
Argentina
1
(GK)
1
(GK)
2
3
5
6
8
8
10
11
12
(GK)
12
(GK)
13
14
15
16
16
18
18
19
19
20
20
21
21
(GK)
(GK)
22
23
23
Coach                                   Coach
Joachim LOEW (GER)                                            Alejandro SABELLA (ARG)

वाचने 51168
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

लेट देम फॉलो ब्राझिल... लेट देम वरशिप मेस्सी.... यू हॅव बीन माय फेवरीट, क्लोज!! klose1 klose2 klose3

अमेरिकन भूमीवर युरोपिअन संघ कधीही विश्वविजेते ठरलेले नाहीत. युरोपच्या भूमीवर मात्र अमेरिकन संघाने विश्वविजेतेपद मिळविले आहे. हा इतिहास अमेरिकन संघांच्या बाजूने आहे. याच भरवश्यावर ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया व कोस्टा रिका असतील. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले ८ संघ बघता, ब्राझील, अर्जेंटिना, नेदरलँड्स व जर्मनी हे उपांत्य फेरीत पोहोचतील असं वाटतंय. कोलंबिया व फ्रान्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धक्का देऊ शकतील. तेवढी क्षमता त्यांच्यात आहे. पण बेल्जिअम व कोस्टा रिकाला फारशी संधी नाही. अंतिम फेरीत जर्मनी व नेदरलँड्स यापैकी एकजण नक्की असणार.

नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही. माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा अंतिम सामना पण बघायला मिळू शकेल.

नेदरलँड्स साखळी सामन्यातच गारद होणार असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं. मागच्या स्पर्धेवेळी जशी जर्मनीची तरुण टीम होती तशी नेदरलँड्स ची या वेळची आहे (अर्थात तेवढी तांत्रिकदृष्ट्या चांगली वाटत नसली तरी). पठ्ठ्यानी कठीण सामन्यात विजयश्री या ना त्या मार्गे मिळवलीच (१००% रेकॉर्ड आहे स्पर्धेत). स्वतःच्या तांत्रिक कमतरतांवर अधिक शारीरिक खेळ व 'टोटल फुटबॉल' चे तत्त्व यांनी मात करत आहेत.स्वित्झर्लंड प्रमाणेच बेल्जियम देखील आर्जेन्टिनाला कडवी झुंज देऊ शकतो. जर हा सामनाही १२० मिनिटापर्यंत लांबला तर अर्जेन्तिनाला थकव्यामुळे नेदरलँड्स ला सामोरे जाणे सोपे राहणार नाही. माझ्या मते अंतिम सामना ब्राझील वि. नेदरलँड्स असा होईल

ही बातमी वाचा ! ७ खेळाडूंना ताप ! आज दमट आणि उष्ण हवामानात फिटनेस महत्वाचा आहे

In reply to by प्रचेतस

फ्रान्स ला निरोप द्यायची वेळ येत आहे असे वाटते. 78 मिनिटांचा खेळ संपत येतोय. सर्व क्षेत्रात संपन्न सक्षम अशा खेळाडूचा भरणा असलेल्या फ्रान्सला अजुन गोल नोंदवता आलेला नाही. असेच राहिले तर शेवटी काही चमत्कार करतील ते असे काही वाटत नाही.

In reply to by प्रचेतस

बेन्झिमा ला शेवटच्या काही क्षणात संधी आली होती पण जमले नाही. जर्मनी 1-0ने विजयी. चांगला सामना झाला. आता ब्राझिलचा सामना पाहण आहे पण झोप येतेय. हजर होतो एक डुलकी मारून. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटची चार मिनिटे फ्रांससाठी नाही तर 2018 ची वाट पाहावी लागेल :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटचे ३० सेकंद बाकी असताना बेन्झेमाचा जोरकस प्रयत्न जर्मन गोलरक्षक न्यूमरने विफल केला. जर्मनी उपांत्य फेरीत.

सामना चालू होतो न होतो तोच नेमारने दिलेल्या कॉर्नर-किकच्या पास वर कॅप्टन सिल्वाचा ७ व्या मी. बाझिलचा पहीला गोल.

In reply to by खटपट्या

हाफ टाईम मध्ये दोन्ही टिमकडून जबरदस्त झटापटीचा सामना झाला. आता बघू पुढच्या हाफ मध्ये काय होतं ते.

In reply to by शिद

लुईजने ब-याच दुरुन किक मारुन गोल केला. सुप्पर गोल. -दिलीप बिरुटे

ब्राझिलचा गोलकिपर सिजरच्या चुकीमुळे त्याला पिवळं कार्ड मिळालं पण त्याचबरोबर कोलंबियाला पेनल्टी किकचे बक्षीस. मिळालेल्या संधीचा फायदा घेत जेम्स रॉड्रिग्जने कोलंबियासाठी ८० व्या मी. पहीला गोल केला. जेम्स रॉड्रिग्जचा ह्या वर्ल्डकप मधील ६ वा गोल. गोल्डन बुटाकडे वाटचाल.

कोलंबियन गोलकिपरला गोलपोस्ट वरुन किक मारताना अडथळा आणल्यामुळे ब्राझिलचा कॅप्टन सिल्वाला पंचातर्फे पिवळं कार्ड. Silva ब्राझिल जर जिंकून सेमी-फायनलला पोहोचली तर सिल्वा केलेल्या चुकीमुळे त्या मॅचला मुकणार.

बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच सर्व फूटबॉल शौकिनांसाठी लै धक्कादायक. नेमार विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर. एकंदरीत ब्राझीलच्या पुढच्या वाटचालीला हा प्रचंड धक्का आहे.

In reply to by प्रचेतस

च्यायला, आमचा भरवसा नेयमारवर त्याच्या आक्रमणामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण यायचं. आता आमचं काय खरं नाय दिसत. जर्मनी जाते वाटतं अंतिम सामन्यात. :( -दिलीप बिरुटे

चला,सज्ज व्हा अर्जेंटीना - बेल्जियम सामना पाहायला. जादुगार मेस्सीमुळे हां सामना अर्जेंटीना जिंकेल असे वाटते.

अर्जेंटीना वि. बेल्जियम आणि नेदरलँड वि.कोस्टारिका असे दोन्ही सामने आज रात्री होत आहेत. पैकी एक चांगला सामना आज अर्जेंटीना वि. बेल्जियम यांच्यात  बघायला मिळणार आहे. अर्जेंटीनाचा फॉर्म मधे असलेला कर्णधार मेस्सीवर सर्व सामन्याची दारोमदार आहे.

अर्जेंटीनाचा देव लिओनेल मेस्सी

मेस्सीला संघातील खेळाडु कसे साथ देतात त्यावरही अर्जेंटीनाचा विजय अवलंबुन असेल. दुसरीकडे बेल्जियमचे ब्रुईन, ई.हजार्ड,  डी. ऑरीजी, यांच्यावर बेल्जियमची खरी भिस्त आहे. एक चांगला सामना थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. दुसरया सामन्यात नेदरलँड वि. कोष्टारिका या सामन्या नेदरलँड (नारंगी सेना) बाजी मारेल असे वाटते. नेदरलँडने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. कर्णधार रॉबीन व्हॅन पर्सी आणि रॉबेन ही जोडी सध्या फॉर्मात आहे. कोस्टारिका नेदरलँडच्या तुलनेत कमी अनुभवी असले तरी चमत्कार करु शकतात. परंतु सर्वाधिक विजयाची शक्यता नेदरलँडचीच वाटते. फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिग्युएनचा सुरेख गोल. त्याआधी मेस्सिने स्वत:भोवतीच गिरक्या घेत बेल्जियनांना नाचवलं ते केवळ लाजवाब.

In reply to by प्रचेतस

बेल्जियमचा शेवटचा मिनिट आणि ते बाहेर जाणार काही प्रयत्न उत्तम होते. अर्जेंटीना सेमीफायनल मधे पोहोचले 1-0 दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.
बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा एक सरस टीम असतांना केवळ एक गोल दोन गोलांवर विजय मिळत आहेत, हे पाहतांना बरे वाटत नाही. धडाकेबाज खेळात तीन चार गोल व्हावेत अर्थात असे होत नाही कारण दोनही संघ सक्षम असतात बचावाच्या बाबतीत तरीही असं सामन्यात दिसत नाही.
बिरुटे सर, जर्मनीने तुमचं म्हणणं लईच मनावर घेतलं बघा. ब्राझीलवर तब्बल ७ (सात) गोल केलेत !! आता यात एक दोन विश्व-चषक निघतील ब्राझीलवाल्यांचे.. :)

In reply to by हाडक्या

च्यायला, काल ब्राझील जे हरलं त्याच्यामुळे मला करमू नै राह्यलं सालं इतका बोगस खेळ झाला की दर मिनिटाला हळहळत होतो. काल जर्मनी इतकी सुरेख खेळली की १०-० झाले असते तरी मला वाईट वाट्लं नसतं. अजिबात खेळ करता आला नाही ब्राझीलला. दुस-या हाफ मधे ब्राझीलने आक्रमण केलं परंतु तेव्हा खूप उशीर झालेला होता. संपूर्ण जर्मनी संघ गोल करायच्या मुड मधे होता आणि ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं. एक ऑसकरचा गोल सोडला आणि काही आक्रमणात गोल करण्याची संधी मिळाली परंतु गोल करता आला नाही. पण सामना केवळ सुप्पर झाला. जर्मनी निर्विवाद विजयी होते. त्यांनी ब्राझीलवासियांनाही आपल्या खेळाने वेड लावलं. असो, ब्राझील काय अन जर्मनी काय खेळेल त्याच्या बाजूने आपण नैका. आमचा झेंडा आता जर्मनीचा. :) आज अर्जेंटीना आणि नेदरलँड यांच्यात नेदरलँड जिंकेल असे वाटते. एकटा मेस्सी काही करु शकत नाही. बाकी, खेळ पाहू कालच्या सामन्यासारखा मजा यावी. म्हणजे झोपेचं केलेल्या बलिदानाचं काही वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझील कुठे कुठे झाकू असं चाललेलं होतं
हा हा हा ..!! आमचा या वेळचा ब्राझील-विरोध (आणि नेहमीचे युरोपीय फुटबॉल समर्थन) काल कामी आले. सगळे ब्राझील समर्थक मित्र फोन बंद करून बसले होते. आज 'सिल्वा नव्हता रे' (नेमार नव्हे!), नायतर सिल्वाने दोन तीन तरी वाचवले असते म्हणे.. :D

आर्जेन्टिना १-० ने विजयी आर्जेन्टीना चे आणखी दोन गोल सहज झाले असते. शेवटच्या मिनिटाला तर मेसिला सुवर्ण संधी होती

हॉलंडचा पेनल्टी शुटआऊट मध्ये ४-३ ने कोस्टारीकावर विजय. आता हॉलंड ९ जुलैला सेमी-फायनल मध्ये भिडणार अर्जेंटीना बरोबर.

नेदरलँड जिंकले !!!!!! पण कोस्टा रिका ने मनं जिंकली राव.... लई चिवट. जबराट !आवडले लोक. सेमी फायनल मधे कुणाला सपोर्ट करू कळत नाहीये. पण नाही; नेदरलँड च. सही खेळ करताय्त. लुई वॅन हाल.... नेदरलँड मॅनेजर... भावी युनायटेड मॅनेजर आहे ही सुखद बाब आहे.

आज ब्राझील आणि नेदरलँड यांच्यात तिसर्‍या स्थानासाठी सामना होत आहे, ब्राझील आपली आबरु वाचवतो का एवढाच तो प्रश्न. बाकी उद्या अर्जेंटीना वि. जर्मनी या सामन्यात जर्मनीची बाजू वरचढ दिसते आहे. अर्जेंटीनाकडे मेस्सी सोडला तर दुसरा खेळाडूचे नाव दिसत नाही. मेस्सीपेक्षा जर्मनांकडे भरपुर आक्रमण आहे, उत्तम पासेस आहेत आणि गोल करण्याची क्षमता त्यांच्या प्रत्येक खेळाडू दिसते. हा सामना मला जर्मनी वि. मेस्सी असा वाटतो.

(छायाचित्र फिफावरुन) -दिलीप बिरुटे

विश्वचषकात अतिशय सुरेख खेळ करणारे आणि स्पर्धेत ब्राझीलचा पराभव करुन विजय मिळवणारे नेदरलँडचे हिरो.

रॉबिन व्हॅन पर्सी                      जॉर्जिनो विनाल्ड                  डॅले ब्लिंड

 

मंडळी, कालचा ब्राझीलसाठी प्रतिष्ठेचा असलेला सामनाही ब्राझीलला ३-० ने गमवावा लागला. जर्मनीकडून झालेल्या मानहानिकारक पराभवातून ब्राझील सावरलेच नाहीत. नेदरलँडने या विश्वचषकात रसिकांची मनं जिंकली असे मी म्हणेन. रॉबिन व्हॅन पर्सी, डॅले ब्लिंडने आणि शेवटी  जॉर्जिनो विनाल्डमने गोल करुन थाटात विजयी समारोप या स्पर्धेचा केला.


आज जर्मनी आणि अर्जेंटीनाचा सामना रात्री साडेबारा वाजता होतोय. बघायला विसरु नका. जर्मनीचीच विजयाची शक्यता आहे.

-दिलीप बिरुटे

म्याच साठी जर्मनी बिअरचे क्यान घेऊन स्टेडियम्स,स्पोर्ट्बार,ब्रांडॅनबुर्ग टोअर अशा पब्लिक व्ह्यूइंग प्लेसेस मध्ये तय्यार आहे...

हिग्युएनने गोल केला पण ऑफसाईड असल्याने पंचांनी दिला नाही. जर्मनी परत बचावले तत्पुर्वी मध्यरक्षक श्वाईनस्टायगरला पिवळे कार्ड मिळाले.

मेस्सी आणि त्याची टीम चांगले आक्रमण करते आहे, जर्मनीला आपल्या फॉर्म मधे येणे गरजेचे.

हाफ टाइम ०-० जर्मनांचा हेडर अर्जेण्टीनाच्या गोलपोस्टच्या क्रॉस बारला धडकून माघारी.

खेळत राहिले तर पेनाल्टी शूटला जाईल सामना..

दोन्ही संघाच्या बचावाच्या धोरणामुळे सामना अधिकच्या वेळात पोहच्लाय. राहिलेल्या तीस मिनिटात कोण गोल करतंय ते पाहू या....नाही तर आहेच पेनाल्टी शूट.

गोयेत्जचा चांगला गोल सामना संपत येतोय.