Skip to main content

झट्पट दहीवडे

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 05/07/2014 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट दहीवडे साहित्य ... बटर (चहात बुडवून खातात ते.) गोड दही चिंच खजुराची चटणी जिरे पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर कृती............. दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे. एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी. वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे. थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

वाचने 31879
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

पांडवकालीन किंवा सातवाहन काळातले. बाकी, खेकडे जितके जूने तितके चांगले, असे ऐकून आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आधी खेकडे खाऊन मग, बटरवडे खाल्ले की... आधीच मर्कट, तशात मद्द्य प्यायला....अशी गत होते का?

खेकड्याच्या धाग्यावरील भिंगरी ह्यांचा प्रतिसाद चुकून स्वतःच्या 'झटपट दहिवड्या'च्या पाककृतीवर पडल्याने एका चांगल्या पाककृतीच्या धाग्याचा खरडफळा झाला. संपादक मंडळाने वेळीच हालचाल्र करून संबंधीत प्रतिसाद योग्य त्या धाग्यावर हलविला असता तर असा दुर्दैवी प्रकार घडला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य ती कारवाई करता येईलच. पण अर्थात इच्छा असेल तर.

In reply to by प्रभाकर पेठकर

१.काका, मिपावर येऊन किती वर्षे झाली हो तुम्हाला? २. सो स्वीट ३. असाच निरागसपणा जपा. ४. भिंगरी गप्प आणि तुम्हीच भिरभिर ???? ५. टी आर पी काका टी आर पी! ६. हे कुठल्या प्रतिसादाचं विडंबन? थोडा घाईत आहे म्हणून सध्या एवढंच! ;)

In reply to by प्यारे१

डोळे झाकून घ्या!
एका चांगल्या पाककृतीच्या धाग्याचा खरडफळा झाला.
कुठे दहिवडे आणि कुठे हे पोकळ बटरवडे!
संपादक मंडळाने वेळीच हालचाल्र करून संबंधीत प्रतिसाद योग्य त्या धाग्यावर हलविला असता तर असा दुर्दैवी प्रकार घडला नसता.अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य ती कारवाई करता येईलच. पण अर्थात इच्छा असेल तर
च्यायला, श्रद्धांजलीच्या धाग्यावर प्रतिसाद देण्याचा प्रमाद झाला की काय!

धन्यवाद पेठकरभाऊ , अहो पण या चुकीमुळे इथे नवनवीन पदार्थांची रेलचेल झाली. अर्थात माझं भिरभिरं झालं त्यामुळे

सग्गळं सग्गळं झालं इथे पण कोणी मोदींचं नाव काढलं नाही.? मिप्पावालो, जनता तुम्हे माफ नही करेगी..!!

आयोजित केलेल्या अवांतर स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक खेकडा बक्षिस देण्यात येत आहे.(पेठकरकाका सोडून ! ) अ ज्याने त्याने आपापल्या आवडीप्रमाणे त्यावर दही/विरजण घालून घ्यावे.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्यांना लावता येते, त्यांना खेकड्यांना विरजण नक्कीच लावता येईल.

In reply to by स्पा

साहित्य : १. कुठलीही कं. २. कुठलीहा शाखा ३. कुठलाही प्रदेश अथवा राज्य ४. महाराष्ट्र सोडून इतर कुठल्याही प्रदेशातील मॅनेजर आणि ५. बाकी सगळे मराठी कामगार. क्रुती. एकदम साधी आहे. मॅनेजरने ज्याला अजिबात अक्कल नाही अशा मराठी माणसाला, पगार वाढ द्यावी.त्यानंतर मराठी माणसांत आपापसात जे काही घडेल त्याला खेकड्यांचे लोणचे म्हणतात. बादवे, ह्या लोणच्याचा आस्वाद इतर परप्रांतीयच घेतात, हे सांगायला नकोच.

धन्यवाद मिपावाले, माझ्या मिपावरील प्रवेशाच्या पहिल्याच पाककृतीवर इतका प्रतिसाद मिळाला. अजून काही प्रतिसाद आले कि शतक पूर्ण होईल आणि ही सारी किमया माझ्या नजरचुकीमुळे गळपटलेल्या प्रतिसादामुळे. जो भी होता है अच्छे के लिये होता है

दह्यातला खेकडा......मिपाकर कित्ती कित्ती ते आंबटशौकीन !!!!!!

कालच नरकोंडम बेटावरुन परत आलो. काय मस्त साखरेसारखी गोड केळी मिळाली म्हणुन सांगू? अमावस्येच्या आधि उतरवल्या मुळे चांगली भरलेली होती. मग काय चांगली ४०-५० डझन केळी पाठीवर बांधुन घेतली आणि मारली समुद्रात उडी तिकडून बंगालच्या उपसागरातुन पोहत पोहत, कृष्णा, भीमा, मुळा-मुठा मार्गे पुणे गाठले. उद्या म्हणजेच रविवारी नरकोंडम बेटावरची केळी, भरलेले खेकडे, आणि बटर दहिवडे यांचा आस्वाद घेण्यासाठी एक कट्टा रायगडाच्या टकमक टोकावर आयोजीत केला आहे. सर्वांना सस्नेह निमंत्रण. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

उद्या टकमक टोकावरून कुणाकुणाचा कडेलोट होणार आहे? माझा तर आधीच झालाय,चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद देऊन.