Skip to main content

झट्पट दहीवडे

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 05/07/2014 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट दहीवडे साहित्य ... बटर (चहात बुडवून खातात ते.) गोड दही चिंच खजुराची चटणी जिरे पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर कृती............. दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे. एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी. वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे. थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

वाचने 31879
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

अमावास्येला भरलेले खेकडे मिळतात. म्हणजे साधारणपणे अमावास्येच्या दरम्यान मादी अंडी घालते असे म्हणतात म्हणून त्या दरम्यान भरलेले खेकडे मिळतात. कधी अंडी आधी सोडली असतील तर अमावास्येला पोकळ खेकडाच मिळेल.

In reply to by भिंगरी

नरकोंडम बेटावर पण साखर घालावी इतकी गोड आणि उत्कृष्ठ केळी मिळतात. म्हणजे साधारण पणे केळ्यांचा सिझन असेल तर चांगली पिकलेली गोड केळी मिळतात. कधी कधी झाडावरुन अधिच केळी काढलेली असतील तर केळ्यांची साल पण मिळणार नाहीत. पैजारबुवा,

In reply to by भिंगरी

खेकड्यांचे दहीवडे करण्यासाठी खेकडे तळून घ्या॑वेत का...कि तसेच घ्यावेत..? जागू...ए जागू...

In reply to by भिंगरी

ओह शिट !!!! ते किनई माझा नेम चुकला. भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली. आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.

In reply to by भिंगरी

स्वामींनी म्हटलंच आहे : खेकडे पकडून अवसी । कां तें घाली दहीवडे । घेऊ दे प्रतिसाद उसळी । ती येक भंबेरी ॥ ७०॥

कादंबरी फर्फार आवदते. कित्ती कित्ती चान दिसते तिच्या हनु-वटी वरचा तिल कित्ती कित्ती काला दिसतो.

In reply to by स्पा

बाळ असे प्रश्र्ण चारचौघात विचारु नये. संध्याकाळी भेट मग बोलु. पैजारबुवा,

In reply to by स्पा

पैला तर दही विरजनाला लाऊन घ्या .. म्हणजे सात आठ तास सहज त्याच्यातच जातील.. अवांतर(?) - हि पाकृ माहीत नव्हती, नेमकी चव इमॅजिन होत नाहीये, पण सहज जमण्यासारखी असल्याने ट्राय करून बघायला हरकत नाही ! बटर किंचित कमी भिजवून आणि थोडासा कुस्करून त्यात खारी बुंदी पण सोडली तर मस्त चाट तयार होईल असा अंदाज ..

आम्ही नेहमी करतो असे बटरवडे... पण फ्क्त दहीच बनवतो..आंबटगोड चटणी नाही बनवत. गोडदही घेउन ते दहीवड्याला जसे दही बनवतात तसे बनव्ते.. बाकी सगळे भिंगरीने सांगीतल्याप्रमाणे करतो.

ईनोव्हेटिव्ह दहि खेकडे फारच आवडले. फोटो तर फारच ईनो टाईप आलाय. च्यामारी आता हि जळजळ दह्यानी पण थांबायची नाहि.

In reply to by स्पा

पांडू ... अश्या भयकथा लिहायच्या नाहीत.अरे..खय्रा वाटतात ना त्या! :p

In reply to by रेवती

रेवतीताई, असा पोपटाचा जाम होउ नये यासाठी माझ्याकडे खात्रीशीर उपाय आहे. १००% सुरक्षित व आरोग्यदायी. व्य.नि. करावा. =))

In reply to by कवितानागेश

अरेच्चा! अहो? काय चाल्लय? हे "१००% सुरक्षित व आरोग्यदायी" चे पेटंट फक्त आमच्याकडेच आहे बरका. (आमची कोठेही शाखा नाही!!!!)

In reply to by रेवती

नाहि तर काय...? सद्ध्या दहीवडे, खेकडे, पोपट, जाम असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि असा वंचित, गुलाम, लाचार, झापडे लावला गेलेला, स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज सोत्रि, कॉकटेलच्या आहारी गेला तर नवल काय?

In reply to by स्वप्नांची राणी

>>>>स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज सोत्रि, कॉकटेलच्या आहारी गेला तर नवल काय? ह्याला व्यक्तिगत शेरेबाजी, हल्ला मानावे काय? की 'स्वप्नांची राणी' हा सोत्रींचाच डू आयडी आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

खूप लपवण्याचा प्रयत्न केला पण अश्या प्रतिक्रिया येतात की नाइलाजाने सांगावच लागतय....मी ना खर म्हणजे बॅटमॅन चा डू आयडी आहे...*sorry2* *SORRY*

In reply to by स्वप्नांची राणी

म्हणजे "बॅटमॅनच्या स्वप्नांची राणी" असा संधी/समास करायचा काय?

In reply to by आदूबाळ

बापरे...अजून एक भयकथा... हा धागा उघडायचीच भिती वाटतेय आता...

In reply to by प्यारे१

स्पष्टीकरण जाउद्या...यमक काय सॉल्लिड्ड जुळतय ना...!! "भयकथा....भिती वाटतेय आता" लगे हाथ एक डूआयडिष्टक पाडूनच टाकते....काय म्हणता..? (वॉव..परत जूळलं की यमक)

मनमोहक पोटपुजा... पुरा टेस्टी झट्पट दहीवडे :- ही दह्यातली माझा अगदी विक पॉइंट असलेली पाकृ आहे,दही चांगले घट्ट आणि सफक गोड असेल तर तिखट आणि मिरी पावडर घातलेल्या या दह्याची चव केवळ अप्रतिम लागते. ;) चला तर आपण या पाकॄचा फोटो शोधुया. { बदाम एक्का } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

आणि त्यावरचे ईतके मनोरंजक प्रतिसाद शोधुन सापडणार नाहि. सबब संपादकांना विनंती आहे त्यानी हा धागा उडवुन नये. बाकि कुणि नाहि तरि मी मात्र ह्या धाग्याची वाचनखुण साठवतोय. अजुन छप्परफाडु प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

In reply to by दिपक.कुवेत

छ्प्पर फाटले तर दही आत नाही का सांडणार? मग नुसतेच पाण्यात भिजलेले बटर खायला काय मजा येणार?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

घाबरु नका....दहि आत सांडलं तर मँगो मुस मधे घालीन त्याने पॅना कोता मस्त लागेल. अगदि १००% सुरक्षीत आणि आरोग्यदायी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तसं नै कै... काऊनि बतरदहीवदा, मोअकलाया दाहि दिश्या भिजवले पान्यामदये मि, बतर मोजियले सात मीथ, मिरी, सखर आनि पनि कलवल दह्यात असं काहीसं असणार!

In reply to by पिंगू

मराठी पुस्तकांच्या वाचनालयात कमलाबाई ओगल्यांचे रुचिरा आहे कि राव! पैसा ताईंना गावलं बघा.

In reply to by प्रीत-मोहर

झालं आता त्या फुलदाणीतुन खेकडे बाहेर पडुन सगळ्या घरभर धावणार *biggrin*

दरवेळी ईथे चक्कर मारली की ...... दहीवड्यांचे खेकडे,खेकड्यांचे ड्रेस्डेन,ड्रेस्डेनचा उंबरठा,उंबरठ्याचे कुंथणे,कुंथण्यारे पोपट्,पोपटाचा जाम....चक्कर यायला लागते बघा

पदार्थाचे नांव : झटपट पोकळ खेकडे साहित्य : १) अवसेच्या रात्री कधी अंडी आधी सोडली असतील तर, पोकळ खेकडा मिळेल. २) झटपट लाल तिखट ३) (चहात बुडवून खातात ते) काहीही ४) कोथिंबीर-बटर ५) दही-पावडर, मीठ-चटणी, खजुराची- चिंच, गोड-जिरे. कृती : अमावस्येमध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. पोकळ खेकडे कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे. एक मिनिटाने त्यावर फेटलेली दही-पावडर टाकून त्यावर आवडत असल्यास मीठ-चटणी टाकावी. वरून झटपट लाल तिखट ... चवीनुसार टाकावे. कोथिंबीर-बटर टाकून खाण्यास द्यावे. थोडावेळ फ्रीज मध्ये बसल्यास थंडही छान लागते.

वा दिपकराव खेकड्याच्या पाठीत भरलेल्या बटरवड्यांच्या आइस्क्रीमचा फोटु कातील आला आहे. पैजारबुवा,

In reply to by प्यारे१

पॉल अक्टोपसच्या तंगड्यांचे उपवासाचे वडे पाहुन तोंपासु. पैजारबुवा,

In reply to by सूड

अहो खेकडे आहेत म्हटल्यावर माऊताईनी सांगितले ना ते चालणार नाही पळणारच. आणि ते काय तुम्हाला साबुदाण्याचे वडे वाटले काय एकादशीला चालायला :)

In reply to by सखी

>>काय तुम्हाला साबुदाण्याचे वडे वाटले काय एकादशीला चालायला छे हो!! साबुदाण्याचे वडे आज प्लेटमध्ये ठेवून केव्हाची वाट पाहात होतो की आता चालतील मग चालतील, पण अज्जिबात चालले नाहीत. एकादशी असूनसुद्धा !! त्यामानाने ऑक्टोपस चालत असावा. ;)