Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 07/06/2014 - 19:59
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
विडंबन
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
विरंगुळा
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धडाधड आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या घरासमोरच्या वावरा'त पळत गेलो त्यातून आलेली ओलसर श्रद्धा अढळणारे, टराटर(मनास-मोकळे करणारे! *biggrin* ) आवाज न काढण्याची, तसा वात् प्रचार करु न देण्याची दडपशाहीची, बद्ध-कोष्ठाची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (सक्काळी ना...,{लागली नै तरी!}जायलाच हवे असे मत, का कशासाठी{असते}ते ठाऊक नसले तरी चालेल )...म्हणे!!! ;) [*>>> कूंssssथुनी..वर्गा#त सार्‍या..वास माझा वेssगळा हे या तत्वाच्या लोकांचं जीवन सूत्रच!!! #--> इथे वर्ग या शब्दाचा अर्थ,सामाजिक..शालेय..जातीय असा आपापल्या मतीप्रमाणे हावा-तो घ्यावा.नंतर उगीच धागाकर्त्याच्या नावानी कुंथू नये! *biggrin* कारण कोणत्याही वर्गात काहिच अर्थ नसता,तर कुणी तरी त्यात-बसलं असतं का? ..असो!] जुन्या कुंथीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच टारटूर/कूंन्थू..आणि घाई'ची लागणार्‍यांचा-हुतुतू..)असे बरेच वाSतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूSSSळा'कडे जाण्याची प्रेरणा{ढर्रढर्रढरढर...इथे नित्यानुभवाप्रमाणे, भस्सकन कॉक दाबून पाणी सोडल्याचा आवाज आला..} आणी कुंथुन कुंथुन करण्याचा प्रयत्न सर्व वावरां'मध्ये आढळतो. मी आणि मो.फोन, खादाडजग/बद्धकोष्ठी-सृष्टी कशी निर्माण झाली??? इ.इ. चा शोध मानवाने याच कक्षात सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात(भिंतींवर)आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे तिथल्या कार्य-क्रमाचाचा गाडा (सुळूक.सुळूक..)चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे विशेष-पटकन होण्यास मदत होते असे पाली,झुरळं इ.भयप्रद..व वर'च्या कक्षातून गळणारा ठिबक-सिंचनाचा पाऊस(मंजे-वरुन*) {*-म्हणून तो वरुण!..काय अगाध तर्कसंगती लागली...च्यामायला! *biggrin* }, आणि टाकिचे पाणि संपल्यावर नळातून येणारा(नुस्ताच)वारा इ. ना (पटकन होण्याच्या प्रांतातील)देव मानण्याची प्रथा सुरु झाली. बद्धकोष्ठमुक्ती औषधांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी (सर्वसाफ)नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'सांभाळण्या'चे काम सुरु होऊन त्यांना *च-कूपात{*-हा शब्द उघड वाचतांन्नाही अनेकांना अजुन अशौच-येतं..म्हणून फुली टाकली..क्षम-स्व! ;) ..) आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. त्यांचे हाती अनेक (विविक्षीत जागी) ऐनवेळी गुदगुल्या करवणारी अस्त्रे दिली गेली. आणि मग,(होइल की नाही???)या भितीपोटी त्यांची भक्ति सुरु झाली. सुरुवातीला अस्सल परिणामी असलेले हे षड-तंत्र हळूहळू आलेल्या बर्‍याच नवरोगांमुळे टिकेचे लक्ष बनले. काळाच्या ओघात टाइट झालेली आणि (काहिशी) सुटत आलेली,ढेरी इ. निकष मानून मजबूत केली गेलेली आतडीव्यवस्था ह्यांच्या-आतून,ढामढूमधडामधुडूम..आवाजी-मुख्य-कर्म आणि त्याचे कार्यस्थान असलेला परम-अर्थ सातत्याने पोट-कैदेत राहिला. सातत्याने होणारी खाद्यीय आक्रमणे,जिभेची गुलामगिरी,अकारण खाद्यार्थ-हिंसा(ए....कोण रे तो नॉनव्हेज खाणं..म्हणतोय!?), हार्ड वारूणी-करुणा यामुळे त्या पोटातील खाद्यात्मिक सूज आलेला स'माज,खर्‍या (प्रातःकालीन)परमार्थापासून सतत वंचितच राहिला. याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच चिकटलेले आणि कधीही पटकन न होऊ-देणारे भ्रम (इल्यूजन){इथे..लूजमोशन का ऐकू आलां रां*&%चं .. ;) ..),प्रमाद(भका/भका खाण्याचा स्वभाव), करणापटव* (लिमिटेशन्स){*लोकहो..हे एरंडेल तेलासारखं बुळ्ळुक्कन बाहेर काढणारं..एखादं आयुर्वेदीक औषध असावं का?}, विप्रलिप्सा* (लोभीपणा){*-लोकहो,मला हे(पण) ,एरंडेला'सारखच जागा-मोकळी करणारं,कागद-सुरनळी-मयुरपिसाराफुलवासन..तंत्रातलं..औषध वाटतं!...आपल्याला काय वाटतं??? =)) } हे केवळ कल्पनेनी कळणारे-तदोष्ठशोषात्मक-दोष आपल्याला आपल्या त्या मूळ जागेचा ठाव घेण्यास सहाय्य तर करतातच पण त्यातही एखाद्या खाद्यविरोधी-वर्णाच्या अहंकारापोटी इतर समाजाला तसा अभास मिळण्यापासूनही वंचित-खुर्चीत* ठेऊ शकतात.{*--हे आसन भा'रतीय नाही,म्हणून संस्कृतीप्रेमी-आध्यात्मिक लोक..त्याचाही कचकाऊन निषेध करतात म्हणे..कै कै वेळेला..त्या'च्यावरच-बसायची वेळ आलेली असतांन्नाही!...असो!} असा कुंथित, सगळ्यांपासून लांम(ब), मोकळे होण्यात-लाचार,सांस्कृतीक लेंग्याच्या नाडीनी अवळला गेलेला, स्व-तंत्र वात्-प्रचार न करु शकणारा{मंजे *सक्या सोडणारा..खराखुरा दांभिक) समाज आहारतज्ञांच्या आहारी गेला तर नवल काय? तिथे..आत-गेल्यावर निरिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची भित्ती-मनोरंजनाची साधने नाहीत, गळणारी डबडी नाहीत, खिडकीग्रंथ मिळालाच तर पाहाण्यापलिकडे आणि वरवर वाचना पलिकडे त्यातला-कूटार्थ कळत नाही अशा---परिस्थितीत* करणार काय?{*सांगा..सांगा...काय??????...} तेव्हा...हे-सगळे भाकड-सुरु झाले. रुपके ऐकताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरु'पणकार,{या विषयी अधिक खुलासा,व्य.नि.तून मिळेल..कृपया इथे छळून त्या उन्मनी अवस्थेचा बेरंग करू नये!} Kee'र्तनकार{मंजे,ज्यांना यात..सॉरी यातली,चावी-मिळालेली आहे,,ते!} देखील (त्याच) त्या अत्यावश्यक गोष्टी रंगवून रंगवून सांगू लागले आणि त्या ऐकून भस्सकन झाल्या'सारखा नि'श्वास टाकला गेला... खरे तर (यात)वावरा'त-बसणार्‍या व्यक्तिंनुसार,आणि या व्याधितल्या भ्रातृ'वर्गा*नुसार{*वर्गा'चा अर्थ सुरवातीला विशिदिलेला आहेच!} फरक करणे अपेक्षित आहे. खाद्यांन्नांची आणि खादाडीची मांडणी खरे तर ८०% कडक-स्वयंपाक-कांड, १६% व्यायामोपासना आणि ४% ध्यान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा खर्‍या खाद्यांन्नांची माहिती नसलेला असा आहे. त्यांना नेमाने, काहीतरी चांगले खायला मिळेल असे आमिष दाखवून,नायतर अपचन होईल.. अशी भीती घालून प्राचीन खादाडीकडे वळवणे त्यांच्याकडून काही खाद्यान्नयज्ञ, खाद्यव्रते, दंभोSपास, असे काहीतरी करवून एक पुरावा मागितला..तरी फुटवता येईल अशा परिस्थितीत आणणे हे असल्याकर्मकांड्यां'चे मुख्य काम(असते.) त्यानंतर त्यातील-(उपासनेनी)वाकलेल्या लोकांना (सुटकेची आशा दाखवून)दिलेले काम,(इच्छाविरोधी)पंथ पूजन, मजा न येणारी-पूजा ही(असली-नकली :-/ ..)उपासना आणि त्यानंतर त्यांनाच पिळायचे कुभांड.. असे(दिव्य..यात) अपेक्षित आहे.(असते.) २१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची सा'मान्य खाद्यभक्तांत आलेली क्षमता यामुळे या असल्या योग्यांना..पुराणातल्या गोष्टी /वानग्या नित्य (आजही..)व्यवहारात याव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे (जातकांवर टाकायचे..) टप्पे आहेत आणि ते अत्यंत अर्क*शुद्ध आहेत हेही (आपण)समजून घेतले(च) पाहिजे. {*अर्कशुद्ध म्हणायचे..कारण हव्या त्या समर्थनीय स्तराला जाणारे,यांच्या इतके या प्रांतांमधले जे ,त्यांना..अर्क'चम्हणायला हवे..त्याशिवाय कैसी शुद्धता??? नै का!?..असो!} खादाडांन्नो जपून खा'हो। स्व'धर्म वेळेवर होवो। जो जे..पचवील तो ते खावो। (मग..)तुमचं काय जाssतं??? ॥ :p . :p . :p
  • Log in or register to post comments
  • 25390 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 15:34

In reply to आपल्या दयाळू माहितीसाठी मी by स्पा

Permalink

स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद

स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद घालून वैसेभी कुच्च्च नै होता (नै म्हणायला काश्मीर धोरण ठरवले जाते तेवढे सोडून). पण दांभिक लोकांची व्यर्थ पिरपिर सदानकदा सुरू असते इतके सांगायचे म्हटले तरीही लोक का उसळतात ते कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/09/2014 - 15:38

In reply to स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद by बॅटमॅन

Permalink

मग चालू द्या .. तुम्हीही तेच

मग चालू द्या .. तुम्हीही तेच बोलणार , समोरूनही तेच प्रतिसाद येणार, ह्याला अंत नाही.. कुठे थांबव हे ज्याचे त्याने ठरवावं नाहीतर आहेच ,तेच तेच
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/09/2014 - 21:27

In reply to स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद by बॅटमॅन

Permalink

असं कसं, असं कसं ???

असं कसं, असं कसं ??? मराठी जालावरूनच शिकवण घेऊन तर ओबामाभाऊ त्यांचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवतात अशी अंतर्गत गोटातली बातमी आहे *secret* (त्यामुळे ते बरेचदा चुकते हे वेगळे ;) )
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/09/2014 - 14:37

In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by स्पा

Permalink

तुम्हाला कुंथणारया दांभिकांची

तुम्हाला कुंथणारया दांभिकांची इतकी का पडलेली असते .. आपल्या आयुष्याचे तेच आद्य कार्य असल्यासारखे का मागे पडता , कुन्ठून्द्या कि तुमचे काय जाते ....
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।। असे समर्थांनीच म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 07/09/2014 - 14:50

In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या

Permalink

अरे वा. तुम्ही पण दासबोध

अरे वा. तुम्ही पण दासबोध वाचलेला दिसतोय की. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/09/2014 - 15:19

In reply to अरे वा. तुम्ही पण दासबोध by प्रचेतस

Permalink

घरी आहे मात्र पुर्ण वाचले

घरी आहे मात्र पुर्ण वाचले नाही. कुणी "समर्थांनी अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटलं आहे" असं म्हटलं की ते संदर्भ वाचतो दासबोधात. मनाचे श्लोक आवर्जून ऐकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 15:03

In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या

Permalink

पण

पण 'आधी असलेला पाग्या' जो 'संतवचने रटून होतो वाघ्या' आणि त्यामुळे 'ज्याचा येळकोट रहात नाही' कारण 'मूळ स्वभाव जात नाही' अशा लोकांचे काय करायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 07/09/2014 - 15:17

In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या

Permalink

हे अश्या पध्दतीने शहाणे करणार

हे अश्या पध्दतीने शहाणे करणार का रे धन्या? आणि समजा या सकळजनांना शहाणे व्हायचेच नसेल तर एवढा सगळा घाट कशाला? सिरियस उत्तर अपेक्षित आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 15:24

In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by किसन शिंदे

Permalink

मध्ये नाक खुपसतो.

शहाणे करायची/करू पाहण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी. आणि समजा शहाणे व्हायचेच नसेल तरीही ते बिंबवत राहणे, कारण आज नै झाले ते उद्या होऊही शकते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/09/2014 - 15:37

In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by किसन शिंदे

Permalink

हे अश्या पध्दतीने शहाणे करणार

हे अश्या पध्दतीने शहाणे करणार का रे धन्या?
पद्धत कशीही असो, विचारांनी टकरा दिल्या की त्यातून काहीतरी चांगलं हाती लागतंच. त्या धाग्यावर कुणीतरी एखादं सुंदर वाक्य, एखादा सुंदर परिच्छेद लिहून जातो. जो वाद घालणार्‍यांच्या लक्षात येत नाही मात्र बाकी वाचकांना जाणवतो. उदाहरणार्थ असाच मी कुठेतरी वाद घालत असताना मुकवाचक त्या धाग्यावर तटस्थ राहिले. मात्र त्यांनी मला तीन खरडी लिहिल्या ज्यांनी मला विचार करायला भाग पाडले.
आणि समजा या सकळजनांना शहाणे व्हायचेच नसेल तर एवढा सगळा घाट कशाला?
बुडती हे जन, न देखवे डोळा। म्हणूनि कळवळा येतो आहे || :) आपल्या पूर्वसुरींनी हे केलं नसतं तर जग आजही मध्ययुगातच असतं. काही धागे हे निमित्त असतात. त्या धाग्यांच्या निमित्ताने आपले विचार मांडता येतात. प्रत्यक्ष चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/09/2014 - 16:09

In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by धन्या

Permalink

@चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा

@चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा वाचणारे खुपजण वाचत असतात. त्यांच्या मनात या अशा विचारांचे बीज रुजू शकते. >>> +++१११ सूक्ष्मपणे अंतर्मनावर संस्कार यातूनच होतात. माझा तर अनुभव असा..की विरोधी विचार ऐकत असतानाच,मला नेमकं खरं काय? हे जाणून घेण्याची ऊर्मी बळावली.आणि त्यातूनच मी आपल्या घाटपांडेकाकांचं-"जंयोतिषाकडे जाण्यापूर्वी!" हे पुस्तक वाचलं. पुढे सर्वच हिंदु(धर्म)विरोधी मतं वाचली...जो प्रवास आजही चालू आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 07/09/2014 - 21:33

In reply to @चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा by अत्रुप्त आत्मा

Permalink

काय हे बुवा... हे सगळे चलाख

काय हे बुवा... हे सगळे चलाख लोक चर्चा तुमच्या धाग्यापासून दूर भटकवत आहेत... *unknw* आणि तुम्हीही चक्क तुमच्या पोटाचा गदारोळ विसरून त्या लोकांच्या गदरोळात भाग घेता आहात ??? *dirol*
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/09/2014 - 15:32

In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या

Permalink

जे जे आपणासी ठावे। ते ते

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।
नुसते वाद घालून मजा बघणे "ह्याला शाहणे करून सोडणे" म्हणत नसावेत :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/09/2014 - 15:41

In reply to जे जे आपणासी ठावे। ते ते by स्पा

Permalink

ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे

ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या या आक्षेपाच्या उत्तरासाठी हे किसन शिंदे यांना दिलेले उत्तर वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/09/2014 - 15:56

In reply to ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे by धन्या

Permalink

ठीके

तुमचा दृष्टीकोनही दिसून येतोच आहे.. २, ४ चांगले विचार मिळवण्यासाठी.. घाला वादावादी :) तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो काही प्रश्न नाही
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 07/09/2014 - 16:02

In reply to ठीके by स्पा

Permalink

तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो

तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो काही प्रश्न नाही
थोडक्यात काय तर आम्ही सध्या बाकडयावर आहोत हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/09/2014 - 16:03

In reply to तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो by धन्या

Permalink

खिक्क

खिक्क या निमित्ताने तुमच्या सोबत काफी पितापिता चर्चा झाडणाऱ्या तुमच्या मित्राची आठवण झाली
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/09/2014 - 16:05

In reply to खिक्क by स्पा

Permalink

यू मीन दॅट ढवळ्या पवळ्या अ‍ॅन

यू मीन दॅट ढवळ्या पवळ्या अ‍ॅन ऑल ?? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 07/07/2014 - 18:08

In reply to पण कुंथणार्‍या दांभिकांवर by धन्या

Permalink

दांभिकांवर ताशेरे ओढण्यास

दांभिकांवर ताशेरे ओढण्यास जाणे म्हणजे चिखलातल्या वराहासोबत खेळावयास जाण्याप्रमाणे आहे. आपण चिखलात लोळून येतो, वराह मजा घेतो ते निराळंच!!
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Mon, 07/07/2014 - 18:04

Permalink

संगीतोपचार

हे कार्य सुकर होत नसेल तर संगीतोपचार अवश्य करून बघावा. उदाहरणादाखल खाली दिलेली गाणी आळवल्याने लाभ होउ शकतो. १. आsssभी जाsss, आssssभी जाssss, ए ----- आ भी जा २. आजा आजा मै हू प्यार तेरा, वल्ला वल्ला इंतजार तेरा ३. आयेगाss आयेगाss आयेगाss, आयेगा आनेवाला आयेगा जाणकारांनी यादीत भर घालण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/09/2014 - 14:49

In reply to संगीतोपचार by अधिराज

Permalink

कार्य अधिक सुकर

कार्य अधिक सुकर झाल्यानंतरच्या काही भावना: १) जिवलगाऽऽऽ राहिले रे दूर घर माझे..पाऊल थकले पोटामधले जड झाले ओझे!! २) झाला साखरपुडा गं बाई थाटाचा....मऊ मऊ पुरणपोळ्या खाईन गं आणि वापर वाढेल बाई लोट्याचा ३) कशी काळनागिणी सखे गं वैरिण झाली नदी...प्राणविसावा पैलतीरावरी अफाट वाहे मधी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Wed, 07/09/2014 - 23:36

In reply to संगीतोपचार by अधिराज

Permalink

सगळ्या कुंथलगिरीकर

सगळ्या कुंथलगिरीकर महाराजांसाठी हे फार उत्तम गाणं आहे..अवश्य लाभ घ्यावा... http://www.youtube.com/watch?v=1u-6QMaKuSQ
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on गुरुवार, 07/10/2014 - 05:42

In reply to संगीतोपचार by अधिराज

Permalink

आधी आणि नंतर

आधी कोई आनेवाला है जिया बेकरार मेरा जिया बेकरार आजा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा नंतर तुम आ गये हो नूर आ गया है नहीं तो चरागोंसे लौ जा रही थी एकदम apt.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/09/2014 - 15:31

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 15:35

Permalink

चालू द्या!

चालू द्या! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/09/2014 - 15:48

In reply to चालू द्या! by प्यारे१

Permalink

काय चालु द्या ?

काय चालु द्या ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/09/2014 - 15:50

In reply to चालू द्या! by प्यारे१

Permalink

काय चालु द्या ?

काय चालु द्या ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 15:57

In reply to काय चालु द्या ? by प्रसाद गोडबोले

Permalink

जे चालू आहे तेच्च! होत नसेल

जे चालू आहे तेच्च! होत नसेल तर आणखी काही उपाय करा. (बोळे) मोकळे होणं मह्त्त्वाचं. तुंबलेत बिचारे! ;) - ट्यार्पी शील
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:02

In reply to जे चालू आहे तेच्च! होत नसेल by प्यारे१

Permalink

+१

स्वतःचे ते (आध्यात्मिक) विचार, दुसर्‍याचे ते बोळे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 16:06

In reply to +१ by बॅटमॅन

Permalink

+१२३

+१२३ स्वतःचे ते (तार्किक) विचार, दुसर्‍याच्या अंधश्रद्धा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:11

In reply to +१२३ by प्यारे१

Permalink

+१२३४

अंधश्रद्धेला अंधश्रद्धाही म्हणू न देणे ही एक अंधश्रद्धाच. त्याला सेल्फराइचसपणे परेड करणे हे खरे तर मोठ्या अस्वस्थतेचे लक्षण. पण असो. 'जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो' असं ज्ञानेश्वर म्हणून गेलेलेच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/09/2014 - 16:12

In reply to +१२३४ by बॅटमॅन

Permalink

रती कशाला येईल वाढायला,

रती कशाला येईल वाढायला, बाकीचे वाढपी पाणक्ये कुठे गेले म्हणे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 07/09/2014 - 16:19

In reply to रती कशाला येईल वाढायला, by सूड

Permalink

आणि रती वाढायला आली तर जेवण

आणि रती वाढायला आली तर जेवण कोणाला जाईल ? *man_in_love*
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:22

In reply to आणि रती वाढायला आली तर जेवण by प्रसाद गोडबोले

Permalink

हम्म्म, तुमच्या बोलण्यात

हम्म्म, तुमच्या बोलण्यात बिंदू आहे ओ प्रसादराव :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 16:15

In reply to +१२३४ by बॅटमॅन

Permalink

+१११ खरंच आहे.

+१११ खरंच आहे. :) आपल्याला दिसतं ते नि तेवढंच खरं मानणारांना लाल सलाम! (बुवा, किती करायचेत?)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/09/2014 - 16:18

In reply to +१११ खरंच आहे. by प्यारे१

Permalink

@आपल्याला दिसतं ते नि तेवढंच

@आपल्याला दिसतं ते नि तेवढंच खरं मानणारांना लाल सलाम!>>> स्वत:वरचे आरोप दुसय्रांना "अजुन" लावा! ;) मंजे मग "पाहिजे" तेव्हढे होतील. :p
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:18

In reply to +१११ खरंच आहे. by प्यारे१

Permalink

चार पुस्तके वाचून प्रचिती

चार पुस्तके वाचून प्रचिती आल्याच्या थाटात आपल्याला सगळंच दिसतं असं मानून 'लाल' करणारांना त्याहीपेक्षा कडक सलाम!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 16:25

In reply to चार पुस्तके वाचून प्रचिती by बॅटमॅन

Permalink

असेच म्हणतो!

असेच म्हणतो! :) (बुवा नि बॅट्या दोघांनाही)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:29

In reply to असेच म्हणतो! by प्यारे१

Permalink

'हे तो प्रचितीचे बोलणे' या

'हे तो प्रचितीचे बोलणे' या थाटात पैशाला पासरी संतवचने पेरून कोण प्रवचने देत बसते हे पाहिले तर लोकांना समजून येईलच म्हणा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 16:40

In reply to 'हे तो प्रचितीचे बोलणे' या by बॅटमॅन

Permalink

आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी

आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी कुठले तरी! ज्ञान ना तुम्हाला ना आम्हाला. दोन्हीकडं माहितीचा साठा. तुमचा फार मोठा, आमचा चार पुस्तकांचा. चालायचं! असो! @ सगळी गँग: आम्ही टैमप्लिस!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 16:51

In reply to आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी by प्यारे१

Permalink

कबुलीबद्दल धन्यवाद.

कमीतकमी डोकं वापरायला तरी आम्ही प्रतिबंध करत नाही, पण त्याला प्रतिबंध होणार असेल तर पुस्तके चार असोत नैतर फार, अंधश्रद्धाळूपणा काही जाणार नाही. शेवटी भोंदूंची दुकाने आमच्या ओरडीमुळे बंद होण्याइतकी आमची पावर नाही हे माहितीच आहे ओ, पण त्यामुळे समोरच्याचा मार्ग हा डोके बंद करायला शिकवतो इतके दाखवले तरी लोक पिसाळतात. स्वतःच्या अंधश्रद्ध विचारांना संतवचनांचा मुलामा लावल्यामुळे आपली वैचारिक बेइमानी झाकली जाते अशा भ्रमात कुणी राहू नये इतकेच जमेल तेव्हा आहे. आवाज किती क्षीण आहे याचा त्याच्या सत्यासत्यतेशी संबंध नसतो. तेव्हा चालूद्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 17:00

In reply to कबुलीबद्दल धन्यवाद. by बॅटमॅन

Permalink

अहो डोळे उघडून बघण्याचा

अहो डोळे उघडून बघण्याचा उद्देश नेमका काय आहे ते समजायला हवं की! तुम्हाला जनतेला 'सत्य' दाखवायचं असतं ते कोणत्या प्रकारे दाखवताय त्यावर अवलंबून आहे की बरंच. उगा ह्या ह्या काळी हे हे लोक अशा अशा प्रकारे वागत होते हे सत्य जनतेला दाखवून त्यातून कुणाचाच फायदा होत नसेल किंबहुना असलेल्यांच्या श्रद्धा मोडकळीस येत असतील तर त्यात तथ्य ते किती? उकीरडा सगळ्यांकडेच असतो. घरात कमी असेल पण असतो. (केराची बादली) पण म्हणून उकीरडा झाकायचा की उघडा पाडायचा हे सत्यान्वेषणाच्या नादात समजणं किंवा उमजणं हे जास्त उपयुक्त.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 17:07

In reply to अहो डोळे उघडून बघण्याचा by प्यारे१

Permalink

घरात कमी असेल पण असतो.

घरात कमी असेल पण असतो. (केराची बादली) पण म्हणून उकीरडा झाकायचा की उघडा पाडायचा हे सत्यान्वेषणाच्या नादात समजणं किंवा उमजणं हे जास्त उपयुक्त.
चला, उकिरडा आहे हे कबूल केलंत हेही नसे थोडके. आता उकिरडा झाकण्याने कुणाचा नक्की काय फायदा होतो म्हणे? घरात कचरा साठला असेल तर तो कार्पेटखाली किती दिवस सारणार? त्याचा मोठा ढिगारा होऊन असह्य वास मारून, अळ्या-किडे होईपर्यंत वाट पाहणार की थोडासा कचरा असताना तो साफ करायला शिकवणार हे समजणं महत्त्वाचं. साफसफाईचं शिक्षण दिल्यास उकिरडा स्वच्छ होईल आणि त्यावर आधारलेले दुकान नष्ट होईल असं वाटत असेल तर एक व्यावसायिक भावना (काँपिटिशनचा तिरस्कार इ.इ.) म्हणून त्याला मी समजू शकतो, मात्र 'चिंता करितो विश्वाची' छाप आव असलेल्यांना त्यानं फरक का पडावा हे समजत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 17:15

In reply to घरात कमी असेल पण असतो. by बॅटमॅन

Permalink

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार असतो. त्याला जास्त ताणून चालत नाही. कचरा एका विशिष्ट खोलीमध्ये असेल तर तो तिथं तेवढ्यापुरता जमा होणं हे काळानुरुप होत असते. पण कचरा काढायच्या नादात सगळंच गुंडाळा नि फेकून द्या ह्या गोष्टीला विरोध होता, आहे नि राहील. त्याउप्पर आज जी गोष्ट कचरा म्हणून वाटत आहे ती गोष्ट पूर्वी कधीतरी उपयुक्त होती नि ती वापरात होती, तिला आजच्या काळानुसार मोजून मापून कचरा म्हणून तिचा कचरा करणं कधीच शहाणपणा ठरणार नाही. असो!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 17:24

In reply to अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार by प्यारे१

Permalink

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार

अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार असतो. त्याला जास्त ताणून चालत नाही.
दिलेली अ‍ॅनॉलॉजी उलटली की असा सोयीस्कर बचाव सुरू होतो, पण तेवढा रडीचा डाव चालायचाच.
पण कचरा काढायच्या नादात सगळंच गुंडाळा नि फेकून द्या ह्या गोष्टीला विरोध होता, आहे नि राहील.
ज्योतिषादि कचर्‍याला हात घातल्याने हिंदूधर्माचा सगळाच गुंडाळा फेकायला निघालोत हा तुफ्फान विनोदी जावईशोध लावल्याबद्दल प्रथम अभिनंदन. स्वच्छतेचा मनापासून कंटाळा असला, की एक कपटा उचलला तरी नको नको चा धोशा सुरू होतो.
त्याउप्पर आज जी गोष्ट कचरा म्हणून वाटत आहे ती गोष्ट पूर्वी कधीतरी उपयुक्त होती नि ती वापरात होती, तिला आजच्या काळानुसार मोजून मापून कचरा म्हणून तिचा कचरा करणं कधीच शहाणपणा ठरणार नाही.
सर्व समाजसुधारकांनी याप्रमाणे आचरण केले असते तर सतीप्रथा, बालविवाह, विधवांचे केशवपन, जातिभेद -एक ना अनेक प्रथा आजही चालू राहिल्या असत्या. सगळे समाजसुधारक किंवा लिखाणातून मूर्खपणावर कोरडे ओढणारे तुमचे लाडके संतही या बाबतीत मग शहाणे ठरणारच नाहीत. 'नवसे पोरे होती तरी कासया लागे पती' म्हणणारे तुकोबा नैतर 'तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी' असे रोखठोकपणे सांगणारे गाडगेबाबाही तुमच्या लेखी मूर्खच असतील, नै? जराही बदलायची नावड हेच या प्रतिसादाचे मूळ आहे. समाजाच्या आळशी आणि झापडं लावून बसलेल्या मनोवृत्तीची उत्तम झलक तुमच्या प्रतिसादातून आयतीच दाखवल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 18:35

In reply to अ‍ॅनालॉजी नावाचा एक प्रकार by बॅटमॅन

Permalink

गोळ्या झाडायला हरकत नाही.

गोळ्या झाडायला हरकत नाही. एकही लागलेली नाही. कारण अशा प्रकारचा माझा एकही प्रतिसाद नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 18:37

In reply to गोळ्या झाडायला हरकत नाही. by प्यारे१

Permalink

मंत्रसामर्थ्य आणि

मंत्रसामर्थ्य आणि ज्योतिषाबद्दलची चर्चा सुरू होती तेव्हाचे तुमचे प्रतिसाद बोलके आहेत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 18:49

In reply to मंत्रसामर्थ्य आणि by बॅटमॅन

Permalink

मंत्र सामर्थ्य आहेच.

मंत्र सामर्थ्य आहेच. त्याला तू अंधश्रद्धा म्हणायला काहीही हरकत नाही. त्याउप्पर मंत्रांचं काम हरवलेल्या वस्तू शोधून द्यायचं नसतं हे तिथंही लिहीलेलं आहे. बाकी ज्योतिषा च्या समर्थनाबद्दल एकही प्रतिसाद दिलेला नाही. असल्यास शोधून द्या. इन्क्रिमेण्ट झाली का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/09/2014 - 18:49

In reply to मंत्रसामर्थ्य आणि by बॅटमॅन

Permalink

मंत्र सामर्थ्य आहेच.

मंत्र सामर्थ्य आहेच. त्याला तू अंधश्रद्धा म्हणायला काहीही हरकत नाही. त्याउप्पर मंत्रांचं काम हरवलेल्या वस्तू शोधून द्यायचं नसतं हे तिथंही लिहीलेलं आहे. बाकी ज्योतिषा च्या समर्थनाबद्दल एकही प्रतिसाद दिलेला नाही. असल्यास शोधून द्या. इन्क्रिमेण्ट झाली का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/09/2014 - 18:58

In reply to मंत्र सामर्थ्य आहेच. by प्यारे१

Permalink

इन्क्रिमेण्ट झाली का?

इन्क्रिमेण्ट झाली का?
उकिरडा दाखवल्याबद्दल धन्यवाद. :) कमरेखालच्या प्रवासाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com