✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किसमिस

ल — लीलाधर, Sun, 11/13/2011 - 18:07
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.

प्रतिक्रिया द्या
12176 वाचन

💬 प्रतिसाद (56)

<राजकुमार>आपने जरूर उसको अपनी

पाषाणभेद
Mon, 11/14/2011 - 00:30 नवीन
<राजकुमार>आपने जरूर उसको अपनी सुई चुभाइ होगी वर्ना हमारी प्यारी भाभीजान ऐसी हरकत कभी नही करती! अंगूर का दाना हूँ सुई ना चुभो देना सुई जो चुभोई तो रस टपकेगा जो रस टपकेगा तो किसमिस किसमिस किसमिस बन जाऊंगी
  • Log in or register to post comments

:(

मदनबाण
Mon, 11/14/2011 - 13:14 नवीन
:(
  • Log in or register to post comments

लील्या काय कहर कविता

अभ्या..
Wed, 08/28/2013 - 09:09 नवीन
लील्या काय कहर कविता लिहायाचास बे :-D:-D आधी दिवस काय जायचे मग लग्नाची हुरहुर काय लागायची :-D:-D भारीच ब्वा .... मिस ची होणार का आता मिसेस किसेस एवजी धुवा आता डिशेस :-D
  • Log in or register to post comments

लेअर टाकायला चुकला ..

चौकटराजा
Wed, 08/28/2013 - 14:35 नवीन
नव्याने फोटोशॉप शिकणार्‍या सारखे कवीराज लीलाधर यांचे झालेय ! दिवसजायचा लेअर व लग्नाचा लेअर यांची काहीतरी गडबड झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माताय.

प्रचेतस
Wed, 08/28/2013 - 09:23 नवीन
माताय. ही कविता नजरेतून कशी काय निसटली होती ब्वा.
  • Log in or register to post comments

आता मात्र खरंच दिवस गेले ?

संजय क्षीरसागर
Wed, 08/28/2013 - 09:51 नवीन
दिवस कधी खोटे गेलेत का बोला, गेलेत ना आता? कामवाली ठेवा. घोड्यावर वरात जाऊं दे जोरात, हौसेनं तिला घेतलीये ना घरात ? तुम्ही खा किसमिस, दादा खातो साय आता हाय काय आणि नाय काय!
  • Log in or register to post comments

लील्याच्या कवितांना डॉल्फिन

कोमल
Wed, 08/28/2013 - 10:05 नवीन
लील्याच्या कवितांना डॉल्फिन चावलाय की काय... सगळ्या टुणटुण करत वर येत आहेत..
  • Log in or register to post comments

भयाण

स्पा
Wed, 08/28/2013 - 10:07 नवीन
भयाण =)) =))
  • Log in or register to post comments

दीवस गेले भूरभूर लागली

प्रसाद गोडबोले
Wed, 08/28/2013 - 10:54 नवीन
दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, >>> बरोबर आहे . आधी दिवस गेले की हूरहूर लागणारच लग्नाची
  • Log in or register to post comments

नॉट नेसेसरिली

बॅटमॅन
Wed, 09/04/2013 - 17:04 नवीन
नॉट नेसेसरिली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काय काय लिहायचा हा प्राणी

अद्द्या
Wed, 08/28/2013 - 11:05 नवीन
काय काय लिहायचा हा प्राणी :D
  • Log in or register to post comments

सौ ने इष्टेटीची परात मागितली

बॅटमॅन
Wed, 08/28/2013 - 12:09 नवीन
सौ ने इष्टेटीची परात मागितली तर दारूसोबत का बुडावे अंधारात? कैच्याकै लिहितंय झालं लील्या...
  • Log in or register to post comments

अफाट काव्यप्रतिभा असलेल्या

धन्या
Wed, 08/28/2013 - 12:53 नवीन
अफाट काव्यप्रतिभा असलेल्या कवीची ही कविता कशी बरे ईतके दिवस अंधारात राहीली?
  • Log in or register to post comments

वा!!!!

सुयशतात्या
Wed, 08/28/2013 - 13:31 नवीन
मस्त...क्या बात है!!!
  • Log in or register to post comments

माताय !!

सूड
Wed, 08/28/2013 - 14:01 नवीन
ही कशी वाचली नाही कविता मी?? वाह वाह !! मिपावरही कलोनियल कझिन्स का काय म्हणतात ते आहेत याचा अभिमान वाटला. ;)
  • Log in or register to post comments

लीलाधरा ...

सस्नेह
Wed, 08/28/2013 - 17:42 नवीन
साखरपुड्याच्या सुपाचा बाऊल संपायच्या आतच रीतिभातींचे डेझर्ट पिऊन टाकलेस वाटतं !
  • Log in or register to post comments

किसमिस

मोदक
Wed, 08/28/2013 - 22:00 नवीन
किसमिस प्रेषक, लीलाधर, Sun,
13/11/2011 - 18:07
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

"बरेच दिवस गेल्यावर" ही कविता

अन्या दातार
Sun, 09/01/2013 - 15:15 नवीन
"बरेच दिवस गेल्यावर" ही कविता बोर्डावर आलीये. जरा मिपाकर्स, स्वागत नही करोगे?? ;)
  • Log in or register to post comments

रम्य!

पैसा
Wed, 09/04/2013 - 16:57 नवीन
रम्य आठवणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

लिली हूं.... पुढे सरक!

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/04/2013 - 22:29 नवीन
लिली हूं.... पुढे सरक! . . . . . . . . . . . कागद बदलायचाय! =))
  • Log in or register to post comments

आणि हा पहा कोलोनियन

प्यारे१
Wed, 09/04/2013 - 23:37 नवीन
आणि हा पहा कोलोनियन कझिन्सपैकी दुसरा लॉर्ड कझिन ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

प्या...रेभा *****

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/05/2013 - 00:13 नवीन
प्या...रे भा ***** =)) :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

(No subject)

मोदक
गुरुवार, 09/05/2013 - 00:02 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चचाचे अजूनेक अजरामर काव्य

बॅटमॅन
Fri, 06/27/2014 - 15:27 नवीन
चचाचे अजूनेक अजरामर काव्य =))
  • Log in or register to post comments

उत्खननाबद्दल धन्यवाद.

सौंदाळा
Fri, 06/27/2014 - 17:06 नवीन
उत्खननाबद्दल धन्यवाद. साय, किसमिस फोडु कविता आहेत एकसे एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>मरून गेलेल्या बाबांचा मागून

सूड
Fri, 06/27/2014 - 15:34 नवीन
>>मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज इंटरेस्टिंग !! बाकी दिवस जाणं, मग लग्न होणं आणि परत रीतीभातींच्या घरात राहणं; चुकल्यासारखं वाटत नाहीये का काही?
  • Log in or register to post comments

अहाहा ,आजचा दिवस साजरा झाला..

स्पा
Fri, 06/27/2014 - 17:55 नवीन
अहाहा ,आजचा दिवस साजरा झाला... कोणीतरी या सुंदर कवितेच रसग्रहण करा प्लीज ,
  • Log in or register to post comments

लिल्या पुन्हा एकदा मिपाच्या

धन्या
Fri, 06/27/2014 - 18:00 नवीन
लिल्या पुन्हा एकदा मिपाच्या प्राईम टाईम स्लॉटमध्ये :D
  • Log in or register to post comments

... ...

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/27/2014 - 20:23 नवीन
=)) ... =)) ... =))
  • Log in or register to post comments

खूप छान कविता.

प्रचेतस
Fri, 06/27/2014 - 20:32 नवीन
खूप छान कविता. आणि मनापासून लिहिलेली असल्याने काळजाला भिडणारी.
  • Log in or register to post comments

कविता काळजाला भिडली हे ठीक

धन्या
Fri, 06/27/2014 - 20:49 नवीन
कविता काळजाला भिडली हे ठीक आहे. मात्र तुम्हाला कसे कळले की त्यांनी ही कविता मनापासून लिहिली आहे? कशावरुन त्यांच्या कलोनियल कझिनप्रमाणे र ला र आणि ट ला ट जुळवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कवी जे काही लिहितात ते

प्रचेतस
Fri, 06/27/2014 - 21:13 नवीन
कवी जे काही लिहितात ते मनापासूनच लिहितात. नाहीतर असले भावविभोर काव्य उमटणे कठीण. आणि त्यांचे कलोनियल कझिन तर अत्यंत प्रत्ययकारी काव्य लिहितात. त्याचा प्रत्यय तुम्हास अजिंठ्याला आणि किसनदेवांना देवगिरीवर आलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

(No subject)

किसन शिंदे
Sat, 06/28/2014 - 09:01 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाप्रे!

यशोधरा
Fri, 06/27/2014 - 20:55 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments

कविवर्य

भिकापाटील
Sat, 06/28/2014 - 12:46 नवीन
तोडलस मित्रा !! अशीच काव्यप्रतिभा दिवसेंदिवस बहरत जौ दे.......
  • Log in or register to post comments

हौशी कवी

पैसा
Sat, 06/28/2014 - 13:00 नवीन
हौशी कवी बिचारे कविता जुळवतात आणि शिनेर मिपाकर त्यांचा बाजार उठवतात याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. लिल्या, हौर आन्दो! डरनेका नै!
  • Log in or register to post comments

वाऊ!

निखळानंद
Mon, 06/30/2014 - 17:03 नवीन
कवितेचे रसग्रहण मिपाकरांकडून शिकावे.. करूण रसाला छातीशी धरून भडभडून हसावे !
  • Log in or register to post comments

तुमचे प्रतिसाद वाचून पूर्वी

सूड
Mon, 06/30/2014 - 17:09 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचून पूर्वी 'रातकिडा चंद्रसेन' आयडीने एक गृहस्थ काव्यात्मक प्रतिसाद टंकत असत, त्यांची आठवण झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखळानंद

आयडीने नाही, तशी स्वाक्षरी

प्रचेतस
Mon, 06/30/2014 - 17:11 नवीन
आयडीने नाही, तशी स्वाक्षरी घेऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तांच तां !!

सूड
Mon, 06/30/2014 - 17:13 नवीन
तांच तां !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी काहीही..

निखळानंद
Mon, 06/30/2014 - 19:13 नवीन
मी काहीही लिहिले तरी कोणाला तरी पूर्वीचे आठवतंय काहीतरी.. चालायचंच्..मिसळपाव म्हणजे आठवणींचे गाठोडेच आहे नाहीतरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वा वा !! चारोळ्या लिहीण्यात

सूड
Mon, 06/30/2014 - 19:18 नवीन
वा वा !! चारोळ्या लिहीण्यात वेळ नका घालवू, आता एक खंडकाव्यच येऊद्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखळानंद

@खंडकाव्यच येऊद्यात. >>>.

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/30/2014 - 19:34 नवीन
@खंडकाव्यच येऊद्यात. >>>. खंडच का? अखंडकाव्यही चालेल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आत्ताच पारलेचे किसमी टाॅफी

किसन शिंदे
Fri, 02/26/2016 - 16:01 नवीन
आत्ताच पारलेचे किसमी टाॅफी चाॅकलेट खाल्ले आणि चचाची ही कविता आठवली. हँट्स आॅफ लिलेश.
  • Log in or register to post comments

अरे काय हे!!!!

प्रचेतस
Fri, 02/26/2016 - 16:07 नवीन
अरे काय हे!!!! मरतोय मी हसून हसून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बरं झालं आठवलं, बायकोने परात

किसन शिंदे
Fri, 02/26/2016 - 16:15 नवीन
बरं झालं आठवलं, बायकोने परात आणायला सांगितली होती. बघायला हवी आता मार्केटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिपा (किस)मिसिंग लीलाधर !

सस्नेह
Fri, 02/26/2016 - 16:31 नवीन
मिपा (किस)मिसिंग लीलाधर !
  • Log in or register to post comments

ही

नाखु
Fri, 02/26/2016 - 16:35 नवीन
परात पुन्हा घरात (पक्षी वर) आली. अता तरी बुवा लिहिते होतील का? (प्रतीसाद सोडून अश्या प्रत्यय दर्शी कवीता)
  • Log in or register to post comments

कोण पायजे तुम्हाला?

पैसा
Sun, 02/28/2016 - 22:18 नवीन
कझिन्सपैकी बुवा की लिल्याचे लेखण पायजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बुवाच

नाखु
Mon, 02/29/2016 - 09:54 नवीन
मुख्यालय इथे असताना शाखेची चौकशी करण्याचे पाप आम्हाला का करायला लावताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा