मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत.
त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील.
कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता.
ठिकाण: शनिवारवाडा
ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल.
शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी.
ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील.
मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत.
अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.
वाचने
56374
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा!
आमच्या चहाची सोय करायचं लक्षात आहे ना?
आता चहा शनिवारवाड्यावरच
In reply to वा वा! by पैसा
आता चहा शनिवारवाड्यावरच =))
टिपिकल
In reply to आता चहा शनिवारवाड्यावरच by प्रचेतस
पुणेरी उत्तर. आता स.पे. मधला एखादा यजमान शोधणे आले.
:)
In reply to टिपिकल by पैसा
वडगाव बुद्रुक मधला एखादा यजमान शोधत नाहीत हे नशीब.
ऑंsssss पैसा ताई पण
In reply to टिपिकल by पैसा
ऑंsssss *shok* पैसा ताई पण पुण्यात!
हां मग!
In reply to ऑंsssss पैसा ताई पण by अत्रुप्त आत्मा
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले
In reply to हां मग! by पैसा
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय!
त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय)
तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी.
-नुत्काच पुनेकर ;)
नाय ब्वा.
In reply to हां मग! by पैसा
नाय ब्वा.
चहा पाजण्याचा आमचा वादा कायम हाय.
ह्हूंssss
In reply to हां मग! by पैसा
ह्हूंssss :-/
हे पिंपरी-गोवा युतिचं दु... दु.... कारस्थान आहे! :-/
ओ बुवा
In reply to ह्हूंssss by अत्रुप्त आत्मा
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.
आपल्या इचाराचा इचार केला जाइल
In reply to ओ बुवा by पैसा
आपल्या इचाराचा इचार केला जाइल! ;)
कोर कमिटी पुडे सदर इचार ..विणिमयासाठी ठेवनेत येइल! :D
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड
In reply to आपल्या इचाराचा इचार केला जाइल by अत्रुप्त आत्मा
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)
पिंची कडे
In reply to कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड by प्रचेतस
पिंचीकडे " वजनदार" माणसे आहेत.ती सुद्धा सातवाहन कालीन शर्ट घालणारी !
हो, आणि एक इरसाल म्हातारं पण
In reply to पिंची कडे by चौकटराजा
=))
हो, आणि एक इरसाल म्हातारं पण आहे. ;)
ऑ
In reply to हो, आणि एक इरसाल म्हातारं पण by प्रचेतस
वल्ली मी अजुन थोडा "तरुण" आहे हो.
चहा न पिणार्याy अनहितांसाठी
In reply to हां मग! by पैसा
चहा न पिणार्याy अनहितांसाठी दुसरी काही सोय केली आहे का *unknw*
अरे बापरे......
In reply to चहा न पिणार्याy अनहितांसाठी by त्रिवेणी
अरे बापरे...... *shok*
घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे
In reply to अरे बापरे...... by प्रचेतस
घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे काही *clapping*
(No subject)
In reply to घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे by त्रिवेणी
*ROFL*
पुणे कट्टयाला शुभेच्छा!
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा.
सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.
वा वा! कट्ट्यास शुभेच्छा!
वा वा! कट्ट्यास शुभेच्छा!
ता.क. साखरभात खाऊ नये.
श्रीरंग जोशी यांचा मुक्काम किती दिवस आहे?
गुरुवारी किंवा शुक्रवारी ठेवला असता तर, नक्की आलो असतो.
शुक्रवारी त्यांचे उसगावात
In reply to श्रीरंग जोशी यांचा मुक्काम किती दिवस आहे? by मुक्त विहारि
शुक्रवारी त्यांचे उसगावात प्रस्थान होणार आहे.
हायजॅक अॅलर्ट
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.
धरणे अॅलर्ट...!
In reply to हायजॅक अॅलर्ट by पैसा
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.
+१
In reply to धरणे अॅलर्ट...! by एस
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.
अहो पण अनाहिताच धागा
In reply to +१ by पैसा
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.
खिक्क!
In reply to अहो पण अनाहिताच धागा by प्रचेतस
स्वॅप्स धरणे धरायला येणार आहे. अनाहिता नव्हे! आमचा बेशर्त पाठिंबा हय.
खांदा मिळाला दंबुक चालवायला
In reply to खिक्क! by पैसा
खांदा मिळाला दंबुक चालवायला ;)
निषेध
In reply to खांदा मिळाला दंबुक चालवायला by टवाळ कार्टा
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्...
असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?
निषेधाचा निषेध!
In reply to निषेध by एस
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध!
आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."
टिब्बल निषेध
In reply to निषेधाचा निषेध! by पैसा
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले.
यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.
हे काय? पैतै, पंतांच्या
हे काय? पैतै, पंतांच्या पत्नीने अनाहितावर हे सांगितले नव्हते. बघा, आता काही होऊ शकतय का.
:-)
In reply to हे काय? पैतै, पंतांच्या by रेवती
:D
मी पण येत आहे.
छान!
In reply to :-) by जुइ
भेटू नक्की!
हां, मग ठीक आहे.
In reply to :-) by जुइ
हां, मग ठीक आहे.
शुभेछा !!!
शुभेछा !!!
कट्ट्याला शुभेच्छा.
कट्ट्याला शुभेच्छा.
पुणे कट्ट्याचा धागा, तो पण
पुणे कट्ट्याचा धागा, तो पण वल्लीकडून ?
चक्कर येउन पडतो आहे. शुद्धीवर आलो की उर्वरित प्रतिक्रिया देईन.
तुम्हाला माहीत नाही ?
In reply to पुणे कट्ट्याचा धागा, तो पण by विश्वनाथ मेहेंदळे
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.
जेव्हड्या मिपाकरांना भेटता
In reply to पुणे कट्ट्याचा धागा, तो पण by विश्वनाथ मेहेंदळे
=))
जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)
बदलला आहे तो.
In reply to पुणे कट्ट्याचा धागा, तो पण by विश्वनाथ मेहेंदळे
बदलला आहे तो.
हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.
वल्ली यांचे आभार
या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार.
मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-).
माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.
हजर...
नक्की येत आहे.
बुवा....
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?
कसबा गणपतीपाशी किंवा खुद्द
In reply to बुवा.... by बाबा पाटील
कसबा गणपतीपाशी किंवा खुद्द शनिवारवाड्याच्या प्रांगणातच पागेची व्यवस्था आहे. तिथं बांधा घोडं.
धन्यवाद.
आणखी एक शंका उद्या पालखी कुठे असेल ?
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा
In reply to धन्यवाद. by बाबा पाटील
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.
(No subject)
:(
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(
शुभेच्छा..!
+१
In reply to शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
आमच्या कडून पण हार्दिक शुभेच्छा....
++२
In reply to +१ by मुक्त विहारि
++२
आमच्या कडून पण हार्दिक शुभेच्छा....
सचित्र वृत्तांकनाची वाट बघत
सचित्र वृत्तांकनाची वाट बघत आहे.
डॉ. भुषण काळुसकर जेवण्याच्या
डॉ. भुषण काळुसकर जेवण्याच्या वेळी येतील असं त्यांनी म्हटलं आहे.
रविवार असुनही..
ओ.पी.डी. मध्ये अडकलो आहे.येवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.कट्ट्यास शुभेच्छा.
बाबा काका तुम्ही रंगा काकांना
In reply to रविवार असुनही.. by बाबा पाटील
बाबा काका तुम्ही रंगा काकांना टांग दिलित काय?? *shok*
बालिके.....
माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.
कट्टा व्रुत्तांत?
कट्टा व्रुत्तांत?
वृत्तांत नाही का यायचा
वृत्तांत नाही का यायचा मध्यवर्ती पुण्यात घडलेल्या कट्ट्याचा? ;)
कट्टा धमाल झाला असेल ह्यात
कट्टा धमाल झाला असेल ह्यात काही शंका नाही... सविस्तर व सचित्र कट्टा वृत्तांच्या प्रतिक्षेत.
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही.
तरी थोडक्यात देतो.
एकंदर हजर व्यक्ती
श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)
कट्ट्याची क्षणचित्रे:
शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे.
देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे.
मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे.
वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे.
एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.
मी तर इन मीन चार डोकी असतील
In reply to वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं by प्रचेतस
मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही.
भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला.
*पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!
धन्यवाद वृत्तांताबदल
In reply to वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं by प्रचेतस
धन्यवाद वृत्तांताबदल :)
उर्वरित सर्वांछे नव्या
In reply to वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं by प्रचेतस
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)
हे पण गुजरातीतच??? :)
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा
In reply to उर्वरित सर्वांछे नव्या by टवाळ कार्टा
त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.
आता काय अच्छे दिन आले ना. ;)
हा मोदी इफेक्ट असावा...
In reply to उर्वरित सर्वांछे नव्या by टवाळ कार्टा
हा मोदी इफेक्ट असावा... कट्टेका दिन अछा था !
अछा नाही... "अच्छा" बर्का
In reply to हा मोदी इफेक्ट असावा... by डॉ सुहास म्हात्रे
अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )
कट्टयाची प्रकाशचित्रे
कट्टयाची प्रकाशचित्रे उर्ध्वस्थापीत ही नम्र विनंती.
हे काय?
सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!
अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच
In reply to हे काय? by भाते
अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच मजा.
इतरांना फक्त ट्रेलरच.
कधी नव्हे ते वल्लीशी सहमत !!
In reply to अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच by प्रचेतस
कधी नव्हे ते वल्लीशी सहमत !! ;)
धमाल कट्टा
चित्र उपलब्ध नाही
सर्व चित्रे
माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली.
वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्यांना धन्यवाद.
मस्तं.
मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी.
प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.
फोटो क्रमांक 8716 मधे डावीकडून अनुक्रमे
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा.
श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)
कट्टा सुंदर झाला.
मिपाकरांसोबतचा माझा पहिलाच कट्टा. खुप मस्त झाला कट्टा.
या कट्ट्याला मी तसा
या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा!
) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही.
धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे!
)
हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो!
बाकि खर्या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली.
रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही

दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही!
फोटू छान आलेत. मजा आलीये हे
फोटू छान आलेत. मजा आलीये हे कळतेय.
:(
आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे.
पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे..
एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.
पुणे कट्टा फोटो
पुणे कट्टा फोटो
पुणे कट्टा वृतान्त येथे फोटो चढवले आहेत
पुणे कट्टा वृतांत वाचून आणि
पुणे कट्टा वृतांत वाचून आणि फोटो पाहून ''इकडून '' सर्वांचे आभार मानण्यात आलेले आहेत
सर्वास विदित व्हावे हि विनंती
मस्त
मस्त कट्टा वृतान्त.
बॅड लक
मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या.
बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...
फोटो टाकल्यास थोडा मजा आ
In reply to बॅड लक by समीरसूर
हा घ्या सचित्र कट्टा वृत्तांत.
कट्ट्याचा सचित्र वृतांत
कट्ट्याचा सचित्र वृतांत येथे पहावा.