Skip to main content

घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 12/06/2014 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे. काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो. १ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो. 2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत ४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. - ४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही. ३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. – थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात, औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये. २ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो. ३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27432
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता. होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? >>>
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
गूढता, चमत्कार ?
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे
होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत.
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही.
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अ‍ॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
????!!!
फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
ओके.. आणि मग..
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे.
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची? गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात. असो.

In reply to by गवि

होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा. माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो. आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते. या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्‍या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते. एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते. समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते. समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्‍या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.

In reply to by चित्रगुप्त

आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे. वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्‍याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का? आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर १. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे? २. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? ३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला. आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?

In reply to by असंका

वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही. मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अ‍ॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...! माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता! आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?

In reply to by असंका

अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते
....अपवादात्मक होते.. बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.

In reply to by गवि

असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.) एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.

In reply to by असंका

तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे. प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला. तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं 'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.

In reply to by राजेश घासकडवी

जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.

In reply to by राजेश घासकडवी

मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत'
....म्हणून ....असा प्रश्न विचारणं बरोबर नाही'
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
'...हे विधान मात्र अपुरं पडतं, कारण...कार्य सिद्ध नाही'
'त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत.'
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील. मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.

In reply to by असंका

हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा. होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा. 30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.

In reply to by राजेश घासकडवी

"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

In reply to by गवि

गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच. पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?

In reply to by गवि

( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही) गवि साहेब एक शंका.. इथे
मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात
हा आक्षेप आहे का ? नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?

In reply to by हाडक्या

चोक्कस. हो. द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.

In reply to by गवि

वोके.. मी या वादाला तार्किकदृष्ट्या पहायचा प्रयत्न करतोय.. म्हणजे, तुम्हाला होमिओपथीच्या औषधांबद्दल (महिती नाही म्हणून असेल) आक्षेप नाही. ते योग्य (कमीत कमी डिटेक्टेबल तरी) मात्रेमध्ये असेल तर गुणकारी असेल (असू शकेल) असे तुम्ही गृहित धरले आहे. आता इतरांसाठी (विरोधी आणि समर्थक) हाच प्रश्न - पुरेश्या मात्रेमध्ये औषध शरीरात जात असेल तर ते गुणकारी असेल की नाही ? जर असेल तर विरोध करणार्‍यांची कारणे अजून स्प्ष्ट होतील का ? (आपण गविंचा आक्षेप मान्य केला आहे तो क्षणभर बाजूला ठेवूयात) जर औषधे कार्य करतात तर या पॅथीला 'भंपक' म्हणता येईल का ? जर औषधे कार्य करत नसतील तर पॅथीचे तज्ञ तसेच विरोधी तज्ञ यांच्या लक्षात ही बाब नाही आलीय का अजून ? मग तर पॅथीच रदबादल व्हायला हवी. लोकांना कायदेशीर पदवी (अथवा पदविका ) कशी दिली जाते जगभर ? तसेच या उपचार-प्रणालीच्या अनुशंगाने (बाजूने) जर काही संशोधन होत असेल तर समर्थकांनी अजून का मांडले नाहीये ? की इथल्या समर्थकांना माहिती नाहीये ? (अजून बरेच प्रश्न उभे राहतील परंतु आतापुरते इतकेच..)

In reply to by राजेश घासकडवी

हे छान उत्तर दिलेत आपण. छोटेखानी. जेव्हढ्यास तेव्ह्ढे. मुद्देसूद. आपण एका अज्ञ माणसाशी बोलत आहोत हे शेवटी एकदाचे आप्ल्याला कळले. फारच छान. आपण दिले आहेत त्या दुव्यात नवीन काहीच नाही कळलं. त्याच तिकिटावर तोच खेळ कितीवेळा बघायचा... साहेब, जगात चालताना, कुणाचा अनुभव प्रमाण मानायचा- स्वत:चा की इतरांचा? आपली थिअरी तर रॉक सॉलिड आहे. पण त्यातून गुण कसा येतो, ते कळत नाही. उलट त्यामुळेच जादू वगैरे शब्द मनात यायला लागले. गुण कशामुळे येतो हे कळणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. (जसं भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्या आवाक्याबाहेरचं आहे तसंच...). पण गुण अनेकदा आलेला आहे. आणि तत्काळ.

In reply to by असंका

साहेब, जगात चालताना, कुणाचा अनुभव प्रमाण मानायचा- स्वत:चा की इतरांचा? आपली थिअरी तर रॉक सॉलिड आहे. पण त्यातून गुण कसा येतो, ते कळत नाही.
गुण येणं हे बहुतेक वेळा शरीरच आपलं आपण करतं. त्यामुळे 'आठ दिवस मॉडर्न मेडिसिनची औषधं घेतली, बरं वाटलं नाही, मग होमिओपथीची औषधं घेतली, दोन दिवसात आराम पडला' यासारखे आत्मानुभव हे फसवे असू शकतात, कारण तो पहिल्या आठ दिवसांच्या औषधांचा लेट इफेक्ट असू शकतो, किंवा तसंही ते दुखणं दहा दिवसांत बरं होणारं असू शकतं. अनेक लोकांना गुण आल्यासारखा परिणाम दिसणं यासाठी काही लागत नाही. या लेखात असा विश्वास कसा पसरतो हे स्टॉक मार्केट गुरूचं उदाहरण देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तुम्हाला ज्यावर विश्वास ठेवायचा त्यावर ठेवा. पण त्यावरून 'अमुक अमुक पदार्थ हा औषध आहे' असं म्हणता येत नाही. 'मला हा पदार्थ घेतल्यावर फायदा झाला असं वाटतं' इतपतच म्हणता येतं. तुम्हाला आवडो न आवडो, औषध म्हणून मान्यता मिळण्यासाठी निकष आहेत. त्या निकषांवर होमिओपथीचं काहीच उतरत नाही.

In reply to by धन्या

इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे?
हो हो मीही हेच म्हणणार होतो ... अजुन काही प्रश्न : पृथ्वी गोल आहे म्हणणार्‍यांनी कितीवेळा पृथ्वी फिरुन पाहिलिये , किंव्वा पृथ्वी सुर्याभोवती फिरते म्हणणार्‍यांन पकी किती जंणांना त्याचा अनुभव आलाय ? कशावरुन सुर्य पृथ्वी भोवती फिरत नाही ? =))

इथे लोकं वादासाठी वाद घालत आहेत. होमिओपॅथी हे थोतांड आहे असं म्हणणार्‍या एकानेही ज्यांना त्याचा उपयोग झाला तो कसा ह्याचे उत्तर दिले नाही. प्लासिबो इफेक्ट असला तर एखाद्य चालून जाईल. कैक वर्ष, कैक रोगांवर वेगवेगळ्या लोकांना उपचाराने बरं वाटलं असेल तर तो प्लासिबो इफेक्ट कसा असेल. असो. आंधळेपणे विरोध करणार्‍यांकडून ठोस उत्तर मिळायची अपेक्षा नसल्याने ह्या विषयावर आमची लेखनसीमा.

In reply to by आदिजोशी

बरोबर आहे. इथे लोकं वादासाठी वाद घालत आहेत. शहाण्या माणसानी उगाच आपले रक्त तापवून घेउ नये. उन्चावरुन गम्मत बघावी. ;)

होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात. धागार्त्यास विनंती की त्यांनी नमुन्यादाखल एकाद्या पेशंटास काय काय प्रश्न विचारले, ते इथे लिहावे.

लग्न जमण्यावर होमिओपाथीत काही औषध आहे का ? संपादक मंडळ , हा प्रतिसाद टवाळखोरीचा वाटल्यास उडवून टाकावा. प्लीज !

In reply to by चौकटराजा

@लग्न जमण्यावर होमिओपाथीत काही औषध आहे का ?>>> =)) होमिओच काय कुटच्याही पॅथित असेल...तरी सांगा! =))

In reply to by चौकटराजा

लग्न जमण्यावर औषधे आहेत. "गलत साबित करने वाले को दस हजार नगद इनाम" (नोटः यह कोई धोका, फरेब नही है, आजतक सैकडो लोग इनाम पा चुके है) १. लग्न जमत नाहीये, आणि ते जमावे यासाठी: नक्सव्हॉम ३०, कॅलेन्डुला २०० २. लग्न तर जमले, पण पुढला त्रास टाळण्यासाठी: कल्केरिया कार्ब २००, सिलिशिया २०० ३. लग्न जमूच नये यासाठी: कॅन्थेरिस १००० (फक्त एक डोस) त्यानंतर कॅनॅबिस इंडिका ३० आणि हेपर सल्फ ३० वरील सर्व उपचार स्वतःचे लग्नाचे संबंधित आहेत. मुलाचे, मुलीचे, वडिलांचे, आत्याचे, मामीचे, मित्राचे, मैत्रिणीचे वगैरे लग्नासंबधी दुसरी औषधे आहेत. गरजवंतांनी व्यनितून संपर्क करावा.

In reply to by कवितानागेश

कॅनॅबिस इंडिका उत्तमच, पण त्याचं ३० डायल्यूशन? एक रेणूसुद्धा शरीरात जाणार नाही, मग काय मजा? ;)

सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण असं आहे, की लोक फक्त पॅथीची माहिती नसताना फुकटची चर्चा करतायत. पण आहार विहार आणि मानसिक आरोग्य यादेखिल तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे पार दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ; मला सर्दी झाली आहे. तरीही मी तिन्ही त्रिकाळ दही खातेय, पावसात भिजतेय, एसी २० वर ठेउन बसतेय आणि जागरणं करतेय.... मग जगातला कुठलाही डॉक्टर आणि कुठलिही पॅथी मला बरं करु शकणार नाहीत. आणि मी सगळ्याच्या नावानी शिमगा करायला मोकळी होईन! ;) सगळ्या रोग्यांना वाटत असतं की डोक्टरनी जादूची गोळी द्यावी आणि एका क्षणात आपल्याला बरं करावं, म्हणजे आपण पुन्हा उनाडायला मोकळे. पण तसं कधीच होत नाही. पॅथीच्या चर्चेला अर्थ नाही. कारण सगळ्याच पॅथी आपापल्या जागी योग्य आहेत. गरजेप्रमाने त्या त्या वेळेस काय वापरायचं हे रोग्यालादेखिल कळ्णं आवश्यक आहे. पण आपल्याला स्वतःला आपल्या विचित्र लाईफस्ताईलमध्ये शरीर नक्की कसं काम करतंय आणि काय काळजी घ्यायला हवी याचं भान नसतं. मग एखादी "पॅथी" कशी काम करतेय हे कुणालाही कळणं फार दूरची गोष्ट आहे. :)

In reply to by कवितानागेश

उदाहरणार्थ; मला सर्दी झाली आहे. तरीही मी तिन्ही त्रिकाळ दही खातेय, पावसात भिजतेय, एसी २० वर ठेउन बसतेय आणि जागरणं करतेय.... मग जगातला कुठलाही डॉक्टर आणि कुठलिही पॅथी मला बरं करु शकणार नाहीत.
म्हणजे वरील गोष्टी केल्यामुळे सर्दी होते असं म्हणायचंय का? पण मग होमिओपॅथी तत्त्वज्ञाना (- "सारख्याने सारख्याचा नाश") अनुसार तर आपली सर्दी हेच सगळे केल्यामुळे बरी व्हायला हवी हो?

In reply to by कवितानागेश

सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण असं आहे, की लोक फक्त पॅथीची माहिती नसताना फुकटची चर्चा करतायत
असहमत.. खूपजणांनी खूप वाचन करून फार योग्य प्रश्न विचारले आहेत.. ज्यावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्नही झालेला नाही.. अनेकांचा आक्षेप विरलीकरणाच्या संकल्पनेवर आहे.. औषधाची उपयुक्तता गृहीत धरली तरी ती संकल्पना पचनी पडत नाही..

In reply to by बाळ सप्रे

बेसिक शंकांना उत्तरे तर देता येत नाहीत, मग प्रश्नकर्त्यांवर सरसहा आरोप करून आपल्या अंधश्रद्धेचे समर्थन करायचे हा प्रकार इथे कैकदा दिसून येतोय. प्रश्नकर्ते डॉक्टर नसतील म्हणून त्यांचे सर्व प्रश्नच रद्दबातल कशावरून? अन समजा तोच न्याय लावायचा असेल तर समर्थक तरी जे डॉक्तर नाहीत त्यांना तरी काय कळतंय?

राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या अॅलोपॅथी प्रॅक्टीस बाबतच्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात होमिओपॅथीक डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचे विधेयक पारीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेत पारीत करण्यात आलेल्या विधेयकानुसार आता एक वर्षाचा फार्माकॉलॉजीचा कोर्स केल्यास होमिओपॅथीक डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करता येणार आहे. राज्यातील ग्रामीण भाग तसेच शहरातील मध्यमवर्गीय व झोपडपट्टी भागात सर्वाधीक होमिओपॅथीक डोक्टरांकडून रुग्णसेवा केली जाते. परंतु, रुग्णांवर तातडीच्या उपचारांसाठी होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टीस करता येत नव्हती. आमदार वसंत गिते यांनी या बाबत राज्य विधानसभेत आवाज उठवत होमिओपॅथीक डोक्टरांच्या न्याय्य मागण्या लावून धरल्या होत्या. आता राज्यातील ६० हजाराच्यावर होमिओपॅथीक डॉक्टरांना फार्माकॉलॉजिचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्याचा मार्ग मोकळा होईल. या निर्णयाचे राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांनी आधीच जोरदार स्वागत केलेले आहे. नव्याने करण्यात आलेल्या विधेयकात बॉम्बे होमिओपॅथीक प्रॅक्टीशनर्स एक्ट १९५९ मधील "ओन्ली" हा शब्द वगळण्यात आला असून, एमएमसी एक्ट १९६५ मध्येही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथीची दारे उघडून देण्यात आली आहेत, असे मनसे प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी म्हटले आहे. साभारः होमिओपॅथीक डॉक्टरांना अखेर न्याय

In reply to by आयुर्हित

हे चुक आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट तत्वता मान्य नसताना, त्याची प्रॅक्टीस करण्याची परवानगी कशी दिली जाते? मी दुसरीकडे म्हणल्या प्रमाणे हे म्हणजे एखाद्या नास्तिकाला देवळाचा पुजारी करण्यासारखे आहे.

In reply to by प्रसाद१९७१

होमिओपदीच्या डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्र अमान्य असते का?

In reply to by अनुप ढेरे

होमिओपदीच्या डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्र अमान्य असते का?
हो. होमिओ पाथी च्या लोकांची शरीराची कार्य कशी चालतात ह्या बद्दल पूर्ण वेगळी मते आहेत. एखद्या औषधाची clinical trial कशी घ्यावी हे त्यांना माहीती नाही. त्यांना bacteria, virus वगैरे मान्य नाही. रक्ताचे विविध घटक, हार्मोन असले प्रकार माहिती/मान्य नाहीत. सध्या भारतात हे विषय म्हणुन शिकवत असतील, पण ते होमिओपाथीचे भाग नाहीत.

In reply to by आयुर्हित

या निर्णयाचे राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांनी आधीच जोरदार स्वागत केलेले आहे. नाहीतरी ९५ टक्के लोक ते अगोदरच करत होते आता फक्त राजमान्यता मिळाली. उरलेले पाच टक्के( कि एक टक्का) जे शुद्ध होमियोपथी चा व्यवसाय करतात ते आधुनिक वैद्यकाच्या साईड इफेक्ट्स बद्दल कंठशोष करून आपली टिमकी वाजवत असतात. उदा. डॉक्टर बात्रांचे जितके लेख मी कुतूहल म्हणून चाळले त्यात एकही लेख असा आढळला नाही कि त्यात "साईड इफेक्ट्स" बद्दल आरडा ओरडा नाही. हिच परिस्थिती इतर होमेओपाथ ची आहे. माझे म्हणणे एकच आपली रेषा मोठी आहे दाखवण्यासाठी दुसरी रेषा लहान आहे हे दाखवणे आवश्यक आहे का?

In reply to by सुबोध खरे

लोकांच्या हे का लक्षात येत नाही की नीट Clinical Trials झाल्यामुळे "साईड इफेक्ट्स" लक्षात आले आहेत. Trials करायच्या नाहीत आणि म्हणायचे की "साईड इफेक्ट्स" नाहीत, ही शुद्ध बुवाबाजी आहे. पण नशिबानी होमिओपाथीला "साईड इफेक्ट्स" ची भिती नाही, साखरेच्या गोळ्यांचा "साईड इफेक्ट" काय होणार (फक्त मधुमेहींना होत असणार).

जे गंडे - दोरे देतात त्यांची गंडोरापॅथी असते का मग ?......डोरा डोरा.......मिनी डोरा.

In reply to by इरसाल

:-) त्या लोकांना डॉक्टर ओफ गंडोपाथी असे का म्हणु नये? बंगाली बाबांना नावापुढे डॉक्टर ही पदवी लावायची परवानगी का मिळु नये?

आजची 'आयुष' मंत्रालयाची बातमी वाचल्यावर आठवण झाली ती या आणि आयुर्वेदावरच्या वाचनीय धाग्यांची. या नवीन मंत्रालयावर आता आयुर्वेद, योगोपचार, होमिओपॅथी यांबरोबरच सिद्ध आणि युनानी या पद्दतींच्या वापराबद्दल लोकजागृती करण्याची (promoting traditional medicines) जबाबदारी असेल असं दिसतं. या जबाबदारीत या निरनिराळ्या उपचारपद्दतींच्या प्रमाणीकरणाबद्दल प्रामाणिक प्रयत्न करणं देखील अभिप्रेत असेल अशी आशा आहे. यात औषधांची सुरक्षितता आणि उपयुक्तता स्थापित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या करणं (pre-clinical and clinical trials), तसंच भोंदू व्यावसायिकांवर कठोर नियंत्रण ठेवणं हे सर्व समाविष्ट असेल. हे खास खातं स्थापन करणं ही चांगली पायरी असेल, पण या मंत्रालयाने वरील जबाबदार्‍यादेखील समर्थपणे सांभाळल्या पाहिजेत. श्री. श्रीपाद येस्सो नाईक यांची या नव्या खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक झाल्याचं वृत्तात म्हंटलं आहे. त्यांच्याकडे या व्यतिरिक्त सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे स्वतंत्र मंत्री म्हणूनही पदभार आहे.