घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे.
काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो.
१ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो.
2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत
४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. -
४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही.
३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. –
थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात,
औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये.
२ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो.
३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लग्न जमण्यावर औषधे आहेत.
खरोखरच कॅनॅबिस इंडिका ३० ????
कॅनॅबिस इंडिका उत्तमच, पण
म्हणजे सर्दीवर काही औषध आहे
म्हणजे लग्न जमण्यासाठी का
लग्न जमण्यासाठी का लग्न न
सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण
उदाहरणार्थ; मला सर्दी झाली
सावधपण सर्वविषयी
थोडक्यात 'पथी' बरोबर 'पथ्य'
सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण
+१
मी डॉक्टर नसेन पण मूर्ख पण
होमिओपॅथीक डॉक्टरांना अखेर न्याय
नास्तिकाला देवळाचा पुजारी करण्यासारखे आहे.
होमिओपदीच्या डॉक्टरांना
होमिओपदीच्या डॉक्टरांना
होमिओपॅथीक डॉक्टरांना अखेर न्याय
जाता जाता
लोकांच्या हे का लक्षात येत
अच्छा
त्या लोकांना डॉक्टर ओफ
आजची 'आयुष' मंत्रालयाची बातमी वाचल्यावर आठवण झाली
या जबाबदारीत या निरनिराळ्या उपचारपद्दतींच्या प्रमाणीकरणाबद्दल प्रामाणिक प्रयत्न करणं देखील अभिप्रेत असेल अशी आशा आहे.यात औषधांची सुरक्षितता आणि उपयुक्तता स्थापित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या करणं (pre-clinical and clinical trials), तसंच भोंदू व्यावसायिकांवर कठोर नियंत्रण ठेवणं हे सर्व समाविष्ट असेल. हे खास खातं स्थापन करणं ही चांगली पायरी असेल, पण या मंत्रालयाने वरील जबाबदार्यादेखील समर्थपणे सांभाळल्या पाहिजेत. श्री. श्रीपाद येस्सो नाईक यांची या नव्या खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक झाल्याचं वृत्तात म्हंटलं आहे. त्यांच्याकडे या व्यतिरिक्त सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे स्वतंत्र मंत्री म्हणूनही पदभार आहे.