Skip to main content

कावळा बायकांनाच का शिवतो?

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 14/06/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली. 'ये क्या है? 'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली. 'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश. 'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?' 'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली. त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई? 'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले. "सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो. कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39494
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by साती

स्त्रिया आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी पवित्र, कोमल, किंवा काही वेगळ्या आहेत, म्हणून त्यांना जपून ठेवावं हा पुरुषप्रधान विचारच आहे. तुझ्यासारख्या अनुभवी डॉक्टरने अनुभवातून या पुरुषप्रधानतेला सुरुंग लावणं यथायोग्य आहे. त्यामुळे प्रतिसाद अतिशय आवडला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"काही" आय डी " काही " विविक्षित धाग्यांवर न बोलावता पोहोचतात. चिखलात दगड टाकून टाळ्या पिट्ण्याची हौसच जन्मजात असते काही आयडींना ! एरव्ही एखाद्या सकारत्मक चर्चेच्यावेळी ही आय डी वट वाघळांसारखे झाडावर उलटे लोंबत असतात आणि संधी मिळाली की उडी टाकतात ! पुन्हा गायब ते गायब !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओकांना हवे असलेले पैकेट त्यांना न देता ते फक्त लेडीजशी संबंधित आहे, म्हणून जपून ठेवावं, हा त्या सार्जंट आणि सरदारजीचा पुरुषप्रधान विचारच आहे. ओकांसारख्या अनुभवी विंग कमांडराने अनुभवातून या पुरुषप्रधानतेला सुरुंग लावणं यथायोग्य आहे. त्यामुळे धागा अतिशय आवडला.

In reply to by चित्रगुप्त

कावळे आपल्या विविध भावनांचे विरेचन करतात असे ऐकले होते. या धाग्याच्या चावडीवर एरव्ही माझ्या सारख्यांच्या विषयाच्या पिंडाला न शिवणारे एकमेकांवर तुटून पडताना पाहून पुरूष प्रधानानांनी नॅपकिन वापरले पाहिजेत असे वाटले तर नवल नाही...

हॅ हॅ हॅ.. लहानपणी "ताकत के लिये" असलेल्या औषधांच्या बाटल्या घेऊन रस्त्याकडेला टेम्पो लावून बसलेल्या वैदूंकडचे बलदंड पैलवानांचे फोटो पाहून आम्हालाही अशी ताकद हवी असं वाटून घरी मी अन माझ्या शाळकरी मित्राने त्या औषधांसाठी पैसे मागितले. तेव्हा आमच्या आयांची रिअ‍ॅक्शन पाहून अशीच काहीशी अवस्था झाली होती. ती ताकद वेगळी इतकंच त्यावेळी कळलं. विषयाच्या औचित्याबद्दल काही टिप्पणी: हो. एखादी गोष्ट रद्द होण्यासाठी तिची रद्दी होणं आवश्यक असतं हे आवडतं वाक्य मी बर्‍याच ठिकाणी पेरत असतो. अनावश्यक टॅबू विषय नष्ट व्हायचे तर त्यांच्याविषयी बोलून बोलूनच त्याची रद्दी होईल. तार्किकदृष्ट्या विषय आणि मांडणी ही कितपत आकर्षक आहे त्यावर मत देत नाही, पण एक हलकाफुलका किस्सा सांगितला आहे. स्त्रीविषयक काही टार्गेट असा उद्देश उघडपणे मनात नसावा. असे प्रसंग अगदी आयाबहिणी, पत्नी, मैत्रिणीसमोर सांगून हलकेच घेतलं जाणं उत्तमही असेलच. पण पण पण.. समजा अशा घरगुती ग्रुपमधे आपण असा प्रसंग वर्णिला. त्यापैकी सर्वांनीच तो हलके घेतला. फक्त सदरहू ग्रुपपैकी एका बहिणीला किंवा मावशीला किंवा दोघींना किंवा मोठ्या मामाला तो संकोचजन्य वाटला आणि त्यांनी कौटुंबिक बैठकीत तसं मत नोंदवलं तर शांतपणे ते स्वीकारणं किंवा मूळ उद्देश बाजूला ठेवून दिलगिरी व्यक्त करणं हे जास्त योग्य ठरावं. त्या दोघींना नाही ना बरं वाटलं, मग गडबड झालीच.. अशावेळी तिथल्यातिथे त्यांची विचारसरणी कशी कालबाह्य आहे किंवा मूळ किस्सा कसा लॉजिकल होता हे पटवून वाद वाढवणे योग्य वाटेल का? दररोज दोन पेग दारु पिणे कदाचित आरोग्याला अपायकारक असेल किंवा नसेल. स्वतःला त्यापासून अपाय असेल किंवा उपाय असेल.. पण घरातल्या आईला किंवा पत्नीला किंवा वडिलांना त्या पिण्याने मनस्ताप होत असेल तर ती थांबवणेच इष्ट नाही का? अशा वेळी त्यांना त्रास झाला इतके कारण बास नाही का? किती मिलिलीटर दारु दिवसाला चालते आणि त्याच्या सध्याच्या मेडिकल लिमिट्स काय आहेत किंवा अन्यत्र रोज माफक मद्यपान घराघरात कसे चालते किंवा ते चालणे कसे कालानुरुप आहे याची माहिती तिथे आपल्या घरच्यांना देऊन काय उपयोग? मिसळपाव हे एक्स्टेंडेड कुटुंब मानल्यास एखाददुसर्‍या व्यक्तीच्या मनाला दुखवणारे काही झाले असल्यास त्या हरकतीचा योग्य मान किंवा मौन यापैकी एक व्हावे. धाग्यात आक्षेपार्ह काही नाही. असते तर तो शिल्लक राहिलाच नसता. धाग्यात काही तात्विक मुद्दा असता आणि त्याला कोणी तात्विक विरोध केला असता तरी ते योग्यच..पण कोणाचे मन दुखावल्यास त्यावर तार्किक प्रतिवाद करु नये असं मत आहे. यशोधरा यांनी फक्त हरकत नोंदवली आहे. धागा अप्रकाशित केलेला नाही याची नोंद घ्यावी लागेल.

In reply to by गवि

हरकत नोंदविली तर योग्य शब्दात नोंदवा. मी त्यांच्याच असे नव्हे तर इन जनरल या धाग्याला ज्यांनी आक्षेप घेतलाय त्यांच्या सगळ्यांच्या आक्षेपालाच आक्षेप घेतलाय. तेही कुणाचेही मागले पुढले काही उकरून न काढता. मग संपादिकाबाई ते पर्सनली घेऊन माझ्या मागच्या ओकांबाबतच्या लिखाणाचा संदर्भ देऊन , इतर संस्थळावरची माझी मते लिहून नळावरच्या बायकांच्या भांडणाप्रमाणे भांडण का करत सुटल्येयत? मूळात गरज नसताना ओककाकांच्या मागच्या लेखाचे संदर्भ का? मूळात इथे कोण कुणावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत नसताना तुम्ही हा पॉईंट स्कोअर केलात वैगेरे भाषा काय संयत मानसिकतेचे ध्योतक आहे का? आणि हे इथेच नव्हे तर मूद्दाम माझ्या बर्याचश्या प्रतिसादांच्या मागेमागे इकडचं तिकडचं उकरून केवळ या एकाच आयडी किंवा संपादिकेकढून का? असो. याविषायावर वाद घालायला मला याहून वेळ नाही. ;) त्यामुळे युनिलॅटरल मॅचमध्ये यशोधराबाईंनी यापुढे कितीही पॉईंट स्कोअर केले तरी चालतील. :)

In reply to by साती

तुमचे बरोबर आहे हो गाववाले.. :) फक्त कोणाचा मुद्दा दुखावले जाण्याकडे वळला की तार्किक प्रतिवाद करत बसू नये इतकंच मत आहे. तार्किक प्रतिवाद तर्काचाच करता येतो. भावनेचा नव्हे. मला तुझा प्रथम प्रतिसाद अत्यंत आवडलेला आहे. मी एकूण अनाठायी वादाबद्दल बोलतोय. तुझ्याच नव्हे तर एकूण धाग्यावरच्या. तुझा नम्र -(रत्नांग्रीकर) केळकर ;)

In reply to by साती

साती, मला एक सांगा, मी कुठेहे तुमचे नाव घेता जनरल बर्‍याच आयड्यांबाबत ते लिहिले होते, तर तुम्ही ते स्वतःच्या अंगावर का ओढवून घेतले, मला काही समजले नाही खरेच. तुमचा कोणताही प्रतिसाद आजवर मी उडवला नसताना, माझा प्रतिसाद उडवालच वगैरे कशाला बोललात? मूळात गरज नसताना ओककाकांच्या मागच्या लेखाचे संदर्भ का? >> स्त्री पुरुष समानतेचा संबध नसताना जर तो मुद्दा होऊ शकतो, तर ज्या लेखकाच्या धाग्याचा विषय आहे, त्याच लेखकाच्या मागच्या धाग्यांचा उल्लेख झालेला का खटकावा? आमचा तोच फक्त मुद्दा.. असं काही आहे का? >>माझ्या बर्याचश्या प्रतिसादांच्या मागेमागे इकडचं तिकडचं उकरून >>आँ? बर्‍याचश्या प्रतिसादांवर काय उकरलं आहे ते सिद्ध करा. नाहीतर विधान मागे घेऊन माफी मागा.

In reply to by साती

मूळात इथे कोण कुणावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत नसताना तुम्ही हा पॉईंट स्कोअर केलात वैगेरे भाषा काय संयत मानसिकतेचे ध्योतक आहे का?
हे अगदीच अरेरे आणि दुर्दैवी. तुअम्च्या पहिल्या संयत भाषेतल्या प्रतिसादाबद्दल ते होते. ब्राऊनी पॉईट्स. कौतुक होतं ते , प्रतिसाद विषयाला टेंजंट होता (कारण पाळीबद्दलचं लिखाण हा मूळ मुद्दाच नव्हता - पाळी वा त्याबद्दलचा किस्सा कसा संयत भाषेत सांगता येतो आणि मुद्दा पोहोचवता येतो ह्यासाठी सूड्चा धागा पहावा) तरी उत्तम भाषेसाठी ते पाँईट्स होते, पण एकाच दिशेन विचार करुन अर्थाचा अनर्थ करुन एखाद्याचे नाव कारण नसताना कसे खराब होऊ शकते ह्याचा हा एक चपखल नमुना. असो. :) चालूदेत.

In reply to by गवि

व्यक्तीच्या मनाला दुखवणारे काही झाले असल्यास त्या हरकतीचा योग्य मान किंवा मौन यापैकी एक व्हावे.
मौन एकवेळ मान्य .. की हरकतीच्या प्रतिसादावर काहीच प्रतिक्रीया न देणे.. योग्य मान म्हणजे नक्की काय करावे?? खास करुन आपल्याला त्यात काही आक्षेपार्ह वाटत नसताना.. परत त्या प्रतिसादावर प्रतिसाद नाही दिला तरी धाग्यावरी इतर सर्व प्रतिसाद वाचून एखाद्याचे मन परत परत दुखावले जाउ शकतेच ना.. त्याला काय करणार?? आणि हजारो आयडी आणि शेकडो वेगळेवेगळे विषय असताना कुणाचे मन कुठे दुखावेल सांगता येत नाही...

In reply to by गवि

..पण कोणाचे मन दुखावल्यास त्यावर तार्किक प्रतिवाद करु नये असं मत आहे.
ह्याला समंजसपणा असे म्हणतात. प्रचंड सुंदर प्रतिसाद.

In reply to by एस

याला समंजसपणा नव्हे, सारवासारव म्हणतात. मुळात काही लोकांनी अकारण भावनांची गळवे दुखवून घ्यायची आणि वाट्टेल ते ताशेरे ओढायचे (कुणालाही वैयक्तिक रीत्या उद्देशून लिहित नाही, पण काही मासलेवाईक प्रतिक्रिया पाहू - ) - मुक्तपीठीय पोस्ट ! - खूपच मजा येत असेल ना चित्रगुप्तकाका, ह्या विषयावर चवितचर्वण करुन? चालूदेत. जिलबी आहे ही. ती ही बेचव. ओकावंसं वाटणारा धागा टाकला काकांनी मग इतरांनी सभ्य शब्दात पण कणखर आणि मुद्देसूद प्रतिवाद केला की त्यांच्यावर अतार्किक, असंबद्ध आरोप (त्या अमक्या धाग्यावर लेखकाची टिंगल ना हो केली होतीत? मग आता बाजू का घेताय?...मला तरी यातलं अगम्य लॉजिक समजलेलं नाही) व्यक्तिगत टोमण्यांची राळ उडवून देणे, आणि केवळ वादासाठी वाद... आणि हे डावपेच व्यर्थ जाताहेत म्हटल्यावर गविंसारखा कोणीतरी येऊन रुद्ध कंठाने भावनात्मक आवाहन करणार - मग आपण कसे एक्स्टेंडेड कुटुम्ब आहोत की नाई, ताईसाहेबांचा, मामासाहेबांचा मान राखला पाहिजे की नाही, मग माफी मागा पाहू, वगैरे टिपिकल एमोशनल ब्लॅकमेल. मुळात फालतू नॉन-इश्युवरून कोणी मन दुखावून घेत असेल तर त्यानेच ते मनात ठेवावं, किंवा मग उघडपणे मत मांडायचं झाल्यास प्रतिवाद ऐकण्याची तयारी ठेवावी. सोयीस्कर असेल तेव्हा मिसळपाव हे एक ऑनलाईन फोरम आहे आणि नसेल तेव्हा एक्स्टेंडेड कुटुम्ब अशी मखलाशी करू नये.