कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे.
कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले!
मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली.
'ये क्या है?
'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली.
'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश.
'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?'
'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली.
त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई?
'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले.
"सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो.
कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
वाचने
39494
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to कठिण आहे. by साती
बाब्बौ..
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुरुषप्रधान विचार
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकमेकांशी टोच्या मारून
In reply to पुरुषप्रधान विचार by चित्रगुप्त
हजार टक्के सहमत. परफेक्ट
In reply to कठिण आहे. by साती
समर्पक आणि संतुलोत
धन्यवाद!
In reply to समर्पक आणि संतुलोत by चित्रगुप्त
हॅ हॅ हॅ..
नळावरचे भांडण!
In reply to हॅ हॅ हॅ.. by गवि
तुमचे बरोबर आहे हो गाववाले..
In reply to नळावरचे भांडण! by साती
साती, मला एक सांगा, मी कुठेहे
In reply to नळावरचे भांडण! by साती
मूळात इथे कोण कुणावर कुरघोडी
In reply to नळावरचे भांडण! by साती
व्यक्तीच्या मनाला दुखवणारे
In reply to हॅ हॅ हॅ.. by गवि
सुंदर
In reply to हॅ हॅ हॅ.. by गवि
याला समंजसपणा नव्हे,
In reply to सुंदर by एस