धनंजयशी सहमत. फक्त नावामुळे पाकृ असेल असं वाटलं त्यामुळे लेख उघडावा का नाही असा विचार केला.
>> हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते
हे फक्त थोडं सर्वसमावेशक विधान वाटतं; प्रवासी विमानांना उड्डाणासाठी वातावरण लागतं आणि ऑक्सिजनसाठीही. किमान काही प्रकारच्या लढाऊ विमानांना वातावरणाची आवश्यकता नसते असं वाचल्याचं आठवतंय. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.
१. प्रोपेलर - या इंजिनाला जोडलेली पाती पंख्यासारखी फिरून हवेला मागे ढकलून निमानाला गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
२. जेट - यातसुध्दा इंजिनात होण्यार्या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब प्रचंड प्रमाणात वाढवल्यावर तिला बारीक छिद्रांमधून मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. तिचा अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान पुढे जाते.
३. रॉकेट इंजिन - यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानबरोबर नेला जातो. ज्वलनात उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने विमान पुढे जाते. अतीवेगवान अशा लढाऊ विमानात अशा प्रकारच्या इंजिनाचा उपयोग करतात.
वरील तीन्ही प्रकारात विमानाच्या उध्दरणासाठी वातावरणाची आवश्यकता असते. अग्निबाण मात्र निर्वात पोकळीत उडू शकतात. त्यासाठी अधिक शक्तीशाली रॉकेट्स असतात.
तुमच्या बुधा १ बुधा २ चा संदर्भ मी मूळ लेख वाचल्या नसल्याने लागला नाही. पण नुकताच मुंबई ते न्यूआर्क हा प्रवास थेट मार्गाने केला. तुमच्या मनात आलेले सर्व प्रश्न मलाही पडले होते. मुंबई ते न्युयॉर्क/न्युजर्सी थेट विमाने सुरू झाल्याचे गेल्या १-२ वर्षातच समजते. (एअर इंडियाने तर थेट उड्डाणे ह्याच वर्षी सुरू केली, असे कुठल्यारी बातमीत वाचल्या सारखे वाटते) पहिल्या प्रवासात विमान कोणत्या मार्गाने जाणार ह्याचे मला देखिल कुतुहल होते. मला ते अफ्रिका खंडावरुन जाईल असे वाटल्याने ह्यावेळेला थोडा वेगळा भूभाग बघायला मिळेल असे वाटले होते पण विमान कॅनडाच्या दिशेने चढाई करायला लागल्यावर पुन्हा नेहमीचाच भूभाग बघायला मिळणार हे कळले. मला वाटत होते की जमिनीला जास्तित जास्त धरुन जाता यावे म्हणून ही वाट निवडली पण त्यामागचे नेमके कारण तुमच्या लेखातुन समजले धन्यवाद!
(शिकागो-चायना ह्या थेट विमानात मात्र उत्तर ध्रुव ओलांडून जायला मिळाल्याने खिडकीतुन खाली खूपच वेगळा नजारा बघायला मिळाला होता.)
घारे साहेब,
उत्तम लेख. पिवळा डांबीस ह्यांना अमेरिकेत स्थायिक असल्याचा अहंकार आहे हे वेळोवेळी त्यांच्या प्रतिसादातुन प्रतित झालेले आम्ही पाहिलेले आहे.
अमेरिकेत कित्येक वर्षं वास्तव्यास असणे ह्यात फुशारक्या मारण्यासारखे आम्हाला तरी काहीही वाटत नाही, तस्मात त्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.
-कारकुन
घारे साहेब तुमची कळकळ आणि जळजळ समजली. मिपावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी लागते. तेव्हा प्रतिसाद किंवा त्यांचा अभाव, काहीही असले तरी दिल पे मत लो यार!
आपल्या तात्यारावांनीही मिसळपावाच्या गाडीवर साबूदाण्याची लापशी ठेवायला मुभा ठेवली आहेच.
लापशीच नव्हे, तर कारल्याची भाजी, बोंबीलांचे कालवण, इनोचे पेय, सगळे सगळे चालते. फ़क्त खा़उन जनतेला जास्त पोटदुखी होणार नाही ह्याचे भान ठेवायचे.
मिपावर वावरायचे म्हणजे गेंड्याची कातडी लागते
ती लागतेच, एकदा शिंग खुपसावेसेही वाटले.
आमचे आंतर्जालीय मित्र अँडी स्काऊंड्रल उर्फ आनंदयात्री यांना याचा फार अनुभव आहे!
"राजहंसाचे चालणे भूवरी जालिया शहाणे म्हणून काय आणिक कोणे चालावेचि ना ? " असे विचारून आपल्या ज्ञानेश्वर माउलींनी सर्व किडेमकोडे, खेकडे वगैरेंना बिनधास्तपणे आपापल्या वेड्यावाकड्या चालीने चालत रहायचा मुक्त परवाना दिला आहे.
हे मात्र खरं! :)
आपल्या तात्यारावांनीही मिसळपावाच्या गाडीवर साबूदाण्याची लापशी ठेवायला मुभा ठेवली आहेच.
नक्कीच आहे. जो जे वांछिल तो ते लिहो.. :)
तात्या.
आम्हाला घारे साहेबांची भाषा आणि परिभाषा माहित आहे. तसेच त्यांचे विज्ञान अज्ञान व अंतर्ज्ञान ही माहित आहे.
सहमत आहे.
नावामुळे पाकृ असेल असं वाटलं त्यामुळे लेख उघडावा का नाही असा विचार केला.
मलाही तसेच वाटले, इथे दुसरेच प्रकरण दिसत आहे. :(
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण
+१
विमानाचे इंजिन
नविन वाट
जमालगोटा उगाळून
उत्तम लेख
अय्या, हो नं!!!!
भावना पोहचल्या.
कारल्याची भाजी
गेंड्याचे शिंग
गेंड्याची कातडी ना?
"राजहंसाचे
भाषा आणि परिभाषा
हम्म