✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

ध
धनंजय यांनी
Wed, 10/01/2008 - 07:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66042 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

व
विसुनाना Fri, 10/03/2008 - 15:30 नवीन

माझी वैचारीक पातळी उंचावली

धनंजय, लेख आताच वाचला. धक्का बसला. समलैगिकतेबद्दल ऐकून होतो. ऐकत होतो. वाचले होते. गर्हणीय वाटत नव्हते. मनात कुठेतरी "असू शकतं! ठीक आहे!" इतपत मनाची तयारी झाली होती. त्यावरून कुणाची चेष्टा करण्याइतपत दुष्ट नव्हतो. असं स्वतःचं समलैगिक असणं जाहीरपणे मान्य करणार्‍या (अशोक रावकवींसारख्या) माणसाबद्दल वाटे की - आहे ना? असू दे. पण उघड कशाला बोलायचं? हे काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं स्टंट आहे. पण माझ्या जवळच्या लोकांबद्दल 'असे' काही असेल तर ते पटणं आणि पचवणं अवघड आहे. जाणवतंय की माझ्या समजूती किती दृढ आहेत. तुझ्याकडे पाहून जाणवतंय की तुला प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं काही उघडपणे बोलायची गरज नाही. तू आधीच गुणी आहेस. अनेक विषयात तुला गती आहे. या गोष्टींचा उच्चार न करताही अमाप प्रसिद्धी तू मिळवली आहेस/ अजून मिळवू शकतोस. पण तरीही तू हे उघड केलंस. कशासाठी केलं असावंस? हा प्रश्न सतावतोय. किंबहुना लेख वाचूनही ते कळत नाहीय. त्याला काही सबळ कारण आहे काय? (एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!) समलैगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर काय असते?(एखाद्या स्त्रीबद्दल वाटणारं शारीरीक आकर्षण आणि मानसिक आकर्षण यातला फरक पुरुषाच्या दृष्टीकोनातून मला माहित आहे.) एखाद्या पुरुषात/स्त्रीत मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका कशामुळे उत्पन्न होतात? वयाच्या पंचविसाव्या वर्षी तू 'ते ' पुस्तक वाचले नसतेस तर तू सामान्य पुरुष म्हणून वावरला असतास काय? असे अनेक प्रश्न मनात आले. उत्तरे मिळतील? ते काहीही असो. हे आत्मकथन वाचून माझा वैचारिक दर्जा उंचावला हे मात्र खरं. हे आपल्या आप्तातही घडू शकतं -ते आपण पटवून घेतलं पाहिजे इतपत प्रगती झाली. हे हृद्गत बोलून तू आमच्यावर जो विश्वास दाखवलास त्यामुळं स्वतःचा दृष्टीकोन निकोप ठेवण्याची आमची जबाबदारी वाढली आहे.
ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे.
हे तुझे आत्मगत म्हण किंवा अनुभव म्हण पटवून घेताना मलाच भावनिक श्रम झाले. विदा/माहिती असूनही. कित्येकडाव वाटलं की तू एखादी गूगली टाकली आहेस. (तसं करण्यात तू पटाईत आहेस.अजूनही वाटतं._) इतरांच्या अनेक प्रतिसादांशी सहमत! विशेषतः - एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीत फरक पडला का? तर मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 10/04/2008 - 18:19 नवीन

गूगली नाही :-)

विसुनानांना सतावणारा प्रश्न आहे :
...हे उघड ... कशासाठी केलं असावंस? त्याला काही सबळ कारण आहे काय?
याचे सोपे उत्तर आहे, माझा सामान्य व्यवहार [जमेल तितका] प्रामाणिक आहे. हे त्याचेच अंग. येथे अधोरेखित करतो - हा असामान्य प्रामाणिकपणा नाही, बाकीचे लोक जितपत प्रामाणिक असतात तितकाच प्रामाणिकपणा आहे. प्रसिद्धीसाठी उघड केले नाही, हे तर आधीच पटलेले आहे, त्यामुळे तो विचार पुढे चालवत नाही. - - - -
(एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!)
अत्यंत योग्य दिशेने विचार आहे. पण हा विचार इंटरनेटच्या पूर्वीच्या काळी निष्फळ ठरला असता. शरिराच्या आकारामुळे, वरच्या पट्टीतल्या आवाजामुळे, ऐकून-बघूनच स्त्री कोण आणि पुरुष कोण हे कळते. "भद्र"नावे (ऑफिशियल नावे) ही कित्येक भाषांत मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी असतात. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या/लेखाच्या संदर्भात लेखक/लेखिका पुरुष/स्त्री लगेच कळून येते. मिसळपावाच्या टोपणनांवात मात्र कोण पुरुष, कोण स्त्री हे कधीकधी कळून येत नाही. तरी कित्येकदा कोणाला उपप्रतिसादांत कोणी "अमुक-तमुक-दादा" म्हणते तर उप-उपप्रतिसाद येतो - "नाही, मी अमुक-तमुक-ताई आहे". स्त्रियांची नावे ("स्वाती, माधवी" वगैरे स्पष्ट, "सुहास, शिरीष" सारखी संदिग्ध नव्हे) घेऊन काही पुरुष मागे मिसळपावावर वावरत होते, त्याबाबत लेखा-प्रतिसादी झाली होती. असे दिसले की अनेक लोकांना हे ठीक वाटले नाही. पण कोणी पुरुषाने पुलंनी लिहिलेले पुरुष नाव "लखू रिसबूड" घेतले, किंवा कोणी स्त्रीने "सरला पित्रे" नाव घेतले, तर अशा प्रकारे चुकचुक होताना दिसत नाही. त्यामुळे मिसळपावाच्या सदस्यांनी नामनिर्देशाने शक्यतोवर आपण पुरुष की स्त्री आहोत असे सांगावे, असे मिसळपावाच्या अनेक सदस्यांना वाटते. असे दिसते, की बहुतेक लोक "आपण स्त्री की पुरुष" असे कुठल्यातरी पद्धतीने आपणहून सांगतात. नावाने नव्हे, तर "मला दादा नका म्हणू, ताई म्हणा" असे लिहून. - - - - खरे म्हणजे असे विचारता येईल की याच वेळी मिसळपावावर हे कसे काय सांगितले? माझ्या प्रकट (आभासी नव्हे) आयुष्यात ही बाब सांगून-न-सांगून उघड आहे. माझ्या प्रियकरासोबत मी घराबाहेर वावरत असतो, तेव्हा दोन प्रियकर एकमेकांशी ज्या प्रकारे वागतील त्याच प्रकारे मी वागतो. ऑफिसातल्या कोणी विचारले की तुझे लग्न झाले आहे का, किंवा तसे काही ठरले आहे का? तर जे आहे तेच उत्तर देतो. मागे माझ्या प्रियकराच्या गाडीला अपघात झाला होता, आणि मला ऑफिसहून सुटी घेणे भाग होते. तडकाफडकी सुटी मी कोण्या ऐर्‍यागैर्‍यासाठी घेत नव्हतो, आप्त माणसासाठी घेत होतो, हे ऑफिसातल्या वरिष्ठाना कळले नसते तर ते कोड्यात पडले असते. असे लहानसहान प्रसंग रोजच्या आयुष्यात दिवसाला दोनतीन येतात. उदाहरणार्थ कोणी विचारते "आज डब्यात आणलेल्या पदार्थाची पाककृती काय?" "मला माहीत नाही, उद्या त्याला विचारून सांगतो..." प्रश्न असा येऊ शकेल की जर माझ्या रोजच्या आयुष्यात मी इतका "सामान्य"पणे प्रामाणिक आहे (पुन्हा लिहितो, यात असामान्य असे काहीच सांगणे नाही), तर मग मिसळपावावर ही माहिती नवीन का? मिसळपावावर असे प्रसंग कितपत येतात, ते बघूया. मागे येथे कोणी क्ष यांनी सांगितले की "मला पाककृती करता येणार नाही, सौ. क्ष यांना सांगून करून घेईन." हे गरज नसताना "आपले लग्न झाले आहे" असे सांगत आहेत काय? मला असे वाटत नाही. किंवा तुम्ही तुमच्या पत्नीने काढलेली सुरेख चित्रे येथे दाखवून आम्हाला मोहवले होते. कोणी म्हणेल "ती तुमची पत्नी म्हणून सांगायची काय गरज होती. श्री. रामदास यांनी कोण्या तिर्‍हाईत चित्रकाराची चित्रे दाखवली, तसेच करायचे..." असे कोणी म्हणणे चूक आहे. तुमच्या लेखात "ही माझी पत्नी" ही आत्मीयता जाणवत होती. उद्या समजा मी माझ्या प्रियकराने काढलेली चित्रे येथे लावली. मी असे नाही म्हणणार "अशाच कुठल्या तिर्‍हाइताची चित्रे आहेत", तुम्ही पत्नीची म्हणून सांगितली तशी मी ती प्रियकराची म्हणून सांगेन. मिसळपावावर असे प्रसंग मला अनेक आले. येथेच मी अनेक प्रेमकविता प्रसिद्ध केल्या आहेत. पुरुष प्रियकराचा उगीच स्त्री म्हणून उल्लेख कुठेही केलेला नाही. त्याच्या प्रतिसाद-उपप्रतिसादात "कवितेतील प्रियव्यक्ती स्त्री की पुरुष" असा मुद्दा कधी उपस्थित झाला नाही. कदाचित एकदाच... "रविकर" या शारिर प्रेमकवितेत थानाचा उल्लेख होऊ शकला असता (पण झाला नव्हता) असे एका वाचकाने लिहिले होते - पण त्या कवितेत "ढुंगण" शब्द योग्य की अयोग्य याबद्दल जो संवाद झाला त्याच्याकडे माझे लक्ष जास्त होते. थोडक्यात मिसळपावावर माझे हे सांगणे संदर्भ होता तेव्हा झाले होते. संदर्भ नव्हता तेव्हा हा विषय मनातसुद्धा आला नाही. यात जाहिरातही नाही, आणि लपवाछपवीही नाही. मग हा अधिक तपशीलवार लेख आता का दिला? आता काय संदर्भ होता? असा तुमचा प्रश्न असू शकतो. हा प्रश्न मी लेखाच्या "समारोपात" हाताळला होता. मिसळपावावर मी काही साहित्यिक आनंद घेण्यासाठी येतो, आणि ज्या काही चर्चा येथे चालू असतात, त्यांच्यात भाग घेतो. समलिंगितेबद्दल थेट चर्चा फारशी येथे झालेली नाही. ही चर्चा सुरू करणासाठी मी विशेषज्ञ नाही. (मी कधीकधी पोटातला वायू ढेकरेवाटे सोडतो, हे माझ्या पोटात बरे वाटण्याकरिता फार महत्त्वाचे आहे. हे मी लपवतही नाही - म्हणजे ढेकर दिल्यास आपण ढेकर देऊच शकत नाही असा कांगावा करत नाही. पोटात वायू होता, तो बाहेर टाकल्यामुळे बरे वाटले, असे सरळसरळ संगतो. ढेकर देतो या गोष्टीची जाहिरातही करत नाही. काही लोक जठरातील वायू-उत्सर्जन क्रियेचा अभ्यास करतात, आणि त्याबद्दल लेख लिहितात. मी तसा अभ्यास करत नाही, त्यामुळे तसे अभ्यासपूर्ण लेखही लिहीत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत. पण जर कोणी म्हटले "ढेकरा देणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ शकतो - "मी ढेकर देतो, आणि सहेतुक दुष्ट हेतूने देत नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "ढेकरेची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे. शरीरशास्त्राऐवजी तुमच्या मित्राचा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर तो कपाळ कारणमीमांसा सांगणार आहे. तरी त्याच्याकडूनही "ढेकर देतो, दुष्ट हेतूने देत नाही, जिथवर कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." हा विदा मान्य असायला पाहिजे.) समारोपात दुवा दिलेल्या लेखात चर्चा चालू होती की "समलिंगी आकर्षण असणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ केला - "मला समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "या आकर्षणाची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे.शरीरशास्त्राऐवजी माझा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर मी कपाळ कारणमीमांसा सांगणार होतो. तरी "समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." हा विदा मान्य असायला पाहिजे. त्यामुळे वर विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे देणार नाही. काही प्रश्न विदा स्पष्ट करायला सांगतात, त्यांची उत्तरे देईन.
१. समलैगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर काय असते?(एखाद्या स्त्रीबद्दल वाटणारं शारीरीक आकर्षण आणि मानसिक आकर्षण यातला फरक पुरुषाच्या दृष्टीकोनातून मला माहित आहे.)
जसा विचारला तसे उत्तर देता येणार नाही. स्त्रीच्या भावनांबद्दल तुमच्या मनात जी काही कल्पना आहे, त्याच्याशी तुलनात्मक विवेचन करता येणार नाही. "समलैंगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर माझ्यासाठी काय आहे?" या प्रश्नाचे उत्तर देईन. शारिरिक पातळीवर शरीरसंबध हवाहवासा वाटतो. भावनिक पातळीवर सहवास हवाहवासा वाटतो. प्रियकराशी सारखे बोलावेसे वाटते. प्रियकर जेव्हा भेटायला पाहिजे तेव्हा दिसला नाही तर असामान्य काळजी वाटते (बाकी लोकांबद्दल वाटत नाही). प्रियकराकडून बालहट्ट पुरवून घेणे, बालहट्ट पुरवणे याबाबत भावनांना मनात जागा आहे. (अन्य लोकांसमोर बालहट्ट कधी करत नाही, त्या भावना उद्भवतच नाहीत. अन्य प्रौढ लोकांनी माझ्यासमोर बालहट्ट केला, तर साधारणपणे आवडत नाही.) वगैरे, वगैरे. या भावनांचे कवितांमध्ये वर्णन आलेले आहे. या सर्व भावना शारिरिक नाहीत. याचा माझ्यापुरता समलैंगिकतेशी संबंध असा - भावनिक आणि शारिरिक आकर्षण एकत्र असले, की ते काही खास असते. हृदयाशी जास्त भिडलेले असते. असे भावनिक-शारिरिक जोड-आकर्षण मला ज्या लोकांबद्दल वाटले, ते सर्व पुरुष आहेत. ज्या काळात फक्त स्वप्नरंजन केले, त्या काळात स्वप्नातले आभासी प्रिय लोक पुरुषच होते. ते स्वप्नरंजन शारिरिक-भावनिक जोड-स्वप्नरंजन होते.
एखाद्या पुरुषात/स्त्रीत मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका कशामुळे उत्पन्न होतात?
दुहेरी भूमिकेचा वैयक्तिक अनुभव मला नाही. माझी एकच मानसिक भूमिका आहे. (भूमिकांचे स्त्री/पुरुष असे वर्गीकरण करणारे निकष सांगितल्यास, ती जी एकच भूमिका आहे, ती कुठली ते सांगेन. माझ्या मते लोक ज्याला "पुरुष" भूमिका म्हणतात, तशीच काही माझी मानसिक भूमिका आहे.) म्हणून मला उत्तर देता येणार नाही. पण जर माझ्या मित्रांपैकी मला असे कोणी सांगितले की त्याच्यात (किंवा तिच्यात) मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका उत्पन्न होतात, तर त्यांना "उत्तर द्यायचे आहे का" विचारून बघीन. तोवर तुम्ही आणि मी, दोघेही प्रकाशित पुस्तकांमधून (संकेतस्थळांवरून) ही माहिती जमा करू शकतो.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी तू 'ते ' पुस्तक वाचले नसतेस तर तू सामान्य पुरुष म्हणून वावरला असतास काय?
बहुधा ते पुस्तक नसते तर दुसरे काही निमित्त झाले असते. दहाबारा वर्षांच्या अमूर्त स्मृतींचा विदा साठला होता. पण कधीकधी असा भयाण विचार येतो - बारा वर्षे "शारिरिक-भावनिक जोड-प्रेम असते" ही भावना दाबून टाकली होती ती आणखी दहा-बारा वर्षे तशीच पुरून ठेवली असती तर? भावनेच्या दृष्टीने अधू असे ते जीवन मी आणखी कित्येक वर्षे कंठत राहिलो असतो. मला प्रेमकविता, थिल्लर प्रेमपट, प्रामाणिकपणे कधी समजले नसते. माझ्या ओळखीतल्या माझ्या वयाच्या काही "सामान्य" (स्पष्ट : समलिंगी नव्हेत) पुरुषांनी ठरवलेल्या मुलीशी निष्प्रेम विवाह केलेले आहेत. त्यांच्यातले ताणतणाव फार दु:खद दिसतात. (पुन्हा स्पष्ट : समलिंगी नव्हेत. घटस्फोट झाल्यास पुन्हा "सामान्य" विवाहच केलेत.) त्यांच्यासारखेच कुटुंबाने सांगितले म्हणून कदाचित मीही ठरवलेल्या स्त्रीशी विवाह केला असता. कर्तव्यभावनेने मी पत्नीला चांगले वागवले असते बहुधा. पण ज्या घनिष्ठ शरीर-भावना जोड-संबध मिळवण्याचा हक्क मी मानतो, त्याच्यापासून मी आणि ती स्त्री दोघेही वंचित राहिलो असतो. त्या शरीरसंबंधातून उत्पन्न झालेल्या संततीला केवळ कर्तव्यदक्ष आणि निष्प्रेम आईवडील घरात दिसले असते. घरच्यांनी नीट बघून जोडी जमवली असती, तर बहुधा स्त्री कर्तबगार आणि हुशार असती. आपल्या भावनिक हक्कांची पायमल्ली होताना बघून तिने लवकरात लवकर घटस्फोट घेतला असता, मीही तो योग्य मानला असता, अशा विचाराने थोडेसे (खूप थोडेसे) हायसे वाटते. त्या स्त्रीची तरुण्यातली काही वर्षे प्रेमाशिवाय वाया गेली असती. त्या गुन्ह्याचा मी वाटेकरी झालो असतो. ती स्त्री मी (आणि समाजाने) तिच्यावर केलेल्या अन्यायामुळे कडवट झाली असती. मुद्दामून वाईट न चिंतूनही असा पश्चात्ताप मला करावा लागला, म्हणून मीसुद्धा कडवट झालो असतो. असला दु:खी जीवनक्रम माझ्या (आणि ती कोण बरे स्त्री, तिच्या) वाट्याला आला नाही. माझी आणखी कित्येक वर्षे भावनिक अपंगत्वात गेली नाहीत. या घडलेल्या जीवनक्रमाबद्दल फारच आनंद वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विसुनाना Sun, 10/05/2008 - 11:35 नवीन

आभार

सविस्तर उत्तराबद्दल आभार! बाकी बोलत राहू. खाली आलेल्या प्रतिसादांप्रमाणे पुस्तकाबाबत जरूर विचार व्हावा. धनंजयाइतके शुद्ध विष्लेशण करून या विषयावर प्रथमपुरुषी लिहिणारा जगात विरळाच असेल. अर्थात अशा पुस्तकाच्या लेखकाने स्वतःच्या भावनिक श्रमांचा (होणार असतील तर) आणि कालापव्ययाचा (अपव्यय वाटेल तर) विचार जरूर करावा. त्यासाठी तो समर्थ आहेच.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
श्रावण मोडक Sun, 10/05/2008 - 17:53 नवीन

विरळा आणि श्रम

हा अनुभव विरळाच असेल, हे (माझ्या वाचनाच्या अनुभवाचा विचार करता) मराठीपुरते तरी निश्चितच. आत्मकथन लिहिणे म्हणजे त्या-त्या काळाचे जगणे पुन्हा जगायचे असा प्रकार असतो. ते सोपे नसते. त्यामुळे श्रम आणि कालापव्यय याबाबतचा विचार मात्र लेखकाने करावा याविषयी सहमत. याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे पुस्तक झाले तर त्याच्या वाचनातून काही वाचकांना विचारपरिवर्तनाचा मार्ग दिसला तर श्रम आणि कालापव्ययाचे सार्थक झाले असे म्हणता येऊ शकते. आणि त्या उलट पुस्तकामुळे नव्या वादांना जन्म मिळून पुन्हा भावनिक श्रम होणार असतील तर मूळ श्रमही घेऊ नये असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे निर्णय अंतिमतः लेखकानेच करावयाचा आहे. ते स्वातंत्र्य धनंजय यांना खचितच आहे. पण माझ्या मते असे श्रम या प्रक्रियेत प्रत्येकाला भोगावेच लागतात. प्रस्तुत मूळ लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देतानाही धनंजय यांना भयंकर भावनिक श्रमांचा सामना करावा लागला असणार आहे. कदाचित सरावलेपणामुळे (तसे झाले असेल तर..., एरवी हा शब्द मागे) ते जाणवले नसतील. पण ते मनाच्या आतमध्ये झाले नसतील असे म्हणता येणार नाही. आणि तसे श्रमही आपले काम चोख बजावत असतात. ते त्यांचे मोल मनावर परिणाम करून वसूल करतातच. पण मग इथे प्रश्न निर्माण होतोच. लेखन करावयाचे तरी कशासाठी? धनंजय काय म्हणतात ते समजून घेणे आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
संजीव ओक Tue, 10/14/2008 - 14:21 नवीन

धनंजय - आत्मकथन

धनंजय तुमचे अभिनंदन... एका अतिशय संवेदनशील सार्वत्रिक समस्येला तुम्ही तितक्याच सामंजस्याने हाताळलेत. हा प्रश्न स्थळकाळापलीकडील आहे. कालही होता, आजही आहे, उद्या कदाचित त्याची व्याप्ती वाढलेली असेल. असे विषय मांडणे हे खरेच धाडसाचे काम. पण मग कोणीतरी ते करायलाच हवे. आणि नुसतेच करायलाच हवे असे नव्हे तर त्या विषयाचे गांभीर्य समजावून घेऊन तितक्याच समंजसपणाने भावनिक पातळीवर परिणाम करणारे एक निराळेच अनुभवविश्व वाचकांसमोर यायलाच हवे. लेखन हा समाजाचा आरसा आहे, असे मानले जाते. त्यामुळे याचे प्रतिबिंब लेखनातून उमटायलाच हवे. ज्या पध्दतीने आपण कोणार्कच्या मंदिराचा उल्लेख केला आहे त्यावरून आपली वैचारिक प्रगल्भता निश्चितच समजून येते. या विषयावर आपण अधिक काही लिहिल्यास... जमल्यास आत्मकथन स्वरुपाचे तर मराठी साहित्यविश्वात त्याची सन्माननीय दखल घेतली जाईल, यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुवर्णमयी Fri, 10/03/2008 - 20:00 नवीन

लेखन

मूळ लेखन अतिशय उत्कट, मनापासून आलेले आहे यात शंका नाही. समारोपाच्या शब्दात भावनिक आंदोलनातून,लोकांच्या विविध प्रतिक्रिया पाहून मनाला झालेले क्लेष दिसत आहेत आणि त्यामुळे त्या समारोपात एक प्रकारची औपचारिकता, बंड, विखार असे मिश्रण मला तरी वाटले. धनंजय यांच्याशी माझी मिपा आणि उपक्रमावर लेखनावर चर्चा व्य नि तून होते. त्यांनी वेळोवेळी लेखनावर मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांच्या लेखनातून त्यांचा व्यासंग जसा दिसतो तसेच काही विषय जे इतर लोक कदाचित लिहिण्याचे टाळतील ते मुद्दाम हाताळण्याची वृत्ती सुद्धा दिसली आहे. कदाचित हे नैसर्गिकरित्या होत असावे. हाच मोकळेपणा किंवा वृत्ती त्यांना हा लेख लिहिण्यासही प्रवृत्त करत असावी. त्यामुळे त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलली का ? नाही. हा लेख वाचून मला धक्का बसला का तर उत्तर नाही असेच आहे. मृदुला म्हणते तसा हा विषय आणि मोकळेपणा भारतात किंवा अमेरिकेत मी सुद्धा बघितला आहे. उद्या इथे वाढणारी मुले कुणालाही आईवडिलांपुढे आणून आम्ही एकत्र राहत आहोत असे सांगतील ही मनाची तयारी ठेवूनच पालक इथे राहण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्बत करतात. धनंजय यांनी त्यानाही लोकांच्या मतांनी काही फरक पडणार नाही हे दर्शवलेलेच आहे. जगात असा निर्णय घेणारे ते एकटेच आहेत का ? नाही.. मग असे असतांना हा विषय अगदी थेट आणि मुद्दाम इथे मांडण्याचे काय कारण असावे? अनोळखी ज्या लोकांना म्हणतो त्यांच्या समोर एवढा खाजगी विषय आणि अनुभव मांडण्याची गरज कितपत असावी? का असावी? ते मला लेख वाचून कळले नाही. उत्तर द्यायला इथे कोणी बांधील नाहीचः) आता लोकांचे वागणे मला मान्य आहे किंवा अमान्य आहे याने काही फरक पडतो का ? नाही. माझ्या नातेसंबंधाची किंवा अगदी जवळची व्यक्ती हा असा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे ही वस्तुस्थिती आहे. पण असे दहा लोक एकत्र आले की हा निर्णय व्यक्तिगत न राहता सामाजिक होतो. समलिंगी व्यक्तींना आपले एक कुटुंब असावे असे वाटणे, त्यांनी मुले वाढवणे आणि अगदी योग्य प्रकारे मुलांचे संगोपन करणे हे सर्व मुद्दे त्यातून आलेच. त्या मुलांचे भावविश्व हा मोठा अभ्यासाचा आणि नाजुक विषय आहे ..... मी अमेरिकेत असे पाहिले आहे की मुलांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून साधारणपणे काही व्यंग असणारी मुलेही इतरांबरोबर शक्य असल्यास सर्वसाधारण शाळेतच जातात. इथे मुलांचे आणि आईवडिलांचे काही ना काही निमित्याने इंटरॅक्शन असतेच. माझ्या सहा वर्षाच्या मुलीला काहींना एकच पालक, दोन डॅडी दोन मॉमी आहेत अशा गोष्टी माहिती आहेत. ती जशी जशी मोठी होईल तसतसे तिला अधिकच गोष्टी कळतील.. आणि म्हणूनच एक आई म्हणून शेवटी मी काय म्हणेन देवा माझ्या मुलांना सुखी ठेव्...कोणताही प्रकारचा निर्णय घेण्याआधी आणि त्याचे परिणाम सहन करण्याची योग्य शक्ती दे..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2008 - 21:40 नवीन

मला वाटते...

अनोळखी ज्या लोकांना म्हणतो त्यांच्या समोर एवढा खाजगी विषय आणि अनुभव मांडण्याची गरज कितपत असावी? का असावी? मला वाटते की 'समाज प्रबोधन'. आपण अनेकवेळा तिसर्‍याच कोणाबद्दल तरी 'दुसर्‍या' कोणाला बोलताना पाहतो. त्याने ह्या विषयाची 'माहिती' मिळते. तज्ञांच्या शास्त्रीय चर्चा ऐकतो त्रिमितीय विचारांस 'चालना' मिळते. पण आपल्याच मित्रमंडळीतून असे कोणाचे स्वतःचे अनुभव आणि विचार ऐकायला मिळाले तर त्या मागील खर्‍या 'भावना' कळतात. आपले जवळ जवळ संपूर्ण 'प्रबोधन' होते. 'सम वेदना' (संवेदना) थेट मनाला भिडतात. पारंपारीक विचारांची चौकट उसकटवून नविन ताज्या विचारांचे अंकुर उगवतात बौद्धीक परिपक्वता येते. कदाचित हाच ह्या लेखनामागील उद्देश असावा.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 10/04/2008 - 18:50 नवीन

सरपंच...

श्री. सरपंच, स. न. मूळ लेख थोडा विस्तारून आणि त्यावरचे प्रतिसाद संपादित करून व त्यावर प्रत्येक मुद्याच्या संदर्भात धनंजय यांचे प्रतिमत घेऊन एक छोटेखानी (पण गंभीर विषय असल्याने महत्त्वाचे) पुस्तक तयार करु शकाल. मिपाची ही मराठी मुद्रित साहित्यात भर ठरू शकेल. श्री. धनंजय, स. न. वर केलेल्या सूचनेतून एक छोटेखानी पुस्तक (विषयाचे गांभीर्य ध्यानी घेता याला पुस्तिका म्हणता येणार नाही) जरूर आकाराला येईल, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे असे आत्मकथन मराठीत येणे गरजेचे आहे. मनावर घ्याल?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 10/04/2008 - 18:52 नवीन

सूचनेशी

सूचनेशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
समीर गोखले Tue, 12/23/2008 - 15:56 नवीन

Bravo DJ

Dear MisaLPav readers, I am a new member to Mi.Pa. and I am really enjoying this community. I am still trying to figure out how to use marathi fonts, so I am using English fonts right now. First, congratulations DJ for a great article. It takes lot of courage to talk openly about your real feelings. I can understand this as I am also gay. As far as Indian community goes , homosexuality is still a taboo and articles like DJ's need to be published and talked about more openly. I think I can correlate with DJ's story as my life story is also on similar lines. For last 8 years I am staying in US and am working for a multinational company. I have MS, MBA degrees and am well settled in life. Just like everyone else, I also come for a traditional maharashtrian family. I am in a committed relationship with another guy for last 5 years (who happens to be maharashtrian as well :). my aai-baba, close family knows about me as well as my partner. Their strong support means a lot to me. DJ's article gave me courage to openly talk about my life especially on forums like this. Being Indian, being Maharashtrian, being gay are all part of same identities that I carry all the time and so it matters a lot when something like this happens on a marathi website. I must say I was pleasantly surprised to read positive comments from lot of readers on this topic. Thanks for your openness and intelligent conversations.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 12/23/2008 - 18:04 नवीन

संदर्भ

मोकळेपणाने लिहिल्याबद्दल अभिनंदन. अभिनंदन केवळ मोकळेपणाने लिहिल्याबद्दल नाही तर धनंजयसारखेच धैर्य दाखवल्याबद्दलही. तुमच्या या पोस्टमध्ये तुम्ही पारंपरिक महाराष्ट्रीय कुटुंब, तुमचे शिक्षण, सध्याची नोकरी वगैरे उल्लेख केले आहेत. या विषयाच्या संदर्भात ते खरेच संदर्भपूर्ण आहेत? व्यक्तिशः मला तसे वाटत नाही. जे तुमच्याविषयी, तेच पार अगदी महाराष्ट्राच्या एका टोकाला धुळ्यात अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीचे मी पाहिले आहे. तेव्हा ही पार्श्वभूमी खरोखरच संदर्भपूर्ण असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर गोखले
आ
आजानुकर्ण Wed, 12/24/2008 - 02:20 नवीन

पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण...

पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण हे सांगताना समीररावांना असे अभिप्रेत असावे की गे असूनही त्यांच्या दैनंदिन आयुष्याला काही फरक पडलेला नाही. इतर स्ट्रेट यशस्वी/करियरिस्टिक तरुणांइतकेच त्याचेही आयुष्य - किंबहुना जास्तच - यशस्वी आहे. पारंपारिक महाराष्ट्रीय कुटुंबातही ही गोष्ट घडणे शक्य आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा बाऊ न करता प्रत्येकाचे लैंगिक स्वातंत्र्य मान्य करावे. आपला, (विश्लेषक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ध
धनंजय Wed, 12/24/2008 - 02:41 नवीन

असेच असावे - "समाजाच्या अपल्या विभागातही" असा संदर्भ

आत्मपरीक्षण करताना "आपण कोण"बरोबर "आपण कुठले" असा विचार साहजिक येतो. त्या संदर्भात समीर यांनी स्वतःविषयी उत्स्फूर्तपणे तपशील लिहिले असावेत. असे परीक्षण करताना आपण धुळ्यातील खेडवळालाही मनुष्य म्हणून जोडले गेलो आहोत हा विचार यावा, हे श्रावण मोडक यांचे मतही पटण्यासारखेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ए
एकलव्य Wed, 12/24/2008 - 03:01 नवीन

स्वाभाविक संदर्भ

समीर गोखले यांनी मराठी परंपरेचा संदर्भ देणे येथे अगदी स्वाभाविक आहे असे मला वाटते.
  • मराठी आंतरजालावर कोणी स्वतःच्या लैंगिक जीवनपद्धतीविषयी लिहित असेल तर मी मराठी आहे हे लिखाणात येणे स्वाभाविक आहे. विशेषतः कोणी इंग्रजीत लिहित असेल तर कदाचित (आणि कदाचितच) असा संदर्भ देणे अधिक गरजेचे आहे.
  • दुसर्‍या अर्थाने -- आजानुकर्ण आणि धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे -- ही असले प्रकार आमच्या समाजात नाहीत बुवा हा असा काहीसा गंड अजूनही दिसतो. त्याला छेद जाण्याच्या दृष्टीने वाचकाची लेखकाशी नाळ जुळणे गरजेचे असते... या संदर्भांनी त्याला नक्कीच हातभार लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
कोलबेर Wed, 12/24/2008 - 03:27 नवीन

सहमत

एकलव्य आणि अजानुकर्ण ह्यांच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
श
श्रावण मोडक Wed, 12/24/2008 - 17:34 नवीन

हो. पण...

समीर यांचे आयुष्य व्यावसायिक आघाडीवर यशस्वी आहे किंवा नाही याला फारसा अर्थ नाही. गे व्यक्तीकडे अॅबनॉर्मल म्हणून पाहिले जाण्याच्या मुद्याचा विचार केला तर ते आयुष्य एखाद्या स्ट्रेट माणसासारखेच नॉर्मल आहे हे सांगणे महत्त्वाचे. ते सांगताना शैक्षणिक, सांस्कृतीक वगैरे पार्श्वभूमी आली तर नकळत गे असणे म्हणजे तो सांस्कृतीकदृष्ट्या हीन, शैक्षणिकदृष्ट्या मागास असतो असे तर होत नाही? गे असणे अॅबनॉर्मल मानले जाते याचा प्रतिवाद करण्याची भूमिका अशा पवित्र्यातून येते की काय अशी मला शंका आली म्हणून हे लिहिले. हा प्रश्न जगण्याच्या संदर्भातील एका वैयक्तिक स्वातंत्र्याचा असेल तर त्याच्याशी हे संस्कृतीसापेक्ष मुद्दे निगडीत होत नाहीत. गे असणे ही बाब संस्कृतीसापेक्ष नाही. त्यामुळेच महाराष्ट्रीय वगैरे संदर्भ उगाच अपोलोजेटिक, डिफेन्सीव्ह वाटतात इतकाच माझा मुद्दा आहे. मी मराठी आहे, म्हणून मी स्ट्रेट आहे असे थोडेच गृहितक असते? मी मराठी आहे म्हणून मी तृतीयपंथी नाही असे थोडेच गृहितक असू शकते? हे सारे आत्मव्यक्त स्वरूपाच्या लेखनासाठी. समाजशास्त्रीय विश्लेषणात्मक लेखनात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक पार्श्वभूमी येणार आणि त्यातूनच गे असणे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे सांस्कृतीकदृष्ट्या हीन, शैक्षणिकदृष्ट्या मागास नसते अशी मांडणी होते. हे मुद्दे केवळ चर्चेसाठीच उपस्थित केले आहेत. कोणत्याही लेखकाला कसल्याही पिंजऱ्यात उभे करण्यासाठी नाही.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 12/24/2008 - 21:46 नवीन

श्रावण

आपल्या भावना नक्कीच पोहचल्या. अगदी आपल्या आधीच्या प्रतिसादापासूनच.... हेतूंबद्दल गैरसमज नव्हता आणि नाही. अपोलोजेटिक, डिफेन्सीव्ह असे लिखाण होऊ नये आणि खूप फिलॉसॉफिकल राहिल्याने पर्सनल टच मिटून जाऊ नये यांचे संतुलन साधणे तसे अवघड आहे. जे नैसर्गिकपणे येईल तसे करावे हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
K
Kamgaar_mahila गुरुवार, 12/25/2008 - 05:06 नवीन

वा

अनेक आभार धनंजय याचे. This is my first post here, so will write in English for this time (struggling with devanagari conversion a bit) Tar, I have been reading numerous posts on this site and this article made me open an account and write! Dhananjay, mitra, dhanyavaad. All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc. For the first time, I read something that was different and "right"--it made me feel less anxious. Something I can relate to. Something I have experienced that is always silenced because we all are too busy celebrating what "straight" people do. Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life. In Mumbai as well as in Dhule. And Priyali, they (we) have been facing discrimination for a long time, in every small details of life. So if all you are concerned about is a "najar" of a woman, please educate yourself about what we go through. I admire your patience, Dhananjay.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 12/26/2008 - 18:48 नवीन

अगदी!

And Priyali, they (we) have been facing discrimination for a long time, in every small details of life. So if all you are concerned about is a "najar" of a woman, please educate yourself about what we go through.
अगदी अगदी! लेख वाचून धक्के बिक्के बसणार्‍यांना अधिक माहितीची अजिबात गरज नाही पण आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेत तेव्हा अधिक माहिती घेण्याच्या मागे लागतेच. :) बाकी, संकेतस्थळाविषयी आपली निरीक्षणे मजेशीर वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Kamgaar_mahila
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/27/2008 - 19:50 नवीन

आय-ओपनर / एकाच नावेतले प्रवासी

आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेत
माझेही! अगदी खाड्कन! इतके दिवस मी समलिंगी नाही अशी माझी स्वतःबद्दल उगीचच समजूत होती. आता मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्यासाठी 'क्वालिफाइंग क्रायटीरिया' कळल्यावर या समजुतीत काही तथ्य होते की नाही ते पाहू. १. मी जातीने "भट" आहे - चेक. २. मला "बायको" आहे - चेक. (सो फार, सो गूड.) ३. ती "भाजी" बनवते - वेल, कधी बनवते, कधी नाही बनवत. कधी चिकन बनवते. कधी इडल्या बनवते. कधी "दीप फूड्स"चे फ्रोझन प्याकेट मायक्रोवेव्हमध्ये टाकते. कधी सासूसासर्‍यांपैकी कोणी मुक्कामाला आले असेल तर ते बनवतात. कधी रेष्टारंटातला आचारी बनवतो. कधी (हल्ली हे फार क्वचित होते) मी बनवतो. त्यामुळे या निकषावर मी उतरत नाही. ४. माझ्या बायकोने बनवलेली भाजी हा माझ्यासाठी "एक्स्पीरियन्स"/"टिपिकल एक्स्पीरियन्स" असतो - वेल, एखादे दिवशी एखादी भाजी फारच उत्कृष्ट बनवली (किंवा फारच बिघडली) तर "एक्स्पीरियन्स" असू शकतो, अन्यथा असतोच असे नाही. इतरही "टिपिकल एक्सपीरियन्सेस" असू शकतात. जसे ऑफिसात सकाळीसकाळी काहीतरी गडबड झालेली असताना नेमका ट्राफिकमध्ये सापडून उशीर होणे आणि अशा परिस्थितीत बॉस डेस्परेटली मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना मोबाइलची बॅटरी रिकामी झालेली असणे. त्यामुळे याही निकषावर मी उतरत नाही. याचा अर्थ मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्याच्या चारपैकी दोन निकषांवर मी उतरत नाही. अरेच्या! म्हणजे मीही समलिंगी आहे तर! इतके दिवस स्वतःच्या लैंगिकतेविषयी भ्रमात वावरत होतो. आता स्वतःला आहे तसे, स्वतःच्या "ट्रू आयडेंटिटी"मध्ये ऍक्सेप्ट केले पाहिजे. बहुतांश मिपा सदस्यही या ना त्या निकषावर न उतरल्यामुळे माझ्यासारखेच समलिंगी आहेत हेही कळले ते बरे झाले. चला, म्हणजे मुबलक कंपनी आहे तर! माझी स्वतःची खरी ओळख मला स्वतःलाच होण्यास कारणीभूत झाल्याबद्दल कामगार महिलाताईंचे अनंत आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
K
Kamgaar_mahila Mon, 12/29/2008 - 02:04 नवीन

Some resources

Some resources on the sexual politics in India: 1. Film--> Sancharam (Journey) Synopsis: In Sancharram ("The Journey"), Kiran is mortified by her growing lesbian desire for the effervescent Delilah, in an idyllic Indian village where arranged marriage is the only acceptable form of coupling. [http://www.thejourney-themovie.com/] 2.Online Articles: A Special Issue on Marriage: http://ghadar.insaf.net/November2005/MainPages/MarriageUnethical.htm Books: 1. Sakhiyani: Lesbian Desire in Ancient and Modern India. by Giti Thadani 2.Same-Sex Love in India: Readings from Literature and History by Ruth Vanita and Salim Kidwai
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 12/29/2008 - 20:24 नवीन

रोचक दुवे

"I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily." (एकलव्याच्या खरडवहीतून कॉपीराइट-उल्लंघनाचा फारसा विचार न करता साभार.) Nice try! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Kamgaar_mahila
प
प्रियाली Mon, 12/29/2008 - 21:08 नवीन

सांगितलं ना

की डोळे उघडले. वरचे दुवे वाचून तर ते कधी बंद होणार नाहीत अशी परिस्थिती आली आहे. :) परंतु, असो. या लेखावर, प्रतिसादांवर आणि एकंदर विचारांवर माझी प्रतिक्रिया मांडून झाली आहे. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम. जाहीर स्थळांवर एखाद्याची इच्छा नसेल तर त्याची पाठ पकडून संवाद चालू ठेवण्यात फारसे हशील नसते हे कामगार_महिलाबाईंना माहित असावेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/26/2008 - 19:55 नवीन

आक्षेप!!!

All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc.
एका स्टीरियोटाइपचे उत्तर दुसरा स्टीरियोटाइप होऊ शकत नाही. बायकोने बनवलेल्या भाजीइतकाच रेष्टारंटातल्या शेफाने बनवलेल्या ष्टेकात रस घेणारा एक "सर्वभक्षी" "भट" म्हणून यावर मी तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो. (आणि हो, माझी बायको कोंबडीही बनवते हो कधीमधी...)
Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life.
And so are there "Bhat"s in all streams and spheres of life... So kindly keep your own stereotypes where they rightfully belong...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Kamgaar_mahila
K
Kamgaar_mahila Sat, 12/27/2008 - 05:44 नवीन

प्रियालि व

प्रियालि व ट्ग्या तुमचे अनेक आभार. माझा हेतू स्टीरियोटाइप कर्णे हा न्व्ह्ता. सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/27/2008 - 10:36 नवीन

धन्य आहे!

सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.
ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे / साधायची गरज आहे, त्यांना (१) नावे ठेवून, (२) त्यांच्याबद्दल चुकीची गृहीतके / स्टीरियोटाइप्स बनवून आणि (३) ती गृहीतके अपमानकारकरीत्या बोलून दाखवून, संवाद सुरू राहणे सोडा, पण मुळात संवाद सुरू होणे शक्य आहे असे प्रामाणिकपणे वाटते का याचा थोडा विचार व्हावा. उलटपक्षी जर थोड्याफार प्रमाणात संवाद सुरू करण्यात जर कोणी किंचित का होईना, पण यशस्वी झाला असेल, तर त्यावर अशा वक्तव्यांनी पाणी पडणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते का, यावरही थोडा विचार व्हावा. समलिंगींच्या काही अपेक्षा ('अपेक्षा' हा शब्द 'positions'साठी दुसरा चांगला मराठी प्रतिशब्द सापडला नाही म्हणून) समजू शकतो, जसे की expectation of tolerance from and greater acceptance within society on an equitable basis, equal civil rights वगैरे, किंवा इतरही अनेक न्याय्य बाबी असू शकतील ज्या समलिंगी नसल्यामुळे अननुभवामुळे माझ्या (किंवा समलिंगी नसलेल्या माझ्यासारख्या इतरांच्या) आकलनशक्तीच्या सध्या बाहेर असतील, आणि त्यातून काही विधायक आणि सर्वांसाठी न्याय्य असे सामाजिक बदल होण्यासाठी संवादाची आणि दोन्ही बाजूंना एकमेकांच्या बाजू, concerns समजून घेण्याची गरजही समजू शकतो. पण ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांना नावे ठेवण्याने त्यांना आपली बाजू ऐकून घेण्याची उपरती होईल असे का वाटावे हे कळत नाही. शेवटी सध्याची समाजरचना जशी आहे त्यात समलिंगींच्या बाजूतील न्याय्यता समजून न घेण्याने समलिंगी नसलेल्या समाजघटकाचे काडीचेही नुकसान होत नाही, आणि त्यांना नावे ठेवण्यातून त्यांना ती बाजू समजून घेण्याची इच्छा होण्याची सुतराम् शक्यता नाही, उलटपक्षी यदाकदाचित त्यांपैकी कोणाला अशा संवादाचे वावडे नसले किंवा काही अंशी काही बाबींमागील न्याय्यता समजूही शकत असली तरी अशा (विरळा) व्यक्तीची एकंदर बाजूतील न्याय्यतेबद्दलची सहानुभूती गमावण्याचीही शक्यता नगण्य नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. आपली बाजू, आपल्या मागण्या कितीही रास्त असल्या तरी ज्यांच्यासमोर त्या मांडायच्या, ज्यांना त्यांमागील न्याय्यता पटवून द्यायची त्यांना नावे ठेवण्याने ते आपली बाजू सहानुभूतिपूर्वक ऐकून घेण्यास बांधील राहत नाहीत, आणि संवाद साधणे तर सोडाच, पण उलट दरी वाढत राहते. आपल्या "संकेतस्थळाविषयीच्या आपल्या (stereotypical) निरीक्षणा"तून किती जणांचा अपमान अथवा किती जणांवर यातून अन्याय झाला, ते पाहू. १. सर्वप्रथम, अर्थातच, ज्यांच्यावरून हा stereotype होता तो गट, अर्थात जे मिसळपावावर येतात आणि ज्यांची पत्नी भाजी बनवते आणि ज्यांना आपली पत्नी कोणती भाजी बनवते यात रस आहे असे सर्व समलिंगी नसलेले विवाहित "भट" जातीतले शाकाहारी पुरुष. २. मिसळपावावर येणार्‍या सर्व (समलिंगी नसलेल्या) महिला (जात आणि आहार-निरपेक्ष), कारण यांना "पत्नी " असणे शक्य नाही आणि त्यामुळे १. मधील stereotypeमध्ये बसणे शक्य नाही, तरीही केवळ मिसळपावावर येत असल्यामुळे stereotypeमध्ये विनाकारण ढकलल्या गेल्यामुळे. (याचप्रमाणे १. मधील stereotype मध्ये न बसतासुद्धा केवळ मिसळपावावर आल्यामुळे त्या stereotypeमध्ये घुसडले जाणारे इतरही अनेक गट आहेत. जसे:) ३. मिसळपावावर येणारे अविवाहित पुरुष-सदस्य (जात, आहार आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांनाही "पत्नी" नाही. ४. मिपावर येणारे/र्‍या मांसाहारी/सर्वभक्षी सदस्य. (जात, लिंग आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांना केवळ "भाजी"त रस नसावा. ५. मिपावर येणारे परंतु आहारात फारसा रस नसणारे सदस्य (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). यांनाही "भाजी"त रस नसावा. ६. मिपावर येणारे समलिंगी (किमानपक्षी पुरुष-समलिंगी) सदस्य (जात-निरपेक्ष). यांना "पत्नी" नसावी. हे भिन्नलिंगीही नाहीत. त्यामुळे stereotypeमध्ये बसत नाहीत. तरीही घुसडले गेलेत. ७. मिपावरील "भट"खेरीज इतर जातींतील सदस्य (लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष आणि केवळ "भट नाहीत" इतक्याच प्रमाणात जात-सापेक्ष). ८. मिपावरील अ-हिंदू सभासद (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). (आणखीही काही गट राहिले असल्यास चूभूद्याघ्या.) आता इतक्या जणांच्या शेपटावर पाय देऊनसुद्धा जर संवादाची अपेक्षा असेल तर धन्य आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Kamgaar_mahila
ध
धनंजय Sun, 12/28/2008 - 01:55 नवीन

वादे वादे

संवाद साधायचे त्यांच्याशी समेटीने, सहानुभूतीने बोलावे, हा टग्या यांचा मुद्दा उपयुक्त आणि व्यवहार्य आहे. पण त्रागा हा कोणाला चुकला आहे? मुळात माझा वरील लेखच देण्याचे कारण स्टीरियोटाइप्सबद्दल मुक्तसुनीत यांच्या लेखाला आलेल्या काही सदस्यांच्या प्रतिक्रिया होत्या. त्या तिथे नीट वाचून असे जाणवले की त्यातही काही जहर जहरासाठी होते, तर काही प्रतिक्रिया विचारी लोकांनी माहिती अभ्यासली नसल्यामुळे होत्या. हा नीरक्षीरविवेक जमण्यात सुज्ञ धोरण असते, हे मान्य. आणि काही प्रमाणात या "कोणार्क" लेखात त्या दुसर्‍या गटापुढे माहिती ठेवणे मला जमले, असे मला या लेखावरील प्रतिसादांतून जाणवले. पण तो नीरक्षीरविवेक सुरुवातीपासून जमलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणेसुद्धा मानवसुलभ भावनांबद्दल अनभिज्ञता दाखवते. चवताळलेला, हल्लीच आवाज सापडलेला, जेव्हा त्रागा करतो, त्यात घट्ट विणलेला वाद सांगितलेला नसतो. त्यात खरे दुष्ट, आणि उदासीन म्हणून दुष्टपणा चालवून घेणारे, यांच्यात फरक केलेला नसतो. जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे. हे साहजिक आहे हे विचारी लोकांनी ओळखावे. चिरडला जाणार्‍याने चाकाचाकात फरक करणे दूरगामी महत्त्वाचे आहे खरे - चिरडणारे चाकच उचलून मी सुटणार आहे, दुसर्‍या चाकांनी हे चाक उचलत असताना थोडेच हलायचे आहे. (पण थोडेतरी हलायचे मात्र आहेच!) त्राग्याच्या बोलांनी संवाद खुंटणे ही फार पुढची बाब आहे. जिथे कोणी खाली चिरडले जाते आहे, याबाबत हूं-की-चूं नाही, संवादच नाही, तिथे सुरुवातीच्या स्टीरियोटाईप करणार्‍या आरड्याओरड्याने संवाद सुरू होईल. हा विचार अधिक आशावादी आहे. (टग्या यांनी १-२-३ असे स्टीरियोटाईपचे केलेले विश्लेषण मुद्देसूद असले, तरी मला त्यांच्या पहिल्या विवेक-सूचक परिच्छेदांना पुरवणी म्हणून अनाठायी वाटले. दलित कवितेचे आणि साहित्याचे अशा प्रकारचे "चळवळ्या दलितांचे सवर्णांबद्दल स्टीरियोटाईप काय" असे विश्लेषण करता येईल - पण ते जळजळीत साहित्य वाचताना अशा विश्लेषणात गुंतल्यास काही सारभूत हरवेल, असे मला वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/28/2008 - 07:04 नवीन

नेमका उलटा प्रकार

जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे.
रथाचे एकच चाक चिरडत असताना त्राग्यातून "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात" असा स्टीरियोटाइप होणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु येथे नेमका उलटा प्रकार होत आहे असे वाटते. समलिंगींना न समजून घेण्याचा मक्ता फक्त बायकोने बनवलेल्या भाजीत रस घेणार्‍या भटांनी घेतला आहे आणि उर्वरित सर्व समाजाचे समलिंगींशी सख्य आणि सामंजस्य आहे असा काही दावा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे समलिंगींबद्दल असामंजस्य हे कोणाही एका समाजघटकापुरते मर्यादित नाही. हे म्हणजे रथाच्या कोठल्याही चाकाखाली आले असता चिरडले जाण्याची शक्यता असली तरी केवळ मला हंडई गाड्या आवडत नसल्याने "हंडई गाडीच्या चाकाला लावलेली कोरियन कंपनीची टायरे वाईट कारण चिरडताना त्यांचे विशिष्ट आकृतींमध्ये वळ उठतात" असे म्हणण्यातला प्रकार आहे. एखाद्या संकेतस्थळावर समलैंगिकतेवर आर्टिकले येण्या-न येण्याचा आणि त्या संकेतस्थळाचे वाचक बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेले भट असण्यानसण्याचा संबंध काय? बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेल्या भटांखेरीज इतरांना समलिंगींबद्दल सहानुभूती असते असे यातून सुचवायचे आहे, की त्यांना समलिंगींचे (पॉझिटिव्ह) अनुभव पदोपदी येत असतात असे, की समलिंगींबद्दल सहानुभूती नसलेले सगळे एकजात बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेले भट असतात असे? बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेल्या भटांचे एक वेळ सोडा (का सोडा? पण तूर्तास सोडा.), पण इतर गटांना तरी यातील कोणतेही कॅरेक्टरायजे़शन योग्य किंवा न्याय्य वाटते का (बा. हा. भा. खेरीज इ. अ. न. भटांसाठी योग्य किंवा अयोग्य नव्हे; त्यात्या इतर गटांसाठी योग्य किंवा अयोग्य!) याची विचारणा केली आहेत काय? मला तरी हा अन्यायाखाली दडपण्यातून येणार्‍या त्रागात्मक स्टीरियोटाइपच्या प्रकारापेक्षा समलिंगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले असलेले इतर असंबद्ध स्टीरियोटाइप्स उधळण्याचा प्रकार वाटतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धम्मकलाडू Wed, 12/31/2008 - 11:06 नवीन

आनंदपर्वणी....

धनजंय यांचा प्रतिसाद आणि त्यावर टग्या यांचा प्रतिसाद. आनंदपर्वणी....धन्य धन्य.. जय हो.... मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥ (मुक्तछंदी) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
समीर गोखले Fri, 12/26/2008 - 12:50 नवीन

Dear Shravan and

Dear Shravan and others, Thanks for responding. And please be patient with me as I learn to use marathi fonts here. I will continue to respond in English till then. I totally agree that as sexual minorities (gay, lesbian, bisexual) we are connected by a common thread (of sufferings, discrimination, joys, happiness) with all sexual minorities around the world (not just Dhule but any small town in Brasil or Mexico as well) Because we share similar life experiences, we know and we understand the joys and pains of all sexual minorities (just in the same fashion any minority does this -like women can connect with other women on lot of gender related issues across the globe in same way. Indians in US can corelate to other immigrants etc..). The only reason I stated my education and background was to establish my authenticity. I am new to this forum and have never written here. Before coming out publicly on this forun, I wanted to make sure I establish my credentials as unfortunately based on previous experiences I hear from my straight friends (to whom I am still not 'out') that gay people do not exist among us. They are some type of psycho or something like that. It is unfortunate we have to prove our authenticity before we claim our sexuality. Anyway, hope this helps. As I said, I will definitely be regular member on this site, not because we are talking about this issue, but because I really liked the range of topics this forum is handling (and I must say with lot of maturity). So keep them coming. I am telling my partner to sign up and create an account as well. :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 12/26/2008 - 13:11 नवीन

मिसळपाव वर

मिसळपाव वर जी काही मोजकी प्रामाणिक आणि संवेदनशील लोक आहेत, त्या पैकी धनंजय हे एक आहेत. लैंगिकता हा खाजगी विषय आहे. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 03/29/2010 - 06:23 नवीन

लेख

लेख मनापासून आवडला. फार फार आवडला. अतिशय आवडला. किती प्रामाणीक, हळूवार, सुंदर, दर्जेदार!!!! धनंजय साहेब आपली लेखन शैली अ-प्र-ति-म!!!! एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन . मला ते चूकीचं वाटतं. माझ्या मते सेक्सचे अनेक हेतू/जीवनातील उद्देश आहेत आणि एकमेकांची मानसिक/भावनिक निकोपता राखणं, परस्परंची काळजी घेणं, परस्पर मैत्री संबंध दृढ करणं हे मला आकळलेले काही. मग ते स्त्री-पुरुष या जोडीने साध्य होवो वा अन्य स्त्री-स्त्री वा पुरुष-पुरुष ते स्वागतार्हच आहेत सामाजीक आणि मुख्य वैयक्तीक स्वास्थ्यासाठी. सहजीवन जगण्यास जोडीदार मिळणं यासारखं सुख सुख ते नाही. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/29/2010 - 08:39 नवीन

जैविक

एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन . मला ते चूकीचं वाटतं.
सेक्स ची जैविक प्रेरणा ही प्रजोत्पादनाशीच निगडीत आहे या अर्थाने तो मुळ उद्देश आहे असे म्हटले जाते. प्रजोत्पादनाशी निगडीत न ठेवता तो केवळ आनंददाय़ी करणे आता शक्य असते हे मान्य. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रास Mon, 07/16/2012 - 21:11 नवीन

मिसळपाववर वाचलेल्या प्रामाणिक

मिसळपाववर वाचलेल्या प्रामाणिक आणि अभिनिवेशविरहित हृद्य लिखाणाचा शिरोमणी असा हा लेख लिहिल्याबद्दल धनंजयरावांना मनापासून धन्यवाद! कोणार्कच्या शिल्पांचा इतका समर्पक उल्लेख कुठेही आढळलेला नाही. बाकी प्रतिसादकांबरोबरची चर्चाही (काही स्थानं वगळता) अगदी वाचनीय आहे. धनंजयराव, या लेखामुळे तुमच्याबद्दलच्या आदरात वाढच झालेली आहे असं नमूद करू इच्छितो. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 07/16/2012 - 22:46 नवीन

हा धागा वर काढल्याबद्दल

हा धागा वर काढल्याबद्दल प्रासभौंचे अनेक आभार. इतके प्रांजळ अनुभवकथन मराठीच का, कुठेही अतिशय विरळाच होय. समलिंगी संबंधांबद्दल माझे व्यक्तिगत मत सनातनी असले तरीदेखील धनंजय यांना अनेक सलाम. लेखन पाऽऽर भिडले.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 11/22/2013 - 05:11 नवीन

एका प्रगल्भ संस्थळावर एका

एका प्रगल्भ संस्थळावर एका प्रगल्भ विषयावर प्रगल्भ चर्चा.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 11/22/2013 - 12:04 नवीन

अप्रतिम लेख..

अप्रतिम लेख.. वाचुन धक्का बसला..पण धनंजय ह्यांचे आधीचे लिखाण वाचुन जी प्रतिमा तयार झाली होती ती उलट अजुनच उंचावली. लोक हेटाळणी करतात, अनैसर्गिक म्हणतात, लोकांच्या संस्थळावर जर इतक्या जहाल प्रतिक्रिया येत असतील तर प्रत्यक्ष आयुष्यात किती त्रास सहन करावा लागत असेल? लैंगिकता हा माणसाचा केवळ एक पैलु आहे. त्यावरुन एखाद्या विषयी मत बनवणं चुकच.. खर तर आधीही म्हणल्या प्रमाणे मी हे आकर्षण समजु शकत नाही पण हे समजु शकते की ही विकृती नाही. आणि त्याहुनही महत्वाचं म्हणजे ही माणसाची अत्यंत खाजगी बाब आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा आणि भोचकपणा करण्याचा कुणालाच अजिबात अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 11/22/2013 - 13:49 नवीन

मिसळपाववरचा एक सुंदर लेख.

मिसळपाववरचा एक सुंदर लेख. विचारांना प्रगट कबूल होण्याचं प्रामाणिक धारिष्ट्य एका विशिष्ट समाजरचनेच्या खुलेपणामुळं सहज होतं. धनंजयराव भारतात राहते तर कदाचित वेगळा प्रकार असता हे ते स्वतः देखील कबूल करतील. कदाचित अमेरिकन समाजरचनेमध्ये समलैंगिकतेबाबत स्वीकार आहे. त्यामुळं तिथं काही वेगळं वाटत नसेलच. मला वाटतं २००८ मध्ये मिसळपावची ओळख प्रकाश घाटपांडे काकांनी उपक्रम का मनोगतवर दिलेल्या ह्याच लेखाच्या लिंकमुळं झाली. तेव्हा उत्तम संपादकीय देखील सुरु होते. लेख वाचायला तेव्हा जास्त मजा यायची हे कबूल आहे. गेले ते दिन गेले.... ह्यात कुठलंही कमी जास्त करण्याचं कारण अथवा हेतू नाही. बदल आहे तो आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा