आपण चार लोकांपेक्षा निराळे काही करत असताना मनात प्रथम काही येत असेल, तर 'उगीच बभ्रा नको' हे वाक्य. आपले वागणे बरोबर आहे की नाही, आपण आपल्या वागण्याने कुणाला त्रास देतो की नाही, आपल्याला त्या वागण्याची प्रामाणिक निकड आहे की नाही - हे खरे सयुक्तिक प्रश्न. पण ते पडण्याआधी 'चार लोक' नामक संस्थेची धास्ती वाटून आपले वागणे लपवून ठेवण्याकडेच पहिली प्रतिक्रिया होते खरी.
या भित्र्या प्रतिक्रियेचा संबंध शरीराबिरिराबद्दलच्या संकोचांशी नसून चार लोकांपेक्षा वेगळे ठरण्याच्या भीतीशी आहे. तिच्यावर मात करायला शिकले पाहिजे. आपले वागणे तपासून ते योग्य असल्याची खात्री आपली आपल्याला पटली, तर निर्भयपणे आणि उघडपणे तसे वागले पाहिजे, हा धडा तुमच्या अनुभवातून शिकण्यासारखा आहे.
इतक्या मोकळेपणानं लिहिल्याबद्दल आभार.
बिंदुमाधव खिरे यांनी ही चळवळ पुण्यात चालवली आहे हे मला पुरोगामी लोकांच्या एका कार्यक्रमात समजले. बिंदुमाधव मोकळे पणाने हक्कांबद्दल बोलले.कार्यक्रमात काही लोकांच्या चेहर्यावर भयमिश्रित आश्चर्य दिसत होते. पण हळू हळू त्यांच्या चेहर्यावरच्या आठ्यांचे जाळे मोकळेही होत होते. काहीतरी वेगळे पण आहे असे समजल्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे बिंदुमाधवांना ज्ञात होते. समाजातील हा अस्वीकार हा परंपरा व अज्ञाना पोटी आहे. काही वेळा हा स्वीकार हा "राँग नंबर" इतकाच दखल वा अदखलपात्र असतो.
उज्वला मेहेंदळ्यांचा लेख हा उत्कृष्ठ वाटला. यातुन मिपा कर समृद्धच होणार आहेत. नवीन दृष्टी च लाभणार आहे.
प्रकाश घाटपांडे
ब्राव्हो!!!!
"स्व" चा साक्षात्कार होण्यासारखं सुख नाहि.. आणि तो स्व जसा असेल त्याला स्वीकारून, किंबहूना न दडवता, अभिमानाने मिरवण्यासारखा प्रामाणिकपणा नाहि.
ब्राव्हो!!!! धनंजय ब्राव्हो!!!!
- ऋषिकेश
मराठीत इतकं स्पष्ट आणि स्वच्छ लिहिलंय तुम्ही .. हे नक्कीच धक्कादायक आहे.
लोकमतच्या 'तो' धक्का ह्यापुढे नगण्यच.
Hats off!!!
>>मिपा कर समृद्धच होणार आहेत. नवीन दृष्टी च लाभणार आहे
या प्रकाश घाटपांडेंच्या मताशी सहमत.
- अभिजीत
माझी पहिली साहजिक प्रतिक्रिया....मला धक्का बसला.
भिन्न लिंगी लोक एकमेकांकडे आकर्षित(शारीरीक) होतात ते नैसर्गिक हे आजवर ऐकलेले आणि अनुभवलेले आहे. जसे चुंबकाचे दोन विरुद्ध धृव एकमेकाकडे आकर्षित होतात आणि दोन समान धृव अपकर्षित होतात असे शास्त्र सांगते.
आता समलिंगी आकर्षण हा प्रकार जरी नवा नसला तरी तो आजवर खूपच कमी प्रमाणात होता किंबहुना तो अनैसर्गिक आहे म्हणून वा समजून छुपेपणे चालत असायचा. कारण मुलं एकमेकांना शिव्या देताना ** मारीन असा सरसकट वाक्प्रचार वापरत असत आणि अजूनही वापरतात...हे अगदी सहज आठवलेले.
धनंजय हे व्यवसायाने डॉक्टर आहेतच आणि त्यातून संशोधकही आहेत. तेव्हा ह्यावर त्यांनीच शास्त्रीय कारणमीमांसा करावी की हे असे अनैसर्गिक(लोकांच्या समजुतीप्रमाणे) आकर्षण निर्माण होण्यास शरीरात असे कोणते रासायनिक बदल होतात अथवा ते तसे जन्मापासूनच असतात.
आता गंमत बघा. समान आवडीचे लोक एकत्र येतात,मित्र बनतात वगैरे गोष्टी नैसर्गिक मानल्या जातात कारण ही वैचारिक मैत्री असते. पण समान लिंगी व्यक्तींबद्दल मात्र ते मानले जात नाही. म्हणजे शारीरीय पातळीवर ती मैत्री मान्य होत नाही असे म्हणता येईल.
तसेच चुंबकाचे दोन भिन्न धृव एकत्र येतात ..जे नैसर्गिक मानले जाते पण परस्पर विरोधी आवडीच्या व्यक्ती सहसा एकत्र येत नाहीत . शारीरीय आणि वैचारिक...दोन्हीही बाबतीत. आहे ना कमाल.
धनंजयांच्या वैयक्तिक बाबतीत म्हणायचे झाले तर आजवर त्यांचे जे काही हरहुन्नरी व्यक्तिमत्व इथे महाजालावर पाहीलेय त्यावरून त्यांच्याबद्दल जो आदर निर्माण झालाय त्यात माझ्या दृष्टीने तसा फारसा फरक पडणार नाही.
रोखठोक, प्रामाणिक अनुभवकथन आहे. लोकप्रभामधील लेख तसेच यासंबंधी मुक्त व्यासपीठांवर घडणार्या औपचारीक तसेच अनौपचारीक चर्चांमधून संबंधित विषयाचे कंगोरे कोरडेपणाने समोर येतच असतात/आलेलेच आहेत; मात्र असे प्रामाणिक अनुभवकथन असले की त्यांची व्याप्ती आणि गंभीरता सर्वार्थाने 'अप्रिशिएट' करता येते, असे वाटते. 'अशी काही एक गोष्ट अस्तित्त्वात असू शकते' हे मान्य करण्याचा खुलेपणा आणि माणसाला 'माणूस' म्हणून वागवायची तयारी असेल, तर नैसर्गिक-अनैसर्गिक, कायदेशीर-बेकायदेशीर इ. गौण व्याख्यांच्या निर्मितीत आणि एकंदर समाजजीवनात अधिकाधिक वस्तुनिष्ठता येऊ शकेल, असे वाटते.
इतक्या प्रामाणिक, धाडसी अनुभवकथनाबद्दल धनंजय, तुम्हांला सलाम!
(प्रामाणिक)बेसनलाडू
बेलाने वर व्यक्त केलेल्या विचारांशी पूर्णपणे सहमत!!
मी स्वतः जरी "स्ट्रेट" असलो तरी माझे अनेक गे/ लेस्बियन मित्रमैत्रीणी आहेत....
आणि त्या सर्वाना माझ्याप्रमाणेच समान हक्क मिळावेत अशाच मताचा मी आहे.....
त्यांनाही आपल्याप्रमाणेच स्वतःच्या इच्छेप्रमाणे मोकळेपणे जगण्याचा हक्क आहे....
आपला,
पिवळा डांबिस
मराठी स्थळांवर जिच्याबद्द्दल अतीव आदर वाटतो अशा एका व्यक्तीच्या सर्वात संवेदनक्षम अनुभवाचे तिच्या स्वतःच्या शब्दातले वर्णन. माझी तात्विक भूमिका मी माझ्या मागच्या पोस्टमधे लिहीली होतीच. पण मित्राबद्दल आपण केवळ फिलॉसॉफिकल नसतो. अजूनही काही गुंतलेले असते.
धनंजयचे आत्मकथन पारदर्शक आहे, अगदी साध्यासोप्या शब्दात त्याने आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे - अगदी श्वासोच्छ्वासाइतक्या सहजपणे. त्यात समर्थन नाही. जे आहे ते सत्य. आणि हे सत्य सर्वात प्रथम मान्य करायला आणि नंतर मग जसे दिसले तसे मांडायला लागणारे असामान्य धैर्य त्याने दाखवले आहे.
या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्याला मांडता येतील. मला वाटते आपण थोडे भाग्यवान आहोत ; कारण या अज्ञात अशा विश्वाचा केवळ अनुभव घेणाराच नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करून , तिला आपल्या तर्काच्या कसोटीवर घासून पाहणारा एक बुद्धिमान माणूस हे सगळे सांगतो आहे.
माझा प्रश्न : एक भिन्नलिंगी (हेटेरोसेक्शुअल ) माणूस म्हणून मला माझ्या प्रौढ वयापासून असे वाटत आले आहे की मुलांचे संगोपन करणे ही जी गोष्ट आहे तिच्याशिवाय एक व्यक्ति म्हणून माझे आयुष्य अपुरे आहे. इथे याची नोंद घ्या की याचा संबंध माझ्या पौरुषाशी, प्रजोत्पादनाच्या माझ्या क्षमतेशी , किंवा वंशवृद्धिशी नाही. या तीन्ही गोष्टींबद्द्ल मला फारशी फिकीर कधीच वाटली नाही. मात्र मुलांना वाढवणे हे मात्र मला अगदी मुले व्हायच्या आधीच गरजेचे आहे असे जाणवले होते. आता माझा प्रश्न असा आहे की, हेटेरोसेक्शुअल असल्यामुळे मला माझी मुले असण्याबद्दल निसर्गाचा , कायद्याचा वगैरे अडथळा कधी आला नाही. तर समलिंगी व्यक्तीमधे अशा प्रवृत्ती असल्या तर त्याने काय करायचे ? अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कधी पडले काय ?
या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्याला मांडता येतील. मला वाटते आपण थोडे भाग्यवान आहोत ; कारण या अज्ञात अशा विश्वाचा केवळ अनुभव घेणाराच नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करून , तिला आपल्या तर्काच्या कसोटीवर घासून पाहणारा एक बुद्धिमान माणूस हे सगळे सांगतो आहे.
१००% सहमत
धनंजय प्रामाणिक अनुभवकथनाबद्द्दल धन्यवाद.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अनेकांमध्ये असते. कायद्याचा अडथळा होतो खरा.
या अडथळ्याचा त्रास मुख्यतः प्रामाणिक पुरुषांना होतो. स्त्रियांना नियोगाने (सीमेन डोनेशनने) गर्भधारणा करता येते. पूर्वी स्त्रीकडून कायद्याने मूल दूर करता येई. आजकाल असे करता येत नाही.
ज्या समाजांमध्ये स्त्रीला फारशी किंमत नाही (यात भारतातले काही समाज आलेत) त्या समाजांमध्ये स्त्रीशी लग्न करून काही समलिंगी आकर्षण असलेले पुरुष अपत्यप्राप्ती करतात.
प्रामाणिक पुरुषांना अपत्ये दत्तक घेऊन त्यांचे संगोपन काही देशांत आणि राज्यांत करता येते. हे कायदेशीररीत्या शक्य नसते तेव्हा ज्यांना जमते, ते आपल्या कुटुंबातूनच मूल दत्तक घेतात. कागदपत्रे नसली तरी कधीकधी कौटुंबिक संबंधांमुळे दत्तक गंभीरपणे केले जाते. माझ्या माहितीतल्या एका गृहस्थांनी आपली भाची दत्तक घेतली.
चित्रा यांनी प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ओळखीतल्या एका द्वि-पुरुष जोडप्याचे लहान मूल आहे. हा सर्व प्रकार जमवणे कठिण आहे. त्यामुळे जमेलच असे नाही. ज्या द्विपुरुष जोडप्याला मूल हवे असून असल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे आपल्या कुटुंबात मूल आणता येत नाही, त्यांना मात्र समाजाबद्दल काही प्रमाणात वैषम्य वाटण्याची शक्यता असते. बहुधा वाटतेच. पण स्वसांत्वनासाठी धोरण (कोपिंग स्ट्रॅटेजी) असे सर्वजण शोधून काढतात. काही स्त्री-पुरुष जोडप्यांना मूल नसते, ते कुठल्याशा प्रकारे आपल्या मनाचे सांत्वन करून, आयुष्यात तरीही आनंद बघतात. थोडा बदल करून तशाच काही वैचारिक धोरणाचा उपयोग या संदर्भातही होतो.
धनंजय, तुमचं अतिशय प्रामाणिक लेखन फारच भावलं. लोकप्रभेतले लेख तर वाचलेले होतेच; आधी शब्द मिळत नव्हते पण प्रवीण टोकेकरांकडून उधार घेऊन म्हणू शकते, की माणसाला भिन्नलिंगी संबंधांमधे रस आहे का समलिंगी यापेक्षा महत्त्वाचं आहे त्याचं माणूस असणं! बाकी मेघना, घाटपांडे काका, पिडा काका आणि बेसनलाडू यांच्या मतांशी सहमत.
तुमच्या प्रामाणिक लेखनाबद्दल अनेक आभार.
अदिती
एकच प्रश्न पडलायः हे शीर्षक नाही समजलं मला!
'बालिका वधू'मधीला नायिका कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे पाहते आणि तिला आपल्या शरीराचा साक्षात्कार होतो, असे धनंजय यांनी वर लिहिले आहे. त्याच्याची साधर्म्य सांगणारा हा अनुभव असल्यामुळे तो संदर्भ या शीर्षकामागे असावा.
सुसंस्कृत मन, आचारविचार, सत्याचा शोध व धैर्य ही स्वभाववैशिष्ट्ये माणसाच्या इतर काही वैशिष्ट्यापेक्षा नक्की जास्त महत्वाची आहेत.
धनंजय माझे मित्र आहेत, मला त्यांचा इथे[आंतरजालावर, इस्ट कोस्टवासीय त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटु शकतात याबद्दल त्यांचा हेवा वाटतो.] सहवास मिळतो, बरेच ज्ञान, माहीती मिळते याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.
जे काही मी वाचले आहे त्यावरुन असे वाटते की हे नैसर्गीक आहे. मुद्दाम ठरवुन समलिंगी होण्याचे प्रमाण अतिशय कमी असेल [जर असलेच तर] एक नक्की की कुठल्याही व्यक्तीला [दुसर्यावर जाणुन बुजून अन्याय करेपर्यंत] सन्मानपुर्वक वागणुक मिळावी.
आणि सहज, अभिनिवेशरहित धैर्याने लिहिलेला लेख. जवळच्या व्यक्तींना बसलेला धक्का, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांनी केलेला स्वीकार/अस्वीकार याबद्दल जरी तुम्ही लिहिले नसले, तरी ही किती थकवून टाकणारी प्रक्रिया असेल याचा अंदाज शेवटच्या काही वाक्यांवरून बांधता येतो.
एक चौफेर बुद्धीचा विचारवंत म्हणून तुमच्याबद्दल आदर होताच. तो आता या 'वेअरिंग ऑन युअर स्लीव्ह' अशा लेखनाच्या कृतीने दुणावला आहे.
धनंजय,
तुमचा लेख खूपच सुंदर आहे. पण वरील प्रतिक्रियांमध्ये त्या लेखातील शब्दयोजना, गणितीय अचूक मांडणी, ह्याविषयी कुणीही लिहिलेले नाही ! हे कसे ? विषय इतका का दुर्धर आहे, की ह्या कलाकृतीकडे दुर्लक्ष व्हावे ?
पु ले शु.
आणखी असेच सुंदर लेख येऊ द्या.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
पुन्हा एक प्रतिसाद दिल्याशिवाय रहावले नाही.
एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.
हे पहिल्यांदा थोडेसे अगम्य वाटले, नंतर छान उलगडत गेले.
आपले वैयक्तिक अनुभव इतक्या धाडसी पणाने मित्र-मैत्रिणींसमोर मांडण्याचा मनाचा मोकळेपणा हिच यशस्वी आयुष्याची प्रेरना, ताकद आहे असे जाणवते.
लेखन आवडले. सत्याला सामोरे जाण्याची वृत्ती आवडली.
अतिशय प्रांजळरीत्या, संयत शब्दांत सहजपणे मांडलेला अनुभव. खूप आभार.
प्रेम, कामना, वासना, या सर्वांना थारा देण्यासाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, हे जाणवलं. तसंच जाणवलं, या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत. मला माहीत होतं, की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी मिळण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी गरज आपल्याला होती हे कळलं, तशी ती गरज पुरवायचा मी प्रयत्न करेन, कधी काळी ती पूर्ण होईल, याची आशा मला मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत मला मिळालेली नाही.
+१!
धनंजय, सर्व प्रथम तुम्ही इतक्या मोकळेपणाने इतका वैयक्तिक विषय मांडला आणि कुठेही भडकपणा वगैरे येऊ न देता त्या बद्दल तुमचे कौतुक वाटते.
मला वाटते कोणत्याही समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्या व्यक्तिला दोन भावनिक वादळांना सामोरे जावे लागते. एक स्वतःला ऍक्सेप्ट करायला (संस्कारांचा किंवा मुक्तसुनित म्हणतात तसा साच्यांचा प्रभाव) आणि दुसरे वादळ म्हणजे जेव्हा सार्वजनिक रित्या ती व्यक्ति एक समलिंगी म्हणून वावरायला लागते ते, ज्याला 'कमिंग आऊट' असेही म्हणतात बहुतेक. तुमच्या लेखावरून असे जाणवते की ही दोन्ही वादळे तुम्ही नक्कीच पचवली आहेत.
मला अर्धवट कळत्या वयातच समलिंगी संबंध वगैरे असं काही असतं हे कळलं होतं. सुरुवातीला हे काही तरी 'विचित्र' आहे असं वाटत होतं. नंतर मित्रांच्या संगतीने हा काही तरी चेष्टेचा विषय आहे असं वाटायचं. पण जसं जसं या विषयावर वाचन होत गेलं आणि माझी विचारशक्ती पक्व होत गेली तसतसे मला यातले मानवीय पैलू सापडत गेले. आज मला अश्या संबंधांबद्दल कुठलेही कुतूहल किंवा काही विशेष काही वाटत नाही. जसा मी भिन्नलिंगी तसा तो / ती समलिंगी. इतकं सहजपणे ते स्वीकारता येतं. प्रत्येकाची आपली एक स्पेस आहे, एक परिघ आहे आणि त्या परिघाच्या आत तो / ती काय आहे हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. तिथे आपली स्वतःची फूटपट्टी वापरून मोजमाप करणं चूक आहे. तरीही भारतात किंवा अमेरिकेत वगैरे स्थिती फारच सुसह्य असावी. अरब देशांमधे तर डायरेक्ट देहांत शासनच आहे या गुन्ह्याला.
बर्याच वेळा असा आक्षेप घेतला जातो की हे अनैसर्गिक आहे, कामवासनेचा नैसर्गिक हेतू प्रजोत्पादन आहे आणि समलिंगी संबंधात हे शक्य नाही. मलाही तसंच वाटायचं (अजूनही थोऽऽऽडंसं वाटतंच). पण असा विचारही येतो मनात. सृष्टीतला कोणताही प्राणी घ्या, कामक्रीडा ही केवळ आणि केवळ प्रजोत्पादनासाठीच असते. एक माणूस सोडला तर. किती माणसं कामक्रीडा करताना केवळ कर्तव्यभावनेने त्यात भाग घेत असतिल? म्हणजे ऑलरेडी माणूस अंशतः का होईना अनैसर्गिक झालेला आहे. आणि आता विज्ञानाने समलिंगी व्यक्तिंनापण प्रजोत्पादन करायची सोय करून दिली आहे.
हे झाले धनंजयनी मांडलेल्या विषयाबद्दल. पण त्यांनी इतक्या सुंदर शब्दात हा विषय मांडला आहे की त्यालाही खरंच दाद द्यावीशी वाटते.
एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.
ओपनिंग बॉलवरच उत्तुंग षटकार. मी पुढचा लेख नंतरच वाचला. हा पहिला परिच्छेदच ३-४ वेळा वाचला. इतकी चपखल उपमा? जियो, धनंजय.
बिपिन.
बिपीनराव, सुंदर लेखावर छान प्रतिसाद आहे तुमचा.
प्रत्येकाची आपली एक स्पेस आहे, एक परिघ आहे आणि त्या परिघाच्या आत तो / ती काय आहे हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. तिथे आपली स्वतःची फूटपट्टी वापरून मोजमाप करणं चूक आहे.
हे आपल्या भारतात फक्त लैंगिक संबंधांच्याच नाही तर अनेक इतर विषयातही विसरलं जातं. किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या स्पेसचा परीघ खूपच कमी मिळतो. :-|
सृष्टीतला कोणताही प्राणी घ्या, कामक्रीडा ही केवळ आणि केवळ प्रजोत्पादनासाठीच असते. एक माणूस सोडला तर. किती माणसं कामक्रीडा करताना केवळ कर्तव्यभावनेने त्यात भाग घेत असतिल? ....
रसलनी शंभरएक वर्षांपूर्वी हेच लिहिलं होतं आणि रसलला तेव्हाच्या इंग्लंडमधे टीकेला सामोरं जावं लागलं.
हे आपल्या भारतात फक्त लैंगिक संबंधांच्याच नाही तर अनेक इतर विषयातही विसरलं जातं. किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या स्पेसचा परीघ खूपच कमी मिळतो.
सहमत. १००%. पण हे फक्त भारतातच नव्हे तर सगळीकडेच, अगदी पाश्चात्य देशातही. माणूस इथूनतिथून सारखाच. माझा याही सिध्दांतावर विश्वास आहे की माणसाचा मूळ साचा काही बदललेला नाहिये. फक्त व्यक्त स्वरूप बदलतं. सौदी अरेबियात मुंडकं ऊडवतात. अमेरिकेतील कट्टर धार्मिक लोकही तेच करू पाहतात पण करू शकत नाहित म्हणून करत नाहित एवढेच.
आता तू म्हणतेस तसं आपल्याकडे हा परिघ खूपच कमी असतो. त्याचं कारण मला तरी असं वाटतं की मूळात आपला समाज हा खूप घट्ट बांधला गेला आहे. नात्यागोत्यांची वीण खूप घट्ट असते. म्हणूनच एखादी चुलत काकू कधी तरी वर्षं सहा महिन्यांनी भेटते तरी सुध्दा 'काय? मग कधी करते / तो आहेस लग्न? का कुणी आधीच ठरवला / ली आहे?' असं दणक्यात विचारू शकते आणि जर खरंच संबंध चांगले असतिल तर आपल्यालाही त्याचे काही वाटत नाही. पाश्चात्य संस्कृतीतही असं असेलच पण कमी असेल असं मला वाटतं. अरब संस्कृतीत तर मुलगा लग्न झालं की लगेच वेगळा राहतो आणि सून घरात एकटी असेल तर सासरा घराची पायरी सुध्दा चढू शकत नाही.
असो. मला वाटतं मूळ लेखापेक्षा हा प्रतिसाद खूपच अवांतर होतोय का? आपण एक नविन धागा टाकू. :)
बिपिन.
तू रसल चा उल्लेख केलास आणि तू सांगितलेली रसल ची पुस्तकं अजून वाचली नाहियेत ही टोचणी परत सुरू झाली. ;)
. पण हे फक्त भारतातच नव्हे तर सगळीकडेच, अगदी पाश्चात्य देशातही. माणूस इथूनतिथून सारखाच.
हे वाक्य आवडुन गेले, नुसते नाही खुपच आवडुन गेले ! तुम्ही शातपणे बसुन एक लेख टाकाच.
वरच्या वाक्यासाठी टाळ्या !!
मलाही मूळ लेख, आणि हा प्रतिसाद आवडला..
पर्सनल स्पेस मधे माणूस काय करतो हा खरंच त्याचा प्रश्न आहे.. पण तरीही ते तुम्ही इतकं मोकळे पणाने बोलताय हे आवडलं..
नंदनने परफेक्ट शब्द दिलाय!
मिपा खरंच प्रगल्भ संस्थळ झालेय!
अतिशय सुंदर लेख.
तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांमुळे वाचकाचीच समजून घेण्याची आणि प्रतिसाद देताना विचार करण्याची जबाबदारी वाढते आहे.
लैंगिक आकर्षण हे भिन्न-सम आणि उभयलिंगी असते..असतेच... ते मान्य करणे फार अवघड आहे हे खरेच. स्बतःबद्दल हे मान्य करायला फारच धाडस पाहिजे किंवा भावनांची तीव्रता तितकी पाहिजे. उभयलिंगात आकर्षण असणारे लोक आपल्यातल्या समलिंगी आकर्षणाकडे काणाडोळा करुन राहू शकतील पण फक्त समलिंगी आकर्षण असणार्यासमोर मोठेच प्रश्न.
मानवाला सर्व बाबतीत वेगळेपणाची सूट घ्यायची पण लैंगिकतेच्या बाबतीत मात्र तो 'प्राणी' आहे असे म्हणायचे आणि आपल्या प्राणीजगताच्या अर्धवट निरिक्षणांच्या जोरावर प्रतिवाद करायचा याची मजा वाटते. प्राणी सृष्टीतही आनंदासाठी-सामाजिक जवळिकीसाठी समागम असतो असे नॅशनल जिओग्रफिकवर पाहिले आहे. असे नके पैलू आपल्याला माहित नसलेले असू शकतात. आपले प्राणीसृष्टीबद्दलचेच ज्ञान इतके तोकडे असताना त्या ज्ञानावर आधारित मते बनवणे ही मजाच आहे. तसेच, माणुस नैसर्गिक असताना त्याच्या मनातल्या घडामोडी अनैसर्गिक म्हणणे हे विरोधाभासाचे आहे.
लेख आवडला. प्रकटन आवडले. आपला मानसिक गुंता इतका क्लिष्ट असतो की त्याचे निरिक्षण करता आपल्याला नको असलेल्या अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत जन्मभर राहू शकतो. त्या विशिष्ट गोष्टींचे परिक्षण-परिशीलन करणे बौद्धीक धाडसाचे असते.
आता जे दुवे दिले आहेत त्यांचे वाचन करतो.
-- लिखाळ.
प्रकटन आवडले, धक्का बसला का तर नाही. मला धक्का बसला नाही. समलैंगिकता ही गोष्ट आता कानगोष्टी करण्याइतकी राहीलेली नाही मात्र अनेक विचार मनात आले. लेखकाबद्दल नाही, स्वतःबद्दल आणि त्याचे कारण अभिनेशविरहित प्रामाणिक आणि सहज लेखन.
सर्वप्रथम गेल्या लेखात झालेल्या अनपेक्षित विनोदामुळे मला थोडी गंमत वाटली होती. जसा विषय मांडला जातो(लेखाचा नव्हे तर प्रतिसादाचा) तसा तो विनोदाचा किंवा गांभीर्याचा विषय होतो असे वाटते. विनोद प्रत्येकावर होतात, जाड्या, बुटक्या, काळ्या माणसांवर. बाईवर, नवर्यावर, बिहारींवर, भय्यांवर, गुज्जुंवर आणि समलिंगी माणसांवरही. विनोद एखादे वेळेस बरा असतो पण तो बोचरा ठरू लागला किंवा समोरच्यावर वार करू लागला तर नकोसा होतो. (उदा. बायकांवर सुरु झालेले मिपावरील अनेक धागे) गांभीर्याने लिहिलेल्या प्रकटनाला समजून घेण्याची क्षमता सुजाण माणसात असावी असे वाटते.
माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जबाबदारी समोरच्या माणसाला कळत असेल तर समलैंगिकता हा टाबू नक्कीच होऊ नये.
परंतु,
अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर म्हणेन की अशी गोष्ट माझ्या घरात घडली, अगदी जवळच्या व्यक्तीशी तर मला धक्का बसेल का? तर हो, नक्कीच बसेल.
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.
आणि, जर मला इतरांबद्दल काही वाटत नसेल आणि जर माझ्या घरात असे झाल्यास वेगळे वाटत असेल तर समलैंगिकतेकडे मी पारदर्शक नजरेने पाहते का?
नाही मी नाही पाहत.
लेखकाच्या प्रकटनामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळी भावना निर्माण झाली का? - नाही. कोणतीही वेगळी भावना नाही.
माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.
प्रियाली तैंच्या आणि सर्केश्वर बिप्पीन भौंच्या मुद्द्यांवर सहमत ...
लेखकाच्या प्रकटनामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळी भावना निर्माण झाली का? - नाही. कोणतीही वेगळी भावना नाही.
माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.
एक्झॅक्टली .. सेम हियर ... धनंजयने तोंडात बोट घालायला लावली ब्वॉ ... एक नंबर सहज आणि सुलभ लिहीले आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
अत्यंत धाडसी आणि तेवढाच प्रामाणिक लेख. लेखातील प्रामाणिक प्रकटन आवडले.
>>अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल.
भिन्नलिंगी व्यक्तींना ती नजर नकोशी होऊ शकते. त्यात मुद्दाम लिहिण्यासारखे असे काही आहे असे मला वाटत नाही.
पण त्या स्त्री च्या जागी आपण आहात आणि आपणाला कुणा दुसर्या स्त्रीचे आकर्षण वाटत आहे अशी कल्पना करून बघायला हवी.
धन्यशेठ,
कुठलाही आव न आणता केलेले अत्यंत मनमोकळे अन् धाडसी कथन. मान गये उस्ताद...!
धनंजयांच्या वैयक्तिक बाबतीत म्हणायचे झाले तर आजवर त्यांचे जे काही हरहुन्नरी व्यक्तिमत्व इथे महाजालावर पाहीलेय त्यावरून त्यांच्याबद्दल जो आदर निर्माण झालाय त्यात माझ्या दृष्टीने तसा फारसा फरक पडणार नाही.
प्रमोदकाकांसारखेच म्हणतो. माझ्या दृष्टीने फारसा नाही, तर काहीच फरक पडणार नाही...
मात्र,
अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर म्हणेन की अशी गोष्ट माझ्या घरात घडली, अगदी जवळच्या व्यक्तीशी तर मला धक्का बसेल का? तर हो, नक्कीच बसेल.
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.
प्रियालीचे वरील दोन मुद्दे प्रामाणिक तर आहेतच परंतु समलिंगि संबंधाच्या बाबतीतल्या तिच्या वरील व्यक्तिगत मताशी मी सहमत आहे...
असो, बाकी समलिंगी संबंध हे अनैसर्गिक असतात हे माझं व्यक्तिगत मत आजही कायम आहे...
आपला,
(धन्याशेठच्या प्रांजळ लेखनाचा फ्यॅन) तात्या.
आपल्या मनात असलेल्या ठराविक चौकटीच्या बाहेर पडलेले कुठलेही पाऊल हे आपल्याला बहिष्कृत करावे असे वाटू लागते ह्याचे कारण आपल्या दृढ संकल्पना.
कळत्या वयापासून समजलेले माणसामाणसातले संबंध आपण ज्या जाणिवांनी कळतनकळत टिपलेले असतात त्यात कुठेतरी लैंगिक संबंधाबद्दल मनाची धाटणी काय असावी ह्याची रुजवात होत असावी असे वाटते.
चारचौघे आणि आपण ह्यातले ते समांतर जाणे हा आपल्या अनुभवविश्वाचा भाग आहे की विकृती आहे, नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हा लढा फार म्हणजे फारच कठिण असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्यात ती व्यक्ती बर्याचवेळा पूर्णपणे एकाकी असते. अशावेळी बुद्धीच्या निकषावर घासून योग्य त्या निष्कर्शाप्रत पोचणे, एवढेच नव्हे तर एकदा स्वतःला ती ओळख पटल्यावर आपल्या जवळच्या जिव्हाळ्याच्या लोकांना ते पटवून देणे ह्यातले जे भावनिक विच्छेदन आहे ते रक्तबंबाळ करणारे आहे!
त्या भावनिक जखमा भरल्यावर किंवा निदान बुजल्यावर त्याच्या दडपणाखाली दबून न जाता पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात मोकळेपणाने ती बाजू मांडण्याचे धैर्य दाखवणे केवळ असामान्य आहे.
एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने तू तुझ्या अनुभवविश्वावर ही स्कालपेल चालवली आहेस आणि कुठेही रक्त न येऊ देता एक सहजसुंदर शल्यकर्म पार पाडले आहेस त्याने मी थक्क झालोय!
धनंजय, तुला स्वतःची ओळख किती जवळून आहे ह्याचे हे लक्षण आहे. अशा 'स्व'च्या जवळ पोचलेल्या फार थोड्या व्यक्तींपैकी तू एक आहेस ह्याचे कौतुक वाटते.
आतापर्यंत एक विद्वान, व्यासंगी, स्थिरचित्त, प्रगल्भ व्यक्ती म्हणून तुझी जालावरील ओळख मला होती त्यात अतिशय धैर्यवान असं आणखी एक बिरुद सामावलं
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर -
मला धक्का बसला का? तर नाही.
माझ्या मनाने ही वेगळी बाब स्वीकारली का? तर हो स्वीकारली.
एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीत फरक पडला का? तर नाही.
(माझ्या जवळच्या नात्यात असे काही घडले तर मी एवढेच सहजतेने घेऊ शकेन का? तर नाही. कारण नाते म्हटले की भावनिक पातळीवर एक वेगळी जोडणी असते. मनाला स्वीकारायला लावणे इतके सहज नसेल हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. आणि तुझा हा लेख वाचून असे काही पुढे आले तर ते स्वीकारण्याकरता आता मन तयार होऊ शकेल ह्याची खात्री वाटते.)
चतुरंग
लेखातील प्रत्येक वाक्य मनापर्यंत जाऊन भिडले. आणि तुमच्या मोकळेपणाचे कौतुक वाटले. तुमचे आत्मकथन वाचून अनेकांना आपल्या आपल्या आवडीनिवडींचा स्विकार मोकळेपणे करण्याचे धाडस मिळेल असे वाटले, मग त्या वरच्या मानाने कितीही क्षुल्लक, आयुष्यबदलू नसल्या तरी.
अमेरिकेत आल्यानंतर इतरांकडून आणि टीव्ही वर वगैरे समलैंगिकतेविषयी थट्टा, कुतुहल असे सर्व ऐकायला - पहायला मिळायचे. पण त्यानंतर कधीतरी आधीच्या धाग्यात दिलेला फिलाडेल्फिया हा इंग्रजी चित्रपट पाहिला. चित्रपटाचे प्रभाव पडून बदलणारी मी नव्हे, पणकधी नव्हे तेवढा या चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव पडला आणि कुतुहल ओसरले आणि काही लोकांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे हे जाणवले.
माझ्या मुलीच्या वर्गातील मुलाला दोन वडिलच आहेत. सुरूवातीस त्यांच्या घरी गेले की अवघड वाटायचे, पण नंतर लक्षात आले की ते तर आपले आयुष्य चांगले जगत आहेत. बरे मुलांना वाढवताना मी जशी काळजी घेईन तशीच ते ती घेत आहेत, आणि त्यांची मुलेही त्यांच्याबरोबर चांगली आनंदात आहेत. आणि मग अजून काही चष्मे बाजूला ठेवले गेले.
माझ्या आयुष्यातील जवळच्या अविवाहित व्यक्तींनी असे जाहीर केले तर तोवर मला कल्पना आली नसली तर कदाचित आश्चर्य वाटेल, पण खेद वाटणार नाही. जवळच्या विवाहित व्यक्तींनी (विरूद्धलिंगी व्यक्तीशी विवाह केलेल्या व्यक्तींनी अर्थातच) जाहीर केल्यास राग, चीड, ते दु:ख, किंवा काळजी इत्यादी अनेक भावना असतील, पण ते याला किंवा हिला हे आधीच का सुचले नाही अशा प्रकारे असेल.
अतिशय धाडसीपणाने आणि काहिही न लपवता आपण लिहिले आहे.
खोटं नाही सांगणार.. पण मला थोडा धक्का बसलाच. तरीही तो पचवणे जड नाही गेले.
धनंजयचे आत्मकथन पारदर्शक आहे, अगदी साध्यासोप्या शब्दात त्याने आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे - अगदी श्वासोच्छ्वासाइतक्या सहजपणे. त्यात समर्थन नाही. जे आहे ते सत्य. आणि हे सत्य सर्वात प्रथम मान्य करायला आणि नंतर मग जसे दिसले तसे मांडायला लागणारे असामान्य धैर्य त्याने दाखवले आहे.
मुक्त्सुनित यांच्याशी सहमत आहे.
सुरूवातीला मला हा विषय चेष्टेचा वाटायचा. पण जसजशी त्यातली गंभिरता लक्षात आली तसतशी त्यातली चेष्टेची भावना कमी होत गेली. तुमचा पहिला उतारा आहे ना..
एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.
यामध्ये किती अर्थ दडलेला आहे हे लेख वाचून लक्षात आलं. आपण डॉक्टर आहात. शरीर शास्त्राबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला आहेच. पण जेव्हा आपल्याला ही जाणीव झाली त्यानंतर आपल्या मनामध्ये किती वादळ झालं असेल याची कल्पना नाही करता येणार. कदाचित हा "आपण गे आहोत" हे समजल्यावर त्याचा स्विकार करणं जड गेलं असावं.
आपण अतिशय धाडसी पाऊल उचललं आहे.
हे वाचल्यानंतर..तुमच्याबद्दल वाटणारा आदर कमी झाला का? - तर अजिबात नाही.. उलट खूपच वाढला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
>> माहितीशिवायही दृढ कल्पना असणार्या लोकांना समर्थन देणे फार शिणवणारे काम आहे. ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे.
तुमचा लेख तर आवडलाच पण त्यातला प्रामाणिकपणा जास्त आवडला. तुमच्या धाडसाचे अभिनंदन.
लेख उत्तम लिहिला आहे. पहिला परिच्छेद विशेष.
अभिनिवेशरहित हे अगदी योग्य विशेषण.
माझ्या जवळच्या कोणी असे सांगितले असते तर इतका उशीर (पंचविसाव्या वर्षी?) कसा काय असा (लेखकाला पडला तसाच) प्रश्न पडला असता.
दोनेक वर्षांपूर्वी मला (मी लग्न का करत नाही म्हणून) असा प्रश्न केला गेला होता. की तुला नुसत्या मैत्रिणीच कश्या, 'तसलं' काही नाही ना. मी थक्क. मित्र आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले. प्रश्नकर्ती व्यक्ती भारतीय, परदेशात न राहिलेली. तेव्हा हळूहळू इथेही जाणीव वाढते आहे.
जपून ठेवावी अशी आहे.
लिहिण्याची कणमात्रही आवश्यकता नसताना मुक्तपणे विचार मांडणे हे साधे काम नाही. एका "ओपन" धनंजयाला किमान दहा "सुप्त" धनंजयांची साथ असू शकते. त्या सार्यांना कदाचित बोलता येत नाही किंवा बोलायची दमडीइतकीही गरज वाटत नाही.
असो/// धनंजय - येथे मोकळेपणाने तुम्हाला लिहावेसे वाटले ह्यात येथील वाचकांचा गौरव आहे.
- एकलव्य
धनंजय,
प्रामाणिक लेखनाबद्दल काय बोलावे काहीच सूचत नाही. लेखन वाचून जरासा धक्का बसला. गाव-गाड्याच्या संस्कारात वाढल्यामुळे समलैगिंकतेच्या विषयाबाबत म्हणाल तर दुषीत पूर्वग्रह असल्यामु़ळे तसे लोक विकृत , घाणेरडी वैगरे वाटायची. अर्थात असे वाटणे, माझ्या शैक्षणिक,सामाजिक, मानसिक, बुद्धीमत्तेची संकुचितता असेल, तो समजूतीचा दोष आहे, फक्त माणूसपणाच्या कोणत्याही सन्मानापासून अशी माणसं वंचित राहू नये, खोलवर रुजलेल्या पारंपारिक विचारांना तोडण्याचे काम या प्रामाणिक लेखनाने केले असे वाटते.
जालावरील आपल्यासारख्यांची भेट, एका अलौकिक बुद्धीवंताची भेट असल्यामुळे, आपल्याबद्दल अशा लेखनाने आदरात कोणताही फरक पडणार नाही.
माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.
प्रियाली, अगदी मनातलं बोलल्या !!!
-दिलीप बिरुटे
सर्वच प्रतिक्रिया देणार्यांनी केले. प्रतिक्रिया वाचून मनाला फार बरे वाटले.
या बाबतीत वैज्ञानिक स्पष्टीकरणांचा विचार करणे शक्य आहे. पण अशा बाबतीत वैज्ञानिक विचारसरणीत "गृहीतके काय?", "प्रमाणे कुठली" वगैरे विचार करणे महत्त्वाचे. अन्यथा "कसल्या प्रकारच्या उत्तराने प्रश्नकर्त्याचे समाधान होते," त्याची चौकट सुरुवातीला ठरवलेली बरी.
साधारणपणे असा काही वाद केला जातो :
गृहीतक : हेतूसाठी कार्ये होतात. (विज्ञानात हे गृहीतक साधारणपणे मानत नाहीत. कार्याचे निरीक्षण करून त्याचे वर्णन नमूद केले जाते, निर्हेतुक कार्ये देखील असू शकतात.)
गृहीतक : प्रजोत्पादन करण्याच्या प्रमुख हेतूनेच मनुष्यांचा लैंगिक व्यवहार होतो. (हा मुद्दा केवळ समलैंगिकतेचा विचार होतानाच लोकांना सुचतो. अन्यथा सुचत नाही. माझा व्यंग्यपूर्ण लेख "वैराग्यभावाचा अभाव..." बघावा. प्रजोत्पादन करायचे नाही तेव्हा लैंगिक व्यवहार जर थांबत असता, तर तो लेख आचरट राहिला नसता. प्रजोत्पादन करायचे नाही असा हेतू असतानाही लोक लैंगिक व्यवहार करत राहातात. बहुधा अप्रमुख हेतू लैंगिकतेसाठी पुरेसे असावेत.)
गृहीतक : प्रजोत्पादन करण्याच्या हेतूनेच जनावरांचा लैंगिक व्यवहार होतो, आणि ही उपमा मनुष्यांना लागू आहे. (जनावरांची उपमा मनुष्याला लागू करायची की नाही, हा एक मुद्दा. आणि हे गृहीतक निरीक्षणांनी फोल ठरते हा दुसरा मुद्दा.)
कुठल्याही एका व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीची गृहीतके काय, याबद्दल विचार करता येतो. आणि तिथपासून विज्ञान (म्हणजे प्रमाणे असलेले विश्लेषण) विकसित केले जाऊ शकते. समजा एखाद्याला ओळखीतून माहीत असेल की भारतातल्या सर्व शहरांत आणि खेड्यांत मोठ्या प्रमाणात समलिंगी संबंध दिसून येतात. तर त्या व्यक्तीचे असे मत नसणार की हा उपटसुंभ पाश्चिमात्त्य व्यवहार आहे. (कुंपिणीकर इंग्रजांना हा पौर्वात्य व्यवहार वाटत असे! - तेही स्वतःच्या देशाबद्दल अडाणी.) त्या व्यक्तीला ती सिद्धता अनावश्यक असेल. पण ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल त्याला ती आकडेवारी द्यावी लागेल. त्यांना आकडेवारी खोटी वाटली तर पुन्हा वेगळ्या डोळ्यांनी मुंबई, एखादे छोटे गाव फिरून आणावे लागेल. वगैरे, वगैरे.
जीवशास्त्राच्या बाबतीत सामान्य मध्यवर्ती (कॉमन ऍव्हरेज) निरीक्षण काय, याच्याबरोबर सामान्यपणे किती प्रकार (व्हॅरायटी) दिसतात हेसुद्धा निरीक्षणाने सिद्ध होते. सामान्य "व्हॅरायटी"ची कारणमीमांसा करता येते, पण बहुतेक संदर्भांत अवांतर असते.
उदाहरणार्थ, (१) बहुतेक लोक उजव-खोर असतात, आणि काही थोडे डावखुरे असतात. "गरोदरपणात आईच्या टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण अधिक म्हणून डावखुरा" असे कारण कळले म्हणून डावखुरा गोलंदाज उजव्या हाताने चेंडू टाकू लागणार नाही. आणि "गरोदरपणात तुझ्या आईच्या टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण अधिक होते म्हणून मी तुझ्यासमोर बॅटिंग करणार नाही," असे कोणी फलंदाज म्हणणार नाही. किंवा आपले मूल डावखुरे होऊ नये म्हणून गरोदर बाईने टेस्टॉस्टेरोन प्रतिबंधक औषध घेऊ नये!
... (२) जेव्हापासून पठन-पाठन इतिहास आहे, तेव्हापासून हे माहीत आहे - काही बालके योनी असलेली जन्मतात आणि काही शिश्न असलेली. हे निरिक्षण वादातीत असले, तरी सांगितलेली कारणे वेगवेगळ्या काळात वेगवेगळी होती. काही समाजांत असे कारण सांगतात की गरोदरपणात काकड्या, पडवळे, वगैरे लांबोडके खाद्यपदार्थ खाल्ल्यास शिश्न असलेली बालके जन्माला येतात. आयुर्वेदात वेगवेगळी कारणे दिसतात - समागमाच्या वेळी वीर्याचे प्रमाण अधिक असले तर शिश्न असलेले बालक जन्माला येते. आजकाल सांगतात - "य"-रंगसुत्र असलेल्या शुक्रजंतूने गर्भधारणा झाली तर शिश्न असलेले बालक जन्माला येते. कुठली का कारणमीमांसा अधिक पटण्यासारखी असो, "बालकांमध्ये व्हॅरायटी असते" हे निरीक्षण पूर्वीपासून आतापर्यंत तितकेच खरे राहाते. कारणमीमांसा एक अवांतर कुतूहलच आहे.
त्याच प्रमाणे आयुर्वेदातल्या ग्रंथांतून समलैंगिकतेची कारणमीमांसा दिली जाते, आताच्या जीवरसायनशास्त्रात काही कारणमीमांसा दिली जाते. "मनुष्यांमध्ये व्हॅरायटी असते" हे निरीक्षण पूर्वीपासून आतापर्यंत तितकेच खरे राहाते. कारणमीमांसा एक अवांतर कुतूहलच आहे. त्यामुळे वैज्ञानिक स्पष्टीकरणे देण्यापूर्वी कुतूहलाचा संदर्भ निश्चित करणेही महत्त्वाचे.
या लेखात मला विदा विश्लेषण करून द्यायचे नव्हते, कारण मी खुद्द स्वतःला विदा म्हणून प्रस्तुत करतो आहे. गृहीतके, प्रमाणे, कुतूहलाचा संदर्भ वाचकांनी स्वत:चा ठरवून वरील लेखातला विदा वापरावा.
एक महत्त्वाचा मुद्दा प्रियाली यांनी उपस्थित केला :
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.
नको त्या व्यक्तीकडून वासनामय नजर अनुभवली तर नकोसे वाटेल, हा स्वयंस्पष्ट मुद्दा आहे. त्याचा समलैंगितकेशी स्पष्टसंबंध लागत नाही हे त्यांनीच सांगितले आहे. म्हणजे "एखादा पुरुष(ही)..." पण हा मुद्दा त्यांच्या मनात या संदर्भात आला. अन्य लोकांच्याही येतो. हे शक्य आहे, की अशा स्त्रियांकडून नको असलेली वासनामय नजर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात अनुभवली असेल. किंवा समलिंगी आकर्षण असलेली स्त्री सर्वभक्षी आहे अशी कल्पना मानलेली असावी. तात्यांनी दुजोरा दिलेला आहे, म्हणून हा मुद्दा पुरुषांनाही लागू आहे, असे येथे चर्चेत दिसते.
काही लोकांची अशी धारणा आहे, हे जाणणे मला महत्त्वाचे असते. (हे मी आधीही जाणले आहे, पण प्रियाली यांनीही हा मुद्दा अधोरेखित केलेले आहे.) माझ्या बाबतीत विदा : पौगंडावस्थेतल्या अमूर्त आकर्षणानंतर मला तरी "सर्व पुरुषां"बद्दल आकर्षण नाही. फक्त ज्यांच्यावर थोडेफार प्रेम जमू लागले अशाच इन्या-गिन्या पुरुषांबद्दलच. तरी मला हे लक्षात ठेवले पाहिजे - काही पुरुषांना असे वाटते की मी त्यांच्याकडे वासनेच्या नजरेने बघतो. (त्यांना तसे का वाटते, हे कोडे आहे. पण जर त्यांना तसे वाटते असे ते म्हणतात, तर त्यांच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवतो, ठेवलाच पाहिजे.) माझ्याकडून वासनामय नजर नसतानाही ज्याला तशी नजर जाणवते, तशा पुरुषास चार हात लांब ठेवणे हे माझ्यासाठी योग्य धोरण आहे. जितकी त्या माणसाची संशयी दृष्टी, तितक्या प्रमाणात तो अविश्वासाने, माणुसघाणेपणे माझ्याशी वागेल, हे जाणून त्याच्याशी सावधानीने रोजव्यवहार करणे माझ्या दृष्टीने इष्ट.
कित्येक पुरुष असे भेटतात, ज्यांना माझ्या नजरेत वासना आहे असे दिसत नाही (कारण तथ्यही तेच असते). कदाचित स्वतःच्या आकर्षक असण्याबद्दल अवास्तव कल्पना या पुरुषांना नसेल. किंवा मी सर्वभक्षी आहे, असे त्यांचा पूर्वग्रह नसेल. काही का असेना. सामान्य लोक एकमेकांना जितपत विश्वासाने, माणुसकीने वागवतात, त्याच प्रकारे असा पुरुष माझ्याशी वागेल. अशा पुरुषांशी तितक्याच विश्वासाने वागण्यासाठी माझे मन तयार असले पाहिजे. सवयीने कळते - कोणाच्या डोळ्यांत ही वासनेची अनाठायी (पण मनापासून) भीती आहे, आणि कोणाच्या डोळ्यांत नाही.
एखाद्या समाजात जर बहुतेक पुरुष माझ्या नजरेत नसलेली वासना कल्पून बघत असतील, तर त्या समाजात माझा वावर कष्टाचा होईल. पण नागर समाजात असा पूर्वग्रह नसलेलेच बहुतेक पुरुष मला भेटतात, यामुळे माझे रोजचे जगणे तसे फारसे कठिण नाही.
अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.
इथे माझा मुद्दा किंचित वेगळा होता. (स्त्री वेगळ्या नजरेने - वासनामय असेच नाही) पुरूष स्त्रियांकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला घृणा येतेच असे नाही. बरेचदा, ते आवडते असा अनुभव आहे. किंबहुना, पुरुषाने आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहावे हीच अनेकदा स्त्रियांची इच्छा असते. परंतु पुरूषाची वेगळी नजर वासनामय किंवा वखवख इतकीच दिसत असल्यास ते आवडेलच असे नाही. या उलट, स्त्रीने स्त्रीकडे केवळ वेगळ्या नजरेने पाहणे हे इतर स्त्रियांपेक्षा वेगळे असल्याने चटकन जाणवेल आणि बहुधा विचित्र वाटेल.
मला वाटते कोणत्याही मनुष्याला इतर "सर्वांबद्दल" कधीच आकर्षण नसते.
प्रतिसादाशी अवांतर:
बाकी वर लिहिल्याप्रमाणे, आपल्यापेक्षा वेगळ्या असणार्या प्रत्येक माणसाच्या जागी आपण स्वतःला उभे करू शकत नाही किंवा तशी अपेक्षा इतरांकडून ठेवणे फार होते असे मला वाटते.
लेख आणि त्यातील प्रामाणिक मोकळेपणा आवडला. भारतात सध्या असल्याने फार कमी मिपा अथवा जालाशी संपर्क येत आहे. त्यामुळे लेख वगैरे वाचायला ठेवून दिले. आत्ताच जरा वाचायला घेतले. थोडक्यात उशीरा वाचल्याने उशीरा प्रतिसाद.
वरील अनेक प्रतिसादांशी सहमत. चित्राने म्हणल्याप्रमाणे, फिलाडेल्फिया चित्रपटाने हा विषय अतिशय वेगळ्याच आणि हळूवारपणे मांडला आहे. त्यातील मुद्दे हे कायदेशीर असतील पण वरील लेख हा एका व्यक्तीच्या भावनेच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असल्याने तितकाच हळूवार आणि प्रांजळ आहे.
इतरांनी म्हणल्याप्रमाणे मला देखील आश्चर्य वाटले नाही / धक्का बसला नाही, अथवा धनंजयबद्दल वाटणारी आत्मियतापण कमी झाली नाही.
प्रतिक्रिया
आपण चार
बिंदुमाधव
ब्राव्हो!!!!
धक्का - खूप थोड्या धाडशी लोकांपैकी तुम्ही एक आहात
शास्त्रीय कारणमीमांसा!
सलाम!
असेच म्हणतो!!
इतकं
प्रतिक्रिया
या
बालसंगोपनाची उर्मी
मनापासून आणि प्रामणिक
+१
'बालिका
प्रिय मित्र
असामान्य
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी अगदी
सहमत
अगदी!
+१
सुंदर प्रतिसाद
उलगडा
मनाची ताकद...
अतिशय
कमिंग आऊट
अतिशय
+१
हे आपल्या
उत्तम
मलाही मूळ
सुंदर
प्रकटन आवडले
+१
अत्यंत धाडसी
लेख वाचला,
उत्तम कथन, माझं मत..
धनंजय, तुला मनःपूर्वक दाद!
स्पष्ट
हॅट्स ऑफ टू यू धनंजय..
धाडसी लेख.
प्रामाणिक लेख
उत्तम लेख
लेख, विचार आणि मांडणी
प्रामणिक
किती हा प्रामाणिकपणा...!!!
सहृदय वाचन
धन्याशेठ, ख
किंचित वेगळा मुद्दा
सर्वभक्षी
मोकळेपणा...