Skip to main content

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

लेखक डॉ. भूषण काळुसकर यांनी शुक्रवार, 09/05/2014 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात. शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25233
प्रतिक्रिया 162

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?
तुम्ही दैनंदिन भाषेत इंटेलिजन्स कोशंट आणि ईमोशनल इंटेलिजन्स बद्दल तर बोलत नाही ना? तळटीपः माझ्या प्रतिसादाचा रोख कुणा व्यक्तीकडे नसून प्रशांत यांच्या प्रतिसादातील अभ्यास, व्यासंग आणि सामान्यज्ञान या शब्दांच्या अर्थाकडे आहे.

In reply to by धन्या

आरत्या बंद पडल्यामुळे `अशांत कावले' आहेत. माझा प्रतिसाद दिसला की काही तरी पिंक टाकायची इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे.
त्यातल्या किती गोष्टी तुम्ही अभ्यासक्रमात शिकला आहात?

In reply to by आनन्दा

घंटाचंदांचं मी एकवेळ समजू शकतो, त्यांना कुठेही पिंका टाकायची सवय आहे. तुमच्या बाबतीत तर मला काहीही माहिती नाही. प्रतिसादाच्या निमित्तानं प्रोफाईल आणि लेखनकारकिर्द पाहिली असता विषेशज्ञान कसलं असावं याचीही कल्पना येत नाही. पण विषेशज्ञान आणि व्यासंग यातला फरक कळत असावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हे घ्या - विशेषज्ञान काळुस्करसाहेब, काही चुकले असेल तर सुधारा.

In reply to by आनन्दा

आनन्दा- त्या साईट वरती बरच काही आहे, काही केसेसही आहेत, तुला नक्की काय सांगायच आहे ते कळलं नाही

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

माझ्या प्रतिसादावर त्यांनी ही पिंक टाकली होती
तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.
पण विषेशज्ञान (या चर्चेच्या संबधात, Professional Qualification) आणि व्यासंग (Exploration) यात फरक आहे ही स्वतःची चूक लक्षात आल्यावर, त्यांनी अशी मखलाशी (ती सुद्धा चुकीची) करुन :
कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे.
इत्यलम, .... म्हणजे काढता पाय घेतला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
या वाक्याच्या पुराव्यासाठी दिलेली लिंक आहे ती. बी. एच एम एस चा अभ्यासक्रम. आहो संक्षी, बेसिक मेडिसिन, शरीरशास्त्र वगैरे सर्वांनाच शिकवले जाते. अगदी पॅथोलोजी पण. म्हणजेच त्यांना बेसिक मेडिसिनचे प्रोफेशनल क्वलिफिकेशन नाही हा मुद्द संपला. त्याच्या आधारावर जनरल प्रॅक्टिस ते नक्कीच करू शकतात. आणि त्याच आधारावर सध्या त्यांना ती परवानगी आहे. सध्या ज्या प्रश्नावर वाद सुरू आहे त्याची बहुधा तुम्हाला माहिती नसावी. ती पूर्ण टाकण्याईतके त्या विषयाचे ज्ञान मला नाही, कारण मी त्या क्षेत्रात काम करत नाही. पण एव्हढे नक्की सांगू शकतो, की होमिओपॅथिक डॉ. ला एम आर आय प्रिस्क्राइब करण्याचा अधिकारच नाही हे विधान नक्कीच पूर्वग्रहदूषित आहे. सातीतैंचा प्रश्न पूर्ण वेगळा आहे, की ते लोक होमिओपॅथी शिकून अशी प्रॅक्टिस का करतात. तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्याला वर उल्लेखलेल्या वादाचा संदर्भ आहे, म्हणून मी त्यांना तिथे इत्यलम म्हटले, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुमच्या वाक्याचा फक्त संदर्भ घेतला आहे. तुमचा माझा संवाद यापुढेही चालू राहील. सध्या आंब्यामुळे मला फारसा वेळ नाही, तरी पण वेळ मिळताच तुम्हाला उत्तर दिले जाईल.

In reply to by आनन्दा

व्य. नि. तून झालेला आहे, तो मी इथे देऊ शकत नाही. तस्मात होमिओपाथनं MRI करायला सागांवा का ? हा (त्यांचा) मुद्दा बाजूला ठेवू. आपला `सं'वाद (माझ्या) व्यासंगाविषयी होता. व्यासंगासाठी विषय अभ्यासक्रमात असण्याची गरज नाही हा खुलासा मी पूर्वीच केला आहे. तस्मात संवाद पूर्ण झालेला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्राण्यांवर होमिओपॅथीची औषध काय काय परिणाम करु शकतात हे पहायचं असेल तर एकदा माझ्या दवाखान्याला भेट द्यायला यावे. प्राण्यांचे मालकच तुम्हाला सविस्तर सांगतील. खाली २ वेबसाईट्स देत आहे, व्हेटरनरी असोसिएशन च्या आहेत- त्याही वाचा. एक कॅनडातील आणि एक साहेबाच्या देशातील आहे. -http://theavh.org/ http://www.bahvs.com/

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

नक्की काय उपयोग झाला याविषयीचा तुमचा अनुभव विषद केलात तर बरं होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

एकंदरीत आपणांस होमिओपॅथी विषयी चर्चा करण्यात असलेला उत्साह हा वरवरचा वाटतो.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

संपूर्ण सहमती दर्शवतो. पेशंट औषध न घेता बरा झाला तर सर्वोत्तम. त्यामुळे पॅथी हा विकल्प आहे, वाद नाही. कमीतकमी उपायानं इप्सित परिणाम साधायचा असेल तर होमिओपॅथी हा पहिला पर्याय आहे. त्यामुळे होमिओपॅथीत माझा इंटरेस्ट वरवरचा नाही. तुम्ही जर गुणकारकता पटवून देऊ शकलात तर होमिओपॅथी हा कुणाही ओपन माइंडेड व्यक्तीचा पहिला विकल्प राहील. आता या समवैचारिकतेतून पाहता : माझ्या मते, होमिओपॅथी रामनामासारखी आहे. औषध घेऊन स्वतःच स्वतःला बजावत राहायचं `मी बरा होतोयं'. जसा रामनामवाल्यांना रामाचा दिलासा असतो आणि एखादे वेळी काम होऊन जातं तसा होमिओपॅथीचा (एखादे वेळी) गुण येऊ शकतो. थोडक्यात, पेशंटची श्रद्धा महत्त्वाची. अ‍ॅलोपथी निर्वैयक्तिक विज्ञान आहे, पेशंटच्या श्रद्धेचा औषधाच्या परिणामाशी संबंध नाही. अर्थात, तुम्ही कुत्री, झाडं, तान्ही मुलं यांची उदाहरणं देतायं म्हणून कुतूहल आहे. खरं तर जे औषध एकावर परिणाम करतं (तान्ह्या मुलांच्या बाबतीत) त्याचा निर्विवाद परिणाम बहुतेकांवर व्ह्यायला हवा, कारण मानवी शरीराच्या प्रक्रिया एकसारख्या आहेत. औषधाची मात्रा किंवा परिणामकारकता वाढवावी लागेल इतकंच. तुम्ही केवळ Thuja या एकमेव औषधाचं उदाहरण देतायं आणि त्याचा मला तरी अनुभव नाही (म्हणजे तशा प्रकारची व्याधी नसल्यानं ते घेण्याची शक्यता नाही). नाऊ कमिंग टू द पॉइंट : गवि लिखित साखरगोळ्या...या विचारप्रवर्तक लेखात मूळ मुद्दा असा आहे :
होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे...रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा. त्या पदार्थामुळं मूळ रोगासारखीच लक्षणं शरीरात तयार होऊ पाहतील आणि मूळ रोग (लक्षणांचं कारण) शरीरातून बाहेर पडेल.
होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.
मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात शिल्लक राहूच शकत नाही (एक रेणू देखील). कारण Avogadro's number ची लिमिट ओलांडली तर मूळ पदार्थ आपल्या गुणधर्मांसहित त्याहून अधिक डायल्यूट करताच येत नाही.
होमिओपथीवाल्यांचं म्हणणं असं की तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो. हे निदान फिजिक्सच्या कसोटीवर अगदी निराधार आहे.
आणि सरते शेवटी, गविशी संपूर्ण सहमत होत, त्याचाच प्रश्न विचारतो:
इतपत शंका येण्यासाठी होमिओपथीचा Doctor असण्याची गरज नाही. त्या शंका दूर करणं मात्र होमिओपथी एक्स्पर्टसच्या हातात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

एकूण काय तर ही औषधं श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात. अदरवाईज त्या खरंच साखरेच्या गोळ्या आहेत. त्यात मूळ पदार्थ नसतोच. भले मूळ तत्व आपल्याला मान्य का असेना.
ते सेकंड लास्ट परिच्छेद म्हणून वाचावं.

@ डॉ.भूषण काळुसकर- पेशंट मागतात म्हणून इंजेक्शन मधुन फक्त स्टराईल वॉटर देणारे काही डॉक्टर मी ऐकलेले आहेत. हे 'स्ट.वॉटर'चे इंजेक्शन शिरेत की स्नायूत देतात ? शिरेत दिल्यास रक्तपेशी नष्ट होत नाही का ? कारण रक्ताची क्षारता स्ट.वॉटरपेक्षा अधिक असते. तुम्हाला हे त्या डॉक्टरनी सांगितले की पेशंटने ? तुम्हाला स्ट. सलाईन असे म्हणायचे होते का? नक्की काय?

In reply to by मार्मिक गोडसे

वॉटर देतात दोन एम एल. इंजेक्शन डिसॉल्व करायला मिळते ना ते. दोन तीन सी सी ने काही फरक पडत नाही.