Skip to main content

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

लेखक डॉ. भूषण काळुसकर यांनी शुक्रवार, 09/05/2014 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात. शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25233
प्रतिक्रिया 162

प्रतिक्रिया

In reply to by आनंदी गोपाळ

प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा. मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका. आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो. असंख्य लेक्चर्समध्ये. उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं? पींगळा की सुषुम्ना? आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत. ;)

In reply to by साती

लेखक पदार्पणालाच बावरले असतील नै!

In reply to by प्यारे१

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!

In reply to by साती

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये. ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये. तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा. आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे. डॉक एकदम सही बोलरेला हय ! {अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा} Chhinakani

In reply to by प्यारे१

रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?

In reply to by मुक्त विहारि

पहिल्याच लेखाला सर्वांच्या भरभरून प्रतिक्रिया पाहून माझ्या अंगावर मुठभर मांस चढले!!!

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया! आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा.... हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!

In reply to by असंका

त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या http://misalpav.com/node/7514 डॊक्टर http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स एकूण हा विषयच वादग्रस्त आहे

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....

In reply to by जेनी...

डॉक्टर काका!! अहो फक्त सहा वर्षांची प्रॅक्टीस आहे हो त्यांची! अगदी कितीही गचके खाल्ले अस्तील तरी जास्तीत जास्त वय तीस्.....त्यांना काका म्हणावं!!!

In reply to by जेनी...

डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....
ह्येलाच प्लाशिबो म्हन्त्यात काय?

In reply to by धन्या

जर होमिओपॅथी हि प्लासिबो असती तर मग ही औषधं- तान्ही बाळं, प्राणी(कुत्री, मांजर इ.) इतकच काय तर झाडांच्या आजरांवर(अ‍ॅग्रो-होमिओपॅथी) कशी उपयोगी पडली असती? त्यांना कुठे असतो प्लासिबो इफेक्ट?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय. होमिओपथी ही प्लासिबो इफेक्ट तत्वावर चालते असा लोकांचा आक्षेप असतो. त्यावर तुम्ही सविस्तर लिहावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथली चर्चा वाचा. म्हणजे तुम्हाला या विषयाची नेमकी कल्पना येईल आणि तुम्हाला त्यावर भाष्य करता येईल.

In reply to by धन्या

आमच म्हन्न काय समजा प्लासिबो आसनं न्हाईत नसन इफेक्ट हाय कि नाय? तेवढ बोला. आता लईच शंकेखोर मान्सांवर ते प्लासिबो काम करत नाय, मंग बसा बोंबलत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अगदी साध्यातल आणि सोप उदाहरण(साध्यातल आणि सोप हे होमिओपॅथीच्या विविध आजार बर करण्याच्या व्यापक क्षमतेला अनुसरून म्हटले आहे) द्यायच झाल्यास- Thuja या होमिओपॅथीच्या औषधाबद्दल देता येइल. या औषधाच्या वापरामुळे जगभरात लाखो माणसांनी- चामखिळी, कुरुप, मसं, त्वचेवरील निरनिराळ्या गाठी इत्यादी आजारांपासून कायमस्वरुपी मुक्तता मिळवली आहे

स्वागत आहे डॉक्टर . होमेपदीवाले डॉक नव्हते इथे, तुम्ही कसर भरुन काढली !!!

In reply to by प्रचेतस

छान छान.... इथे आम्ही बाहेर, अन तुम्ही करा कट्टे.... (थांबा...आता इथे पण एक जोरदार कट्टा करतो.)

In reply to by मुक्त विहारि

आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच चालू असतात हो. पण जाहिरपणे ते समोर येत नाही इतकेच. *pardon*

In reply to by धन्या

अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे पण शेजारीच आहेत ते.. जाता जाता माझी आंब्याची झैरात करून जातो. काळुस्करांच्या शेजारीच आंबा विकतो आपण.

In reply to by आनन्दा

डॉ साहेब, होमिओपॅथीवर विश्वास आहेच, मी तर टायफॉइड/ मलेरियावर पण होमिओपॅथिक ट्रीट्मेंट घेतली आहे. पण होमिओपॅथी ला मोडर्न सायन्सच्या भाषेत सिद्ध करण्यसाठी काय प्रयत्न चालू आहेत (उदा. पिप वगैरे) ते समजून घ्यायला आवडेल.

मी एम बी बी एस आहे.

In reply to by पोटे

तुम्ही पण जमेल तेव्हा लिहीत चला!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मस्तं प्रष्नं! पण सत्य या विनोदापेक्षा मजेशीर असते. माझ्या मुलांच्या पिडीअ‍ॅट्रीशीयनचे नांव डॉ बच्चा आहे. आमच्या गावात एक नविन सर्जन आलेत. ते नविन असल्याने सध्या हर्निया हायड्रोसील अश्या छोट्या मोठ्या सर्जरीच जास्तं करतात. त्यांच्या आडनावाचं स्पेलिंग बी यु एल एल ए आहे.(मी त्यांना नेहमी त्यांच्या नावाने हाक मारते , आडनाव उच्चारताच येत नाही)

In reply to by साती

ठ्ठो! =)) नवीन जातीव्यवस्था (नि त्यानुसार नावं किंवा उलट) म्हणावी की ही ;)

एकशे एक माझा दुसरा नंबर .... डॉक्टर काका ... तुम्ही लिहाना प्लासिबो बद्दल ... मला वाचायचयो :(

In reply to by जेनी...

9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी योग्य अंक भरल्यास एक फोन नंबर मिळेल , त्यावर फोन करण्याचा प्रयत्न करु नये !
बाकी सगळी दुनिया मुठीत आहे हो तुमच्या!!

काही मूलभूत (बेसिक) तत्वांबद्दल थोडे स्पष्टीकरणः १. रुग्णाने सांगीतलेल्या रोगाच्या मूळ तक्रारी (सिंप्टम्स) (जसे, ताप, खोकला, पोटात दुखणे, छातीत दुखणे, इत्यादी) अनेक आजारांत सामायिकपणे असू शकतात. त्यामुळे केवळ सिंप्टम्स वरून मोठ्या रोगाचे निदान करणे शक्य नसते. त्यामुळे त्या रोगांचे निदान करण्यासाठी काही खास तपासण्या करणे आवश्यक असते. अ‍ॅलोपॅथीमध्ये, पेशंटशी त्याच्या तक्रारींसंबद्धी चर्चा (हिस्टरी टेकिंग) आणि त्याची शारिरीक तपासणी (फिजिकल एक्झामिनेशन)केल्यावर बर्‍याचदा जर मोठा आजार असला तर साधारणपणे एकापेक्षा जास्त रोगांची शक्यता वाटू शकते. त्या सर्व शक्यतांच्या यादीला "डिफरेंशियल डायग्नोसिस" असे म्हणतात. या यादीतल्या शक्यता रुग्णात आहेत की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या (रक्त-लघवी तपासणी, एक्स रे-सीटी-एम आर आय, ई सी जी, डॉप्लर, इ)केल्या जातात. त्या तपासण्यांतल्या काही एखाद्या आजाराची पुष्टी देतात (पॉझिटिव्ह असतात) तर काहींचे निर्णय यादीतल्या इतर एखाद्या शक्यतेला खोडून काढतात (निगेटिव्ह असतात). अश्या तर्‍हेने "डिफरेंशियल डायग्नोसिस" ची यादी लहान होत होत रोगाचे निदान पक्के होते. याचा अर्थ असा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणार्‍या या सर्व निकालांच्या बळावरच मोठ्या आजाराचे पक्के निदान होऊ शकते... याचा अर्थ दोन्ही प्रकारच्या तपासण्यांचे महत्व तोलामोलाचेच असते. त्यामुळे एखाद्या तपासणीत आजार सापडला नाही म्हणजे ती तपासणी फुकट गेली असे नाही. याला डायग्नोसिस बाय एक्स्क्लूजन असे म्हणतात आणि रोगनोदान करण्यात ती एक महत्वाची प्रक्रिया असते. २. बर्‍याचदा फार धोकादायक रोगाचा छोटासा संशय आला तरिसुद्धा एखादी तपासणी करणे जरूरीचे समजले जाते. कारण तो रोग प्रथमावस्थेत असतानाच त्यावर प्रतिबंधक उपाय अथवा उपचार केले तर त्यापासून रुग्णाला होणारा धोका कमी होऊ शकतो. उदा. हृदयविकार, डोक्यातल्या रक्तवाहिन्यांचे विकार, मुत्रपिंडांचे आजार, कर्करोग, इ. अश्या तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) जर पॉझिटिव्ह आला तर त्वरीत उपचार सुरू करणे शक्य होते; आणि जर निगेटिव्ह आला तर मोठ्या आजारासारखी लक्षणे होती पण मोठा आजार नाही हे समजून रुग्णाने खूष व्हायला पाहिजे. वैद्यकीय व्यावसाईकाने जर हा सर्व उलगडा रुग्णाबरोबरच्या चर्चेत करून मग तपासण्या केल्या रुग्णाचा गोंधळ होवून व्यावसाईकांवरचे आरोप कमी होणे शक्य होईल. ३. माझ्या माहितीत असे रुग्ण आहेत की ज्यांना डॉक्टरने, "तुम्हाला जास्त औषधांची गरज नाही" असे सांगून कोणतीही तपासणि न करता केवळ गरज असलेली मोजकी एक ते तीन औषधे लिहून दिली आहेत. आणि त्या रुग्णांची प्रतिक्रिया अशी होती, "५०० रु फी घेतली (जी त्या कन्सल्टंट्सची पूर्वसूचीत तपासणी फी होती), एकपण तपासणी केली नाही आणि पण औषधे पण फक्त (एक-दोन-)तीनच लिहून दिली. फुकटचे ५०० रु खर्च झाले !" यावरून प्रश्न असा आहे की, "डॉक्टरने रोग बरा करण्यासाठी योग्य तेवढीच औषधे लिहून द्यावी की पेशंटच्या मनाचे समाधान होण्याएवढी मोठी यादी द्यावी?" सुज्ञजनांना याचे उत्तर नक्की माहिती असते... पणे तेच सुज्ञ रुग्ण बनले की दर पन्नास रुपयामागे कमीतकमी एका औषधाची भर प्रिस्क्रिप्शनमध्ये पडावी असा विचार करून तसे न झाल्यास डॉक्टरला दुषणे देऊ लागतात. अश्या परिस्थितीत काही डॉ़क्टर जर अनावश्यक (बहुदा व्हिटॅमिन्ससरख्या) औषधांची भर टाकून लांबलचक प्रिस्क्रिप्शन बनवू लागले तर त्यात डॉक्टरांच्या इतकाच रुग्णांचा दोष नाही का? ४. सर्वसाधारणपणे आपण घर बांधताना चांगला आर्किटेक्ट निवडतो, आयकराचे विवरण भरताना सी ए शोधतो, कोर्टात केस करताना योग्य वकील शोधतो... त्यातही साधारण पणे थोडक्यात ज्या विषयाचा सल्ला पाहिजे त्या विषयातील शिक्षण घेतलेला तज्ञ शोधतो. पण अ‍ॅलोपॅथिचे औषध इतर पॅथीची पदवी असलेल्या आणि अ‍ॅलोपॅथिची पदवी नसलेल्या डॉक्टरकडून घेताना बर्‍याच रुग्णाना काही गैर करतो आहे असे वाटत नाही... आणि जनतेला चालते म्हणून सरकारही (हे जनतेनेच निवडलेले प्रतिनिधी असतात) त्यांना न शिकलेल्या विषयांचा व्यवसाय करू देते. याला काय म्हणणार? जे शहाणपण आपण आपल्या घराच्या बांधणीच्या वेळेस, आयकराचे विवरण भरताना किंवा वकिली सल्ला घेताना दाखवतो ते आपल्या स्वास्थ्याचा विचार करताना केव्हा दाखवणार ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपले पहिले २ मुद्दे अगदी योग्य आहेत, पण या बाबतीत डॉक्टर- पेशंट संवाद अपूर्ण अथवा पारदर्शक नसेल तर नंतर गैरसमज वाढत जातात. मी बर्‍याचदा असं ऎकल किंवा पाहीलं आहे की बरेचदा अनेक डॉक्टर, पेशंटशी अतिशय संतापून वागतात किंवा खूपच कमी बोलतात. त्यामुळे पेशंट विनाकारण दुखावला जातो. याऊलट डॉक्टर- पेशंट सुसंवाद असेल तर त्याचे परिणामही(outcome) चांगले होतात. तिसर्‍या मुद्दाबद्दल- भरपूर औषधे घेतली, इंजेक्सन घेतल, सलाईन लावल की आपण लवकर बरे होतो अशी पेशंटची मानसिकता का होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. पेशंट मागतात म्हणून इंजेक्शन मधुन फ़क्त स्टराईल वॉटर देणारे काही डॉक्टर मी ऎकलेले आहेत. काही डॉक्टर तर पेशंटने फार किरकिर केली, तर त्याला विश्वासात न घेता परस्पर झोपेच्या गोळ्या लिहून देतात. त्यामुळे हा दोष दोघांचा आहे आणि असं होऊ नये याची जबाबदारी पण दोघांवरही आहे.(एका हाताने कधीही टाळी वाजत नाही). ४ था मुद्दा- माझेही हेच मत आहे की प्रत्येकाने ज्या शास्त्रात पदवी घेतली आहे, त्याचीच प्रॅक्टीस करावी. तसेच आपल्याकडे स्वास्थ्याच्या बाबत फारच उदासीनता आहे, अगदी डॉक्टरांमधे सुद्धा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अतिशय आवडला प्रतिसाद. माझ्या बघण्यात तर( गेली पंधरा वर्ष )बरेचसे इतर पॅथीचे डॉक्टर्स अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टीस त्यांच्याकडे येणार्‍या एम.आर.च्या ऑफर्स आणि त्यांनी सांगितलेल्या त्या त्या आजाराची औषधं वापरुन करतात ;) ( याच्च क्रमाने वाचावे).

पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी मजल मारली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पदार्पणातच द्विशतकासाठीही शुभेच्छा!

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी?
यावर तुम्ही म्हटलंय
निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले.
या फुलटॉसवर अजून बॅटींग झालेली नाही. आणि
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
माझ्या अल्पमतीप्रमाणे अ‍ॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. असो, माझी अल्पमती पुरे, आपण सूज्ञ आहातच.

In reply to by आनन्दा

आणि अजून एक, कालेजात शिकवले नाही म्हणजे इतरांना एम आर आय वाचताच येत नसेल का हो? तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.

In reply to by साती

धन्यवाद (तो प्रतिसाद तुम्हाला नव्हताच.), तसेही माझा वाद होमिओपॅथिक डॉ. ना अ‍ॅलोपॅथिक औषधे देण्याचा अधिकारच नाही असे म्हणणार्‍यांबरोबर आहे. व्यक्तिशः मी देखील होमिओपॅथिक डॉ.नी अ‍ॅलोपॅथिक प्रॅच्तिस करू नये याह मताचा आहे, कारण त्यांना त्यातले सखोल ज्ञान नाही. पण बेसिक मेडिसिन/ मोडेर्न मेडिकल सायन्स त्यांना शिकवलेच जात नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आणि कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे. तेव्हा इत्यलम|

In reply to by आनन्दा

दादा, प्रश्न काळुसकरांनी MIR का करायला सांगितला आणि त्यांना (रिपोर्ट न पाहाता) तो वाचता येतो का (अभ्यासक्रमात नसल्यानं) असा आहे. उत्तर त्यांनी द्यावं अशी अपेक्षा आहे. मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल.

In reply to by संजय क्षीरसागर

असो. माननीय सखाराम गटणे आठवले होते. ;) अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?