Skip to main content

पाणी

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 04/05/2014 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
जलरुपी आसु गालावर ओघळले नवजन्माचे सोहळे साजरे जाहले कधी त्रुप्तीचे माध्यम बनले अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले ----------------------------------------------------------------------------------- टिप== प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे
लेखनविषय:

वाचने 2773
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by शब्दानुज

>>> पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या आत्ता ही सुरवात आहे... इथेच शेवट करू नका आपले 'लहान वय' नेमके किती आहे?????????????

जराशी चेष्टा झाली तर जास्त मनाला लावून घेऊ नका! वय काय म्हणालात तुमचं? प्रतिभा ही वयावर अवलंबून नसते. मिपावर स्वागत. भरपूर वाचा आणि लिहीत रहा.

In reply to by पैसा

वयाचे गुपित गुपितच राहू द्या कवितेचा खरा आनंद आला का सांगा????

In reply to by शब्दानुज

प्रामाणिकपणे सांगू? कविता ठीकठाक वाटली. कल्पना चांगली आहे, पण विस्तार जरा नीटनेटका हवा होता. मला छंद/वृत्तात एकतर नीट बांधलेल्या किंवा मग संपूर्ण मुक्तछंदात्मक कविता आवडतात. तुम्हाला छंदोबद्ध लिहायचं आहे का याबद्दल जरा गोंधळ वाटला. अजून भरपूर वाचा. हळूहळू नक्की सफाई येईल.

शब्दानुज. पाणी मग ते आसवांच्या रुपातल असो वा तिर्थ किंवा चार आश्रमांच् निदर्शक, छान मांडायचा प्रय्त्न केलाय तुम्ही. लिहीत रहा.

वयाचा मेळ बसत नाही. तश्यात २ दा दम दिल्यामुळे (उदंड अनुभव असावा असे वाटून) बालविवाहाचा संशय बळावतो.

पहिल्याच लेखात दम कसा देणार??? ती विनंती होती !!उगाच वाद का??? शेवट वाचा पाणी बाहेर पड्ले तर पाणीपट्टी कसली??

In reply to by शब्दानुज

आणि आधी पाणी मडक्यात भरलं होतं ना? त्याची पाणीपट्टी पडणारच. तुम्ही मडकं फोडून वर पाणीपट्टीत सूट मागतायं.

शेवटच्या ओळी आवडल्या.