पाणी
लेखनविषय:
जलरुपी आसु गालावर ओघळले
नवजन्माचे सोहळे साजरे जाहले
कधी त्रुप्तीचे माध्यम बनले
अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले
कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले
नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले
अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले
माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले
-----------------------------------------------------------------------------------
टिप==
प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे
वाचने
2767
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या आत्ता ही सुरवात आहे... इथेच शेवट करू नका
In reply to पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या by शब्दानुज
>>> पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या आत्ता ही सुरवात आहे... इथेच शेवट करू नका
आपले 'लहान वय' नेमके किती आहे?????????????
In reply to >>> पुन्हा सांगतो सांभाळुन by प्यारे१
लोकांना कवितेपेक्षा वयात रस का???
In reply to वय??? by शब्दानुज
आमची म्हैस लग्नाची आहे.
In reply to आमची म्हैस लग्नाची आहे. by प्यारे१
म्हैस दुध देणारी आहे का? की 'पाणी' टाकुन दुध विकावे लागते??
In reply to म्हैस आणि पाणि आणि दुध by शब्दानुज
दुध? अजुन लगीन व्हायचं आहे म्हशीचं. :))
यावरुन १ ज्योक आठवला.
मुलगा: चहा येतो का? मुलगी: :))
जराशी चेष्टा झाली तर जास्त मनाला लावून घेऊ नका! वय काय म्हणालात तुमचं? प्रतिभा ही वयावर अवलंबून नसते. मिपावर स्वागत. भरपूर वाचा आणि लिहीत रहा.
In reply to अहो दादा by पैसा
वयाचे गुपित गुपितच राहू द्या कवितेचा खरा आनंद आला का सांगा????
In reply to वय??????? by शब्दानुज
प्रामाणिकपणे सांगू? कविता ठीकठाक वाटली. कल्पना चांगली आहे, पण विस्तार जरा नीटनेटका हवा होता. मला छंद/वृत्तात एकतर नीट बांधलेल्या किंवा मग संपूर्ण मुक्तछंदात्मक कविता आवडतात. तुम्हाला छंदोबद्ध लिहायचं आहे का याबद्दल जरा गोंधळ वाटला. अजून भरपूर वाचा. हळूहळू नक्की सफाई येईल.
शब्दानुज.
पाणी मग ते आसवांच्या रुपातल असो वा तिर्थ किंवा चार आश्रमांच् निदर्शक, छान मांडायचा प्रय्त्न केलाय तुम्ही. लिहीत रहा.
वयाचा मेळ बसत नाही. तश्यात २ दा दम दिल्यामुळे (उदंड अनुभव असावा असे वाटून) बालविवाहाचा संशय बळावतो.
पाण्याबद्दल बोलायच आणि मग दम द्यायचा ही नवी स्टाईल महाराष्ट्रात रुजू पहाते आहे.
In reply to पाण्याबद्दल बोलायच आणि मग दम by ज्ञानोबाचे पैजार
पण कवीनं पाणीपट्टी वसूली करणं म्हणजे फार झालं!
पहिल्याच लेखात दम कसा देणार??? ती विनंती होती !!उगाच वाद का??? शेवट वाचा पाणी बाहेर पड्ले तर पाणीपट्टी कसली??
In reply to दम की विनंती????????? by शब्दानुज
आणि आधी पाणी मडक्यात भरलं होतं ना? त्याची पाणीपट्टी पडणारच. तुम्ही मडकं फोडून वर पाणीपट्टीत सूट मागतायं.
शेवटच्या ओळी आवडल्या.
पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या