प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.
| एक इमारत है संग-ए-मर्मर मे तराशी हुई चौधवी चांद जब महीन कोहरा लिपटकर आता है तब मानो जन्नत की हूर लगती है वो इमारत ----- सुना है के ये इमारत किसी शाह ने अपने बेगम कि याद मे बनवायी है हां... होगा कोई इश्क का मारा ----- जब उसकी यांदे किसी आभिसारों की तरह बरसती होंगी तो वो शाह उस इमारत को देख के क्या सोचता होगा? हां... इश्क का मारा जो ठहराँ ----- फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे और फिर रातभर वो परछाईओंका खेल चलता रहा ------ आखिर चांद थक के बुझ गया.. जब सुबह से कुछ पहले उन हाथोंको अपने हाथ जोडकर बक्षनेकी दुवा करता वो शाह भी थक कर जाने लगा तो उसकी आखोंमे कुछ जलते कतरे थे उसके 'ताज' का एक मोती गिर गया था... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/०४/२०१४) महीन= पातळ आभिसार = धबधबा फुतुर = वेडेपणा तआकुब = अविरत पाठलाग आदम = व्यक्ति | कोण्या काळची गोष्ट आहे, एक राजा अन् एक राणी राणीच्या विरहात परंतू, राजाची स्वप्ने विराणी एकाकी झुरतसे राजा, रात्र रात्र राणीला स्मरत फर्मान सोडूनी घडविले त्याने, संगमरवरातले स्मारक दिमाखात मग उभा राहिला, ताज नावाचा एक महाल शुभ्र संगमरवरी ईमारत, चांदराती दिसे कमाल काय तिचे सॊंदर्य वर्णू, अप्सरा न्हाहून यावी सचैल चांदण्याने मग अंग टिपावे, रातीचे उरले प्रहर काल रात्री परी महाली , काय आक्रीत पाहीले छिन्नी हातोडा घेतलेले हात नुसते पाहिले भास मनाचा होता का जे दृष्य खरे जे देखले राजाचेही हात होते मागत काही मागणे मावळतीला चंद्र जाता, राजा हताश चालला चंद्र बांधता बांधता त्याने,डागही होता बांधला |- चाण्यक -| (०५/०५/२०१४) |
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3400
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मस्त मस्त
मूळ मिकाची हिंदी कविता आणि
मस्तं. दोन्ही कविता आवडल्या.
मिकाची कविता 'पुन्हा' वाचली,
सुरेख!
साहिर...
In reply to सुरेख! by पैसा
उर्दुवर इतकी जबरदस्त पकड मिका
मस्तच...
मुळ हिंदी-उर्दू कविता चेपूवर
दोन्ही रचना उत्तम झाल्या आहेत
सुरेख!
उर्दू कविता समजली नाही पण
अनुवादही छान !
मिका तुमच्या सुंदर कवितेत एक अवांतर कविता घुसडतोय, क्षमस्व
In reply to अनुवादही छान ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वाह
In reply to मिका तुमच्या सुंदर कवितेत एक अवांतर कविता घुसडतोय, क्षमस्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा वा बिरूटे सर, एकदम मस्त!
In reply to व्वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
In reply to वा वा बिरूटे सर, एकदम मस्त! by पाषाणभेद
या इमारतीवर इतक्या कविता