Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user उडन खटोला
Submitted by उडन खटोला on Sun, 04/27/2014 - 11:33
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र
  • Log in or register to post comments
  • 61892 views

प्रतिक्रिया

Submitted by आनंदी गोपाळ on Fri, 05/02/2014 - 21:32

In reply to सामुदायिक नर्तन by राही

Permalink

आपण मात्र नृत्याचा आनंद

आपण मात्र नृत्याचा आनंद निर्भेळपणे घेऊ शकत नाही. असे का असावे?
घोटूल मधे ढोलियाच्या तालावर हलकेच थिरकणारी पावलं आपल्याकडलीच असलीत, तरी, मध्यंतरीच्या काळात 'मराठे' म्हणजे 'जेत्यांची संस्कृती' होती. मराठीमधे मार्दव नाही. हार्श शब्दप्रयोग आहेत. बसा! अन तश्रीफ रखिये, (इथे कोणत्याही इतर भाषेतील शब्द वापरा : उदा. प्लीज हॅव अ सीट, अगदी प्लीज वगळूनही.) यातला फरक पहा. या मराठी भाषेत अनेकदा मार्दव अन अजीजी यांत फरक रहात नाही. एकतर अजीजी नायतर 'बसून घ्याला सांगून र्‍हाय्लोय ना!' स्टाईल शब्द. यातच मधे कुठेतरी मराठे 'बायकांसोबत नाचत' नाहीत, ते 'बायका नाचवतात', असला एक समज प्रचलित झाला असावा. तमाशा त्याचे एक उदाहरण. बाईसोबत नाचणारा पुरुष फक्त नाच्याच. दरम्यानच्या काळात कुठेतरी आपण जगज्जेते सुसंस्कृत लोक, थिरकणे विसरलो. तुम्ही नृत्याचे म्हणताहात, समूहगान असाही एक प्रकार असतो. तोदेखिल विरळा होत गेला आहे आपल्याकडे. पण माणसाची मूळ प्रवृत्ती जात नाही. जाणार नाही. खेडोपाडी गरबा खेळला जातो आजकाल. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत लोक गरबा खेळल्यासारखे नाचतात. तीच गाणी डीजेवर लावून. इ. असो. असे का असावे या प्रश्नाचे हे माझ्या मतीनुसारचे उत्तर आहे. 'मराठे' हा शब्द मरहट्टे, महाराष्ट्र देशीचे अटकेपार झेंडे फडकवणारे वीर, या हिशोबाने वाचावा. जात/धर्म इ.वादी शब्दप्रयोग तो नाही, हे नोंदवितो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 04/27/2014 - 16:26

Permalink

समाजातला दांभिकपणा उघडा

समाजातला दांभिकपणा उघडा पडण्याचा आणि एक सुमुहूर्त ?मुंजीची पार्टी ऐवजी पार्टीनंतर मुंज उरकली असेल .निमंत्रितांनी तोंडभरून बटु आणि आईवडीलांना आशिर्वाद दिले असतील .आणखी काय पाहिजे ? ज्यांना या संस्काराबद्दल काही कळते ते श्रृंगेरी ,श्रीशैलम ,माटुंग्याचा शंकरमठ ,कुर्ला (प)कृष्णमंदिर ,सायन पूर्व कृष्ण मंदिर ,जिएसबी संघ ,चेंबूरचा मठ ,डोंबिवलीचे ज्ञानेश्वर कार्यालय इत्यादी गाठतात आणि गाजावाजा करत नाहीत .
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 04/27/2014 - 17:08

Permalink

मुंज-संस्कार

दारू सर्वजातिय/ धर्मिय पितात. तेच मांसाहारा बाबत. अगदी वर्षभर. मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? आपल्या पैकी किती जण रोज सकाळी देवपूजेनंतर संध्या करतात? लहानपणी मुंज झाल्यावर नवलाईचे नऊ दिवस असल्याप्रमाणे सुट्टीत रोज संध्या केली जाते. पण पुढे शाळा सुरु झाल्यावर ते जमतेच असे नाही. रोजच्या ऑफिसच्या गडबडीत देवपूजा आटोपल्यावर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणताना नजर घडयाळाच्या काटयावर असते. मग कशाला तो मुंजीचा अट्टाहास! दारू पिणारे अनेक ब्राम्हण मी बघितले आहेत जे आधी गळ्यातले जानवे काढुन खिशात ठेवतात आणि मग दारू ढोसतात. कशाला का दिखाऊपणा? ३१ डिसेंबरचा ऊल्लेख आला आहे म्हणुन सांगतो. १ जानेवारी २०१३ ला अंगारकी चतुर्थी होती. ३१ डिसेंबर २०१२ ला रात्री पावणे बारा पर्यंत लॉलीपॉप खात दारू धोसणारे (सर्वजातिय) दुसऱ्या दिवशी माझा ऊपास आहे असे सांगत होते. काय उपयोग आहे त्याचा? कशाला ते ऊपासतापास!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 04/27/2014 - 18:50

In reply to मुंज-संस्कार by भाते

Permalink

एक सुधारणा. संध्या पूजा

एक सुधारणा. संध्या पूजा करायच्या आधी करायची असते.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 04/27/2014 - 20:07

In reply to एक सुधारणा. संध्या पूजा by llपुण्याचे पेशवेll

Permalink

माफ करा.

पण, मला खरंच याची कल्पना नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 04/28/2014 - 14:29

In reply to मुंज-संस्कार by भाते

Permalink

>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच

>>मग इथे केवळ ब्राम्हणांचाच ऊल्लेख का? बाकीचे काय फुकटच गेलेले असतात (ब्राह्मण तस्सं मुळ्ळीच करत नैत) अशी ज्यांची समजूत असते त्यांना "बॉ बॉ बॉ; ब्राह्मण दारू पितात !!!" असं वाटणारच. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/27/2014 - 17:52

Permalink

बाकी काहीही असो, मशारनिल्हे

बाकी काहीही असो, मशारनिल्हे ब्राह्मण कुटुंबाने मांसाहार आणि सोमरसपान करून प्राचीन आर्य संस्कृती टिकवली असेच म्हणणे आहे. पोषाख म्लेंच्छ असला म्हणून काय झाले? उलट आजकाल मांस आणि सोमरस ही आपल्या संस्कृतीची प्राचीन प्रतीके अहद दिल्ली (लाहोर म्हण्णार होतो पण साला १९४७ चा घोळ झाला.) तहद चंदावर नव्या जोमाने दिसू लागली आहेत. म्हणा, गर्व से कहो...
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sun, 04/27/2014 - 19:28

In reply to बाकी काहीही असो, मशारनिल्हे by बॅटमॅन

Permalink

भिड तेज्यायला!!!

आयला! बॅट्याची बॅट सचिनच्या वरताण तळपली की. :) जाता जाता: 'गर्व से कहो...' ला उत्तर देण्याआधी आपल्याला क्युबन सिगार्स, पाईप्स वगैरे अस्सल जिंदादिल खानदानी माणसाला शोभणार शौक हाळी देणार्‍याने केलेले चालतात की झोंबतात हे मात्र पडताळून पहायला हवं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/27/2014 - 23:18

In reply to भिड तेज्यायला!!! by धमाल मुलगा

Permalink

बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित

:) बाकी हाळी देणारे कोण? तथाकथित संस्कृतिरक्षक तर नव्हे? तसे तर शौक ज्यांना पर्वडतात अन झेपतात त्या सर्वांनीच करावे, हाकानाका.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Sun, 04/27/2014 - 18:03

Permalink

.

हा पहा फरक ...एक आहे नौ वार साडी आणि दुसरी आहे काष्टा . https://lh3.googleusercontent.com/-1bVYfzv-i88/U1z4XiX8JwI/AAAAAAAAAVs/uAc_A15BEQw/s188/9vaar_Br.jpg.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg https://lh3.googleusercontent.com/-la3OPsgmErc/U1z4LKwWruI/AAAAAAAAAVg/0mcToEqgCRQ/s194/1_kashta.jpg
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Sun, 04/27/2014 - 18:16

In reply to . by दिव्यश्री

Permalink

फोटो गुगल / आंतरजाल साभार .

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 04/27/2014 - 20:11

In reply to फोटो गुगल / आंतरजाल साभार . by दिव्यश्री

Permalink

मला फोटु दिसत नाहीत.

मला करडया रंगाच्या गोलामध्ये पांढऱ्या रंगात वजाचे चिन्ह दिसते आहे. काय गडबड आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Sun, 04/27/2014 - 20:26

In reply to मला फोटु दिसत नाहीत. by भाते

Permalink

मलापण

मलापण, दिवश्री फक्त पुण्यवान माणसांनाच दिसतात का गं ह्या नऊवारी? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 04/27/2014 - 20:37

In reply to मलापण by सखी

Permalink

सगळी 'वजावट'च आहे राव आमच्या

सगळी 'वजावट'च आहे राव आमच्या इथेही!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 04/27/2014 - 18:19

Permalink

========================

Image removed. ======================== बाकि .. चालू द्या!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/28/2014 - 01:42

In reply to ======================== by अत्रुप्त आत्मा

Permalink

गुरुजी

एव्हढाव्ह प्रतीसाद तुमच्याकडुन अपेक्षीत नाही. करा थोडी बॅटींग.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/28/2014 - 08:00

In reply to गुरुजी by चिंतामणी

Permalink

+१

करा थोडी बॅटींग.
>>> हेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Fri, 05/02/2014 - 21:36

In reply to +१ by प्रसाद गोडबोले

Permalink

बॅटिंग म्हणजे ब्याटम्यानने

बॅटिंग म्हणजे ब्याटम्यानने लिवलेले पर्तिसाद का?
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Sun, 04/27/2014 - 18:38

Permalink

अच्छा असं झालं तर...

अच्छा असं झालं तर... :-D
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sun, 04/27/2014 - 18:51

Permalink

शांति: शांति: शांति:

उडन खटोला, स्वस्थ राहून गंमत बघत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 04/27/2014 - 19:05

Permalink

संस्कार आणि समांतर उदाहरण

मुंज हा कधीकाळी तयार झालेल्या १६ संस्कारांमधील एक संस्कार आहे. तो करावा का नाही हा अगदी गौण मुद्दा आहे. ज्यांना करायची असेल ते करतील आणि ज्यांना करायची नसेल त्यांनी करू नये. माझ्या बाबतीत लहानपणीच मुंज आणि सोडमुंज हे ३ दिवसांच्या अंतराने झाले, मी कधी संध्या केलेली नाही. जानवे नंतर स्विमिंगला गेलो तेंव्हा स्विमिंग पूल मधेच हात मारताना पडले.... त्यामुळे मी काही धार्मिक पध्दतीने याचा विचार करत नाही. पण तरी देखील त्या वयातला एक संस्कार - केवळ त्या दिवशीचे होम-हवन, मंत्र वगैरेच नाही, तर तो सोहळा करायच्या आधीचे प्लॅनिंग, त्यातील नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची involvement, प्रेम या सगळ्याचा एक मनावर एक सुखद परीणाम झाला जो कायमचा लक्षात राहीला. माझ्या दृष्टीने हा सगळा एक संस्कार असतो. कारण किंचित समजायला लागणार्‍या वयात पण तरी देखील आपल्याला कळत-नकळ आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुंजच नाही पण कुठलिही गोष्ट जेंव्हा केवळ शो ऑफ म्हणून होते तेंव्हा त्यातून दूरगामी ना धड संस्कार होतात ना इतर काही सकारात्मक फायदा... अशाच प्रकारचा (किंचीत मोठ्या) मुला-मुलीवरील ज्यूइश संस्कार बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा पाहीले आहेत. त्यातील मुद्दा हा मुल हे वयात येत असतानाचा एक संस्कार आणि सोहळा आहे. तोच प्रकार मुंजीच्या बाबतीत समजून घेतला आणि मग संस्कार म्हणून केले तर अधुनिक काळाला अनुसरून एक चांगला संस्कार तयार करता येईल. त्यात जात आणायची काही गरज देखील नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो: बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा हे ज्या दिवशी होतात त्या दिवशी मुळ सोहळा हा पारंपारीक असतो. त्यात राबाय (ज्यू प्रिस्ट) कडून त्यांच्या पध्दतीने धार्मिक संस्कार केले जातात वगैरे. त्यांच्या पध्दतीत पार्टी असल्याने त्याअनुषंगाने खाणे-पिणे आणि डान्सिंग केले जाते.... पण महत्वाचा मुद्दा त्या आधीचा असतो. आधी एक वर्षभर त्या मुलाला-मुलीला थोडेफार संस्कार (बेसिक हिब्रू भाषा येणे, इतिहास वगैरे) शिकवले जातात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे छोटासा का होईना एक समाजसेवेचा प्रकल्प हा (मदत घेऊन) प्लॅन करणे आणि पुर्ण करणे गरजेचे असते. त्या सगळ्याचा मुलांवर नक्कीच चांगला परीणाम होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 06/03/2014 - 01:03

In reply to संस्कार आणि समांतर उदाहरण by विकास

Permalink

टोटल सहमती

"मुंज हा कालबाह्य संस्कार आहे/या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही/निर्बुद्ध बाष्कळपणा" - हे सगळं तुम्ही 'विधीं'ना अनुसरून म्हणत असाल तर ठीक परंतु संस्कार आणि त्यामागचं तत्त्व, विचार वगैरे काहीच कालबाह्य, अकारण वा निर्बुद्ध बाष्कळ वाटत नाही. मुलानं गुरूगृही वेदाध्ययन करायला जाण्याऐवजी तोच मुलगा (फॉर दॅट मॅटर मुलगी - म्हणजे कुणी मला विचारलं मुलींची मुंज करावी का तर त्याला माझं उत्तर 'हो' आहे) हल्ली शाळा झाल्यावर युनिव्हर्सिटीला जायला घराबाहेर पडू लागला आहे. तेथे त्याला स्वतः पडेल ते काम करून पैसे कमवण्याची अक्कल पक्षी व्यवहारज्ञानाचे अध्ययन करायचे आहे. गुरू कोण - हे जग. मग मातृभोजनाचा काय अर्थ - झालं आता, आईकडून लाड करून घेतले ते पुरे आता यापुढे आपले आपण काय ते बघा. भिक्षावळ? मुला घराबाहेर पडतो आहेस तेव्हा ही घे आपली भिक्षा/शिदोरी. पुढे मात्र पोटापाण्याला काहीतरी कर. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलगा आता शिशुवयातून कुमारवयात चालला. स्वावलंबी होण्याकडे त्याने एक पाऊल टाकलं - असा उदात्त विचार अशी व्यापक धारणा या उपनयन संस्कारामागे आहे. या धारणेचे आपण अनुयायी बनले पाहिजे. या संस्कारांमागची तत्त्वं आपण बघावी. नुसतंच जर आपण विधींमध्ये अडकून बसलो तर खरंच आपलं देव भलं करो. विधी = फंक्शन (काळ). काळ बदलला तसे विधी बदलायला हवेत. अजिनधारणाला आजच्या युगात काही अर्थ नाही. हरणं मारणं कायद्यानं गुन्हा आहे तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. कन्यादानाला काही अर्थ नाही. कन्या कमॉडिटी नाहीत तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. पण म्हणून काही समग्र उपनयन अथवा विवाह 'संस्कार' कालबाह्य नि बाष्कळ ठरत नाहीत. कालबाह्य ठरतात ते केवळ विधी. पण कोणते विधी करावेत नि कोणते करू नयेत हे आपण ठरवूच शकतोच की. तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं. उरला प्रश्न कार्याचा तर वर विकास यांनी म्हणल्याप्रमाणे किंचित समजायला लागणार्‍या वयात असलं तरी देखील मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म. धर्म म्हणजे शिखा धारण केलेला बटू नाही. धर्म म्हणजे जानव्याची ब्रह्मगाठ नाही. धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/03/2014 - 09:28

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं.>>> +++++१११११ @धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.>>>>> यासाठी एक कडक सॅल्युट.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/03/2014 - 12:46

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे.

>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे. वा! आक्खा प्रतिसाद सुंदर. ह्यासाठी एक 'प्यार्टी' लागू. हवंतर जानवं काढून ठेवा तीर्थप्राशन होईस्तोवर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 06/04/2014 - 21:42

In reply to >>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. by प्यारे१

Permalink

जानव्यासहित तीर्थप्राशन केले

जानव्यासहित तीर्थप्राशन केले तर काय होईल हो ? ... तो पण एक विधीच की.. *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/04/2014 - 22:42

In reply to जानव्यासहित तीर्थप्राशन केले by हाडक्या

Permalink

@ तो पण एक विधीच की.. Biggrin

@ तो पण एक विधीच की.. Biggrin>>> =)) विधी नव्हे!!! निषेध!!!!!!!!! :p =))
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 06/03/2014 - 15:12

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

विधी = फंक्शन (काळ).

विधी = फंक्शन (काळ).
वा वा!! पण प्रत्यक्षात काय होत.. विधी हे अशा पोथीपुस्तकातून वाचून केले जातात ज्यांना काळाप्रमाणे बदलण्याचे वावडे असते!! मुंज हा विधी केला जातो.. त्यामागचे तत्व, विचार (जे कालबाह्य नाही) ते सगळं गुंडाळून ठेवले जातं .. त्या तत्व/ विचारांनुसार आजच्या काळाला अनुरुप विधी कुठेही होत नाहित!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/03/2014 - 18:23

In reply to विधी = फंक्शन (काळ). by बाळ सप्रे

Permalink

सप्रेसाहेब, लग्नातल्या

सप्रेसाहेब, लग्नातल्या विधींचे अर्थही असेच आपापल्या सोयीने गुंडाळून ठेवले आहेत, म्हणून कोणी लग्न करायचे थांबते काय? पण त्याविषयीचे लेख पाडले जात नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 06/04/2014 - 10:32

In reply to सप्रेसाहेब, लग्नातल्या by रेवती

Permalink

लग्न करायचे कुणी थांबत नाही,

लग्न करायचे कुणी थांबत नाही, थांबूही नये पण कालबाह्य विधी थांबवता येतील.. लग्न म्हणजे विधी नव्हेत. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात. जे आवश्यक आहे. गतानुगतिक विधी टाळून लग्न म्हणजे आजच्या काळात लग्नाचे रजिस्ट्रेशन, मित्र/ नातेवाईकांना बोलावून सहभोजन ई. तसेच मुंज म्हणजे विधी नव्हेत.. तर शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवणे (मेघवेडा यांच्या प्रतिसादानुसार).. मग ते गतानुगतिक पद्धतिने ८ व्या वर्षी मुहूर्त बघून न करता जेव्हा मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी दूर जाण्याची वेळ येइल (if applicable) तेव्हा म्हणजे साधारण १०वी १२वी नंतर मुलं गावात सुविधा नसल्याने शहरात जातात तेव्हा किंवा परदेशी शिक्षणासाठी जाण्यावेळी करणे..
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/03/2014 - 15:32

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

खास मेवे स्टाईल. बर्‍याच

खास मेवे स्टाईल. बर्‍याच दिवसांनी प्रतिसाद का होईना वाचून बरं वाटलं. *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 06/03/2014 - 15:37

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

अतिशय उत्तम प्रतिसाद.

अतिशय उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 06/03/2014 - 16:37

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

मेवे रॉक्स.

मेवे रॉक्स. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Tue, 06/03/2014 - 17:22

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

सुरेख

सुरेख प्रतिसाद, खरं तर सगळाच संग्रही ठेवावा असा, खालचे विशेष आवडले. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/04/2014 - 21:57

In reply to टोटल सहमती by मेघवेडा

Permalink

अरे वा वा!

बरं वाटलं प्रतिसाद वाचून. बरंचंसं पटलं. विधींना पकडून राहण्यात काहीच अर्थ नाही. लेखातील उदाहरणांमधे मुंजीचे विधी हे त्याचा अर्थ किंवा कारण समजून न घेता केवळ एकत्र जमायचे निमित्त म्हणून केलेले दिसत आहेत. तसे असेल तर अजिबात करू नये असंच मी म्हणेन. आपल्या मनाला पटेल ते करावं. त्याची पूर्वापार करायला सांगितलं आहे म्हणून कोणत्यातरी संस्काराशी नावापुरती सांगड घालू नये. माझ्या मुलाची मुंज अगदी थोडक्यात आणि गंभीरपणे केली होती. आहेर-देणेघेणे इ. ला पूर्ण फाटा दिला. फक्त जवळचे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमले. गप्पा झाल्या. मजा आली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीतच सोडमुंज केली. तेव्हा भाचा काशीला जायला निघतो, त्याला परत आणण्यासाठी मामा "तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! सगळेच खूश!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 06/05/2014 - 05:31

In reply to अरे वा वा! by पैसा

Permalink

डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद.

>>>>"तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! बायकोची स्मरणशक्ती, म्हणजे डाटा साठविण्याची आणि रिट्रिव्ह करण्याचा वेग दोन्ही अफाट असते. 'सहा महिन्यांपूर्वी हिच भाजी शेजारच्या अमुकतमुक बाईंनी पाठविली होती तेंव्हा बोटं चाटत (स्वतःचीच) खाल्ली होती.' किंवा, 'आज वन्संचं कौतुक करताय, करा, पण हेच मी ३ वर्षांपूर्वी शार्दूलच्या मुंजीत सांगितलं होतं तर 'तुला काही कळत नाही म्हणाला होतात'' किंवा, 'वन्संच्या दिराला, वशिला लावून बँकेत चिकटवून घेताय पण ५ वर्षांपूर्वी, माझ्या भावाला बँकेत चिकटवून घ्या म्हंटलं तर तेंव्हा व्हेकन्सी नव्हती, म्हणे.' वगैरे वगैर डाटा साठवणं आणि नेमक्यावेळी रिट्रिव्ह करणं ३२ जीबी पेनड्राईव्हला, बिचार्‍याला, काय जमणार?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 06/05/2014 - 11:54

In reply to डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद. by प्रभाकर पेठकर

Permalink

हाहाहा!

आणि या आठवणींना कसलंच लिमिट नाही! कधीही कुठेही बरोबर हजर करता येतात!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 06/05/2014 - 12:28

In reply to डाटा स्टोरिंगची प्रचंड ताकद. by प्रभाकर पेठकर

Permalink

खी...खी..खी...

आणि या साठवणीतल्या आठवणी काहीही प्रयास न करता (म्हणजे कॉप्युटर सुरू करा, पेनड्राईव्ह लावा, फाईल सर्च करा, इ, इ) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने येऊन तुमच्यावर आदळतात. छॅ, छॅ, पेनड्रईव्हला तिच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाशीही स्पर्धा करता येणे शक्य नाही ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 04/27/2014 - 19:12

Permalink

मुलाचा बाप ३/४ विजार - टी

मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर अहो मग त्याला काय झालं? उन्हाळा सुरु आहे ना? घालू द्या की त्यांना हवे तसे कपडे? त्या बाई आणि बुवांनी अगदी पारंपारिक वेषात जरी आमंत्रण दिले असते ना तरी "आले मोठे परंपरा जपणारे, माहितीये, यांच्या घरी मांसाहार चालतो" असं म्हणायलाही कमी करत नाहीत लोक! म्हणजे कसंही वागलं तरी लोक्स हे नावे ठेवण्यासाठीच अपॉईंट केलेले असतात. मी मात्र पंजाबी कपडे घालून आमंत्रण दिले असते (साडीबीडी आवडते पण झेपत नै हो) कारण मला ते आवडतात. मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार छे हो, माझ्या मुलांनी अज्याबात नकार दिला होता. पहिली संध्या त्याने मुंजीच्या दुसर्‍या दिवशी केली होती. आमचे पुण्यातले घर लहान असल्याने ज्या गेस्ट हाउसावर नातेवाईक राहिले होते तिकडे हा संध्याकाळी खेळायला पळाला. रात्री हा पेंगत असताना आजीनं दृष्ट काढली तेवढच! ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता घालू द्याकी! त्यांना निदान भिक्षावळीच्यावेळी असं काही करता आलं, आम्हाला तर मनपाने परवानगी दिली नव्हती. दिली असती तरी कोणीही नाचले नसते याची ग्यारेंटी, सगळे वयस्क नातेवाईक गुढगे दुखी, पाठदुखी ने त्रस्त आहेत. आजकाल कोणत्याही जातीधर्मात भयंकर जुन्या पद्धतीने काहीही समारंभ होत नाहीत. अमूक हॉल, तमूक गार्डन नावे असलेल्या ठिकाणी हिरवळीवर जेवणाचे स्टॉल लावून उभा उभ्या जेवणे होणारे समारंभ, लग्नाअधी होणार्‍या ब्याचलरांच्या पार्ट्या आजकाल महाराष्ट्रातही चालतात ते सगळे काय ब्राह्मण असतात का? त्यांनी परंपरा न पाळल्याचे लेख मात्र छापून येत नाहीत. तुम्ही वरील लेख लिहून एका जातीवर उगीच अन्याय करताय. ;) ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात ३१ डिसेंबरच कश्याला रेव्हपार्टीमध्ये पकडलेली मुले, मुली हा सगळा ब्रह्मवर्गच असतो काय? डिसेंबरात पार्टी करणे का अधिकार फक्त ब्राह्मणांनाच दिलाय का? तसे असल्यास कागदोपत्री दाखवा. पाहयला गेलं तर महाराष्ट्रीय लोकच नव्हे तर इतर राज्यीय लोकही खाद्यपेयांचा आस्वाद जास्तच प्रेमाने घेत असलेले दिसतील. तुमच्याकडून विदा गोळा करण्यात चूक झालीये का जरा बघा. लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून त्यांना हवे ते करू शकतात, तेही त्यांचे पैसे खर्च करून! तुम्हाला रुचत नसेल तर आमंत्रण देणार्‍यांना सरळ तोंडावर सांगा. गायत्री मंत्र फक्त माझ्या मुलालाच नाही तर त्याच्या सगळ्या जातींच्या, विविध भाषा बोलणार्‍या (भारतीय) मित्रांना अगदी खणखणीत आवाजात (कधीकधी जास्तच जोरात) म्हणता येतो आणि तो म्हणणे हा त्यांचा हक्क आहे. हामेरिकन सरकारही त्याला आक्षेप घेत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 04/27/2014 - 19:35

In reply to मुलाचा बाप ३/४ विजार - टी by रेवती

Permalink

एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते

एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते म्हणजे ज्यांना गायत्री मंत्र म्हणता येत नाही त्यांचेही काही वाईट होणार नसते. दुसरं असं की तुमच्या लेखातून काय म्हणायचय हे समजलं. हा बदललेला प्रकार, फक्त मुंजीतीलच नव्हे, लग्नातीलही पाहिल्यावर मलाही विचित्र वाटले होते हे कबूल करते पण बदल हा असणारच! तुम्ही, मी किंवा कोणीही हा बदल थांबवू शकत नाही मग आहे त्यातच आनंद मानायला शिकले. दोन वर्षांपूर्वी माझ्या भाचीचा साखरपूडा हा लग्नासारखा मोठा केला होता आणि साडी वगैरे जाऊ दे, घागरा पद्धत आली असल्याचे जाणवले. असो, त्यांचे लग्न होऊन ते सुखात आहेत हे महत्वाचे! माझा मुलगा नक्की काय करणार आहे हे मलाही माहित नाही. त्याने समारंभातच नव्हे पण इतरवेळीही मद्यपान करू नये यासाठी मी आग्रही राहीन पण बाकी विविध प्राणी खाण्यात सध्या तरबेज झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Sun, 04/27/2014 - 19:42

In reply to एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते by रेवती

Permalink

जौ द्या मला तरी हे किस्से जरा

जौ द्या मला तरी हे किस्से जरा अतिच 'वेचक' वाटताय..निदान माझ्या तरि पहाण्यात असले काहि आले नाहि..
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/28/2014 - 03:01

In reply to जौ द्या मला तरी हे किस्से जरा by जोशी 'ले'

Permalink

कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे

कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे की मी लिहिलेले? असू द्या हो, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले व माझे मी लिहिले.
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Mon, 04/28/2014 - 06:19

In reply to कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे by रेवती

Permalink

अर्थात लेखक महाशयांचे...

अर्थात लेखक महाशयांचे... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sun, 04/27/2014 - 20:05

In reply to एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते by रेवती

Permalink

+१११

अगदी योग्य आणि समर्पक प्रतिसाद. सगळे मुद्दे पटले मला तुमचे. मी असा विचार करायला कधी शिकणार? आशिर्वाद असु द्या तुमचा.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/28/2014 - 03:02

In reply to +१११ by भाते

Permalink

आहेत की नै मौलिक विचार!

आहेत की नै मौलिक विचार! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/28/2014 - 01:40

In reply to एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते by रेवती

Permalink

आज्जे, तोडले फोडलेस आणी चोळामोळाकरुन फेकुन दिलेस.

टेस्ट मॅचची आयपीएलची मॅच केलीस. तो धम्यासुध्दा फिका पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/28/2014 - 03:04

In reply to आज्जे, तोडले फोडलेस आणी चोळामोळाकरुन फेकुन दिलेस. by चिंतामणी

Permalink

चिंतुकाका, किती दिवसांनी

चिंतुकाका, किती दिवसांनी पाठींबा द्यायला आलात! काही नै जरा गंमत केली. धागाकर्त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे खोटे नाही पण आज टंकायला वेळ होता तो सत्कारणी लावला.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 04/28/2014 - 17:43

In reply to चिंतुकाका, किती दिवसांनी by रेवती

Permalink

हो. खरे आहे.

खूप दिवसांनी इकडे फिरकलो आणि तुझी बॅटींग बघून प्रतिसाद दिल्यावाचुन राहवेना. असेच भारी भारी पोस्ट वाचायला मिळाले तर पुन्हा पुन्हा नक्की येइन.
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Sun, 04/27/2014 - 20:30

In reply to मुलाचा बाप ३/४ विजार - टी by रेवती

Permalink

+१

रेवाक्का रॉक्स!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Sun, 04/27/2014 - 19:46

Permalink

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता >>>> माझ्याकडे माझं पोर आणि त्याची चुलत भावंड, अशी एकत्रित मुंज झाली पालीला. मुंज लावणारा ऐंशीचा खडुस, म्हातारा ब्रम्हवृंद होता. त्यानी हे नाचगाणे, मुलांना वरातीच्या वेळा सजविणे ई.ई. काहिही करु दिले नाही. सारखा वसावसा ओरडत फक्त होता," साँस्कांर ओंहे नां हां, नाँच गाँणी कसली काँरताँय डोंबार्‍याँ साँरखीं...!!!" (खडुस म्हातार्‍याची उपजात सांगण्याचा मोह आवरत नाहीये पण आवरते..*diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO* )
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sun, 04/27/2014 - 20:17

Permalink

.

हं
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com