Skip to main content

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 27/04/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

वाचने 62150
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

मुंज हा कधीकाळी तयार झालेल्या १६ संस्कारांमधील एक संस्कार आहे. तो करावा का नाही हा अगदी गौण मुद्दा आहे. ज्यांना करायची असेल ते करतील आणि ज्यांना करायची नसेल त्यांनी करू नये. माझ्या बाबतीत लहानपणीच मुंज आणि सोडमुंज हे ३ दिवसांच्या अंतराने झाले, मी कधी संध्या केलेली नाही. जानवे नंतर स्विमिंगला गेलो तेंव्हा स्विमिंग पूल मधेच हात मारताना पडले.... त्यामुळे मी काही धार्मिक पध्दतीने याचा विचार करत नाही. पण तरी देखील त्या वयातला एक संस्कार - केवळ त्या दिवशीचे होम-हवन, मंत्र वगैरेच नाही, तर तो सोहळा करायच्या आधीचे प्लॅनिंग, त्यातील नातेवाईकांची आणि आप्तेष्टांची involvement, प्रेम या सगळ्याचा एक मनावर एक सुखद परीणाम झाला जो कायमचा लक्षात राहीला. माझ्या दृष्टीने हा सगळा एक संस्कार असतो. कारण किंचित समजायला लागणार्‍या वयात पण तरी देखील आपल्याला कळत-नकळ आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुंजच नाही पण कुठलिही गोष्ट जेंव्हा केवळ शो ऑफ म्हणून होते तेंव्हा त्यातून दूरगामी ना धड संस्कार होतात ना इतर काही सकारात्मक फायदा... अशाच प्रकारचा (किंचीत मोठ्या) मुला-मुलीवरील ज्यूइश संस्कार बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा पाहीले आहेत. त्यातील मुद्दा हा मुल हे वयात येत असतानाचा एक संस्कार आणि सोहळा आहे. तोच प्रकार मुंजीच्या बाबतीत समजून घेतला आणि मग संस्कार म्हणून केले तर अधुनिक काळाला अनुसरून एक चांगला संस्कार तयार करता येईल. त्यात जात आणायची काही गरज देखील नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो: बार मिट्झ्वा आणि बाट् मिट्झ्वा हे ज्या दिवशी होतात त्या दिवशी मुळ सोहळा हा पारंपारीक असतो. त्यात राबाय (ज्यू प्रिस्ट) कडून त्यांच्या पध्दतीने धार्मिक संस्कार केले जातात वगैरे. त्यांच्या पध्दतीत पार्टी असल्याने त्याअनुषंगाने खाणे-पिणे आणि डान्सिंग केले जाते.... पण महत्वाचा मुद्दा त्या आधीचा असतो. आधी एक वर्षभर त्या मुलाला-मुलीला थोडेफार संस्कार (बेसिक हिब्रू भाषा येणे, इतिहास वगैरे) शिकवले जातात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे छोटासा का होईना एक समाजसेवेचा प्रकल्प हा (मदत घेऊन) प्लॅन करणे आणि पुर्ण करणे गरजेचे असते. त्या सगळ्याचा मुलांवर नक्कीच चांगला परीणाम होतो.

In reply to by विकास

"मुंज हा कालबाह्य संस्कार आहे/या संस्काराचं प्रयोजनच राहिलेलं नाही/निर्बुद्ध बाष्कळपणा" - हे सगळं तुम्ही 'विधीं'ना अनुसरून म्हणत असाल तर ठीक परंतु संस्कार आणि त्यामागचं तत्त्व, विचार वगैरे काहीच कालबाह्य, अकारण वा निर्बुद्ध बाष्कळ वाटत नाही. मुलानं गुरूगृही वेदाध्ययन करायला जाण्याऐवजी तोच मुलगा (फॉर दॅट मॅटर मुलगी - म्हणजे कुणी मला विचारलं मुलींची मुंज करावी का तर त्याला माझं उत्तर 'हो' आहे) हल्ली शाळा झाल्यावर युनिव्हर्सिटीला जायला घराबाहेर पडू लागला आहे. तेथे त्याला स्वतः पडेल ते काम करून पैसे कमवण्याची अक्कल पक्षी व्यवहारज्ञानाचे अध्ययन करायचे आहे. गुरू कोण - हे जग. मग मातृभोजनाचा काय अर्थ - झालं आता, आईकडून लाड करून घेतले ते पुरे आता यापुढे आपले आपण काय ते बघा. भिक्षावळ? मुला घराबाहेर पडतो आहेस तेव्हा ही घे आपली भिक्षा/शिदोरी. पुढे मात्र पोटापाण्याला काहीतरी कर. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलगा आता शिशुवयातून कुमारवयात चालला. स्वावलंबी होण्याकडे त्याने एक पाऊल टाकलं - असा उदात्त विचार अशी व्यापक धारणा या उपनयन संस्कारामागे आहे. या धारणेचे आपण अनुयायी बनले पाहिजे. या संस्कारांमागची तत्त्वं आपण बघावी. नुसतंच जर आपण विधींमध्ये अडकून बसलो तर खरंच आपलं देव भलं करो. विधी = फंक्शन (काळ). काळ बदलला तसे विधी बदलायला हवेत. अजिनधारणाला आजच्या युगात काही अर्थ नाही. हरणं मारणं कायद्यानं गुन्हा आहे तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. कन्यादानाला काही अर्थ नाही. कन्या कमॉडिटी नाहीत तेव्हा तो विधी आपण बंद केला पाहिजे. पण म्हणून काही समग्र उपनयन अथवा विवाह 'संस्कार' कालबाह्य नि बाष्कळ ठरत नाहीत. कालबाह्य ठरतात ते केवळ विधी. पण कोणते विधी करावेत नि कोणते करू नयेत हे आपण ठरवूच शकतोच की. तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं. उरला प्रश्न कार्याचा तर वर विकास यांनी म्हणल्याप्रमाणे किंचित समजायला लागणार्‍या वयात असलं तरी देखील मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म. धर्म म्हणजे शिखा धारण केलेला बटू नाही. धर्म म्हणजे जानव्याची ब्रह्मगाठ नाही. धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.

In reply to by मेघवेडा

@तेव्हा माझ्यामते एकूणच सगळं राईट-ऑफ करण्यापेक्षा काय घेता येईल ते घ्यावं नि पुढे चलावं.>>> +++++१११११ @धर्म म्हणजे मानेभोवती गाठ मारलेला पंचा नाही. धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे.>>>>> यासाठी एक कडक सॅल्युट.

In reply to by मेघवेडा

>>>धर्म हे केवळ एक वाहन आहे. संस्कृतीचे, विचारधारांचे आणि तत्त्वांचे. वा! आक्खा प्रतिसाद सुंदर. ह्यासाठी एक 'प्यार्टी' लागू. हवंतर जानवं काढून ठेवा तीर्थप्राशन होईस्तोवर ;)

In reply to by मेघवेडा

विधी = फंक्शन (काळ).
वा वा!! पण प्रत्यक्षात काय होत.. विधी हे अशा पोथीपुस्तकातून वाचून केले जातात ज्यांना काळाप्रमाणे बदलण्याचे वावडे असते!! मुंज हा विधी केला जातो.. त्यामागचे तत्व, विचार (जे कालबाह्य नाही) ते सगळं गुंडाळून ठेवले जातं .. त्या तत्व/ विचारांनुसार आजच्या काळाला अनुरुप विधी कुठेही होत नाहित!!

In reply to by बाळ सप्रे

सप्रेसाहेब, लग्नातल्या विधींचे अर्थही असेच आपापल्या सोयीने गुंडाळून ठेवले आहेत, म्हणून कोणी लग्न करायचे थांबते काय? पण त्याविषयीचे लेख पाडले जात नाहीत.

In reply to by रेवती

लग्न करायचे कुणी थांबत नाही, थांबूही नये पण कालबाह्य विधी थांबवता येतील.. लग्न म्हणजे विधी नव्हेत. लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात. जे आवश्यक आहे. गतानुगतिक विधी टाळून लग्न म्हणजे आजच्या काळात लग्नाचे रजिस्ट्रेशन, मित्र/ नातेवाईकांना बोलावून सहभोजन ई. तसेच मुंज म्हणजे विधी नव्हेत.. तर शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवणे (मेघवेडा यांच्या प्रतिसादानुसार).. मग ते गतानुगतिक पद्धतिने ८ व्या वर्षी मुहूर्त बघून न करता जेव्हा मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी दूर जाण्याची वेळ येइल (if applicable) तेव्हा म्हणजे साधारण १०वी १२वी नंतर मुलं गावात सुविधा नसल्याने शहरात जातात तेव्हा किंवा परदेशी शिक्षणासाठी जाण्यावेळी करणे..

In reply to by मेघवेडा

सुरेख प्रतिसाद, खरं तर सगळाच संग्रही ठेवावा असा, खालचे विशेष आवडले. चार पैसे कमवून खा. वेळ पडल्यास भिक्षा माग पण चौर्यकर्म करू नकोस, लुच्चेलबाडी करू नकोस इत्यादि विचार्/अर्थ आपण समजवून घेऊन बटूला कस्टमाईज्ड उपदेश करावा. मुलाला कळत-नकळत आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माणसे दिसतात, कसे वागायचे आणि जगायचे हे समजू शकते. मुलावर खर्‍या अर्थाने 'संस्कार' होतो. हीच ती आपली संस्कृती. हाच आपला धर्म.

In reply to by मेघवेडा

बरं वाटलं प्रतिसाद वाचून. बरंचंसं पटलं. विधींना पकडून राहण्यात काहीच अर्थ नाही. लेखातील उदाहरणांमधे मुंजीचे विधी हे त्याचा अर्थ किंवा कारण समजून न घेता केवळ एकत्र जमायचे निमित्त म्हणून केलेले दिसत आहेत. तसे असेल तर अजिबात करू नये असंच मी म्हणेन. आपल्या मनाला पटेल ते करावं. त्याची पूर्वापार करायला सांगितलं आहे म्हणून कोणत्यातरी संस्काराशी नावापुरती सांगड घालू नये. माझ्या मुलाची मुंज अगदी थोडक्यात आणि गंभीरपणे केली होती. आहेर-देणेघेणे इ. ला पूर्ण फाटा दिला. फक्त जवळचे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमले. गप्पा झाल्या. मजा आली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीतच सोडमुंज केली. तेव्हा भाचा काशीला जायला निघतो, त्याला परत आणण्यासाठी मामा "तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! सगळेच खूश!

In reply to by पैसा

>>>>"तुला मुलगी देतो" असं म्हणाला नाही, तर तुला ३२ जीबी चा पेनड्राईव्ह देतो म्हणाला! बायकोची स्मरणशक्ती, म्हणजे डाटा साठविण्याची आणि रिट्रिव्ह करण्याचा वेग दोन्ही अफाट असते. 'सहा महिन्यांपूर्वी हिच भाजी शेजारच्या अमुकतमुक बाईंनी पाठविली होती तेंव्हा बोटं चाटत (स्वतःचीच) खाल्ली होती.' किंवा, 'आज वन्संचं कौतुक करताय, करा, पण हेच मी ३ वर्षांपूर्वी शार्दूलच्या मुंजीत सांगितलं होतं तर 'तुला काही कळत नाही म्हणाला होतात'' किंवा, 'वन्संच्या दिराला, वशिला लावून बँकेत चिकटवून घेताय पण ५ वर्षांपूर्वी, माझ्या भावाला बँकेत चिकटवून घ्या म्हंटलं तर तेंव्हा व्हेकन्सी नव्हती, म्हणे.' वगैरे वगैर डाटा साठवणं आणि नेमक्यावेळी रिट्रिव्ह करणं ३२ जीबी पेनड्राईव्हला, बिचार्‍याला, काय जमणार?

In reply to by प्रभाकर पेठकर

आणि या साठवणीतल्या आठवणी काहीही प्रयास न करता (म्हणजे कॉप्युटर सुरू करा, पेनड्राईव्ह लावा, फाईल सर्च करा, इ, इ) प्रकाशापेक्षा जास्त वेगाने येऊन तुमच्यावर आदळतात. छॅ, छॅ, पेनड्रईव्हला तिच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाशीही स्पर्धा करता येणे शक्य नाही ;) =))

मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर अहो मग त्याला काय झालं? उन्हाळा सुरु आहे ना? घालू द्या की त्यांना हवे तसे कपडे? त्या बाई आणि बुवांनी अगदी पारंपारिक वेषात जरी आमंत्रण दिले असते ना तरी "आले मोठे परंपरा जपणारे, माहितीये, यांच्या घरी मांसाहार चालतो" असं म्हणायलाही कमी करत नाहीत लोक! म्हणजे कसंही वागलं तरी लोक्स हे नावे ठेवण्यासाठीच अपॉईंट केलेले असतात. मी मात्र पंजाबी कपडे घालून आमंत्रण दिले असते (साडीबीडी आवडते पण झेपत नै हो) कारण मला ते आवडतात. मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार छे हो, माझ्या मुलांनी अज्याबात नकार दिला होता. पहिली संध्या त्याने मुंजीच्या दुसर्‍या दिवशी केली होती. आमचे पुण्यातले घर लहान असल्याने ज्या गेस्ट हाउसावर नातेवाईक राहिले होते तिकडे हा संध्याकाळी खेळायला पळाला. रात्री हा पेंगत असताना आजीनं दृष्ट काढली तेवढच! ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता घालू द्याकी! त्यांना निदान भिक्षावळीच्यावेळी असं काही करता आलं, आम्हाला तर मनपाने परवानगी दिली नव्हती. दिली असती तरी कोणीही नाचले नसते याची ग्यारेंटी, सगळे वयस्क नातेवाईक गुढगे दुखी, पाठदुखी ने त्रस्त आहेत. आजकाल कोणत्याही जातीधर्मात भयंकर जुन्या पद्धतीने काहीही समारंभ होत नाहीत. अमूक हॉल, तमूक गार्डन नावे असलेल्या ठिकाणी हिरवळीवर जेवणाचे स्टॉल लावून उभा उभ्या जेवणे होणारे समारंभ, लग्नाअधी होणार्‍या ब्याचलरांच्या पार्ट्या आजकाल महाराष्ट्रातही चालतात ते सगळे काय ब्राह्मण असतात का? त्यांनी परंपरा न पाळल्याचे लेख मात्र छापून येत नाहीत. तुम्ही वरील लेख लिहून एका जातीवर उगीच अन्याय करताय. ;) ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात ३१ डिसेंबरच कश्याला रेव्हपार्टीमध्ये पकडलेली मुले, मुली हा सगळा ब्रह्मवर्गच असतो काय? डिसेंबरात पार्टी करणे का अधिकार फक्त ब्राह्मणांनाच दिलाय का? तसे असल्यास कागदोपत्री दाखवा. पाहयला गेलं तर महाराष्ट्रीय लोकच नव्हे तर इतर राज्यीय लोकही खाद्यपेयांचा आस्वाद जास्तच प्रेमाने घेत असलेले दिसतील. तुमच्याकडून विदा गोळा करण्यात चूक झालीये का जरा बघा. लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून त्यांना हवे ते करू शकतात, तेही त्यांचे पैसे खर्च करून! तुम्हाला रुचत नसेल तर आमंत्रण देणार्‍यांना सरळ तोंडावर सांगा. गायत्री मंत्र फक्त माझ्या मुलालाच नाही तर त्याच्या सगळ्या जातींच्या, विविध भाषा बोलणार्‍या (भारतीय) मित्रांना अगदी खणखणीत आवाजात (कधीकधी जास्तच जोरात) म्हणता येतो आणि तो म्हणणे हा त्यांचा हक्क आहे. हामेरिकन सरकारही त्याला आक्षेप घेत नाही.

In reply to by रेवती

एक ल्ह्यायचं र्‍हायलं, ते म्हणजे ज्यांना गायत्री मंत्र म्हणता येत नाही त्यांचेही काही वाईट होणार नसते. दुसरं असं की तुमच्या लेखातून काय म्हणायचय हे समजलं. हा बदललेला प्रकार, फक्त मुंजीतीलच नव्हे, लग्नातीलही पाहिल्यावर मलाही विचित्र वाटले होते हे कबूल करते पण बदल हा असणारच! तुम्ही, मी किंवा कोणीही हा बदल थांबवू शकत नाही मग आहे त्यातच आनंद मानायला शिकले. दोन वर्षांपूर्वी माझ्या भाचीचा साखरपूडा हा लग्नासारखा मोठा केला होता आणि साडी वगैरे जाऊ दे, घागरा पद्धत आली असल्याचे जाणवले. असो, त्यांचे लग्न होऊन ते सुखात आहेत हे महत्वाचे! माझा मुलगा नक्की काय करणार आहे हे मलाही माहित नाही. त्याने समारंभातच नव्हे पण इतरवेळीही मद्यपान करू नये यासाठी मी आग्रही राहीन पण बाकी विविध प्राणी खाण्यात सध्या तरबेज झालाय.

In reply to by रेवती

जौ द्या मला तरी हे किस्से जरा अतिच 'वेचक' वाटताय..निदान माझ्या तरि पहाण्यात असले काहि आले नाहि..

In reply to by जोशी 'ले'

कोणाचे किस्से? लेखकमहाशयांचे की मी लिहिलेले? असू द्या हो, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले व माझे मी लिहिले.

In reply to by रेवती

अगदी योग्य आणि समर्पक प्रतिसाद. सगळे मुद्दे पटले मला तुमचे. मी असा विचार करायला कधी शिकणार? आशिर्वाद असु द्या तुमचा.

In reply to by चिंतामणी

चिंतुकाका, किती दिवसांनी पाठींबा द्यायला आलात! काही नै जरा गंमत केली. धागाकर्त्यांचे म्हणणे काही पूर्णपणे खोटे नाही पण आज टंकायला वेळ होता तो सत्कारणी लावला.

In reply to by रेवती

खूप दिवसांनी इकडे फिरकलो आणि तुझी बॅटींग बघून प्रतिसाद दिल्यावाचुन राहवेना. असेच भारी भारी पोस्ट वाचायला मिळाले तर पुन्हा पुन्हा नक्की येइन.

>>> ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता >>>> माझ्याकडे माझं पोर आणि त्याची चुलत भावंड, अशी एकत्रित मुंज झाली पालीला. मुंज लावणारा ऐंशीचा खडुस, म्हातारा ब्रम्हवृंद होता. त्यानी हे नाचगाणे, मुलांना वरातीच्या वेळा सजविणे ई.ई. काहिही करु दिले नाही. सारखा वसावसा ओरडत फक्त होता," साँस्कांर ओंहे नां हां, नाँच गाँणी कसली काँरताँय डोंबार्‍याँ साँरखीं...!!!" (खडुस म्हातार्‍याची उपजात सांगण्याचा मोह आवरत नाहीये पण आवरते..*diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO* )

हं

In reply to by यसवायजी

त्यांनी असल्या बर्‍याच पाकृ करुन बघितल्या आहेत. ;) हवं असल्यास खोदकाम करा अथवा (त्यांच्याशीच) संपर्क साधा! @ भडकमकर मास्तर, नया(लगता) है वह! =))

सगळे पर्तिसाद रॉक्स !!!! मौजी त मौज असते. गोटा असतो . बेटकुळी भरण्याची धमकी असते. गोट्यावरून घेर्‍यातून खोडकर पणे हात फिरविणे असते.मुंज मुलाला सिल्कची सुळासुळीत चड्डी घालयला मिळते. मौजी एक सामाजिक कार्य आहे. नाभिकाना एरवीच्या पाचपट पयशे मिळतात.

In reply to by चौकटराजा

नाभिका वरुन आठवले, नाभिकारे वारा वाहे रे... डौलाने हाक जरा नाव आज रे असे वाटायचे. म्हटलां नाभिक कसा नाव हाकल शेवटी ते नाविका रे असे आहे हे सम्जले.

या धाग्यात शतक पार करण्याचे पोटेन्शियल दिसते आहे.... :) बाकी आत्मुबाबा स्मायलीवाले यांचा जरा सविस्तर प्रतिसाद अपेक्षित !

एखाद्या अधुनिक पद्धतीने रहाणार्‍या कुटुंबातील मुलाची मुंज जर त्यानी त्यांना पहिजे त्या पद्धतीने केली तर हरकत काय आहे? माझ्या दोनही भावांच्या आणि नात्यातल्या काहींच्या मुंजी अगदी साग्रसंगीत, वाड्यात मांडव वगैरे घालून केलेल्या आठवतात. काही दिवस त्यांनी संध्या, जेवताना चित्राहूती घालणे वगैरे केल्याचे स्मरते. पण नंतर आजतागायत पळी, ताम्हन हातात तरी घेतले असेल की नाही शंका आहे. गणपतीच्या वेळी नवे जानवे विकत घ्यावे लागते. (त्यांचं ऐकून गायत्री मंत्र मलाही पाठ झाला होता... ) पण यात कुणाला दोष देण्याचे आणि आकांडतांडव करण्याचे काही कारण मला दिसत नाही. पूर्वी मुंज झाल्यानंतर मुलगा गुरूगृही जात असे आणि त्याच अनुषंगाने मुंजीचे विधी असतात. म्हणजे मातृभोजन, भिक्षावळ, पित्याने गुरूमंत्र (मुलाच्या कानात) सांगणे इ. पण आता मुलं गुरूगृही जात नाहीत त्यामुळे तसेही मुंजीचे सांकेतिक महत्व आता राहीले नाही. मुंज ८ व्या ९व्या वर्षी होऊन मग विद्याभ्यासाला प्रारंभ होत असे. आता शिक्षण वयाच्या ३र्‍या ४थ्या वर्षा पासून सुरू होते. मग मुंज करण्यात काय अर्थ राहीला आहे ? पण तरीही असे समारंभ होत रहावेत असे मला वाटते. त्यातल्या धार्मिक घटकां बरोबरच तो एक आनंद सोहळा आहे हे समजावे. म्हणजे करण्यात काही कमी-जास्तं झाले तर राग येणार नाही. असे समारंभ म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असते. इतरवेळी कार्यव्यग्रतेमुळे भेटु न शकणार नातेवाईक, मित्रंमंडळी आवर्जुन एकत्रं येतात अशा वेळी थोडीफार मौजमजा केली तर काय हरकत आहे? चिकनीचमेली गाण्यावर नाचणे वगैरे जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण मी तर सकाळी मुंज, संध्याकाळी दारुपार्टी असं घडताना पाहिलेलं नाही. लोकं (विशेषतः मराठी) इतकं तारतम्यं नक्कीच बाळगत असतील. ते जोडपं तुम्हाला आवर्जुन निमंत्रण द्यायला आले हे लक्षात न घेता तुम्ही त्यांच्या कपड्यावर टिका करणे याला काय म्हणावे ? जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल. आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली.

In reply to by मनीषा

जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.
काय बहारदार प्रतिसाद आहे! क्या बात है! अनेक प्रतिसाद वाचनीय आहेत, विदा, स्वानुभव पण दिले आहेत अनेकांनी. पण तुम्ही दोन ओळीत जो सार सांगीतलात त्याला तोड नाही! अपना तो दिन बन गया!

In reply to by मनीषा

@जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif @आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली. .>>> आमच्या धर्मशास्त्र्यांना त्याची किंमत नसते. आजही ते..अज्ञाताच्या गुहेत काठ्या मारत फिरण्याला आदर्श-सदाचारी-जीवन समजतात. असो!

माझ्या मुंजीची १९८८ साली विडीयो केसेट केली होती. घोड्यावरून भिक्षावळ फडके रोड वरून गणपतीच्या मंदिरात गेली होती. त्यांनतर महिनाभर मी संध्या केली. मग आठवत नाही पण पुढे त्यात खंड पडला ,आज इतक्या वर्षाने कधीतरी ती विडीयो कसेट पहिली तर ह्या सभारंभाच्या निमित्ताने जमलेले अनेक नातेवाईक ज्यातले काही कैलासवासी झाले आहेत त्यांना पाहता आले. बरे वाटले. धाग्याचा विषय पाहून ज्या अपेक्षेने तो उघडला होता व तडक प्रतिसाद वाचायला घेतेले , मग मूळ लेख वाचला. तेव्हा अपेक्षापूर्ती झाली.

पूर्वी म्हणे बायका पण शिकत असत आणि वैदिक ज्ञान वैगेरे घेत असत. मग मुंज फक्तं मुलाचीच का? मुलीची का नाही? अगदी हौशी मौजीसाठी मुंज म्हटलं तरी मुलीच्या नावाने हौस मौज का नाही? ता. क. माझ्या नवर्याच्या धर्मात मुंजीसारखा विधी मुलगा मुलगी दोघांसाठी आहे. मुलासाठी 'शाल' आणि मुलीला 'किरगुणी' बर्याचदा एकाच मांडवात घरातल्या मुलामुलींची एकत्र शाल किरगुणी करतात. आजकाल यातही मुख्य विधी संपल्यावर मुलांना भेटवस्तू द्यायच्या वेळेस बाजूला ऑर्केस्ट्रा चालू करतात. ;) अजून दारू पिणे वैगेरे पाहिले नाही.

In reply to by साती

माझ्या मैत्रिणीची झाली आहे मुंज. मुंज मुलींची करु नये असं शास्त्र कुणाला माहीत असल्यास संदर्भ जाणून घ्यायला आवडेल. बाकी हौसेमौजेखातर मुलीची मुंज करायची आहे असं एक उदाहरण आणि वैदिकीचा अधिकार तिला यावा म्हणून करायची आहे असं दुसरं अशी दोन हल्लीच ऐकली.

In reply to by पिशी अबोली

होय. मुलींची मुंज करता येते. पूर्वी मनशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद सामूहिक मुंज करायचे,त्यात मुलींचीही मुंज होत असे. अजूनही करत असतील , कल्पना नाही. बाकी , मुंजीनिमित्त 'चिकन पार्टी' आमच्या काही नातेवाईकांमध्येही झाली आहे. अगदी माझ्या लहानपणीपण पाहिलिये. ज्याची त्याची मर्जी! हे जर का खरोखरच 'चुकीचे' असेल, तरी असे वागणार्‍यांना मी दोष देणार नाही. तर 'मुंज' म्हणजे नक्की काय, हे कधीही न कळलेल्या आपल्या समाजाच्या आधीच्या काही पिढ्यांना देइन. माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट, एक दाक्षिणात्य ( कर्मठ ब्राह्मण) काकू मुलाच्या मुंजीचे आमंत्रण करायला घरी आल्या होत्या. त्याचवेळेस एक उत्तर भारतीय (ब्राह्मण) काका बसले होते. त्यांनी विचारलं, 'उपनयन' चा अर्थ काय हो? आई काहीतरी सांगणार तेवढ्यात काकू चटकन म्हणाल्या , ' उप' म्हणजे 'सब' ( इन्लिशमध्ये). म्हणजे ते एक छोटं 'लग्न'च असतं!! ... आईनी तोंडावर आलेले सगळं संस्कृत गपकन गिळून टाकलं... मी हसायला आत पळाले!

In reply to by कवितानागेश

लिम्स, लगेच अर्थ शोधला. - 'उपनयन' का अर्थ है "पास या सन्निकट ले जाना।" सम्भवत: आरम्भ में इसका तात्पर्य था "आचार्य के पास (शिक्षण के लिए) ले जाना।" हो सकता है; इसका तात्पर्य रहा हो नवशिष्य को विद्यार्थीपन की अवस्था तक पहुँचा दे

In reply to by पिशी अबोली

असं शास्त्र नाही, असं वाटतं. कधी वाचण्यात आलं नाही. माझ्याही मैत्रिणीची आणि तिच्या घरातील प्रत्येक मुलीची मुंज झाली आहे.

पारशांमध्ये नवजोत समारंभ मुलगे-मुली दोघांचाही करतात. क्रिस्टिअनांमध्ये फर्स्ट कम्यूनिअन दोघांचेही असते. पारशांमध्ये सात वर्षांखालच्या 'खुर्द'--लहानग्यांचे नवजोत होऊ शकत नाही. त्यावेळेस प्रथमच मुला/मुलीला सद्रा चढवण्यात येतो आणि 'कश्टि' नावाचा जानव्यासारखा धागा कंबरेला बांधण्यात येतो. पुढील आयुष्यात त्यांनी या दोन गोष्टी कायम अंगावर बाळगायच्या असतात.

गालिब शराब पीने दे मस्जिद मी बैठकर या वो जगह बता दे जहां पार खुदा न हो I एखाद्या गोष्टीचे औचित्य असते तेवढाही विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला. शेवटी आपण देवळात बसून ओली पार्टी केली किंवा राजघाटावर बायका नाचवल्या आणी ओली पार्टी केली तरी फरक पडत नाही. महात्मा गांधीना शिव्या देणारे लोक सुद्धा त्या स्थळाचे पावित्र्य समजून घेताना पाहीले. ( जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला कि हे कसे तेंव्हा ते म्हणाले आमचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध आहे. त्यांच्या प्रामाणिक पणाला किंवा इतर गुणांना नव्हे). आत्यंतिक विरोध असूनही त्यांना स्थळाचे पावित्र्य समजत होते. कोर्टात अर्धी चड्डी घातली तर चालेल काय? किंवा आपल्या बायकोला घेऊन स्त्रीरोग तज्ञा कडे गेल्यावर लोड शेडींग आहे म्हणून तो अर्ध्या चड्डीत बसलेला असेल तर चालेल काय? आता याचे उत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला. बाकी मुंज केली काय किंवा नाही केली काय? काय फरक पडतो. हा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या डॉक्टर मित्राच्या दवाखान्याच्या बाहेरून एक लग्नाची वरात चालली होती त्यात बँड वाले अतिशय सुरात गाणे वाजवत होते "दिल मी छुपा के प्यार का तुफान ले चले I हम आज अपनी मौत का समान ले चले I कसलाही विधिनिषेध नसेल तर आईबापांचे कामजीवन अशा विषयावर सुद्धा रसभरीत चर्चा करता येईल किंवा मुलान्समोरही कामक्रीडा करता येईल . असो ज्याचे मत त्याच्या पाशी.

In reply to by सुबोध खरे

"औचित्य" या एका शब्दात सर्व आले. १००% सहमत.

उपजात सांगायचा मोह आवरलात नि माती खाल्लीत. ती सांगता तर एव्हाना दोन-अडिचशे प्रतिसाद सहज मिळत होते. बाकी मुंज हा विधी फक्त ब्राह्मणांतच करतात हा ब्राह्मणेतरांतला गैरसमज आणि आमची बरोबरी करायला ब्राह्मणेतर मुंज करतात ही एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्याने (आता त्याची उपजात सांगायचा मोह मी आवरतो) उधळलेली मुक्ताफळे असं दोन्ही ऐकून कान केव्हाच तृप्त झालेत. जाता जाता, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

In reply to by सूड

बघा बघा...खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! या, बरोबरच केक कापू..! जाता जाता, हल्ली असे उपजातीपातींवरुन युद्ध पेटत नाहीत हो...जास्त थोर्थोर विषय हवेत...

काही वर्षांपूर्वी एका सुप्रशिद्ध महाराजांनी त्यांच्या नातवाची मुंज केली होती . त्यावेळी लैच धुराळा उडाला होता . यागोष्टीची आठवण झाली . असो . ज्यांनी फोटू दिसण्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जाहीर आभार . धन्यवाद . वरील फटू पाहून सुजाण , चाणाक्ष लोक/वाचक लग्गेच ओळखतील कि ब्राह्मणी नौ वार कोणती आणि 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' हा प्रकार कोणता . बाकी ती म्हण कोपी पेस्ट केली आहे हे सुज्ञाना वेगळे सांगायला नकोच . धन्यवादच .

लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय. मुंज प्रकार कालबाह्य झालाय हे खरच आहे. तरीही माझ्या मुलाची मुंज घरातल्या लोकांना करायचीच असेल तर ती घरातच करायला लावेन आणि बाकी समारंभ न केल्यामुळे वाचलेल्या पैशातून काहीतरी माझ्या गावातल्या शाळेतल्या पोरांसाठी करेन. हे मी करेन बाकीच्यांनी काय करावं हे ते ठरवतील :)

नऊवार लुगडी अने बन्ने तंगडी उघडी ही म्हण बडोदा मराठीत (हिला धेडगुजरी म्हणावं की धेड मराठी?) खूप चालते. मराठी सरदारांच्या आणि एकूणच मराठी लोकांच्या पोकळ बडेजावाची टिंगल करण्यासाठी ती वापरली जाई. ब्राह्मण बायकांचे नऊवारी नेसण ओचे खोचलेले असते, आणि इतर अनेक जातीतल्या बायकाही ओचे खोचतात मात्र ते थोडे आखूड खोचतात. काम करताना आखूड नेसण बरे पडते. मी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले एक दुर्मीळ कुटुंबछायचित्र पाहिले आहे. त्यात त्या ब्राह्मण कुटुंबातल्या बाईंनी ओचे अगदी आखूड म्हणजे अर्ध्या पोटरीपर्यंत खोचलेले आहेत. पायांवर निर्‍या लोळवणारे नेसण मला वाटते बालगंधर्वांनी लोकप्रिय केले. त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना भरपूर पन्ह्याचे लुगडे पायघोळ होत असावे. ते पदराचा एक काठदेखील अगदी खालून म्हणजे अगदी घोट्यापासून घेत. जुन्या लोकांकडून असे ऐकले आहे की असे पायघोळ आणि पावलांवर निर्‍या लोळवणारे नेसण गरत्या बाईचे लक्षण मानले जात नसे. बाईचे नेसण सैल, अघळपघळ फलकारणारे असू नये असा संकेत होता. स्वयंपाकाची वगैरे कामे करणार्‍या गरीब ब्राह्मण बायकांनाही असे नेसण सोयीचे होते. कष्टकरी बायका दुहेरी ओचे खोचत. म्हणजे डावीकडे खोचलेल्या ओच्यामधे पुन्हा उजवीकडची एखादी निरी अडकवीत. यामुळे कुठल्याही पावलामध्ये लुगडे अडकण्याचा प्रश्न येत नसे. बाकी नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी निर्‍या उजवीकडे फिरवून खोचतात तर कोणी डावीकडे. कोणी कोणी निर्‍यांचे दोन भाग करून ते विरुद्ध दिशांना म्हणजे डावी-उजवीकडे वळवून खोचतात. कोळी बायका निर्‍या फार ठेवीत नसत. कमी निर्‍यांमुळे सुटा राहिलेला पदर कंबरेभोवती घट्ट गुंडाळीत. यामुळे वजन उचलताना कंबरेत लचक किंवा उसण भरत नसे. या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील तर जाणून घ्यायला आवडेल. पेशवाईमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. खाणे-पिणे, वस्त्रप्रावरणे, भाषा अशा बाबतीत नवी मूल्ये प्रस्थापित झाली. तेव्हा त्या आधीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by राही

स्वयंपाकादि कामे करणार्‍या बायकांनाही असे आखूड नेसण सोयीचे होते. असे वाचावे.

In reply to by राही

या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील
चित्रगुप्त यांच्याकडे जुनी चित्रे असतात..

In reply to by राही

नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता यायचे म्हणे. त्यादृष्टीनेही आखूड नेसणच योग्य असावं. अर्थात आखुड नेसा वा पायघोळ नेसा, नऊवार फक्त पुढुनच पिसारा फुलवलेल्या मोरासारखी आकर्षक दिसते. मागुन नेटका पदर अंगभर घेतला तरच ठीक... (नऊवार अज्जिबात ना आवडणारी...स्वरा)