Skip to main content

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 27/04/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे. देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे. कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.

वाचने 25506
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम समाजाचाही पाठींबा आहेच..की.. त्यांनी सद्भावना रॅलीत टोपीचा स्वीकार न करुनच दाखवुन दिले...आणि तरीही कोणी फार ठ्ळक आरोप करु शकले नाही... पण बहुसंख्याक परंतु युपीए राजवटीत दुर्लक्षित असलेल्यांची मने जिंकली...

सद्भावना रॅलीपर्यँत मुस्लीमांचा पाठीँबा असेलही. पण टोपीच्या प्रसंगामुळे नंतर मुस्लीम समुदाय मोदींपासून दुरावला आणि हिंदू समाज अधिक जवळ आला असे म्हणता येईल.

सहमत आहे. बरेच जणांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून मोदी हे भारताच्या पंतप्रधानपदी हवे आहेत. अवांतर - मला वाटते यावेळी अल्पसंख्यांक ज्यांना मोदी नको आहेत, वा जे मोदी येण्याची भिती बाळगून आहेत असे देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले असतील. अर्थात त्यांनी आपला कैवारी समजून मते कोणाला दिली असतील हे ज्याचे त्यालाच ठाऊक.

४८ साली संघ का वाढला, ७७-७८ साली आणखी का वाढला, ९५ ला शिवसेना भाजप महाराष्ट्रात का सत्तेवर आलं, ८४ ला ४ असणारे ८९ ला ९० का झाले... घरातल्या सर्वार्थानं 'बर्‍या' मुलाला सातत्यानं त्याच्याच बेजबाबदार नि वांड भावासाठी (महात्म्याचे शब्द ना?) तडजोड करावी लागत असेल तर बर्‍या मुलाला कधीतरी काड्या कराव्या असं वाटल्यास काय चूक???? - पॉपकॉर्न विकायला कोणी आहे का याची वाट बघत बसलेला!

देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
नाही. दंगली हिदुंचे शिरकाण झाल्यामुळे घडल्या, त्यानुशंगाने उलट हिंदुसमाज मोदींवर जास्त नाराज नको काय ? पण वस्तुस्थिती तशी नाही कारण विकास. खरे तर बेसिक गोश्टीच पुरवल्या पण त्याही पुरवायला काँग्रेसने दाखवलेली इछ्चाशक्तीची दिवाळ्खोरी हे एकमेव कारण आहे की आज काँग्रेसविरोध म्हणून मोदींची लाट कार्यक्षमता विषेश उठुन दिसते आहे. हा काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारुन घेतलेला धोंडा आहे. केजरीवाल तो अभी नया हय.

कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही
गेल्या १२ वर्षात गुजरातमध्ये तसे काही घडले असते ती ही शंका घ्यायला वाव होता.पण उलट घडते आहे.'तणावपूर्ण परिस्थिती,दुकाने बंद्/जाळपोळ,संशयितांना अटक' असल्या बातम्या कुठून् जास्त येतात? 'सेक्युलर' महाराष्ट्र,आंध्र... की गुजरात?

भारतात सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर सुप्रशासनाची. पण मोदी याबाबतीत बदल घडवून आणतील असे मला वाटत नाही. न्यायालये, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, लाचलुचपत प्रतिबंध यात कमालीच्या सुधारणा आणणे गरजेचे आहे. जो आमदार घरबांधणीचा कायदा करतो तोच बेकायदेशीर बांधकामे नियमित करा म्हणून उपोषण करतो. अशा आमदाराला मोदी तुरूंगाचा रस्ता दाखवतील काय? मग आता मोदी लोकप्रिय आहेत याचे कारण काय? खरे तर ते भारतभर लोकप्रिय नाहीतच. बाजपेयीही नव्हते. भारतभर लोकप्रियता फक्त नेहरू, इंदिरा,लालबहादूर शास्त्रीजी व राजीव गांधी या चारच जणाना मिळाली. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मात्र नरेंद्र मोदी ये लोकप्रिय आहेत यात शंका नाही. तरूणाना भाषणातून स्फूर्ति मिळते. त्यात सोनिया ,मनमोहन कुचकामी आहेत.मोदी यात आघाडी घेऊन आहेत.केजरीवाल देखील भाषणात तेच ते मुद्दे उपस्थित करतात. त्या मानाने मोदी बरेच " तयारीचे" नेते आहेत. हे त्यांच्या कट्टर शत्रूला देखील मान्य करावे लागेल.

भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार PATNA: A Muslim woman in Jharkhand has alleged she was gang-raped by more than a dozen men because of her working for BJP in ongoing Lok Sabha elections, police said on Tuesday.

केंद्रात भाजप सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रात काही फरक पडेल असे वाटत नाही. गेली पंचवीसतीस वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजपकडे आहे. मुंबईत शासनव्यवस्थेचे किती अवमूल्यन झाले आहे हे वेगळे सांगायला नको.

गेल्या ५ वर्षात दररोज नवीन घोटाळे देणाऱ्या कॉंग्रेस मुळे कंटाळलेल्या जनतेला सध्या तरी एकाच पर्याय दिसत आहे. यावेळी देऊन पाहू मत, मोदी करतो तरी काय.

In reply to by संचित

बहुतेक लोकांना दंगली / हिंदू मुस्लिम वादाबद्दल फारसा इंटरेस्ट नाही.. पाच वर्षांपूर्वी विश्वासाने सत्ता दिल्यावर काँग्रेस आणि युपीए ने जे घोटाळे केले आणि त्यानंतर ज्या बेमुर्वतखोर पद्धतीने वर्तन केले त्याला लोक चिडले आहेत. त्यात महागाई, इन्फ्लेशन, सुरक्षितता आणि सर्वत्र उघड असलेला संधिसाधू पणा. जर २००९ ते २०१३ मध्ये २००४-०९ सारखे चांगले वातावरण राहिले असते तर आज मोदींची इतकी हवा झाली नसती. मोदींनी या anti incumbency चा नीट आणि आक्रमक प्लॅन करून फायदा करून घेतला आहे.. केजरीवाल हा एकच त्यांना समर्थ विरोधक ठरू शकला असता.. पण दिल्लीच्या गोंधळामुळे त्याचा लोकाश्रय कमी झाला. आणि राहुल गांधी हे समर्थ प्रतिस्पर्धी होऊ शकलेच नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेचे कारण - काँग्रेसविरोधी वातावरण, उत्तम प्लॅनिंग, आक्रमक प्रचार, चांगले मुद्दे..

मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण : ते लोकप्रीय आहेत हे सदोदीत "गोबेल्स " टाइप प्रचाराने लोकांवर बिंबवत रहाणे. काही ना काही कारण काढत चर्चेत रहाणे ( प्रचारात मुद्दे यापेक्षा गुद्दे आणणे , जाणून बुजून वादग्रस्त वर्तन करणे उदा: मतदानासाठी जाताना मुद्दाम पक्षाचे चिन्ह जाणीवपूर्वक प्रदर्शीत करणे ) प्रसंगी मिडीया मॅनेज मरून चर्चेत रहाणे. त्या अर्थाने त्यांची तुलना राखी सावंतां बरोबर करता येईल.

In reply to by विजुभाऊ

मोदींच वर्तन थोड जास्त आक्रमक असत. पण हल्ली ते जुन्या आणि विवादित मुद्द्याबद्दल बोलताना ते शक्य तेवढा वाद टाळताना दिसतात. जुने मुद्दे परत परत उकरून काढले जात असताना सध्या मोदी आधीच्या तुलनेत असे मुद्दे बरेच शांतपणे हाताळताना दिसत आहे. हे सुद्धा एक कारण आहे, कि अधिक जनता आता त्यांना स्वीकारताना दिसते आहे. आणि मला तरी वाटते प्रणव मुखर्जी आणि चिदंबरम यांना कॉंग्रेस ने बाजूला करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. राहुल गांधी यांचा साधेपणाच फुगा फुटला आणि लोकांना त्यांचे आकर्षण जवळ पास संपले. आता प्रियांका वड्रा हीच काय ती कॉंग्रेस जवळ अशा दिसते आहे.

>>> मोदींच्या लोकप्रियतेचे कारण काही कारणे ... - निर्णयक्षमता असलेला स्वतःचे नेतृत्वगूण सिद्ध केलेला एक अत्यंत खंबीर नेता - अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त राजकीय व वैयक्तिक कारकीर्द - अहंकारी स्वभाव असला तरी तो अहंकार कर्तृत्वातून आलेला आहे - प्रभावी वक्तृत्व - समोरच्याला न घाबरता शिंगावर घेऊन थेट आव्हान देण्याचा सडेतोड स्वभाव - १२ वर्षांहून अधिक काळ पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधक, तपास संस्था, प्रसारमाध्यमे, तथाकथित उच्चभ्रू व्यक्तिमत्वे इ. शी खंबीरपणे झुंझणारा नेता अजूनही अनेक कारणे असतील.

. हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

हे आयोगवाले उगाचच काहीतरी काढत बसताहेत झाल. पूर्वी इंदिराही मतदान केल्यावर आपला उजवा हात उंच करून दाखवे. (मोदी पंतप्रधान अशी अपेक्षा करणारी) माई

In reply to by संजय क्षीरसागर

>>> हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. :yahoo: >>> जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल :dance: >>> आणि उमेदवारीही रद्द होईल... :clapping: >>> मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल. *HI*

In reply to by संजय क्षीरसागर

येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? हे काँग्रेसवाले त्यांना अटक करा म्हणतात, पण आझमखानाबद्दल मूग गिळून गप्प का? मुलायम म्हणतो " लडकोंसे गलती होती है" .. त्यावर काही बोलत नाहीत.

In reply to by सचिन

निवडणूक आयोगानंच FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि दोन FIR दाखल झालेत. आपण मतदान केलं असं दर्शवणं वेगळं आणि मतदान केल्याची खूण असलेल्या तर्जनीसमोर निवडणूक चिन्ह धरुन फोटो काढणं वेगळं; हे समजण्या इतके शहाणे तर ते नक्कीच असावेत. पण सत्तालोभापायी आलेला उतावीळपणा नडतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."

In reply to by संजय क्षीरसागर

The EC, however, isn't convinced and has justified the decision on the ground that Modi's address to the media right after he cast his vote in Vadodra on Wednesday did not seem spontaneous for a number of reasons. "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> "A spontaneous byte to the media does not normally stretch into a 20-minute speech. "A spontaneous byte to the media" किती वेळ चालला पाहिजे (म्हणजे जास्तीत जास्त किती सेकंद किंवा किती मिनिटे) याची काही व्याख्या आहे का निवडणुक आयोगाकडे? यावर काही कायदेशीर वेळमर्यादा आहे का? असा काही कायदा किंवा नियम आहे का ज्यानुसार "A spontaneous byte to the media" ठराविक सेकंदांपेक्षा किंवा मिनिटांपेक्षा लांबला तर तो गुन्हा आहे व त्यापेक्षा कमी असला तर चालेल? >>> Even if we were to believe the presser was not planned, then how does one explain the table and chairs set up there? Can all this be arrangspontaneously?" asked a senior EC official, who did not wish to be identified. टेबल-खुर्च्या भाजपने किंवा मोदींनीच पूर्वयोजनेनुसार आणल्या होत्या असा काही पुरावा आहे का? पत्रकार परिषद करायची असेल तर तसे अधिकृत निमंत्रण वृत्तसंस्थांना व माध्यमांना पत्रकार परिषदेच्या आधी काळ पाठवावे लागते. असे अधिकृत निमंत्रण मोदींनी किंवा भाजपने पाठविले होते का? >>> "Yes, we are aware that politicians can't help it when the media insists for a byte. If Modi had a brief chat with the media like his contemporaries in his own party or even his rivals, we wouldn't have given this order. The long interaction and also the deliberate display of his party symbol is a blatant violation of section 126(1)(a) and 126 (1) (b)," the officer added. brief किंवा long interaction ची व्याख्या किंवा नियमावली आहे का निवडणुक आयोगाकडे? किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे long interaction किंवा किती सेकंद किंवा मिनिटे म्हणजे brief याची व्याख्या किंवा नियमावली आहे का? एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने १ सेकंदापेक्षा कमी म्हणजे brief असेल तर दुसर्‍याला वाटेल की २ तासांपेक्षा कमी म्हणजे brief. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न दृष्टीकोन असू शकतो. त्यामुळे brief म्हणजे नक्की किती काळ किंवा long interaction म्हणजे नक्की किती काळ याची सुस्पष्ट व निसंदिग्ध मार्गदर्शक तत्वे किंवा नियम असल्याशिवाय असल्या आरोपांना अर्थ नाही. आता राहिला पक्षचिन्हाचा मुद्दा. मतदानकेंद्रापासून १०० (की २०० ?) मीटर अंतराच्या आत पक्षचिन्ह लावता येत नाही. पण त्या परीघाबाहेर उमेदवारांचे बूथ, भित्तिपत्रके असतातच. जर मोदींनी ही अंतराची मर्यादा पाळली असेल तर पक्षचिन्ह दाखविल्याने कोणताच गुन्हा होत नाही. पूर्वी यापेक्षाही गंभीर गुन्हे नेत्यांनी केलेले आहेत. पण आयोगाने आजवर त्यांच्यावर कधीही कारवाई केलेली नाही. २००४ (किंवा २००६ मध्ये) च्या लोकसभा निवडणुकीत केरळच्या एका कम्युनिस्ट मंत्र्याने स्वतःच्या मतपत्रिकेवर स्वतःच्या उमेदवाराच्या पुढे शिक्का मारून ती मतपत्रिका माध्यमांना संपूर्ण दाखवून नंतर घडी करून मतपेटीत टाकली होती. गुप्त मतदान कायद्याचा हा उघडउघड भंग होता. त्यांच्यावर आयोगाने आजतगायत कारवाई केलेली नाही. मोदींवर एफआयआर दाखल करण्यामागे काँग्रेसचा दबाव आहे. काहीतरी करून मोदींना निवडणुकीतून बाद करण्यासाठी काँग्रेस उरलेल्या १०-११ दिवसात जीवाचे रान करीत आहे. त्यातूनच हे फुसके प्रकरण विनाकारण तापविले जात आहे. आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. भाजप लगेच न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणेल व त्यामुळे निवडणुक आयोगाचे व पर्यायाने काँग्रेसचे पुन्हा एकदा हसे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. कधी सिद्ध झाला? >>> इतरांनी चूक केली म्हणून मोदींना सवलत देता येत नाही. सवलतीचा प्रश्नच नाही. चूक केलीच नाही तर सवलत कशाला? >आयोगाने दबावाखाली झुकून कारवाई केली तरी न्यायालयात ती टिकणार नाही. = हा निव्वळ आशावाद आहे. तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला नाही. वाचला असल्यास तुम्हाला तो समजलेला नाही. न्याय हा ठोस निष्कर्षांवर दिला जातो. भाषण प्रदीर्घ होते की संक्षिप्त याचा निर्णय प्रदीर्घ व संक्षिप्त या दोन्हींची सुस्पष्ट व निसंदिग्ध व्याख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही. २० मिनिटांचा पत्रकारांशी संवाद हा संक्षिप्त होता की प्रदीर्घ हे याच कारणामुळे न्यायालय ठरवू शकणार नाही. आणि जर पत्रकारांशी संवाद कायदेशीर परीघाच्या बाहेर असेल तर परीघाच्या बाहेर पक्षचिन्ह दाखविणे किंवा पत्रकारांशी संवाद करणे हा गुन्हा होऊच शकत नाही. वकील असीम सरोदेंच्या माहितीनुसार, जर समजा मोदींनी कायद्याचे उल्लंघन केले असे सिद्ध झाले तरी त्यासाठी जास्तीत जास्त रू. २५० दंड होऊ शकतो. फक्त एकच अपवाद. जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तो किती वेळ केला यावर गुन्हा अवलंबून नाही. निवडणूक चिन्ह हद्दीबाहेर दाखवलं (किंवा पत्रकारांसमोर भाषण बूथपासून लांब अंतरावर केलं ) अशी मखलाशी केली तरी `टेलिकास्ट' हा नव्या प्रकारचा गुन्हा आहे; त्याला अंतराचं बंधन नाही. मोदी दोषी आहेत किंवा कसं ते यावरनं ठरेल : "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election. 6[126. Prohibition of public meetings during period of forty—eight hours ending with hour fixed for conclusion of poll.— (1) No person shall— (a)convene, hold or attend, join or address any public meeting or procession in connection with an election; or (b) display to the public any election matter by means of cinematograph, television or other similar apparatus; or (c) propagate any election matter to the public by holding, or by arranging the holding of, any musical concert or any theatrical performance or any other entertainment or amusement with a view to attracting the members of the public thereto, in any polling area during the period of forty-eight hours ending with the fixed for the conclusion of the poll for any election in the polling area. (2) Any person who contravenes the provisions of sub-section (1) shall be punishable with imprisonment for a term which may extend to two years, or with fine, or with both. (3) In this section, the expression "election matter" means any matter intended or calculated to influence or affect the result of an election.].

In reply to by श्रीगुरुजी

हे त्या दिव्य असीम सरोदेंचं (२५० रुपये दंडवाल्या) मत आहे का तुमचं? खरं तर निवडणूक आयोगनं FIR दाखल करण्यापूर्वी तुमचा (किंवा सरोदेंचा) सल्ला घ्यायला हवा होता!

In reply to by संजय क्षीरसागर

दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची भाषा व त्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळं स्वतःचंच खरं वाटतं. वरील ३ पैकी कोणतेही क्लॉज वाचले तरी कोणाच्याही सहज लक्षात येईल की मोदींनी कोणत्याही क्लॉजचे उल्लंघन केलेले नाही. तुमच्या लक्षात आले नसेल तर एखाद्या अ‍ॅ किंवा बॅ ला विचारा. तो/ती नीट समजावून सांगेल. मागच्याही प्रतिसादात तुम्ही "मोदींवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे" निवडणुक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे अत्यंत हास्यास्पद वाक्य लिहिले होते. मी "गुन्हा कधी सिद्ध झाला?" असे विचारल्यावर तुम्ही केजरीवालांच्या गंगाघाटावरील व राजघाटावरील मौनाप्रमाणे मौनात गेलात. आता तरी उत्तर द्या.

In reply to by श्रीगुरुजी

गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै समजणार. त्यासाठी प्रगल्भ राजकीय बुद्ध्यांक असावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला. >>> कधी सिद्ध झाला? या उत्तराची वाट पहात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो.
जर निवडणुक आयोग पुरावे देऊन हे सिद्ध करू शकले की मोदींच्या कृतीमुळे मतदारांवर परीणाम झाला आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते.
हे तुम्हीच म्हटलंय आणि (नशीबानं) बरोबर आहे, त्यावर आयोगानं म्हटलंय :
The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting."
पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं :
सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही.
पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास प्रचाराला बंदी आहे. बरोबर आहे. >>> गुन्हा झाल्यशिवाय (म्हणजे प्रचाराचा हेतू सिद्ध झाल्याशिवाय) निवडणूक आयोग FIR दाखल करायला सांगू शकत नाही इतकं तरी समजायला हवं. असं काही नाही. निवडणुक आयोगाने यापूर्वी अनेकांवर अनेक वेळा एफआयआर दाखल केलेला होता व नंतर न्यायालयाने तो एफआयआर रद्द केल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. २००९ मध्ये वरूण गांधींच्या विरूद्ध दाखल केलेला एफआयआर). निवडणुक आयोगाच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा अनेक जणांवर एफआयआर दाखल करून सुद्धा काहीही कारवाई ने केल्याची तसेच काहीही कारवाई न करता आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. निवडणुक आयोगाने दाखल केलेले एफआयआर अनेक वेळा राजकीय दडपणामुळे दाखल केलेले असतात. त्यात काहीही दम नसतो. मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे. निव्वळ एफआयआर दाखल केला म्हणून तुमच्या सारख्या अज्ञानांना आनंदाचे भरते आले आहे. काही दिवसातच तुमचा हिरमोड होणार आहे. >>> सकृत दर्शनी गुन्हा झाल्याशिवाय FIR दाखल करणं आयोगाच्या आंगलट येऊ शकलं असतं. निवडणुक आयोगाने दाखल केलेले अनेक एफआयआर न्यायालयाने पूर्वी रद्द केले आहेत. परंतु ते कधीही आयोगाच्या अंगलट आलेलं नाही. >>> कलम १२६ (अ) आणि (ब) ला बूथपासून अंतराची मर्यादा लागू होत नाही, ती १२६ (क) ला आहे. कुणी तरी कुडबुड्या वकील २५० रुपये दंड होईल म्हणून सांगतो आणि ते आपण इथे प्रकाशित करतो. अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे नामांकित वकील आहेत. दुर्दैवाने ते तुमच्या आकलनापलिकडचं आहे. त्यात तुमचा दोष नाही. >>> The Election Commission had said on Wednesday that "it is evident from Modi's tone and tenor that he made a political speech. He intended, calculated to influence voting." एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा tone and tenor कसा आहे हे सब्जेक्टिव्ह मत आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार टोन चे विश्लेषण बदलते. (उदा. केजरीवालांचा टोन त्यांच्या आंधळ्या भक्तांना प्रामाणिकपणाचा वाटतो. पण तटस्थ नागरिकांना तोच टोन ढोंगीपणाचा वाटतो.) त्यामुळे आयोगाच्या या मताला काडीमात्र किंमत नाही. त्यांनी राजकीय भाषण केले होते हे निखालस असत्य आहे. कारण पत्रकारांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. भाषण करणे व न बोलविता स्वतःहून आलेल्या पत्रकारांना उत्तरे देणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या आयोगाच्या आरोपाला टँजिबल पुरावे असल्याशिवाय काडीमात्र महत्त्व नाही. >>> पण मोदी इतके उद्दाम आहेत की ते आणखी दुसरा FIR दाखल करा म्हणतायंत. त्यांना बहुदा तुम्ही खाली म्हणतायं तसा भ्रम झालायं : सद्यपरिस्थितीत निवडणुक आयोग असे काहीही सिद्ध करू शकणार नाही. निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुक आयोग काम करतो हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळेच मोदींनी आव्हान दिले आहे. >>> पण त्यांची सेल्फी, टीवी प्रक्षेपण आणि मतदान संपण्यापूर्वी घेतलेली पत्रकार परिषद हे सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. स्वतःची सेल्फी काढणे हा जगातल्या कोणत्याही न्यायालयात गुन्हा समजला जात नाही. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो माध्यमांनी घेऊन माध्यमांनी प्रदर्शित केला होता. मोदींनी स्वतःचा फोटो प्रदर्शित केलेला नाही. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. टीव्ही प्रक्षेपण मोदींनी केलेले नाही. ते माध्यमांनी केलेले आहे. त्यामुळे मोदी यात दोषी नाहीत. मोदी फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ती पत्रकार परीषद नव्हती. मोदींनी पत्रकार परिषद बोलाविलेली किंवा घेतलीच नव्हती. पत्रकार स्वत:हून त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारून त्याचे प्रक्षेपण दाखविले गेले. जर यात कोणाचा दोष असेल तर तो माध्यमांचा व निवडणुक केंद्राजवळ माध्यमांना उपस्थित रहायला परवानगी देणार्‍या निवडणुक आयोगाचा आहे. मोदींचा यात दोष नाही. दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. असो. मोदींवर कारवाई होऊन शिक्षा होईल या अज्ञानाच्या आनंदात अजून काही काळ रहा.

In reply to by श्रीगुरुजी

दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही. आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?

In reply to by संजय क्षीरसागर

मोदी मूर्ख नाहीत १०० गजा पेक्षा दूर होते. बाकी निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांची रिपोर्ट पाहोल्या विना अत्यंत दबाव खालील FIR दर्ज करण्याच्या आदेश बहुतेक दिला गेला असावा. असाच दबाव प्रसार भारती वर पडला होता त्यांच्या अधिकार्याने कबूल नामा ही दिला. इच्छा नसताना ही आता मोदींचा ती मुलाकात आता कित्येक वाहिनीन वर कितीदा तरी पहावी लागेल. करायला गेलो आणि झाले एक अशीच परिस्थिती सूचना मंत्रींच्या उतावळे पण मुळे झाली.

In reply to by संजय क्षीरसागर

पोलीसांनी निर्वाळा दिला आहे की मतदान केंद्रापासून २०० मीटर पलिकडच्या भागात हा प्रकार घडल्याने तो गुन्हा ठरत नाही. बसा बोंबलत :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

कलम १२६ (अ) आणि (ब) ला अंतराची मर्यादा नाही. प्रचार झाला की नाही हा मुद्दा आहे. आधी नीट वाचता यायला हवं तर पुढे अर्थ कळण्याची शक्यता असते.

In reply to by संजय क्षीरसागर

दिलगीरी व्यक्त केली की निवडणुक आयोग मोठ्या मनानी सर्वांना माफ करतो. ह्या पेक्षा दोनदा मतदान करा हा सल्ला कितीतरी घातक होता. पण काही कारवाई झाली नाही.

असा मुलभूत प्रश्न मला सुनील अहिरराव यांना विचारावासा वाटतो. भारताचे निवडणूक पंच मन्डळ निपक्ष असल्याचे सिद्ध झालेले आहे . त्यांच्या देखरेखेखाली झालेल्या सर्व लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये मोदींनी विजय मिळवला आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा लोकांनी या जनमत कौलाचा आदर करावयास हवा. हिटलर अथवा मुसोलिनी असे मोदींना म्हणणार्या लोकांनी हे दोघे डिक्टेटर वारंवार निवडणुकीच्या अग्निदिव्यातून गेले नाहीत हे लक्षात घ्यावे. गेली दहा वर्षे केंद्र सरकार मोदींच्या मागे हात धुवून लागले आहे. एका मुख्यमंत्र्याची, खास संशोधक पथकाच्या (SIT ) अधिकार्यांनी, ११ तास उलट तपासणी केल्याचे दुसरे कुठले उदाहरण नाही. या तपासा नंतर सर्वोच्च न्यायालाने त्याना निर्दोष ठरवले. इतका तावून सुलाखुन निघालेला नेता दुसरा नाही. हा माणूस स्व्च्छ राजवट करणारा आणि निर्लिप्त आहे. असा कर्तृत्ववान माणूस या देशाला पन्तप्रधान म्हणून मिळाला तर देशाचे कल्याणच होईल. काही पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळी त्यांच्यावर टीका करत राहतील. पण हा ही एका निकोप लोकशाहीचाच भाग आहे.

In reply to by रमेश आठवले

जाऊद्या हो, नाही समजायचे त्या 'तथाकथीत काही बधीरबुद्धी, पूर्वग्रह दुषित किंवा आदर्शवादी मंडळीना तत्सम विचारजंताना'. त्यांच्या बुद्धिपलीकडले आहे ते. राज्यकरत्यानी फेकलेल्या उष्टया-खरकट्या तुकड्यांवर जगणार्‍यांकडुन यापेक्षा वेगळी अपेक्शा कशी करता येइल.

हे लफडं त्यांना महागात पडणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली (दोन वर्षांची) तर सिएमशीपही जाईल आणि उमेदवारीही रद्द होईल... मग पुन्हा चहाचं दुकान टाकायला लागेल.
दिवास्वप्ने फार पाहु नयेत माणसाने...कारण ती कधीही प्रत्यक्षात उतरत नाहीत. हा, जर केवळ स्वताचे आत्मसमाधानच करायचे असेल तर ती जरुर पहावीत.

व्हाला भाइ अने बेन, पोतानु आ विचार थये शे के मोदी उप्पर, कोरटमा पोलीस केस नाखवी जोईये. आ भाइ "चायवाला चायवाला" कहिने म्हारी अने बीजी म्हारे दस-अग्यार साथिदारोंनी चायनी लॉरी बंद करवी नाखी.

In reply to by मदनबाण

याचा विचार करतोय बराच वेळ! कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? असो, आपण आपले मनोरंजन करुन घ्यायचे मात्र! मदणबाण, व्हिडो भारी बरंका? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष ;)

In reply to by बाळकराम

कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी अब की बार मोदी सरकार असे शब्द घुसवून मोदींचा प्रचार करायची केविलवाणी वेळ यांच्यावर का बरे आली असेल? नाही म्हणजे, भारतात लोक नाही का सापडले ह्यांना? हॅहॅहॅ... काय आहे ना बाळ्या १० वर्ष राज्य करुन सुद्धा कॉग्रेसला देशाचा विकास साधता आला नाही ! इतके वर्ष राज्य करुन सुद्धा गरिबीच्या नावावर मते मागतात तर कधी गरिबीची रेखा शोधुन काढतात्. शिवाय यांच्या आणि यांच्या मित्र पक्षांच्या मंडळींनी भ्रष्टाराचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.आपल्या देशाच्या प्रंतप्रधानपदी इतकी दुबळी व्यक्ती इतके वर्ष आहे की त्यांची सार्‍या जगानेच टिंगल केली. आता मोदी शिवाय इतर सशक्त पर्यात दिसत नसल्याने निदान आफ्रिकन लोकांच्या मुखातुन आलेला संदेश तरी आपल्या देशातील लोकांच्या डोक्यात शिरेल असा कोणा हिंदूस्थानी माणसाच्या डोक्यात विचार आला असेल... तसेही साउथ आफ्रिका आणि आपल्या देशाचे गांधींजींमुळे विशेष नाते आहेच ना ? अजून असे काही श्वेतवर्णीय वा कृष्णवर्णीय सुंदरींना घेऊन केलेले प्रचारी व्हिडो असतील तर जरूर टाका. तेवढाच नेत्रसंतोष बाळ्या तुमची आवड कळली बरं का... *LOL* जाता जाता :- मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे, अबकी बार मोदी सरकारचा प्रचार जरीही मोठ्या प्रमाणात झाला असला तरी सुद्धा मोंदींसाठी हा रस्ता सोपा नाही.

In reply to by मदनबाण

>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा तर आत्ता कुठे सुरु झाली आहे तुमच्याकडं 'निकाल' आधीच लागले काय? ;)

In reply to by मदनबाण

"बाळ्या" का? वा वा चान, चान! शनिवारवाड्यासमोरच्या पुलावर कानकोरणी घेऊन बसतोस वाटतं तू, मदनबाण? नाही, म्हणजे संस्कार, अदब इ. चा वारापण तुला लागलेला दिसत नाही, म्हणून म्हटलं.

या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची?

In reply to by विजुभाऊ

"इंदीराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा" हे आठवले... ठाण्याला तर कांती कोळी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यावर नंतर पेपरात दुसर्‍या दिवशी या अर्थाचे वाचल्याचे आठवले: वरती स्वर्गीय इंदीराजींचे पोस्टर आणि ही घोषणा होती आणि खाली अक्षरशः देशी दारूचा पिंप होता ज्यातून बुंद बुंद गळत होते... *drinks*

In reply to by विजुभाऊ

या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने काय सिद्ध होते. अबकी बार भाजपा सरकार असे कधीच का म्हणत नाहीत हे भाजप वाले. त्यान्ना इतकी खात्री आहे की पक्षाचे नाव वापरले तर ते कधीच निवडून येणार नाहीत याची? काय इजुभाउ ? एक सशक्त विरोधी पक्ष म्हणुन गेल्या १० वर्षात भाजपा दिसला ? नाही ना ? मग नमो नमो माळ ओढण्या पलिकडे त्यांच्या हातात काय उरले ? अजुन समजवुन घ्यायचे असेल किंवा वेगळ्या भाषेत उत्तर हवे असेल तर अरनब गोस्वामीनी जी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे ती पहा... राज ठाकरेंनी या प्रश्नावर "व्यवस्थित" उत्तर दिलय बघा. बाकी मी कोणत्याच पक्षाचा समर्थक नाही, जो देशाची आणि देशातल्या लोकांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल त्याला माझे समर्थन नेहमीच असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तसही प्रतंप्रधानपदी बुजगावण असण्यापे़क्षा मोदी बरे असा इचार वरच्या क्लीप बनवणार्‍याच्या डोक्यात तर नसावा ना ?

वाईट मानू, कुठल्या ही विषयावर लिहिताना लेखकाने वास्तविकता काय होती ते जाणले पाहिजे. केवळ खोट्या प्रचाराला बळी पडून लेख लिहिला नाही पाहिजे. १. गुजरात दंगा ISI आणि स्थानीय त्यांच्या स्थानीय हितचिंतकांनी घडवून आणला होता. प्रतिक्रिया स्वरूप जवळपास ८५० मुस्लीम आणि २५० हिंदू ही मारल्या गेले होते. २. मोदी भारताचे एकमेव मुख्यमंत्री होते ज्यांनी दंगेखोरांवर सक्तीने कार्यवाही केली. ११६ च्या वर दंगेखोर मारल्या गेले त्यात ९०% हिंदू होते. निश्चित हे दंगेखोर भा ज प वाले नसतील अन्यथा मोदी पुढची निवडणूक जिंकले नसते. ३. मोदींच्या सक्ती मुळे गुजरात मध्ये शांतता पसरली आणि त्या मुळे विकास ही झाला. खर म्हणाल तर सेकुलर म्हणविणारे पक्ष अल्प्संख्कांचे खरे शत्रू आहेत म्हंटले तर ४. दिल्लीत ३५०० वर शीख मारल्या गेले पण एक ही दंगेखोर पोलिसांनी मारला नाही. ५. आत्ताच झालेल्या मुझफ्फरनगर भागातल्या दंगलीत ही पोलिसांनी एक ही दंगेखोराला मारले नाही. ६.महाराष्ट्रात ही १९९०-२००० काळात दंगे भडकले होते. पोलिसांनी किती दंगेखोरांना कंठस्नान घातले. (माहित काढा, सत्य कळेलच) ७. अल्पसंख्यकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांचे वोट घेणे म्हणजे सेकुलर वाद. त्या साठी त्यांना मागास ठेवणे ही रणनीती.

मोदींच्या बाबतीत असाच दबावाखाली एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे व काही दिवसातच तो केराच्या टोपलीत जाणार आहे.
हे गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर :
`निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे'
तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

हे गुजराथ नाही. अगदी अगदी! ये तो दिल्ली है! निवडणू़क आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणजे काही साधे प्रकरण नाही! ते २००९ पर्यंत (म्हणजे कोल गेट च्या सुमारास) उर्जा मंत्रालयाचे प्रमुख सचीव होते. नंतर ते निवडणूक आयुक्त आणि मग मुख्य आयुक्त झाले. जेंव्हा कोल गेट प्रकरण बाहेर आले तेंव्हा सि बी आय ने त्यांची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाला केली. पण आता ते मुख्यायुक्त असल्याने घटनासिद्ध पदी आहेत म्हणून त्यांची चौकशी करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"


In reply to by संजय क्षीरसागर

>>> गुजराथ नाही. थोडक्यात, तुमच्या या वक्तव्याला (तुम्ही कितीही प्रदीर्घ प्रतिसाद दिला असला तरी) कोणताही आधार नाही. बाकीची निरर्थक वाचाळता केवळ मोदीप्रेमा पोटी आहे. कुणी काय केलं होतं आणि त्याचं तेंव्हा काय झालं याचा `मोदींनी प्रचार केला (किंवा नाही)' याचाशी काहीही संबंध नाही. तुमची निराधार वाचाळता निव्वळ मोदीद्वेषापोटी आहे. न्याय हा व्यक्तिसापेक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्सेप्शन वर दिला जात नसून वस्तुनिष्ठ पुराव्यांवर दिला जातो. मोदींनी दंगल भडकावली असे कितीही जणांचे पर्सेप्शन असले तरी प्रत्यक्षात न्यायालयात या आरोपाच्या समर्थनार्थ आजतगायत तसूभरही पुरावा मिळालेला नाही. युपीए सरकार, अनेक स्वयंघोषित एनजीओ व नामवंत निधर्मांध गेली १२ वर्षे मोदींविरूध्द बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. पण न्यायालयात त्यांचे आरोप केव्हाच खोटे ठरले आहेत. निवडणुक प्रचारामध्ये मोदींवर केलेल्या आरोपांचे अगदी तसेच होणार आहे. दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत. असो. >>> असो, आपल्या विद्वत्तापूर्ण अनुभवानं जर : `निवडणुक आयोग हा दात, नख्या, सुळे इ. नसलेला वाघ आहे हे सर्व जगाला माहित आहे तसेच मोदींनाही माहित आहे' तर मग लोकशाहीला अर्थच नाही आणि निवडणूकांचा फार्स तरी कशापायी? मोदींसारख्या निब्बर माणसाला डायरेक्ट `तहहयात पंतप्रधान' घोषित करा की झालं! मोदींनी देखिल दुसरा FIR दाखल करा म्हणून फुशारकी मारलेली आहेच त्यावरनं त्यांची दंडेली दिसतेच. मग उगीच बचाव कशाला करता? एकदा दणका बसला की कळेलच. अज्ञानात सुखी रहा.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही म्हणता ते खरंय :
दुर्दैवाने तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा समजत नाहीत.
करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको.

In reply to by संजय क्षीरसागर

आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच शिल्लक आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

>>> करण थापरच्या इंटरव्यूत मोदींना बोलायला शब्द सापडत नाहीत, त्यांचा कंठ अवरुद्ध होतो, ते पाणी मागतात आणि मग सरळ स्टुडिओतून उठून जातात दुर्दैवाने तुमच्यासारख्या अल्पमती असलेल्यांना त्याचा अर्थ समजतच नाही. ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते. मोदी मुद्दाम ठरवून त्या मुलाखतीतून का निघून गेले याचे विश्लेषण अनेकांनी केले आहे. जरा गुगलून बघा. >>> याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो. खाचाखोचा न समजणारा माणूस असा उघड अर्थ काढतो. खाचाखोचावाल्यांना कोर्टाची शहानिशा लागते. तुम्हाला काहीच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत. मोदींनी आजतगायत स्वतःला कधीही अपराधी मानलेलं नाही, कारण ते दोषी नव्हतेच. अलिकडच्या काळात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी हेच सांगितलं की मी माफी वगैरे मागण्याचे नाटक करणार नाही. माझी चौकशी करा व मी दोषी असल्यास फाशी द्या. "याचा अर्थ ते स्वतःला अपराधी समजतात, त्यांचा विवेक त्यांना शर्मिंदा करतो." ही वाक्ये वाचूनच हसायला आलं आणि तुमच्या अज्ञानाची पुन्हा एकदा कीव आली. >>> इथे मोदी सरळ प्रचार करतायंत पण खाचाखोचावाले म्हणतायंत `प्रेसवाले आपणहून आलेत'. मग प्रेसवाल्यांना काय मोदींनी आमंत्रण दिलं होतं का? तुम्हाला काहीच कसं समजत नाही हो? >>> म्हणजे बलात्कार करुन वर `तीनंच मला भरीला घातलं' म्हणायच. (हो, आणि वर, फार झालं तर २५० रुपये दंड करा! ) प्रेसवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराची बलात्काराशी तुलना करणे म्हणजे जरा अतिच होत नाही का? म्हणजे "मी गरीब आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे नाहीत. माझ्या खिशात फक्त ५०० रूपये आहेत." असं मानभावीपणे सांगून दुसर्‍याच दिवशी अर्ज भरताना २.५ कोटींची मालमत्ता जाहीर केल्यासारखं आहे. >>>> फैजाबादमधे सरळ राममंदिराचा प्लॅन आणि रामाची छवि असलेल्या भव्य बॅकड्रॉपसमोर उभं राहून मोदी खुल्ला जातीवाद करतायंत पण खाचाखोचावाले म्हणणार, ते समुदायाकडे पाहतायंत. भारतात प्रभू श्रीरामांचे चित्र लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? आणि मशिदीत जाऊन जातीय दंगलीत सहभाग असलेल्या मुल्लामौलवींचे पाय धरणे, प्रचार करताना दर्ग्यावर चादर चढविणे, टोपीवर उर्दूवर काहीतरी लिहिणे, नमाजाची बांग ऐकू आल्यावर राष्ट्रगीतासारखी मानवंदना देणे हा काय सेक्युलर प्रचार आहे का? >>> मागचा बॅकड्रॉप कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. मोदी काही खिळे मारायला गेले नव्हते. काय चुकीचं आहे यात? मोदी काय स्वतःच्या सभेचं स्टेज स्वतः खपून तयार करतात का? >>> धन्य तो युक्तिवाद आणि धन्य ती वैचारिकता. धन्य ते तुमचे अज्ञान! >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. काँग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? (जमल्यास) लवकर बरे व्हा आणि (जमल्यास) मोठे पण व्हा!

In reply to by श्रीगुरुजी

इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्याप्रमाणे पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो, त्याप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती विचारपूर्वक केलेली असते.
शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by संजय क्षीरसागर

>>>> शाब्बास! पवार हे आपले आदर्श आहेत म्हटल्यावर मोदी असणारच यात नवल नाही. धन्य आहे तुमच्या अज्ञानाची! >>> ज्याप्रमाणे पवारांनी सारी हयात निव्वळ हवा बघून पाठ फिरवण्यात आणि काहीही करुन खुर्ची जपण्यात घालवली तसेच मोदी ऐनवेळी कुणालाही धोबीपछाड मारतात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात हे साम्य दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन! मोदी आणि पवार हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत नाही. दुर्दैवाने तुम्हाला हे समजतच नाही. यात तुमचा दोष नाही. (जमल्यास) लवकर मोठे व्हा आणि (जमल्यास) लवकर बरे व्हा.