Skip to main content

मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 27/04/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे. देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे. कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.

वाचने 25506
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता
रामाचा आणि जातीचा काय संबंध? की रामाचे भक्ती एकाच जातीतले लोक करतात?

In reply to by संजय क्षीरसागर

>>> इतक्या अंधभक्तीला आता उत्तरच नाही. उत्तर नाही म्हणताना मोठा पण निरर्थक प्रतिसाद लिहून गेलात. >>> ज्याला प्रत्येक गोष्टीला विश्लेषक लागतो त्यानं स्वतःची बुद्धी वापरायची नाही हे ठरवलेलंच असतं. कोणाला विश्लेषक लागतो? मोदींना? काहीतरीच काय? उलट मोदींच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण विचारवंत (!) भिंग लावून करत असतात. मराठी किंवा हिंदी बातम्यांच्या वाहिन्या बघा म्हणजे समजेल. >>> फासावर लटकवा ही भाषा फक्त व्यासपीठावरुन बोलायची तर्‍हा आहे हे अज्ञानी जनतेला कळेल तो सुदीन! जो माणूस संपूर्ण निर्दोष असतो तोच हे आव्हान देऊ शकतो. ज्या व्यक्तीविरूद्ध सर्व यंत्रणा व माध्यमे १२ वर्षॅ वापरून सुद्धा कणभरही दोष सापडला नाही तीच व्यक्ती असे आव्हान देऊ शकते. >>> त्यात पुन्हा, प्रेसवाले आम्ही बोलावले नव्हते, आम्ही फक्त भाषण ठोकलं, तस्मात प्रचार कसला? हा तर थोर युक्तीवाद आहे. अहो, खरंच आहे ते. प्रेसवाले तिथे मोदींच्या मागोमाग स्वतःहून गेले होते. केजरीवाल नदीवर टॉवेल गुंडाळून अंघोळीला जाताना, सर्वांच्या देखत आपल्या थोबाडीत मारायला सांगितलेल्या स्वतःच्याच पक्षाच्या व्यक्तीला भेटायला जाताना प्रेसवाले बरोबर घेऊन जातात. मोदींना असली नौटंकी करण्याची कधीही गरज भासलेली नाही. >>> रामाचा फोटो लावणं हा गुन्हा होतो की जातीनिर्देशकता हे देखिल समजण्याची क्षमता नसेल तर काय बोलणार? रामाचा फोटो लावणे ही जातीनिर्देशकता? धन्य आहे तुमची! >>> मोदी स्टेज तयार करत नाहीत पण किमान ज्या स्टेजवरुन आपण बोलतोयं त्याच्या मागे बॅकड्रॉप काय आहे हे कळत नसेल (नियोजित राममंदिराची छवि!) तर पुरता अंधार आहे. छबि स्टेजवर लावणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> शिवाय भाषणात पदोपदी रामनाम घेऊन लांगुलचालन केलेलं ऐकू आलं नसेल तर पारच बधिरता आली आहे. रामनाम घेणे हे घटनेच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरतो? >>> असो, काँग्रेस आणि बिजेपी एकाच माळेचे मणी आहेत हे विचारसरणीवरुन स्वच्छ दिसतंय. नाही. आप व काँग्रेस एकाचे माळेचे मणी आहेत. म्हणून तर त्यांचं साटंलोटं आहे. भाजप पूर्ण वेगळा आहे. >>> प्रत्येकाला बुद्धी असते पण वापरायची नाही असं ठरवणं ही वैयक्तिक आवड असू शकते. तुम्हाला बुद्धीच नसल्याने वापरायचा किंवा न वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

केवळ तुम्हीच उतरु शकता. त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. तेव्हा रहा भ्रमात.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला केवळ तुम्हीच उतरु शकता.
आँ????????? रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. उदाहरणादाखलः- http://www.misalpav.com/comment/502272#comment-502272 ह्यात तर तुम्ही फार त्या माणसाच्या कामाला "निम्न्स्तरावरील काम" वगैरे म्हणुन मो़कळे झालात..!!

In reply to by पिलीयन रायडर

तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच ग्रे म्याटर असतं तर मिपावर जिलब्या पाडणं सोडून अन्य कामंही करता आली असती, पण काये ना, वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं तरी ३१ जुलैच्या कामांचा दट्ट्या लागायचा तो लागलाच. सबब काय ते समजा ;)

In reply to by पिलीयन रायडर

>>> रुणुझुणूची सिरीज गदागदा हलवली तर पन्नास एक प्रतिसाद सहज मिळतील तुमचे.. लोकांची कुवत.. अक्कल..वगैरे वगैरे काढणारे.. यांचं म्हणजे "मी नाही बाई त्यातली, ..." असं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> केवळ तुम्हीच उतरु शकता. तुमचा नम्र स्वभाव आवडला. >>> त्या लेवलला जाऊन वाद घालण्यात अर्थ नाही. खरं तर अशा माणसाशी चर्चा करणं कालापव्यय असतो. मग कशाला इतका वेळ कालापव्यय केलात? >>> तेव्हा रहा भ्रमात. भ्रमात तुम्ही आहात. मी नव्हे. वेगवेगळ्या धाग्यांवर तुमच्या भ्रमाचा भोपळा अनेकांनी फोडलेला आहे. तुमच्यासारखी मंडळी कायमच भ्रमात असतात. बादवे, याच्या आधीच्या प्रतिसादात "तस्मात थांबतो" असे लिहिले होते. पण न थांबता पुन्हा एकदा लिहिण्याची सुरसुरी आलेली दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

- पवारांच्या प्रत्येक वाक्यात सूचक व गूढ अर्थ भरलेला असतो- पवारांच्या वाक्यांत ज्या लोकांना सूचक आणि गूढ अर्थ सापडतो, अशा लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला पहिल्यापासूनच अपार आदर वाटत आला आहे!

In reply to by श्रीगुरुजी

>>> >>> आता मोदींचा एकछत्री अंमल चालू झाला की निवडणूक आयोगाची वाट लागेलच, मग मशिन्स फक्त घरी आणायची आणि दिवसभर कमळाचं बटण दाबून संध्याकाळी परत करायची! म्हणजे पुन्हा प्रचार केला की नाही हा वादच नको. >>> ग्रेसने जेव्हा आपले पित्ते आयोगात घुसडले, तेव्हाच निवडणुक आयोगाची वाट लागली आहे. आता मोदी नवीन वाट काय लावणार? निवडणुक आयोग हा तटस्थ असतो असे म्हटले जाते. निवडणुक आयोग हा कदाचित तटस्थ असू शकेल, पण निवडणुक आयुक्त मात्र तटस्थ असतीलच असे नाही. विशेषतः जेव्हा सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने व सोयीच्या व्यक्ती त्या पदावर बसवितो, तेव्हा तटस्थपणाची अपेक्षाच करता येत नाही. गेल्या काही दिवसातील घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोदींनी बडोद्यातील मतदानानंतर स्वतःची सेल्फी काढताना माध्यमांनी त्यांचा फोटो टिपला व नंतर स्वतःहून आलेल्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आयोगाने अक्षरशः काही तासातच त्यांच्याविरूद्ध थेट एफआयआर दाखल केला. पण पप्पू अमेठीत मतदानाच्या दिवशी एक मतदार मतदान करत असताना थेट मतदान यंत्राशेजारी उभा असल्याचे ३ वेगवेगळे फोटो माध्यमांनी टिपलेले असताना पप्पूला मात्र हाच आयोग क्लीन चिट देउन मोकळा झाला. ३ दिवसांपूर्वी मोदींनी वाराणशीतील बेनियाबाग भागात सभेला व रोड शो करायला आयोगाने बंदी घातली. पण त्याच भागात दुसर्‍याच दिवशी पप्पू आणि अखिलेश यादवला रोड शो ला परवानगी दिली. आज निवडणुक आयोगाने भाजपच्या वाराणशीतील कार्यालयावर विनाकारण धाड घालून प्रचाराचे बिल्ले, टोप्या इ. जप्त केले. भाजप म्हणे या गोष्टी मतदारांना वाटणार होता. कालच प्रचार संपल्याने हे उरलेले साहित्य आहे असे भाजपने सांगून सुद्धा आयोगाने आपला हट्ट सोडला नाही. धाड टाकून साहित्य जप्त केल्यावर काही तासातच आयोगाने सर्व साहित्य परत दिले व भाजप प्रचारासाठी हे साहित्य वापरणार नसल्याची कबुली दिली. काँग्रेस, आप, सप, बसप इ. कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावर धाड टाकली असती तरी त्यात त्या पक्षाच्या प्रचाराचे उरलेले साहित्य मिळालेच असते. मग इतर पक्ष सोडून फक्त भाजपच्याच कार्यालयावर का धाड टाकली? मुद्दाम भाजपला बदनाम करणे व भीति दाखविणे हे दोनच उद्देश यामागे दिसतात. मी आधीच लिहिल्याप्रमाणे निवडणुक आयोग कदाचित तटस्थ असेल, पण निवडणुक आयुक्त तसे असतील अशी खात्री नाही.

In reply to by श्रीगुरुजी

या बाबतीत सहमत . EC हा काँग्रेसधार्जिणा असावा, महाराष्ट्रात मतदार संघ पुर्नरचनेत जाणत्या राजाची मतं घेऊन काम झाल्याची चर्चा होती.

Gujarat Land Acquisition Model is the Best: Commerce Ministry Report काँग्रेसच्या आनंद शर्मा या मंत्र्यांच्या अख्त्यारीतील क्रेंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज गुजरात मधील भूसंपादन पद्धतीला आदर्श पद्धत म्हणल्याचे आले आहे.

In reply to by विकास

हे आले मोदि भक्त :D ...अहो, बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. मोदिभक्तांना&%$#&*%&$# जातीयवाद%&$&-%$# आकलन &$&##मानसीकता*&#@&$& (आपापल्या वकुबाप्रमाणे ब्लाब्लाब्ला चा अर्थ लावावा हि विनंती :P )

In reply to by अर्धवटराव

डिसक्लेमरः आम्ही मोदी भक्त नसून अ आणि ब काँग्रेस भक्तांचे विचार मोदीत सॉरी मोडीत निघालेत हे सिद्ध करणारे विचारकृमीकिटक आहोत. :) बेस्ट म्हणजे 'सर्वात चांगली'...'आदर्श' नव्हे. ते ही खरेच म्हणा. आदर्श मधे चव्हाण साहेब आहेत. मोदी थोडेच! ;) :D

http://www.loksatta.com/desh-videsh-news/ishrat-jahan-encounter-no-pros… भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे सरचिटणीस आणि गुजरातमधील माजी मंत्री अमित शाह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी इशरत जहॉं चकमकप्रकरणी क्लिन चीट दिली. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. शाह यांच्याबरोबरच गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही आरोपींविरोधात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीच्या मोसमात शाह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनाही सीबीआयच्या भूमिकाचा फायदाच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इशरत जहॉं चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सीबीआयने आपली बाजू मांडली. या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिकाऱयांचा समावेश आहे. सत्यमेव जयते!

In reply to by श्रीगुरुजी

ते तुम्ही काही म्हणा... पण अरविंद केजरीवालच एकमेकाव्दितीय... कोणिही मारो त्यांना थप्पड बेदम फिर भी इस बंदे मे ही है दम. *dash1*

आज टाईम्स ऑफ इंडीया मधे आलेल्या बातमीनुसार मोदी सरकारला युपिए सरकारकडून विविध प्रकारची २८५ बक्षिसे/प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यातला काही ठळक भाग खालील प्रमाणे:
Modi's case for his governance is perhaps spurred by the awards that the Gujarat government has received since 2004, which amount to more than 285. Among these are seven Prime Minister's awards, 82 conferred by various central government departments, and 172 by well-known national and international agencies for performances in various development areas. Over the past few years, under the Congress-led UPA rule, the Gujarat government got the Prime Minister's award for best water and sanitation management in rural areas, housing development for poor urban people, and for best practices in controlling maternal and infant mortality. In 2010-11, the Government of India's department of administrative reforms and public grievances and the department of information technology awarded Modi's office (the Chief Minister's Office) best practices award for people-oriented services. The Gujarat Urban Development Department has bagged several central government awards for the BRTS, implementation of reforms norms, and for the seven-point charter of JnNURM. Other awards the state won include those for transportation, solid waste management, and water supply projects.
आता यावरून मोदींना केवळ business friendly असे लेबल लावायचे का? यात प्रश्न परत मोदीसमर्थनाचा नाही तर आपल्याला न आवडणार्‍या व्यक्तीस काय वाट्टेल ते करून बदनाम करणे हे योग्य आहे का, हा आहे. सध्या आंधळ्या मोदीभक्तीपेक्षा आंधळा मोदीद्वेषच उतू जाऊ लागला आहे असे वातावरण आहे. असो.

९व्या टप्प्यातल्या फक्त ४१ जागा बाकी असताना सरकार आणि प्रशासन यांच्याविरोधात अचानक सूडाचं राजकारण करण्याचं कारण जाणण्यासाठी नरेंद्र मोदींचं अमेठीतलं भाषण यु-ट्युबवर पहायला हवं. अमेठी आणि रायबरेलीत विरोधी पक्षांनी ताकदवान उमेदवार उभा न करण्याचा, महत्त्वाच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार न करण्याचा आणि गांधी घराण्यातील उमेदवारांवर थेट टीका न करण्याचा एक संकेत होता जो अटल बिहारी वाजपयी आणि लाल कृष्ण आडवाणींनीही पाळला होता. पण नरेंद्र मोदींनी तो साफ धुडकावून लावला. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-and-varansi बोस्टन विमानतळावर पप्पू ला पकडले होते. १ लाख डॉलर कॅश बाळगली होती म्हणून. तेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते. त्यांनी पप्पूला सोडवले. हे वरच्या लेवलचे नेते सगळे मैत्री बाळगून असतात आपसात. खाबुगिरी करण्यात पण. मोदी नक्कीच वेगळे आहेत. सहिष्णू राजकारण खूप झाले. पवार साहेब नेहमी महाराष्ट्रच्य सहिष्णू राजकारणाचे गोडवे गात असतात. आता मोदी सारखा असहिष्णू नेताच पाहिजे आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन होऊ शकतो पण त्यावर पक्ष चालवता येत नाहीत. तुम्ही विधान सभेची निवडणूक दिल्लीत लढवली दिल्लीच्या वीज ,पाणी ह्या मुलभूत प्रश्नाला हात घातला म्हणून तुम्हाला आता यश मिळाले. आता लोक सभेसाठी सार्या देशभर निवडणुका लढवणार तेव्हा लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या पक्षाची आर्थिक , परराष्ट्र , सांस्कृतिक , सामाजिक ,धार्मिक धोरणे प्रभावी पणे जनतेच्या समोर अजून आप ने मांडली नाही. केजू फक्त व्यक्तिगत हल्ले करत होता. एका मुलाखतीत खाजगीकरणाला त्याचा विरोध आहे हा मुद्दा त्याने वगळायला सांगितला कारण ह्या विरोधाचे कारण तांत्रिक असून ते आता सांगण्याचा वेळ नसल्याने उगाच मध्यमवर्गीयांचा रोष नको अशी चालबाजी करत होता. अरे बाबा तुझे तांत्रिक मुद्दे जनतेला कधी सांगणार का तुझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन तू तांत्रिक मुद्दे आहेत असे करणार तुझे विचार जनतेपुढे मांडणाताना संधार्भासाहित स्पष्टीकरण देणे द्याला गरजेचे वाटत नाही. ह्याउलट मोदी गेल्या दीड वर्षापासून त्यांचे पर्यटन ते इतर आर्थिक , शैक्षणिक धोरणे काय आहेत हे विविध ठिकाणी भाषणातून नुसते सांगितले नाही तर गुजरात मध्ये त्या संबंधी काय केले ह्याचे उदाहरण दिले. आज केजू सरकार बनवणार नाही बनवणार दोघेच राहुल किंवा मोदी आता शेवटी शेवटी ह्या दोघांची पंगा घेऊन प्रसार मध्यांना चालणार नाही त्यामुळे कधी केजू , कधी राज असे तत्कालीन गल्ला भरायला प्रसार माध्यमांना चालतात. मात्र दीर्घ काळासाठी बिग शॉट वर लक्ष द्यावे लागते. आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही मोदी मे हे दम मोदी हे सिंघम लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

आज भारताच्या एका राज्यांचा मुख्यमंत्री त्याने आपली भूमिका बदलली नाही मात्र त्याच्या कर्तुत्वाने भारून आता इयु व अमेरिका त्याच्या संबंधी आपली भूमिका बदलत नाही
लोकांना हस्तक म्हणताना आपल्याला लोकांनी हस्तक ठरवले हे त्याच्या ध्यानात आले नाही
नेम्कं काय म्हन्नं हाय ?

In reply to by विकास

दिसतोय विकासराव?!! ;) पण गटारामुळे येणार्‍या घाणीला ईनो काय करणार? तिथे रुमाल पाहिजे जो मी नाकाला लावून बसलोय आधीच, त्यामुळे सल्ल्याबद्दल थँक्स बट नो थँक्स!

गुजरात मध्ये करून दाखवलं . आणि खरेच करून दाखवलं . शिवसेने सारखे नाही , नुसते होर्डिंग पुरते. अटल किवा अडवाणी सारखे सर्वसमावेशकतेचे ( थोडक्यात सेटिंग बाजी ) राजकारण करणार नाहीत हि खात्री. खूप सोसले आहे देशाने. आता कोण तरी कट्टर कडवा माणूस पाहिजे सर्व स्तरावरची लढाई लढायला. मग तो लढा भ्रष्टाचार , पाकिस्तान , काश्मीर प्रश्न नाहीतर अजून काहीही असू दे. आणि झटपट निकाल लावायची क्षमता. जी नमो मध्ये आहे. हेच खरे महत्वाचे प्लस point आहेत नमोचे. विधान सभे मध्ये चित्र नक्कीच वेगळे असणार आहे,