Skip to main content

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

लेखक जिन्क्स यांनी बुधवार, 26/09/2012 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते). "टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो. सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा... सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स

वाचने 22133
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

सकाळ नेहमीच अती मवाळ / सावध धोरण घेत आलेला आहे. त्यात सध्या त्याची मालकी बारामतीकरांकडे आहे. त्यामुळे सकाळ च्या अशा बातम्यामधे नवे काही नाही सकाळ चा आणखी एक वैचारीक गोंधळ म्हणजे त्याना स्वतःला आपण राष्ट्रीय्/प्रादेशीक की स्थानीक वृत्तपत्र आहोत हे ठरवता येत नाही. त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम मवाळ स्थानीक बातम्या मग राज्यातील महत्वाच्या बातम्या ( उदा: मंडईत दुरड्यांची मोठी आवक / शनिवारपेठेत कॅफेवर धाड / ढोलेपाटलांचे नाव स्थायी समितीत / नागपुरात हळदी-कुंकु कार्यक्रम संपन्न / दिल्लीत खाद्य जत्रा / रवांडा / बुरुंडीच या राष्ट्राध्यक्षांची श्रीलंका / जमेका भेट / ओबामांच्या पोटात दुखू लागले ) असा अनुक्रम असतो. अर्थात हे सर्व जहिरातींमधून जागा शिल्लक राहिल्यास केले जाते. सातार्‍यात अभियम्ता दिनानिमित्त सकाळ ने जी विषेष पुरवणी प्रकाशीत केली होती त्यात विश्वेष्वरय्या यांच्या बद्दल दोन कॉलम पाच सेमी ची एक बातमी. आणि बाकी इतर उरलेली ३.७५ पाने अभिनंदनाच्या जहिरातीच होत्या. ( त्याही दादा/बापू यांच्या अभिनंदनाच्या जास्त)

सकाळ मधील पैलतीर हे अनिवासी भारतीयांसाठी असलेले सदर ही खूपच चांगली संकल्पना आहे. अनिवासी भारतीयांचे लेख व निवासी भारतीयांचे परदेश वारीचे लेख व ह्याहून खमंग व चुरचुरीत अश्या ह्या लेखांवर येणाऱ्या इरसाल पुणेकरांच्या प्रतिक्रिया वाचून ह ह पु आ होते.

In reply to by मानस्

अरे बापरे सकाळ ने माझा लेख चुकून पैलतीर मध्ये छापला वाटते. http://www.esakal.com/esakal/20111020/5284324873040486271.htm आपण ही चूक माझ्या लक्षात आणून दिली धन्य आहात तुम्ही पैलतीर ह्या शब्दाचा नवीन एखादा अर्थ शोधावा म्हणतो.

In reply to by निनाद मुक्काम …

आपला लेख वाचला छान आहे दारु या विषयावर अनेक लेख वाचायला मिळतात पण ते सगळे जरा दिखाऊ असतात. आपला लेख मात्र आशय आणि भाषा दोन्ही दॄष्टीने उत्तम.

'धरणात पाणी नाही तर *तू का' हे अजित पवारांचं वाक्य किंवा ते असल निर्लज्ज काही बोलले याबद्दल सकाळने बातमी दिली नव्हती. मात्र दुसर्या दिवशी 'वादग्रस्त' विधानाबद्दल शरद पवारांनी टोचलेले कान, अजित पवारांची दिलगिरी, आत्मक्लेश याबद्दलच्या बातम्या होत्या.अजित पवारांनी काय तारे तोडले याचा पुसटसा पण उल्लेख नव्हता. अग्रलेख लिहून अजित पवारांना उपदेशहि केला होता. पवारांच्या शाई पुसून दोनदा मतदान कराच्या सल्ल्याबाबत पण बहुदा असेच घडले.

ह्या वरुन आयडीया आली "आपण मिसळपाव टाईम्स हा पेपर सुरु करायचा का " :प

In reply to by प्रसाद गोडबोले

मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे!!! -पिवळा बबन

In reply to by खटपट्या

मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.

In reply to by बाबा पाटील

मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.
१००% सहमत!!! आपण तर त्याना इथे मिपावर सॉल्लिड मिस करतो!!! ----------------------------------------------------------------------- मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे - पिवळा बबन

बकाल पेपर छानच असतो, विशेषतः ते महीला सबलीकरण... आणि महीला आत्मनिर्भरीकरण, महिला बचतगट सगळं खूपच गोड असतं... झाशीची राणी येवून शपथ देते म्हणे गावोगावच्या महिलांना फोट्टू असतो ना पेप्रात

In reply to by नानासाहेब नेफळे

सर्वोत्कृष्ट विनोद म्हणता नाही येणार पण वस्तुस्थितीवरच दाहक व्यंग म्हणून ह्या विडंबनाकडे बघू शकतो. धन्यवाद

काही नाही हो. मराठी व्याकरणात तीन प्रकारचे प्रयोग आहेत. कर्तरी, कर्मणी व भावे. वेगवेगळी वर्तमानपत्रे हा प्रयोग त्यांच्या वाक्यावाक्यांतून करत असतात. त्याच्या आनंद घ्यायचा. मी लहान होतो तेव्हा खाडीलकरांचा नवाकाळ ग्रेट वाटायचा. मधेच लोकसत्ता आवडायला लागला. अधेमधे लोकमतही आवडत होते. अगदी थोड्या काळाकरीता "पत्र नव्हे कुत्र" ही आवडत होतं. चालायचं. वयोमानानुसार वेगवेगळ्या हिरोईन आवडतात तसचं आहे हे ! :)

लहान तोंडी मोठा घास, पण धर्मराजमुटके तात्या, बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण बद्दल, आपल्याला काय वाटायचे त्यावेळी ? आवडायचा का ?

In reply to by खटपट्या

पैसे देऊन लोकसत्ता आणी ऑनलाईन इतर सर्व. मटा, नवशक्ती, टाईम्स. नवशक्ती त्यातल्या त्यात चांगला आहे.

सकाळ चेही तेच होइल जे युनायटेड वेस्टर्न बँकेचे झाले. पवार ,पुतणे आणि त्यांच्या चेल्यानी उर्जितावस्थेतील युनायटेड वेस्टर्न बँकेला पद्धतशीर पणे लुटून कसे दिवाळे वाजवले ,यावर एक चांगला लेख मागे लोकसत्ता त आला होता.....