✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

ज
जिन्क्स यांनी
Wed, 09/26/2012 - 01:15  ·  लेख
लेख
ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते). "टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो. सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा... सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21954 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

निर्बुद्ध?

श्रीरंग_जोशी
Wed, 09/26/2012 - 01:40 नवीन
आवडत्या वृत्तपत्राबाबत तुमच्या भावना समजू शकतो पण निर्बुद्ध हे विशेषण काही पटले नाही बुवा. तुम्ही जे म्हणताय ते करायला तर अधिक बुद्धिमान लोक लागतील.
  • Log in or register to post comments

सोप्पं आहे..!

सुहास
Wed, 09/26/2012 - 05:32 नवीन
ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? सोप्पं आहे..! पेपरवाल्याला सांगून तो बंद करायचा...! देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते). धिस इज अ पवार ग्रुप पेपर.. बाय द वे, लोकमतच्या दर्डांची बातमी वागळेंनी कुठे दाखवली होती...? असो.. मला वाटते, भोचक यांची स्वाक्षरी आठवते का? "काय? तुम्ही पत्रकार आहात..? कोणत्या पक्षाचे..?" --सुहास
  • Log in or register to post comments

लोकमत ने दर्डांची बातमी लोकमत

भरत कुलकर्णी
Wed, 09/26/2012 - 17:37 नवीन
लोकमत ने दर्डांची बातमी लोकमत मध्ये निश्चित छापली होती. अगदी सिबीआय चा छापा पडल्याचेही छापल्याचे आठवते. त्यातल्या त्यात आताशा लोकमत चांगलाच येतो आहे. दिव्य मराठी एकदम बकवास वाटतो आहे. स्थानिक बातम्यांना महत्व कमी अन उत्तर भारतीय जास्त. त्यांच्या पुरवण्यांचे लेख मात्र छान असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

लेका तुला वाटलं तर बन्द कर की

आशु जोग
Wed, 09/26/2012 - 05:34 नवीन
लेका तुला वाटलं तर बन्द कर की सकाळ आग्रह आहे का कुणाचा अगं अगं म्हशी ...
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ...

जिन्क्स
Wed, 09/26/2012 - 11:21 नवीन
अहो बंदच करणार होतो...पण सवय झाली आहे हो. काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

च्यायला लोकांना चहा/कॉफी

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 16:01 नवीन
च्यायला लोकांना चहा/कॉफी लागते 'तिकडे' नीट होण्यासाठी. तुम्ही 'सकाळ' खाता का पिता?? << संपादित.>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

हॅ हॅ हॅ...

इष्टुर फाकडा
गुरुवार, 09/27/2012 - 14:03 नवीन
काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. .....नळीत होते का बघा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

सकाळी सकाळी हातात 'सका'ळ

पक पक पक
गुरुवार, 09/27/2012 - 17:36 नवीन
सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. सकाळ हातात घेता ..? मग बसता कशावर..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

सोड रे तो सकाळ

आशु जोग
गुरुवार, 09/27/2012 - 23:34 नवीन
सोड रे तो सकाळ त्याची सुरळी कर धागाकर्त्याने फारच टेन्शन घेतलेले दिसते... मुन्नाभाई एम बी बी एस पहावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

>> काय आहे ना की सकाळी सकाळी

आशु जोग
गुरुवार, 09/27/2012 - 23:37 नवीन
>> काय आहे ना की सकाळी सकाळी हातात 'सका'ळ घेतला नाही कि 'तिकडे' सुरळित होत नाही. << जिन्क्स साहेब याचा नेमका अर्थ काय ? संपादक हे असले प्रतिसाद स्वतः धागाकर्त्यानेच टाकावेत हे बरे नव्हे. विषयाचे गाम्भीर्य नष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

अय्या गडे ! मग इथे अशे धागे

शिल्पा ब
Wed, 09/26/2012 - 21:02 नवीन
अय्या गडे ! मग इथे अशे धागे कशे काढणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार

जिन्क्स
गुरुवार, 09/27/2012 - 11:19 नवीन
इथे अशे धागे कशे काढणार? - आणि तुम्ही असंबंध प्रतिसाद कशे देणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सहमत टू जिन्क्स..

मृगनयनी
गुरुवार, 09/27/2012 - 11:54 नवीन
सहमत टू जिन्क्स.. "सकाळ"चा पूर्वीचा दर्जा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो.. पूर्वी "नानासाहेब परूळेकरांनी" पुण्यात सुरु केलेले वृत्तपत्र.. म्हणून सकाळ'कडे आदराने पाहिले जायचे. "सकाळ"मधली भाषा, मांडणी, उच्चस्तरीय विनोद हे प्रॉपर पुणेकरांना साजेसेच होते.... पण नन्तर पुण्यात बाहेरचे लोक्स येऊ लागले.. आणि पुण्यातच स्थाईक होऊ लागले. . . व मूळचे पुणे कुठेतरी हरवत गेले......त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले.. असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला... पवारांनी परूळेकरांच्या "सकाळ"ला काबीज केल्यामुळे तसेच विजय कुवळेकरांसारख्या मान्यवरांनी "सकाळ"ला सोडचिठ्ठी दिल्यापासून "सकाळ"चा दर्जा खरोखर ढासळत चाललेला आहे...असेच वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

"सकाळ"मधली भाषा, मांडणी,

धन्या
Wed, 04/23/2014 - 23:13 नवीन
"सकाळ"मधली भाषा, मांडणी, उच्चस्तरीय विनोद हे प्रॉपर पुणेकरांना साजेसेच होते.... पण नन्तर पुण्यात बाहेरचे लोक्स येऊ लागले.. आणि पुण्यातच स्थाईक होऊ लागले. . . व मूळचे पुणे कुठेतरी हरवत गेले......त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले.. असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला...
माणूस किती कोत्या मनोवृत्तीचा असू शकतो याचं उत्तम उदाहरण. पुण्याभोवती भींत का नाही बांधून घेतली "प्रॉपर" पुणेकरांनी? अशी भींत बांधली असती म्हणजे "बाहेरचे लोक्स" पुण्यात आले नसते. मुळचे पुणे हरवले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

पुण्याची भिंत ? :)

आत्मशून्य
Fri, 04/25/2014 - 03:30 नवीन
चीनच्या भिंतीला जबरा स्पर्धा भेटली असती न्हाई ... ? अन त्यावरच्या पाट्या म्हणजे कहर च..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आणि मग या पुण्याच्या

धन्या
Fri, 04/25/2014 - 10:52 नवीन
आणि मग या पुण्याच्या भींतीवरील "उच्चस्तरीय" विनोद असलेल्या पाटयांचे उच्चस्तरीय दर्जा असलेल्या सकाळमध्ये फोटो छापून आले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

ढॅण्टढॅण....

बॅटमॅन
गुरुवार, 04/24/2014 - 01:13 नवीन
मृगनयनी बाई या मिपाच्या दिग्विजयसिंग आजपासून. आपण तर बॉ फिदा झालो यांवर. ताजमहाल आहे नुस्ता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

वरती पाजळलेले अनेक

मृगनयनी
Fri, 04/25/2014 - 10:49 नवीन
वरती पाजळलेले दिवे पाहून नाईलाजाने इथे प्रतिक्रिया द्यावी लागत आहे:- मुळात "ताजमहाल" ही वस्तुतः मुस्लिमांची अमानत नसून आग्रा येथे जाट लोकांनी बांधलेले "शिव-मंदिर" आहे. आग्रेश्वर- तेजाजी शिवमंदीर !!!! सध्याच्या ताज-महालाची बांधणी, वास्तुकला, भिंतींची रचना इ. गोष्टी या हिन्दु पद्धतीच्या आहे. व मुस्लिमांना ज्या ठिकाणी दफन केले जाते, त्या ठिकाणाला "महल" असे कधीच संबोधले जात नाही. औरंगजेब, शहाजहांन.. इ. राजांनी हिन्दु धर्म नष्ट करण्याच्या उद्देशाने अनेक मंदिरे उध्वस्त केलीत. परन्तु त्या मन्दिरांपैकी "तेजो-महाला"चे सौन्दर्य पाहून त्यांनी तो स्वतः'च्या "कामा"साठी वापरला. असो... सांगायचा उद्देश इतकाच आहे, की सध्या ज्याला ताज-महाल संबोधले जाते... ते परमशिवाचे पवित्र स्थान असून तेजो-महालाचा ताजमहाल झाल्याने त्याचे महत्व व पावित्र्य कमी होत नाही. : इथे उगीच टिवटिव करणार्‍यानी ताज-महालाचा पूर्व-इतिहास जाणून घेतला तर बरे होईल. त्याचप्रमाणे या धाग्यावर आम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी आमच्या मनोवृत्तीवर टीका करणारे लोक.. इथे पाहून आम्ही "धन्य" जाहलो!!!.. असो.. आपल्याला कळले असेलच.. की प्रॉपर पुणेकर आणि बाहेरचे यांच्या ज्ञान व माहिती यांत किती फरक आहे!!! पुण्याबाहेरून आलेल्या काही अर्धवट लोकांमुळेच पुण्याचे जास्त नुकसान होत आहे.. हे मात्र खरे!!!! (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्याचप्रमाणे या धाग्यावर

धन्या
Fri, 04/25/2014 - 11:04 नवीन
त्याचप्रमाणे या धाग्यावर आम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी आमच्या मनोवृत्तीवर टीका करणारे बुद्धिमांद्य आलेले- लोक.. इथे पाहून आम्ही "धन्य" जाहलो!!!..
त्याचे काय झाले, तुमची ही मुक्ताफळे हा धागा आता दिड वर्षांनी वर आल्याने आमच्या वाचनात आली. हल्ली असं मी कुणाला उत्तर देत नाही. मात्र तुमचा तो "पुणे शहर ही आमच्या घराण्याची जहागीरी होती" अशा आविर्भावातील प्रतिसाद वाचून आम्हीही "धन्य" झालो. म्हटलं, खरडावे चार शब्द आपणही. :) तुमच्या लिखाणावरुन तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रातील जाणकार असाव्यात असे वाटते. ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात माऊलींनी म्हटलं आहे,
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३ ॥
अपल्याकडून तरी अशा लिखाणाची अपेक्षा नव्हती. असो. मोठे व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मृग नयनी,

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 12:23 नवीन
मृग नयनी, पेशवाईत पुण्यात आलेल्यांनी निजामशाहीपासून पुण्यात आलेल्यांवर बाहेरचे इ.इ. टीका करणे म्हणजे हाईटच झाली, नै? बाकी ताजमहालाबद्दलचे अज्ञानही वाखाणण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बाबा सावध रे बैटमैन....!

आत्मशून्य
Fri, 04/25/2014 - 16:07 नवीन
मृगनयनीG ना घाबरून राहण्यातच भलाई आहे असे माझ्या कडिल त्यांच्या एका प्रतिसादाचा स्क्रीन शॉट सांगतो. अवांतर:- माझ्याकडिल या खाजिन्याचे (तेच हो अदृश्य झालेले साद-प्रतिसाद) एखादे जालिय प्रदर्शन भरवावे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जालिय प्रदर्शन

आदूबाळ
Fri, 04/25/2014 - 18:29 नवीन
जालिय प्रदर्शन
भरवाच. माझी "विश लिस्ट" पाठवू का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

माझी "विश लिस्ट" पाठवू का?

आत्मशून्य
Sat, 04/26/2014 - 00:43 नवीन
माझी "विश लिस्ट" पाठवू का?
"विश लिस्ट" ? माझे आणी इतर सदस्यांचे असे (धागे, वयनी, खरदी) साद-प्रतिसाद ज्यात हमखास अद्रुश्य होण्याचे तडाखेबंद पॉटेन्शीअल माझ्या नजरेतुन आहे तेवडेच स्र्किन शॉट मी घेउन तारिखवार सेव करत आलेलो आहे (निव्वळ हौस, मौजमजा आणी २ टीबी जागा उपलब्ध आहे म्हणूनच). परंतु असले स्गळेच प्रतिसाद माझाकडे उपलब्ध असतीलच असे मात्र नाही, त्यामुळे विशलिस्ट कितपत पुरी करता येइल याबाबत शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

विणोदाचा क्षीन प्रयत्ण केला

आदूबाळ
Sat, 04/26/2014 - 14:20 नवीन
विणोदाचा क्षीन प्रयत्ण केला हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हा हा हा, जालीय प्रदर्शन

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 18:37 नवीन
हा हा हा, जालीय प्रदर्शन भरवावेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

ओ स्क्रीन शॉट मला पाठव रे!

प्यारे१
Fri, 04/25/2014 - 18:40 नवीन
ओ स्क्रीन शॉट मला पाठव रे! सुरुवातीची 'सुरुवात' आम्हीच नारळ फोडून केलेली. इतना हक तो बनता ही है हमरा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

संपादक महोदय काय करु ?

आत्मशून्य
Sat, 04/26/2014 - 00:34 नवीन
ही व्यनीत लिंक देउ की... ? इथेच डाकवु ? स्क्रिनशॉटची ? माझ्या आकाउंटला यामुळे काही धक्का लागणार नाही ना ? @प्रशांतG
इतना हक तो बनता ही है हमरा.
नक्किच. असो आज वाट पाहुया संपादक काय म्हणतात ते, अन्यथा उद्या पर्यंत स्क्रिनशॉटची लिंक सर्वानाच उघड करेन. बाकी हे विवीध (व जुने) अद्रुश्य साद-प्रतिसाद जाम नोस्टेल्जिक करतात बुआ. खरोखर कलादालनाची शोभा वाढवण्या इतका भारी साहित्य प्रकार आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ लिंक आम्हांसही द्या. पायजे

बॅटमॅन
Sat, 04/26/2014 - 00:48 नवीन
ओ लिंक आम्हांसही द्या. पायजे तर व्यनि तरी कराच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अरेरे. इथे आपलं घोर अज्ञान

अनाम
Fri, 04/25/2014 - 13:32 नवीन
अरेरे. इथे आपलं घोर अज्ञान पाहून एक मिपाकर असल्याची शरम वाटली. समोरच्याला प्रत्यूत्तर न करता आपण केवळ अन् केवळ असबंध बडबड करत आहात हे कदाचित आपल्याला ठाऊक नसावं. आधीच जातीवाचक, प्रादेशिक अस्मितेच्या प्रतिसादांतून आपल्या एकूण अगाध बुध्दीचे प्रदर्शन करत लोकांना विनाकारण भडकवत तर आहातच पण लोकांचे छान मनोरंजनही करत आहात. आपल्या एकुण लिखानावरून आपण प्रचंड धार्मिक असल्याचं दिसून येतंय. मग त्यासंबंधी लोकांचं ज्ञान वृध्दींगत करणारे लिखान करा ना! का उगा असले बाष्फळ प्रतिसाद टाकून आपल्या मर्यादा उघड करताय? असो. सुज्ञ असाल तर शांत बसाल, आणि नसाल तर चालूच ठेवा तुमच्या बाललीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

या प्रतिसादातले नक्की काय

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 14:11 नवीन
या प्रतिसादातले नक्की काय संपादित केले गेले? बराचसा आक्षेपार्ह मजकूर आहे तसाच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

याला म्हणतात +व अ‍ॅटिट्यूड!!

आदूबाळ
Fri, 04/25/2014 - 18:30 नवीन
याला म्हणतात +व अ‍ॅटिट्यूड!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 18:38 नवीन
;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तथाकथित श्रेष्ठत्वाचा

lakhu risbud
Fri, 04/25/2014 - 20:20 नवीन
पुण्यात जसे तथाकथित श्रेष्ठत्वाचा अभिमान लावणारे जन्मतात तसेच मंडईच्या एका कोपऱ्यात जन्मणारी श्वानवंशीय प्रजा सुद्धा स्वतःचे जन्मगाव पुणे सांगू शकते. मला एक कळत नाही, पुण्यात जन्माला यात तुमचे काय कर्तृत्व ? तुम्ही कोणत्यातरी दुर्गम,दुष्काळी भागात जन्माला आला असतात तरी त्या मध्ये सुद्धा काही कर्तृत्व असले असते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आमच्या नंतर एक दीड शतकाने

मालोजीराव
Fri, 04/25/2014 - 11:25 नवीन
आमच्या नंतर एक दीड शतकाने पुण्यात आलेले लोक हे आधीपासून पुण्यात असलेल्यांना आणि नंतर पुण्यात आलेल्यांना उपरे समजतात ;) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठ्ठो एकच मारा पण क्या मारा

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 12:20 नवीन
ठ्ठो =)) एकच मारा पण क्या मारा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

धाग्याचे काश्मिर होणे ,

जेपी
Fri, 04/25/2014 - 12:42 नवीन
धाग्याचे काश्मिर होणे , धाग्यावर मंत्र बसणे या नंतर आत धाग्याचा ताजमहल होणे ही नविन म्हण सुरु करावि .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जेपीशी शमती दाखवनारा

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 12:45 नवीन
मी पयला =)) अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

श्री श्री श्री 840 बॅटमॅन

जेपी
Fri, 04/25/2014 - 17:49 नवीन
श्री श्री श्री 840 बॅटमॅन यांचे 'मी पयला ' क्लब मध्ये हार्दिक स्वागत. शुभेच्छुक -जेपी आणी समस्त 'मी पयला' क्लब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(मोहरून जाऊन वगैरे) धन्यवाद!!

बॅटमॅन
Fri, 04/25/2014 - 18:39 नवीन
(मोहरून जाऊन वगैरे) धन्यवाद!! बाकी या क्लबाचे आद्य प्रणेते मध्यवर्ती जागेत राहणारे श्री श्री श्री रा रा रा मुवि यांनाही धन्यवाद देतो. जेपीजी(इमेजवाले नै) तरुण नेतृत्व असल्याने त्यांनाही धन्यवादच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

त्याबरोबरच टिपिकल पुणेरी

आत्मशून्य
गुरुवार, 04/24/2014 - 02:53 नवीन
त्याबरोबरच टिपिकल पुणेरी पत्रकारही हरवून गेले.. असो... या हरवत जाणार्‍या पुण्याबरोबरच सकाळ'चा दर्जाही हरवत गेला... पवारांनी परूळेकरांच्या "सकाळ"ला काबीज केल्यामुळे तसेच विजय कुवळेकरांसारख्या मान्यवरांनी "सकाळ"ला सोडचिठ्ठी दिल्यापासून "सकाळ"चा दर्जा खरोखर ढासळत चाललेला आहे...असेच वाटते...
यावर जाणकारांनी प्रकाश जरुर टाकावा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आमचा प्रतिसाद तुमच्या धागा

शिल्पा ब
गुरुवार, 09/27/2012 - 19:46 नवीन
आमचा प्रतिसाद तुमच्या धागा काढण्याशीच संबंधीत आहे पण किमान या निमित्ताने आपण विद्वान असल्याचा पुरावा मिळाला हे नसे थोडके. नै का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

धागाकर्त्याशी सहमत.पण सामना

अप्रतिम
Wed, 09/26/2012 - 09:10 नवीन
धागाकर्त्याशी सहमत.पण सामना आणि सकाळ ची तुलना करू नका.सामना हे शिवसेनेचे अधिकृत व्रुत्तपत्र आहे तर सकाळ स्वतंत्र आणि निरपेक्श्तेच्या मुखवटा लावलेले बारामतीकरांचे प्रचारपत्र आहे.
  • Log in or register to post comments

आज ते

चौकटराजा
Wed, 09/26/2012 - 09:33 नवीन
आज सकाळ हे बारामतीकरांचे मुखपत्र असले तरी सकाळ पूर्वी परूळेकरांपासूनच बोटचेपे वृत्तपत्र आहे. गोय़ंकांचे धाडस तेथे कधीच नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्रतिम

तरीही

चिरोटा
Wed, 09/26/2012 - 11:07 नवीन
पुण्यात घराघरात सकाळ का वाचला जातो हे न उलगडणारे कोडे आहे.
  • Log in or register to post comments

का म्हणजे?

आनन्दा
Wed, 09/26/2012 - 11:10 नवीन
सकाळ हा चविष्ट पेपर आहे. आनन्दा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

असहमत. पुणे टाईम्स आणि

बॅटमॅन
Wed, 09/26/2012 - 12:57 नवीन
असहमत. पुणे टाईम्स आणि संध्यानंदपेक्षा अधिक चविष्ट पेपर दुसरा असूच शकत नाही असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मसालेदार "चा"विश्ट्पणा हवा

टवाळ कार्टा
Wed, 04/23/2014 - 18:02 नवीन
मसालेदार "चा"विश्ट्पणा हवा असेल तर मुम्बै सन्ध्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दह्नयव्द तवल क्रर्त सुच्नेसथि

बॅटमॅन
Wed, 04/23/2014 - 18:23 नवीन
दह्नयव्द तवल क्रर्त सुच्नेसथि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

थ्यन्कु

टवाळ कार्टा
Wed, 04/23/2014 - 18:41 नवीन
थ्यन्कु =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा.हा.हा...

मदनबाण
Wed, 04/23/2014 - 18:51 नवीन
हा.हा.हा... ;) एकदा वेळ जात नव्हता म्हणुन एका एसटी बस स्टॅडवर वाचण्यासाठी काही मिळते का ते पाहत होतो... तेव्हा एक पेपर विक्रेता पोट्टा दिसला. त्याला हाक मारली आणि जवळ बोलवले. त्याच्याकडे असलेल्या अनेक वर्तमान पत्रात काय निवडावे हे समजेना...मग विचार केला नेहमी तेच तेच वॄत्तपत्र काय वाचायचे ? काहीतरी हटके वाचायला हवे.मग त्याच्याकडे पोलिस टाईम्स दिसला. घेतला आणि बस मधे जाउन बसलो.गाडी सुरु होताच पेपर वाचायला सुरुवात केली. पहिली ठळक बातमी होती डोक्यात वरवंटा घालुन खुन... मग दुसर्‍या पानावर गेलो तर त्यावर बातमी होती विळीने गळा कापला ! च्यामारी मी मनात म्हणालो की हा पोलिस टाईम्स आहे की मर्डर टाइम्स ? त्यानंतर चुकुनही तो पेपर कधी हातात घेतला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा