✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

ज
जिन्क्स यांनी
Wed, 09/26/2012 - 01:15  ·  लेख
लेख
ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते). "टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो. सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा... सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21954 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

त्यांचे मथळे "विळीने कापला

खटपट्या
Wed, 04/23/2014 - 23:54 नवीन
त्यांचे मथळे "विळीने कापला गळा, चला आता पळा" असे काहीसे असतात. लेख लिहिणारे बहुतेक नवकवी असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@@पुण्यात घराघरात सकाळ का

स्पा
Wed, 09/26/2012 - 11:14 नवीन
@@पुण्यात घराघरात सकाळ का वाचला जातो हे न उलगडणारे कोडे आह@@@@ >>पुणेरी अभिमानातील* काही निवडक गोष्टीत. "सकाळ" चाही नंबर लागत असावा *हलका, नम्र विनोद होता.. संबंधितांनी कृपया हलके घ्यावे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

असहमत !

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/26/2012 - 11:54 नवीन
>>पुणेरी अभिमानातील* काही निवडक गोष्टीत. "सकाळ" चाही नंबर लागत असावा अतिशय चुकीचे विचार. सकाळची 'रद्दी' महिन्याच्या शेवटी किती उपयोगाला पडते हे तुम्हाला काय कळणार ? तसेच सकाळच्या बर्‍याच पुरवण्यांचे पेपर हे गुळगुळीत आणि चांगल्या दर्जाचे असल्याने दुध दुभत्याच्या कपाटात वापरता येतात. मित्रांकडून चोरुन आणलेल्या पुस्तकांना कव्हर म्हणून देखील ह्याचा खूप उपयोग आहे. लोड शेडिंगच्या काळात पंखा म्हणून देखील दर्जेदार उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ही जुनी गोष्ट आहे. आता मटा,

प्रसाद१९७१
Wed, 04/23/2014 - 18:24 नवीन
ही जुनी गोष्ट आहे. आता मटा, लोकसत्ता, अगदी लोकमत पण घेतात लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

खीक्क

स्पा
Wed, 09/26/2012 - 11:58 नवीन
@@@सकाळची 'रद्दी' महिन्याच्या शेवटी किती उपयोगाला पडते हे तुम्हाला काय कळणार ? तसेच सकाळच्या बर्‍याच पुरवण्यांचे पेपर हे गुळगुळीत आणि चांगल्या दर्जाचे असल्याने दुध दुभत्याच्या कपाटात वापरता येतात. मित्रांकडून चोरुन आणलेल्या पुस्तकांना कव्हर म्हणून देखील ह्याचा खूप उपयोग आहे. लोड शेडिंगच्या काळात पंखा म्हणून देखील दर्जेदार उपयोग होतो. @@@@ ह्या ह्या .. हो.. माझ्याकडे अशीच रद्दी हिंदुस्तान times ने सुद्धा जमते .. वार्षिक १९९ रुपयात मस्त ४०० पर्यंत रद्दीचे पैसे येतात .. शिवाय.. पेपर वाचायला मिळतो तो वेगळाच फायदा
  • Log in or register to post comments

घाटे का सौदा!

साती
Fri, 09/28/2012 - 09:12 नवीन
१९९ रुपयांत रद्दीचे ४०० पैसे? बहोत घाटे का सौदा है. सकाळ लावा किमान ४० रु. तरी येतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

संध्यानंद सुरु करा

sagarpdy
Wed, 09/26/2012 - 12:01 नवीन
संध्यानंद सुरु करा
  • Log in or register to post comments

अत्रे उवाचं...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 13:07 नवीन
प्र. के. अत्रे एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते, 'सकाळचा उपयोग फक्त 'सकाळी'च विशेष होतो.'
  • Log in or register to post comments

सकाळ चांगला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 16:38 नवीन
वर सर्वांनी म्हटलंय ना, सकाळ आवडत नाही तर मला दै. सकाळ आवडतो, कोणाचं काय म्हन्नं आहे. :) पेप्रावाले आपल्या आपल्या धंद्याच्या हिशोबाने काम करतात त्यात दै.सकाळवाल्यांनी दैनिकांच्या परंपरा वग्रै मोडाव्यात असं मला वाटत नाही, जे चाललं आहे, ते बरं आहे, नव्हे उत्तम आहे. पेप्रांची तुलना करायची असेल तर मराठीतलं कोणता पेपर सॉरी दैनिक घ्यावं म्हणजे सकाळची तुलना होईल. दै. लोकमतने पाहा. मा.श्री अजित दादांचा कसा डोळ्याचे चिपडे काढतांनांचा फोटो टाकला आणि वर लिहिलं 'पवार पाय उतार' खालची बारीक ओळ 'सिंचन भ्रष्टाचाराचे आरोप भोवले'. तुलनेत सकाळनं पाहा अजितदादांचा काय प्रसन्न चित्र टाकलंय.(अहाहा.) आणि शीर्षकही संपादकांची म्याचुरिटी दाखवते 'अजित दादांचे राजीनामास्त्र बारीक ओळीत ''नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी घेतला निर्णय.'' (छापील पेप्रात लाईकचं बटन असतं तर क्लिक केलं असतं असो) तर दोन दैनिकांच्या या दोन बातम्यांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की लोकमतला राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रसन्न चेहरे दाखवण्याचा नेहमी कंटाळा येतो[पाहा तटकरे, भुजबळांचे काय ?] तुलनेत सकाळने दर्डांचे [कोळशांच्या प्रकरणात] फोटो चांगले टाकले आहेत. सकाळ पेपर कसा स्वच्छ असतो बातम्या असो नसो त्याला पाहावं वाटतं लोकमतचं तसं नाही. दै. सकाळचं संपादकीय दै. लोकमतच्या तुलनेत चांगलं सुस्पष्ट मत व्यक्त करणारं असतं. लोकमतचं तसं नाही, डचकत डचकत आलेलं ते संपादकीय असतं. असो. अजून खूप बारीक सारिक तुलना करुन मत मांडलं असतं. पण, टंकाळा आला. टीपः दै. सकाळचा मी पत्रकार, लेखक, संपादक, वगैरे नाही. माझी दै. सकाळची कोणतीही एजन्सी वग्रै नाही. दै. सकाळ आंतरजालावर बाजू मांडण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन देत नाही. धन्यवाद. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खपवलेल्या बातम्या ते समूह व्यवसाय

मैत्र
Wed, 09/26/2012 - 16:59 नवीन
यावर बरंच पूर्वी मिपावर पण लिहून झालं आहे. एक साधी युक्ती सांगतो. कधीही सकाळ किंवा इ-सकाळ वाचताना अगदी सरळ डोक्यात जाईल अशा तर्‍हेची एकांगी बातमी असेल - उदा. कुठला तरी राष्ट्रवादीचा बळंच उदो उदो, संबंध नसताना मोदींना अमुक प्रकरण कसे भोवले, काँग्रेसची कशी गोची झाली आहे इ. बरेचदा काही बातम्या आणि मजकूर वाचून हे इतकं apparently उघडपणे दिसतं की याला मुखपत्र का म्हणू नये हा प्रश्न पडतो. अशा वेळी त्या बातमीचा स्त्रोत पहा - ९९% वेळा - सकाळ न्यूज नेटवर्क - हा असतो, इतर वेळा अनंत बागाईतकर किंवा उत्तम कांबळे! अतिशय दर्जेदार पुरवण्या आणि विकांताची वाट पहायला लावणारा सकाळ फॅमिली डॉक्टर आणि इतर अतिशय फेकू पुरवण्या काढून पार बकवास झाला आहे. पण कागद, स्वच्छ आणि वाचनीय प्रिंट, चांगली मांडणी यामुळे सवयीने वाचला जातो. कित्येक वर्ष लोकसत्ता पुण्यात केवळ aesthetics मुळे मार खात होता. आणि स्थानिक बातम्यांच्या अभावामुळे. हळूहळू त्यानेही स्थान मिळवले आहे विशेषतः काही प्रमाणात नि:पक्षपाती (सुमार राव सोडून) आणि मुख्यतः उत्तम पुरवण्या आणि इतर लेख. प्रा.डॉ.: अजितदादांची बातमी अशा तर्‍हेने छापली आहे की मुळात आरोप खोटाच आहे. खरं खोटं न्यायालय / सरकार ठरवेल ना.. सकाळने कुठल्या आधारावर विधान करावे आणि कशासाठी? लोकमत कडे फक्त दर्डा आहेत, दर्जा नाही.. त्यामुळे त्याला बाजूला ठेवलेलंच बरं. सकाळने वृत्तपत्र यापलिकडे जाऊन जो समूह निर्माण केला आहे ते त्यांचं अतिशय उत्तम व्यावसायिक धोरण आहे आणि यशाचं कारणही. ज्याला business ecosystem म्हणावी अशा पद्धतीने, सकाळ, साम, मधुरांगण, बालाजी तांबे आणि फॅमिली डॉक्टर, बालकुमार चित्रकला स्पर्धा, पुस्तके - चिंटू / ढिंग टांग - ब्रिटीश नंदी, इतर, जागर नागरिक मंच आणि इतर बर्‍याच लहान गोष्टी यातून एक सकाळ ब्रँड आणि साखळी तयार केली आहे जी व्यवसाय म्हणून कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 17:15 नवीन
सकाळने वृत्तपत्र यापलिकडे जाऊन जो समूह निर्माण केला आहे ते त्यांचं अतिशय उत्तम व्यावसायिक धोरण आहे आणि यशाचं कारणही. ज्याला business ecosystem म्हणावी अशा पद्धतीने, सकाळ, साम, मधुरांगण, बालाजी तांबे आणि फॅमिली डॉक्टर, बालकुमार चित्रकला स्पर्धा, पुस्तके - चिंटू / ढिंग टांग - ब्रिटीश नंदी, इतर, जागर नागरिक मंच आणि इतर बर्‍याच लहान गोष्टी यातून एक सकाळ ब्रँड आणि साखळी तयार केली आहे जी व्यवसाय म्हणून कौतुकास्पद आहे. +१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ह्या मात्र खरा हाय !

चौकटराजा
गुरुवार, 09/27/2012 - 08:49 नवीन
" सकाळ" या वर्तमानपत्राचे सोडा .हा सकाळचा व्यावसायिक गट जो तयार झाला आहे. त्याचे कौतुक करावेच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

सन्जयखान्डेकर
Mon, 10/01/2012 - 12:42 नवीन
तसेही माझ्या महितीत संपुर्ण नि:पक्ष असे एकही व्रुत्तपत्र किंवा वाहीनी नाही, सर्वच कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, काही उघड तर काही छुपे, किमान उघड संबंध असणारे बरे, नाहीतर कोण कोणाकडुन काय काय खावुन / घेवुन कोणत्या बातम्या देतील भरवसा नाही. सकाळ किमान पुरवण्यांसाठी तरी वाचावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाट

१.५ शहाणा
Wed, 09/26/2012 - 21:17 नवीन
सकाळ हा पवार कुटुबाचा भाट आहे. तो विरोधि बातमि छाप्णार नाहि.
  • Log in or register to post comments

>> पुणे टाईम्स आणि

आशु जोग
गुरुवार, 09/27/2012 - 01:23 नवीन
>> पुणे टाईम्स आणि संध्यानंदपेक्षा अधिक चविष्ट पेपर दुसरा असूच शकत नाही असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे << संध्यानंद आता पूर्वीचा राहीला नाही, पूर्वीचं पुणही राहीलं नाही सकाळची हेडींग पहा म्हणजे कळेल संध्यानंदचे मार्केट का डाऊन झाले
  • Log in or register to post comments

हे घ्या ...

मैत्र
गुरुवार, 09/27/2012 - 03:38 नवीन
संपादकीय !! अजितदादांचा दणका http://www.esakal.com/esakal/20120927/4680348099663574360.htm "केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत आघाडीचे "यूपीए' सरकारही हादरून गेले." "अखेरीस आपला "आतला आवाज' शिरोधार्य मानून अजितदादांनी राजीनामा दिला." "पण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतलेली समंजस भूमिका पाहता तूर्त तरी त्यांचे मनोरथ पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. " "94-95 मध्ये शरद पवार यांच्यावरही खंडीभर आरोप झाले होते आणि ट्रकभरून पुरावे आणण्याच्या गोष्टी केल्या गेल्या होत्या; पण त्यातून काहीच निघाले नाही. केवळ आरोपांचा धुरळाच उडाला. शरद पवारांनी रोज आरोपांना उत्तर देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर आरोप केले तरच विरोधक स्वतःकडे लक्ष वेधू शकतात, अशी त्या काळातील स्थिती होती." अजून काय लिहायचं बाकी ठेवलंय.. आणि हे नेहमीचे यशस्वी बातमीदारः "दादांच्या राजीनाम्याने भाजप बुचकळ्यात" - सकाळ न्यूज नेटवर्क
  • Log in or register to post comments

संपादक

चिरोटा
गुरुवार, 09/27/2012 - 12:51 नवीन
संपादक सुमार केतकरांसारखाच वाय.झेड. आहे. नशीब! अजितदादाच्या राजिनाम्याने सगळे जग हादरले नाही म्हंटलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ओ त्यांनी

इरसाल
गुरुवार, 09/27/2012 - 13:14 नवीन
कशाला म्हणायला पायजे. ओबामा म्हटला ना की त्याची भिस्त आता मुंबईतील तरुणांवर आहे म्हणुन हाच तो जग हादरल्याचा पुरावा. हाय काय नी नाय काय. बादवे हे वाचले काय तुम्ही.....http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252251:2012-09-26-17-01-08&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 पहिल्या ३ ओळी गौर करने लायक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

निरपेक्ष पत्रकारीतेकरीता मी

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 09/27/2012 - 11:38 नवीन
निरपेक्ष पत्रकारीतेकरीता मी 'दैनिक बोंबाबोंब(पत्र नव्हे ,धगधगते अग्निकुंड(म्हंजे काय रे भाऊ?(कंसातले कंसाबद्दल क्षमस्व))) 'ऑनलाईन सुरु करण्याचा विचार करत आहे .तिथे प्रत्येकाच्याच नावाने निरपेक्ष बोंब मारली जाईल.विशेष म्हणजे मी ,म्हणजेच'टीनपाट अग्रलेखांचा अनभिषिक्ट सम्राट' तिथे दररोज संपादकिय लिहीण. मिपाकर पार्टनरशिप करतील काय?
  • Log in or register to post comments

मिपाकर पार्टनरशिप करतील काय?

अभ्या..
गुरुवार, 09/27/2012 - 13:49 नवीन
मिपाकर पार्टनरशिप करतील काय? >>>> मी तर तयार आहे. मी दररोज एक कुणाच्या तरी अस्मिता दुखावणारे (धगधगणारे )व्यंगचित्र देत जाईन. तुम्ही जामीनाची रक्कम तयार ठेवा.लगेच मात्र देऊ नका. (मी मिडियाप्रसिध्द झाल्यावर मानधन/पर्सेंटेज तेवढे वाढवायचे बघा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

सकाळ नेहमीच अती मवाळ / सावध

विजुभाऊ
गुरुवार, 09/27/2012 - 18:19 नवीन
सकाळ नेहमीच अती मवाळ / सावध धोरण घेत आलेला आहे. त्यात सध्या त्याची मालकी बारामतीकरांकडे आहे. त्यामुळे सकाळ च्या अशा बातम्यामधे नवे काही नाही सकाळ चा आणखी एक वैचारीक गोंधळ म्हणजे त्याना स्वतःला आपण राष्ट्रीय्/प्रादेशीक की स्थानीक वृत्तपत्र आहोत हे ठरवता येत नाही. त्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम मवाळ स्थानीक बातम्या मग राज्यातील महत्वाच्या बातम्या ( उदा: मंडईत दुरड्यांची मोठी आवक / शनिवारपेठेत कॅफेवर धाड / ढोलेपाटलांचे नाव स्थायी समितीत / नागपुरात हळदी-कुंकु कार्यक्रम संपन्न / दिल्लीत खाद्य जत्रा / रवांडा / बुरुंडीच या राष्ट्राध्यक्षांची श्रीलंका / जमेका भेट / ओबामांच्या पोटात दुखू लागले ) असा अनुक्रम असतो. अर्थात हे सर्व जहिरातींमधून जागा शिल्लक राहिल्यास केले जाते. सातार्‍यात अभियम्ता दिनानिमित्त सकाळ ने जी विषेष पुरवणी प्रकाशीत केली होती त्यात विश्वेष्वरय्या यांच्या बद्दल दोन कॉलम पाच सेमी ची एक बातमी. आणि बाकी इतर उरलेली ३.७५ पाने अभिनंदनाच्या जहिरातीच होत्या. ( त्याही दादा/बापू यांच्या अभिनंदनाच्या जास्त)
  • Log in or register to post comments

सकाळ मधील पैलतीर हे अनिवासी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 09/27/2012 - 23:40 नवीन
सकाळ मधील पैलतीर हे अनिवासी भारतीयांसाठी असलेले सदर ही खूपच चांगली संकल्पना आहे. अनिवासी भारतीयांचे लेख व निवासी भारतीयांचे परदेश वारीचे लेख व ह्याहून खमंग व चुरचुरीत अश्या ह्या लेखांवर येणाऱ्या इरसाल पुणेकरांच्या प्रतिक्रिया वाचून ह ह पु आ होते.
  • Log in or register to post comments

पैलतीर नाही हो,मुक्तपीठ ते

मानस्
Fri, 09/28/2012 - 14:23 नवीन
पैलतीर नाही हो,मुक्तपीठ ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अरे बापरे सकाळ ने माझा लेख

निनाद मुक्काम …
Fri, 09/28/2012 - 15:42 नवीन
अरे बापरे सकाळ ने माझा लेख चुकून पैलतीर मध्ये छापला वाटते. http://www.esakal.com/esakal/20111020/5284324873040486271.htm आपण ही चूक माझ्या लक्षात आणून दिली धन्य आहात तुम्ही पैलतीर ह्या शब्दाचा नवीन एखादा अर्थ शोधावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस्

आपला लेख वाचला छान आहे

आशु जोग
Sat, 09/29/2012 - 00:18 नवीन
आपला लेख वाचला छान आहे दारु या विषयावर अनेक लेख वाचायला मिळतात पण ते सगळे जरा दिखाऊ असतात. आपला लेख मात्र आशय आणि भाषा दोन्ही दॄष्टीने उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

धरणात पाणी नाही तर..

दुश्यन्त
Wed, 04/23/2014 - 18:19 नवीन
'धरणात पाणी नाही तर *तू का' हे अजित पवारांचं वाक्य किंवा ते असल निर्लज्ज काही बोलले याबद्दल सकाळने बातमी दिली नव्हती. मात्र दुसर्या दिवशी 'वादग्रस्त' विधानाबद्दल शरद पवारांनी टोचलेले कान, अजित पवारांची दिलगिरी, आत्मक्लेश याबद्दलच्या बातम्या होत्या.अजित पवारांनी काय तारे तोडले याचा पुसटसा पण उल्लेख नव्हता. अग्रलेख लिहून अजित पवारांना उपदेशहि केला होता. पवारांच्या शाई पुसून दोनदा मतदान कराच्या सल्ल्याबाबत पण बहुदा असेच घडले.
  • Log in or register to post comments

छान लेख

प्रसाद गोडबोले
Wed, 04/23/2014 - 23:33 नवीन
ह्या वरुन आयडीया आली "आपण मिसळपाव टाईम्स हा पेपर सुरु करायचा का " :प
  • Log in or register to post comments

झालाच पाहिजे!!

पिवळा डांबिस
Wed, 04/23/2014 - 23:41 नवीन
मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे!!! -पिवळा बबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिसळपाव टाईम्स चा संपादक कोण

खटपट्या
Wed, 04/23/2014 - 23:57 नवीन
मिसळपाव टाईम्स चा संपादक कोण असावा यावर मिपाकरांचे मतदान घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आमचं मत्त सरांना

आदूबाळ
गुरुवार, 04/24/2014 - 00:08 नवीन
आमचं मत्त सरांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

तात्याला परत बोलवा.

बाबा पाटील
गुरुवार, 04/24/2014 - 11:54 नवीन
मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

>>>व्यासंगी उचित उपमा!

प्यारे१
गुरुवार, 04/24/2014 - 13:17 नवीन
>>>व्यासंगी उचित उपमा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

++++१

पिवळा डांबिस
Fri, 04/25/2014 - 02:19 नवीन
मिसळपाव टाईम्स जर काढणार असाल तर तात्या अभ्यंकारांना परत बोलवा त्यांच्या इतके व्यासंगी अग्रलेख कोनी देणार नाही.
१००% सहमत!!! आपण तर त्याना इथे मिपावर सॉल्लिड मिस करतो!!! ----------------------------------------------------------------------- मिसळपाव टाईम्ससकट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे - पिवळा बबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

ते गेले का पण??? कसले जबराट

टवाळ कार्टा
Fri, 04/25/2014 - 09:24 नवीन
ते गेले का पण??? कसले जबराट लेख आहेत त्यांचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

...

आशु जोग
गुरुवार, 04/24/2014 - 10:29 नवीन
बकाल पेपर छानच असतो, विशेषतः ते महीला सबलीकरण... आणि महीला आत्मनिर्भरीकरण, महिला बचतगट सगळं खूपच गोड असतं... झाशीची राणी येवून शपथ देते म्हणे गावोगावच्या महिलांना फोट्टू असतो ना पेप्रात
  • Log in or register to post comments

आजकालच्या सगळ्या पेपरांमध्ये

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 04/24/2014 - 11:52 नवीन
आजकालच्या सगळ्या पेपरांमध्ये तटस्थ आणि निष्पक्ष राहणारा एकच पेपर आहे.. . . . . . ....टॉयलेट पेपर
  • Log in or register to post comments

धन्यवाद

माहितगार
गुरुवार, 04/24/2014 - 11:57 नवीन
सर्वोत्कृष्ट विनोद म्हणता नाही येणार पण वस्तुस्थितीवरच दाहक व्यंग म्हणून ह्या विडंबनाकडे बघू शकतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

या सकाळ च काय करायच ?

धर्मराजमुटके
Fri, 04/25/2014 - 00:31 नवीन
काही नाही हो. मराठी व्याकरणात तीन प्रकारचे प्रयोग आहेत. कर्तरी, कर्मणी व भावे. वेगवेगळी वर्तमानपत्रे हा प्रयोग त्यांच्या वाक्यावाक्यांतून करत असतात. त्याच्या आनंद घ्यायचा. मी लहान होतो तेव्हा खाडीलकरांचा नवाकाळ ग्रेट वाटायचा. मधेच लोकसत्ता आवडायला लागला. अधेमधे लोकमतही आवडत होते. अगदी थोड्या काळाकरीता "पत्र नव्हे कुत्र" ही आवडत होतं. चालायचं. वयोमानानुसार वेगवेगळ्या हिरोईन आवडतात तसचं आहे हे ! :)
  • Log in or register to post comments

लहान तोंडी मोठा घास

पगला गजोधर
Fri, 04/25/2014 - 10:23 नवीन
लहान तोंडी मोठा घास, पण धर्मराजमुटके तात्या, बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण बद्दल, आपल्याला काय वाटायचे त्यावेळी ? आवडायचा का ?
  • Log in or register to post comments

माहित नाही बॉ !

धर्मराजमुटके
Fri, 04/25/2014 - 10:46 नवीन
त्यावेळी आम्ही जिवंत नव्हतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

सद्या कोणते वर्तमानपत्र वाचता

खटपट्या
Sat, 04/26/2014 - 04:09 नवीन
सद्या कोणते वर्तमानपत्र वाचता आपण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पैसे देऊन

धर्मराजमुटके
Sat, 04/26/2014 - 09:50 नवीन
पैसे देऊन लोकसत्ता आणी ऑनलाईन इतर सर्व. मटा, नवशक्ती, टाईम्स. नवशक्ती त्यातल्या त्यात चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सकाळ चेही ...

उडन खटोला
Sat, 04/26/2014 - 08:16 नवीन
सकाळ चेही तेच होइल जे युनायटेड वेस्टर्न बँकेचे झाले. पवार ,पुतणे आणि त्यांच्या चेल्यानी उर्जितावस्थेतील युनायटेड वेस्टर्न बँकेला पद्धतशीर पणे लुटून कसे दिवाळे वाजवले ,यावर एक चांगला लेख मागे लोकसत्ता त आला होता.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा