Skip to main content

जर मोदी पंतप्रधान झाले तर....

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 21/04/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे. मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल. अशावेळी एक मतदार म्हणून त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल. मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही) - भ्रष्टाचार निर्मुलन - महिला सुरक्षा - महागाईच्या दरावर नियंत्रण व घट - काळा पैसा परत आणणे - टॅक्स रिफॉर्म्स - खाणींची लायसन्स वाटप करणे - लोकपालाची अपाँटमेंट - शस्त्रास्त्र खरेदी - पाकिस्तानशी युद्ध -- पाकिस्तानशी संबंध सुधारणे - चीनशी युद्ध -- चीनशी संबंध सुधारणे - राम मंदीर निर्माण - निर्मल गंगा अभियान - पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे - पोटा सारखा कायदा आणणे - नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे - निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे - बालकल्याण योजना राबवणे - शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे - आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - पर्यावरणाकडे लक्ष देणे - आर&डी कडे लक्ष देणे - शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे - वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे - इतर (स्पष्ट करा) आता तुम्हाला यापैकी कोणती पाच कामे मोदींनी सर्वात प्राधान्याने हाती घ्यावीशी करावीशी वाटतात? ती कामे त्यांनी कशी करावी? असे तुम्हाला वाटते तेही लिहा आणि त्या पाच कामांनाही प्राधान्यक्रमाने लावा. तुम्ही निवडलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे महत्त्वाची नाहित असे नाही पण जेव्हा तुम्ही मोदी पंतप्रधान होतील असे म्हणता / समजता तेव्हा त्यांनी कशाला प्राधान्य द्यावे यावर विचार केला असेलच. चला तर येऊ द्या तुमचे प्राधान्य क्रम. लक्षात ठेवा हा क्रम फक्त मोदी पंतप्रधान झाले तर तुमच्या अपेक्षांव्वर आधारित आहे इतर नेत्यांसाठी तो क्रम वेगळा असण्याची शक्यता आहे.

वाचने 44375
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

In reply to by अनुप ढेरे

देशभरात नाही पण काही अतिशय मर्यादित क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करावा या मागणीस अनुमोदन!

मोदी पंप्र झाले तर अल्पसंख्यांकांसाठीचे कॉन्सण्ट्रेशन कँप सुरू होतील. (असेच टाळीखौ उत्तर अपेक्षित असते बर्‍याच सूडोसेक्युलरांना म्हणून दिले बाकी मोदी आले काय नि नै काय, किती बरावाईट फरक पडेल याबद्दल शंकाच आहे. असो.)

In reply to by बॅटमॅन

परवाच्या लोकसत्तामध्ये असाच काहीसा लेख आला होता ब्वा! वाचला असेल बर्‍याच जणांनी. -(ऋषिकेश च्या प्रश्नांचं 'नक्की' प्रयोजन काय असा प्रश्न पडलेला) प्यारे

In reply to by प्यारे१

प्रयोजन असे काही खास नाही. मी मोदी समर्थक अजिबात नाही हे माहिती आहेच. मात्र त्यांच्याबद्दलचे आकर्षण चकीत करणारे आहे. तेच ते आरोप प्रत्यारोप यांच्या पुढे जाऊन दुसरी बाजु समजून घेताना, नक्की काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घेतोय.

In reply to by ऋषिकेश

काँग्रेसबद्दल भरपूर राग आहे हे प्राथमिक नि सगळ्यात मुख्य कारण! काँग्रेसच्या विरोधात उभं राहू शकणारं कुणी आहे ह्याबाबत जनतेला थोडासा विश्वस वाटत आहे नि त्यामुळं लोक मोदीना समर्थन करत आहेत. केजरीवालनी थोडीशी मॅच्युरिटीची भूमिका (जशी सुरुवातीला दाखवली होती तशी) दाखवली असती तर मोदींऐवजी केजरीवालना जास्त समर्थन मिळालं असतं. त्यांच्या 'अतिघाई संकटात नेई' धोरणानं समर्थन दुरावलं ही वस्तुस्थिती आहे. जनतेला एक पर्याय हवा आहे. बस्स्स!

In reply to by प्यारे१

मान्य. वर अर्ध्यावर काढलेला निष्कर्षही तिथेच निर्देश करतो आहे. आता अधिक मते आली की बळकटी येईल. मोदी या व्यक्तीमागे अपेक्षा आहे, धोरणांबद्दल फारशी नाराजी नाही, अंमलबजावणीबद्दल आहे. समांतरः फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते, त्यांना तसा अधिकार असतो हे किती जण लक्षात घेताहेत हे आता समजणार नाही

In reply to by ऋषिकेश

व्यक्ती लांबचा विचार करत असेल तर धोरणं अचानक बदलणं होणार नाही असं वाटतंय. मोदीं नी आपली एक्स्ट्रीमिस्ट ही प्रतिमा आधीच बनवली आहे. त्यात आणखी तेल घालून फायदा होणार नाही हे मोदींसारख्या 'बनिया'ला कळत नसावं असं वाटत नाही. त्यामुळं खाजगीकरणातून मोठ्या कंपन्यांना आवश्यक तेवढी रोजगार निर्मिती केली जाईल, योग्या योग्यतेचा फारसा विचार न करता अर्थकारणाला चालना मिळेल, मध्यमवर्ग आनंदात राहील असं चि त्र उभं राहील आणि साधारण २ टर्म्स (१० वर्षं) हे प्रकार घडतील असा अंदाज आहे. आणि हो पाकिस्तान कुरापती कमी करेल त्यामुळं संबंध सुधारतील. केजरीवालच्या सगळ्या कृत्यांबाबत सुद्धा विचारपूर्वकच गोष्टी होत असाव्यात असा संशय आहे.

In reply to by ऋषिकेश

फक्त अंमलबजावणी करण्यासाठी जनादेश देताना सदर व्यक्ती धोरणेही बदलु शकते,
मोदींच्या बाबत हे शक्य नाही. एकतर भाजपाचं सरकार आलंच तर युत्या करूनच येईल. हे युतीतले भागीदार मुख्य भागीदार पक्षाला आपल्या तालावर नाचवतात. शिवाय भाजपमधेच इतर अनेक 'स्वयंभू' नेते आहेत. त्यामुळे मोदींना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल. नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही. काँग्रेस सोडून कोणाचेही सरकार आले तर एकहाती रिमोट नसेल.

In reply to by बॅटमॅन

मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे. राजीव, युपीए-२ इतके स्थिर होते की पडता पडेना. काय उपेग झाला? उलट राव, युपीए-१, वाजपेयींना इतके जण ब्लॅकमेल करणारे होते / अल्पमतातील सरकारे होती, तरी याच सरकारांनी उजवी कामगिरी केलेली दिसते

In reply to by ऋषिकेश

एखाद्यानं सर्कारी परमनंट जॉब मिळाला म्हणून परफॉर्म न करण्यासारखं सरकार(पण) वागतं का काय? ;) - विरोधकांनी अधून मधून अविश्वास ठराव आणून ऑक्सिजनवरचं सरकार बघायला उत्सुक असलेला ;)

In reply to by ऋषिकेश

अस्सं! मला वाटलं की पैसा यांच्या कमेंटीतील "नाहीतर सरकार फारकाळ टिकणार नाही" याला अणुमोदण होतं.

आधी पर्यावरणाकडे आणि शेतीकडे, ऑर्गानिक फार्मिन्ग्कडे लक्ष द्यावं असं वाटतंय. त्यानंतर १-१- गाव, खेडे स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष द्यावं. भारत का खरोखरच कृषीप्रधान देश आहे.

In reply to by कवितानागेश

सोबत- विकेंद्रीकरण, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, पाणी-शेतीचा पायाभूत विकास, आर्थिक धोरणांत व करांत मूलगामी बदल, सागरी सीमा सुरक्षेवर भर, ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आश्वासक वातावरण निर्मिती, नवीन संशोधनास चालना देणारी धोरणे, तयार मालाच्या आयाती पेक्षा निर्यातीवर भर, महिला सुरक्षेसंबंधी तातडीचे आश्वासक निर्णय... यादी कितीही वाढू शकते. पण यातले कोणते आधी कोणते नंतर याचा निर्णय करण्याची इथं गरज वाटत नाही. अनेक मुद्दे महत्वाचे आहेत व समांतर पणे चालवावे लागतील. अर्थात् अनेक आव्हाने आहेत. त्यात नवीन सरकार काय काय करू शकेल ते बघायचे. पण एवढे मात्र खरे की लोकांच्या अपेक्षा खूप आहेत व त्यासाठी प्रचंड मेहनत नवीन सरकारला करणे आहे.

काहि दिवसांपूर्वी मोदिंचे पुण्यात झालेले भाषण ऐकले. त्यात त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला होता तो म्हणजे संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा. कारण सरकार येत असतात आणि जात असतात पण या संस्था ज्यांच्या मार्फत हा देश चालवला जातो त्या सक्षम असल्या तर कोणतही सरकार असल्याने फरक पडणार नाही. सरकारी संस्थाना (उदा. सैन्यदले,कॅग किंवा इतर तद्सम संस्था) त्यांचे कार्य पूर्ण क्षमतेने करण्यासाठी प्रवृत्त करणे,प्रोत्साहित करणे व त्यांच्या कामाला योग्य दिशा दाखवणे. त्यांनी भाषणात एक वाक्य वापरले होते "मोदीने गुजरात मे कुछ नहि किया जो कुछभी आपको दिखता है वो किया है तो इन संस्थाओने." त्यांनी पंतप्रधान झाल्यावर इतके जरी केले तरी बरेच बोळे निघुन पाणी वहाते होईल.

मराठी म्हणीचा वापर करायचा झाला तर "अजून काका म्हणायला वेळ आहे... :)". निवडणूक चालू होण्याआधी देखील २७२ जागा मिळतील का याबाबत साशंकता होती पण महाराष्ट्रात जे मतदारांची नावेच गहाळ होण्याचे प्रकार घडले आहेत त्यावरून असे वाटते की हाच लेख "जर राहूल गांधी अथवा प्रियांका गांधी-वड्रा पंतप्रधान झाल्यातर..." (पुढे, "जनतेने काय करावे?") असा लिहीण्याची वेळ आली आहे का असे वाटते. असो. तुर्तास या लेखासंदर्भात... सर्वप्रथम "उत्तर नीट ठरवून प्रश्न सोडवा. व्यवस्थित आल्टरेनेटीव्ह असल्याशिवाय कुठलिही प्रस्थापित गोष्ट बदलू नका... राज्य करणे म्हणजे आंदोलन नसते अथवा राजकीय भाषणे नसतात. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असणे आणि देशाचा पंतप्रधान असणे यात फरक आहे. " त्या अर्थाने राज्यकारभाराला दिशा देणे महत्वाचे आहे. आज अशी दिशा आहे असे वाटत नाही. जर दिशा योग्य असली तर तुम्ही दिलेल्या यादीतली अनेक कामे काही विशेष न करता होऊ शकतात. आजही ती स्थानिक पातळीवर कुठे न कुठे होतच आहेत. त्या अर्थाने सर्वप्रथम देशाला नेता आहे, रिमोट कंट्रोल नाही अथवा नुसताच चळवळ्या माणूस नाही ही जाणीव जनतेला आणि नोकरशाहीला येणे गरजेचे आहे. ते मोदींनी करावे ही अपेक्षा आहे. तसेच, जर मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचे मंत्रीमंडळ कसे असेल यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून राहतील. वर दिलेल्या यादीतली प्रत्येक काम कुठल्यान कुठल्या रुपाने (पाठ थोपटून घेण्याइतके) नक्की होईल. पण राम जन्मभूमी अगदी सुप्रिम कोर्टाचा निकाल आला तरी जो पर्यंत दोन समाजात ठराव होत नाही तो पर्यंत होणार नाही आणि ते देखील करतील असे वाटत नाही. मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील इतके नक्कीच वाटते. पण ती priority नसेल. तेच समान नागरी कायद्याबद्दल.... मात्र काश्मीर ही नक्कीच priority असेल पण केवळ ३७० कलमानेच नाही. असो. अर्थात नेहमीचे पालूपदः असे मला वाटते... :)

रविवारच्या (२० तारखेच्या) लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील शेवटच्या पानावरील लोकेश शेवडेंचा लेख वाचावा

एक महत्वाचे काम म्हणजे देशभर नवीन रेल रूळ टाकून प्रवास सुखकारक बनविणे.

दि. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या पराभूत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. इतकी वर्षे काही न बोलताही थकलेले पंतप्रधान मनमोहन सिंग १६ मेनंतर आपला गाशा गुंडाळतील आणि १५ महिन्यांपासून अथकपणे बोलणारे नरेंद्र मोदी त्यांची जागा घेतील, हे वास्तव आता राजकारणातील सर्वच सुज्ञांनी स्वीकारले आहे. गेले वर्षभर संवादहीनता आणि अतिसंवादाच्या दोन टोकांदरम्यान झुलणारा भारत १६ मेनंतर रोखठोक संवादावर स्थिरावणार आहे. १६ मेनंतर धर्मनिरपेक्ष भारत कूस बदलणार, ही धारणा निधर्मी बुद्धिवाद्यांतही दृढ झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या ६० वर्षांच्या कुशासनाचे १६ मेनंतर ६० महिन्यांत सुशासनात परिवर्तन करता यावे म्हणून मोदींनी दोन महिने आधीपासूनच काश्मीरप्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मागच्या दाराने मुत्सद्देगिरी सुरू केली आहे. गेली १० वर्षे सरासरी १५ ते १८ तास अहोरात्र काम करून मनमोहन सिंग एवढे क्षीण झाले आहेत की त्यांना त्यांचे मानसपुत्र डॉ. संजय बारू यांनी पुस्तकात केलेल्या खऱ्या-खोट्या दाव्यांवर भाष्य करायला शब्द उच्चारणेही जड जात आहे. १६ मेनंतर मोदीच पंतप्रधान होणार असल्यामुळे देशाची वेगवान प्रगती साधण्यासाठी हवा तसा हेडस्टार्ट लाभावा म्हणून मनमोहन सिंग त्यांच्याकडे परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाची सूत्रे आधीच का सोपवित नाहीत, असा प्रश्न दिल्लीतल्या मोदीमय झालेल्या मुत्सद्यांना पडला आहे. मोदींचे सरकार येणार ही दगडावरची रेष असल्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे दिल्लीच्या हवामानातही आधीच अच्छे दिन आले आहेत. एप्रिलचा तिसरा आठवडा लोटून गेला तरी दिल्ली ३३ आणि २० अंश सेल्सियसच्या आल्हाददायक कोषातून बाहेर पडायला तयार नाही. मे महिन्यातील हवामान तर याहूनही सुखद असेल अशी त्यामुळे अपेक्षा उंचावली आहे. या सर्व स्पष्ट पूर्वसंकेतांची दखल घेऊन मावळत्या पंतप्रधानांनी प्रस्थापित परंपरा आणि संकेत बाजूला सारून मोदींच्या संमतीने भ्रष्टांचा निःपात करणारे देशाचे पहिले लोकपाल निवडायला, तसेच नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती करायला काहीच हरकत नाही. १६ मेनंतरचे विधिलिखित तसेही सर्वप्रथम द्रष्ट्या मनमोहन सिंग यांनीच टिपले होते. म्हणूनच आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, असे त्यांनी ३ जानेवारी रोजी जाहीर केले आणि '७, रेसकोर्स'मधून बस्तान हलविण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अकबर रोड चौकातील बंगल्याचे नूतनीकरण त्यांनी झपाट्याने पूर्ण करायला लावले. पण मनमोहन सिंग यांच्याकडून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या अपेक्षा मात्र १६ मे उजाडेपर्यंत संपणार नाहीत. केंद्रात मोदींचे सरकार येण्यापूर्वीच मनमोहन सिंग यांच्या हातून सर्वशक्तीमान ठरू पाहणाऱ्या लोकपालाची नियुक्ती आटोपून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणजे पंतप्रधान झाल्याझाल्याच मोदींना गुजरातच्या लोकायुक्तांप्रमाणे लोकपालाची नियुक्ती निरस्त करण्यासाठी पुन्हा सुप्रीम कोर्ट गाठण्यासाठी आदेश द्यावे लागतील. म्हणूनच लोकपाल आणि लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीत ढवळाढवळ करू नका आणि हा विषय नव्या सरकारवर सोडा, असा दम मोदींच्या भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंग यांना दिला आहे. दुसरीकडे गलितगात्र केंद्र सरकारमध्ये किती दम आहे याची चाचपणी करण्याची संधी मोदी सोडत नाहीत. मनमोहन सिंग सरकार अजूनही तीन आठवडे सत्तेत आहे. आपल्या निवडणूक प्रचारावर १० हजार कोटी रुपये खर्च झालेत की नाही, याची ते अजूनही हव्या त्या यंत्रणेमार्फत चौकशी करू शकतात, असे ते उपरोधाने आव्हान देत आहेत. दि. १६ मे रोजी मोदींची सत्ता येणार याची पूर्ण खात्री पटल्यामुळे संघपरिवारात महिन्यापूर्वीच जल्लोष सुरू झाला आहे. ही अभूतपूर्व गोष्ट आहे. राजकारणाशी संघाचा काही एक संबंध नाही, असे सांगणारेच आता आणीबाणीनंतर प्रथमच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उघडपणे सक्रियता दाखविताना संघाच्या लाखो गटनेते आणि स्वयंसेवकांनी भाजपच्या देशव्यापी प्रचारात कसे झोकून दिले, याची वर्णने करीत आहेत. देशाला निर्नायकीच्या गर्तेतून बाहेर काढून निर्णायक टप्पात पोहोचविणाऱ्या संघाची यशोगाथा सांगण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांमध्ये आधीच स्पर्धा सुरू झाली आहे. आणीबाणीनंतरच्या काँग्रेसविरोधी यशाचे शिल्पकार जयप्रकाश नारायण यांच्याप्रमाणे सरसंघचालक मोहन भागवत मोदींच्या १६ मे रोजी मिळणाऱ्या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. मोदींची सत्ता येणार याची जाणीव झाल्यामुळे केंद्रातील अनेक भ्रष्ट आणि उर्मट मंत्री त्यांचा नम्रपणे मोदीजी म्हणू उल्लेख करू लागले आहेत. पण त्यांची खैरियत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून त्यांना वर्षभरात तुरुंगवासात टाकण्याचे वचन मोदींनी देशवासीयांना दिले आहे. एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत. उलट शिखरावर पोहोचलेला देशाचा आर्थिक विकासदर खुंटविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सोनिया गांधी आणि शहजादे राहुल गांधी यांना तुरुंगात टाकण्यासाठी रॉबर्ट वड्रंना माफीचा साक्षीदार म्हणून प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर असेल. मोदींच्या विरोधकांना भारतात थारा नसेल. त्यांना पाकिस्तानात जावे लागेल, असे बिहारमधील मोदीसमर्थक गिरीराज सिंह यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतिहासाच्या अज्ञानावरून मोदींची खिल्ली उडविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही १६ मेनंतर पाकिस्तानात तक्षशीला पाहायला जावे लागेल. हे सारे घडणार आहे १६ मेनंतर. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर. पण मोदी सत्तेत आल्यानंतर आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या खचलेल्या भारताला बलशाली बनविण्यासाठी भाजप आणि संघाने आधीपासूनच रोडमॅप आखून ठेवला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सोशल मीडियापासून सोशल इंजिनीअरिंगपर्यंत मोदींच्या भाजपने जबरदस्त मोर्चेबांधणी केल्याची खात्री पटल्यामुळे त्यांच्या दृष्टीने १६ मे ही तारीख संदर्भहीन ठरली आहे. साभार: 'अच्छे दिन आनेवाले है...' सुनील चावके Monday April 21, 2014

In reply to by असंका

वरचा लेख लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास असून मोदींचा जोर विकासावरच असणार आहे. गडे हुवे मुर्दे बाहर निकालना गलत होगा. क्योंकी सभी लोगोंकी हालत अभी बहोत खस्ता है! ये रहा एक उदाहरण:- आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी देश नवी दिल्ली - गाझियाबादच्या एका 35 वर्षीय व्यक्तीने मसूरी भागात स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या गृहस्थाने आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून आपण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आपल्या मुलीचा सांभाळ करा, अशी विनंती केली आहे.या गृहस्थाचे नाव ओमप्रकाश तिवारी असे असून तो येथील लोणी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान होणार आहात. मी आर्थिक हलाखीमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो आहे. माझ्या मृत्युनंतर माझ्या मुलीचा सांभाळ करावा, अशी विनंती करणारी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही, असे त्याने आपल्या एक पानाच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून चांगली नव्हती. त्यामुळे त्याने गतरात्री हे पाऊल उचलले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या, मोदींच्या नावे चिठ्ठी

In reply to by आयुर्हित

जर हा लेख कल्पनाविलास आहे तर आपण तो इथे डकवण्याचे कष्ट का घेतले? लेखात अनेक ठिकाणी पुढचा पंतप्रधान कोण होइल त्यावर मतप्रदर्शन केले गेले आहे. तो फक्त कल्पनाविलास असून प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही असे तरी मग आपले मत आहे का?

In reply to by असंका

मिपावरील मूळ लेखाचे नाव आहे "जर मोदी पंतप्रधान झाले तर...." हादेखील एक कल्पनाविलासच आहे, अजून तर देशातील मतदानही पूर्ण झालेले नाही. तरी प्रत्येकाने, आपल्या परीने कल्पनाविलासच केलेला आहे. त्यात आपणही आहात की! आणि प्रत्यक्षात मोदी काय निर्णय घेणार आहेत कोणास ठावूक? कृपया नावाप्रमाणे कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका!

In reply to by आयुर्हित

आपण वैयक्तिक होत आहात...माझा ID हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक विषय असून चर्चेसाठी उपलब्ध नाही. आणि आपण लक्षात घ्या की, कल्पना करणे आणि कल्पनाविलास करणे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मूळ लेखात लेखकाने काही कल्पना मांडल्या आहेत. त्या कल्पनाविलास आहेत असे आपण आता म्हणत आहात. हे म्हणजे विषय भरकटवणे झाले. माझा प्रश्न एव्हढाच होत की, वरती जो लेख (म.टा. मधला) आपण स्वतःहून डकवलेला आहे, ते आपल्या नेहेमीच्या भूमिकेशी सुसंगत आहे असं आपल्याला वाटतं का? जर हो, तर पुढे माझा आपल्याला काहीही प्रश्न नाही. जर नाही, तर मला शंका आली, की जो लेख तुमच्या मताविरुद्ध आहे, तो इथे सगळयांच्या नजरेसमोर आणण्याची आपणास काय गरज वाटली? पण आपण हो किंवा नाही काहीही न बोलता कुठेतरी भलतीकडेच जात आहात. कृपया, उत्तर नसेल द्यायचे तर देउ नका, पण परत एकदा - वैयक्तिक टिप्पणी टाळा.

In reply to by असंका

कल्पना करणे : जर मोदी पंतप्रधान झाले तर.... हे वाक्य सोडले तर उरलेला लेख हा पूर्ण "कल्पनाविलास"च आहे. मोदी आणि भारतीय जनता पक्ष काय करणार आहेत ते आधीच १००% स्पष्ट आहे, ज्याची माहिती आपल्याला भारतीय जनता पार्टी घोषणापत्र 2014 वर देऊन आज १६ दिवस पूर्ण झाले आहेत. तुमचा ID समजा अबकड असला तर अबकड जी, कृपया कंफ्युज्ड होऊ नका व इतरांनाही करू नका! असेच म्हणेन. स्वगत: माझा एक समझ होता, जी व्यक्ती आपल्या गुण/अवगुणांवर स्वत:हून विनोद करते, ती खरोखरच विनोदी असते.

In reply to by आयुर्हित

अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

In reply to by असंका

लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... १)डॉ मनमोहन सिंग हे जाणकार, अनुभवी अर्थतज्ञ आहेत व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, परंतु ते त्यांना कॉंग्रेसने अमलात आणू दिले नाही किंवा Implement करता आले नाही, त्यामुळे त्यांचा हा एक गुण झाकोळला गेला आहे. त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पडद्याच्या मागून/पुढून नक्कीच मार्गदर्शन घेता येईल व हे भारतासाठी मोठे योगदान ठरेल. यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती सुरु करून भारतात राहून सेवा देवू इच्छिणाऱ्या हुशार लोकांना अधिक हुशार करता येईल. २)रॉबर्ट वद्रा यांना नोबेल/ऑस्कर/ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड/लिम्का बुक ऑफ रेकोर्ड/भारतरत्न सर्व जे काही देता येईल ते देवून सन्मान करावा व त्यांच्या नावाने एक Training Institute/मुक्त विद्यापीठ काढावे व त्यांचे अनुभव सर्वांपुढे येवू द्यावेत. प्रत्येक तालुक्यातील एक व्यक्ती यांच्याकडे जबरदस्तीने का होईना शिकण्यास पाठवावी. यातून चौकटराजासारख्या निवृत्त व्यक्तींना ५००/- रु चे पण ३ ते 7 वर्षात १कोटी (जास्त अपेक्षा नाही)बनवता आले तरी मी माझे भाग्य समजेन. ३)सर्व अपराधी खासदार(मग ते सोनिया गांधी असो की पवार की मोदी)सर्वांना न्यायालयात उभे करणे व १२ महिन्याच्या आत अपराध सिद्ध करणे/मुक्त करणे.

In reply to by आयुर्हित

न्यायालयात जाऊन एखादे आरोप सिद्ध करा अथवा त्या व्यक्तिवर सभा / वर्तमानपत्र / माध्यमातून टिका करु नका.

In reply to by आयुर्हित

वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by आयुर्हित

वैयक्तिक टिप्पणी टाळल्याबद्द्ल धन्यवाद. वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले. पण असो(-माणसांचे मतपरीवर्तन होणे ही काही अशक्य गोष्ट नाही. काय?)

In reply to by असंका

वरील लेखाशी आपण सहमत आहात हे कळल्याने जरा विचित्र वाटले.
हा लेख उपहासात्मक आहे असेच मलाही वाटतंय, पण आयुर्हीत यांचे मत तो मोदींची स्तुती करणारा आहे असे असावे.

In reply to by संपत

मी स्तुतीप्रिय नाही व (कोणी/कोणाचीही)स्तुती केली म्हणून कोणालाही डोक्यावर घेणार नाही/घेवू देणारही नाही. मला मांडलेले जे मुद्दे रास्त वाटतात त्याचेच मी नेहमी समर्थन करतो. आजपर्यंतच्या लेखात मी मोदींची स्तुती केलेली नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची स्तुती केली आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. उद्या हेच/असेच कामे पवार/चव्हाण/ठाकरे बंधूंनी (अगदी मुशर्रफ/दाउद) साहेबांनी करून दाखवावीत, त्यांनाही डोक्यावर घेवू! धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित साहेब, हा लेखातून चावके मोदींची स्तुती करत आहेत कि उपहासात्मक टीका करत आहेत ह्याबद्दल मतभेद आहेत. तुम्हाला मोदींची व त्यांच्या कार्याची स्तुती करण्याचा हक्क आहेच.

In reply to by असंका

ह्युमरला वैयक्तिक टिप्पणी म्हणून घेवू नका! एक गोष्ट मला वाटते/आवडते ती म्हणजे जेव्हा देशहिताबद्दल गोष्ट असेल तेव्हा तेव्हा "वयम् पंचाधिकं शतम" हीच गोष्ट मी प्रमाण मानतो. आजपर्यंत भाजपने कॉंग्रेसला/बसपा/जनता दल युनायटेड ला बऱ्याच विषयांवर समर्थन दिलेले असले तरी मूळ कारण देशहितच होते!

In reply to by आयुर्हित

-एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई करणारे रियल इस्टेटचे जादूगार सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना तुरुंगात टाकण्याच्या मोदींच्या योजनेची वाच्यता साध्वी उमा भारतींनी केली. पण देशाच्या अतिवेगवान विकासासाठी प्रतिभावान वड्रांचा फॉर्म्युला उपयुक्त ठरू शकतो, याची जाणीव असलेले मोदी त्यांना फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत----,-- हे वाक्य उपरोधिक नाही असे मानून मी खालील माहिती देत आहे. रोबेर्ट वाड्रा -extra-constitutional authority असल्यामुळेच त्यांना आपण म्हणता तशी धंद्यात प्रगती करता आली आणि कॉंग्रेस राज्य सरकारांनी सर्व प्रकारच्या सवलती कायद्याना धाब्यावर ठेऊन दिल्या . सनदी अधिकारी खेमका आणि हरयाणा सरकार यांच्या वादात खेमकांची भूमिका खरी असावी असे मला वाटते. वाड्रा हे extra-constitutional authority असल्याचा पुरावा मला भुवनेश्वर विमानतळावर सापडला. तेथे सुरक्षा तपासणीच्या कक्षाबाहेर एक फलक लावलेला होता. त्यावर, ज्याना सुरक्षा तपासणी मधून जायची जरूर नाही अशा लोकांची यादी दिलेली होती. त्यात सुरवातीची १५-२० नावे पदा प्रमाणे होती. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , अध्यक्ष, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री वगैरे , अशी सर्व अधिकार पदाची नावे होती. सध्या ती पदे भूषवित असलेल्या व्यक्तींची नावे न्हवती .पण यादीच्या शेवटी फक्त एकच नाव -रोबेर्ट वाड्रा- पद नामा शिवायचे होते. ही सरकारी यादी मी दोन तीन भेटीत पाहिली आहे. फक्त त्या भागात फोटो काढण्याची मनाई असल्यामुळे मी यादीचा फोटो काढू शकलो नाही.

In reply to by रमेश आठवले

एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई या ऐवजी की ऐकलेल्या "एक लाखाचे तीन वर्षांत ३०० कोटीं" ह्या नावाचा एक धागा मी परवाच मिपा वर टकला होता, ज्यात सर्व गुंतवणूक तज्ञ व फिनान्शिअल प्लानर्स ला हा प्रश्न विचारला देखील होता. हे मोठे आव्हान आहे, प्रत्येक उद्योजकाला, की एवढे जास्त returns कसे मिळाले? किंवा कसे मिळतील? काय केल्याने मिळतील? तो का दिसत नाही, माहिती नाही? संपादक मंडळाने उडवला तर नाही? कृपया संपादक मंडळाने उत्तर द्यावे.

खालील मुद्दा हा ऋषिकेश यांच्या यादीत असावा असे वाटते. काल एका वाहिनीवरील मुलाखतीत भारताचे परराष्ट्रीय धोरण हे जशास तसे (Reciprocacity ) असावे असे मोदींनी सांगितले. त्या वरून आठवण झाली कि भारताचे पाकिस्तानशी असलेले सध्याचे बोटचेपे धोरण बदलण्याची गरज आहे. MFN करार म्हणजे दोन देशांनी परस्परांना व्यापारात सवलती देणे असा आहे . अशा प्रकारचे करार भारताचे बर्याच राष्ट्रांशी आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत भारताने त्या देशाला MFN देशाचा दर्जा काही वर्षापूर्वी दिलेला आहे पण पाकिस्तानने मात्र भारताला तो दर्जा दिलेला नाही. या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.

In reply to by रमेश आठवले

या एकतर्फी सवलतीच्या धोरणाचाही मोदी फेरविचार करतील असे वाटते.
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे.

In reply to by सुनील

अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे. असं असेल तर मग इतक्या वर्षात बर्‍याच गोष्टी पाकिस्तानने करायला हव्या होत्या किंवा करायला नको होत्या. त्यांना सगळं समजतय ना पण वळ्त का नाहीये? पाकिस्तानला किंवा कोणत्याही अशा देशाला भारताशी चांगले संबंध जर वाढवायचे नसतील तर आपण तरी कशाला आपला वेळ फुकट घालवायचा त्यांच्यासाठी. जेवढ्यास तेवढे वागावे. जगात असे अनेक देश आणि प्रांत आहेत ज्यांना भारताबद्दल किंमत आहे, तिथे जास्त फोकस करायला हवा.

It is pretty much an accepted thing that Narendra Modi is a "strong leader", authoritarian, dictatorial. That he will favour business interests is no secret. But can strong leaders tolerate dissent and criticism? Can thinkers, economists, journalists, two-bit "God men", who have poured vitriol over Sonia Gandhi and the Congress, dare do the same if Modi becomes prime minister? Don't hold your breath. Can "speedy decision-making" be implemented with strong independent institutions? Can "strong leaders" allow strong independent institutions to remain so? Can true capitalism (as opposed to crony capitalism) survive without strong independent institutions? Can election funding of this order at all be above aboard? Do we even care? A romantic notion has also been propagated that Modi will be a mellowed man as a prime minister, that he will become a liberal democrat. And that our democratic institutions like the courts, the Comptroller and Auditor General, Central Bureau of Investigation and the media have enough teeth to rein in any favouritism or trampling of human rights. Looking at the Gujarat model on such similar institutions, I have no doubt which side they will sit on. Having experienced our courts more than most, one thing I can unhesitatingly say is when you are up against an authoritarian government (as I was under the National Democratic Alliance rule) as your adversary in court, the courts are generally reluctant keepers of our fundamental rights. Judges are human beings, and subject to the same frailties and fears as the rest of us. An increasingly corporatised media has a soft-enough underbelly on which to use a scalpel. It should be no surprise that in the India of today being secular, libertarian or environmentally-conscious has pejorative connotations. That India is a true liberal, secular democracy is by no means a settled issue. Modi's genius lies in having identified the fault lines and prying them open. We, as a nation, are ready for a Faustian bargain. Give us a fistful of economic promissory notes and we will barter all the lofty ideals we once held dear. And we will invent reasons why the trade is all for the Greater Good. Let's at least thank Modi for bringing us out of our closet. Shankar Sharma: Corruption is a non-issue for the voter

In reply to by आयुर्हित

वरील (म. टा. मधील) लेखा पाठोपाठ आपण हा लेख इथे आणला आहेत. आपण आपली विचारधारा पूर्णपणे बदललेली आहे असं दिसतंय...!

फक्त ३७० कलम रद्द करू देत. पुढचं आमचं आम्ही बघू. श्रीनगर ला एक दोन बिएच्के घ्यावा म्हणतोय. बाय द वे, बाकीच्या अपेक्षा खालील प्रमाणे आहेत. १. कलम ३७० २. युनिफॉर्म सिव्हील कोड ३. अत्यंत ताकद्वान लष्कर. लष्कराला अमेरिकेच्या अफगाणिस्तान मधील धोरणाप्रमाणे सतत प्रॅक्टीस करण्यासाठी एक वा अनेक चांगल्या बॅटल्फील्ड्स. पाकीस्तान पासून सुरवात करायला हरकत नाही. ४. वड्रासाहेब, लवासावाले साहेब, मनिष तिवारी, दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अहमद पटेल, आदींचा योग्य तो "आदर सत्कार".

अजूनही आपण विषय भरकटवत आहात. आपण स्वत:हून जो लेख सर्वांसमोर ठेवला त्यातील मतांशी आपण सहमत आहात की नाही? जर हो, तर मग पुढे माझे काही म्हणणे नाही. पण जर नाही, तर मग आपण सर्वांना ही माहिती का देत आहात हा माझा दुसरा प्रश्न. सोपे करून सांगतो- " हो" की "नाही" ? यांपैकी एक उत्तर पहिले ठरवून घ्या. मग माझ्या प्रश्नाचा उर्वरीत भाग वाचा. आणि आपण जो पर्याय निवडला आहे, त्यानुसार त्याचे उत्तर द्या.- म्हणजे द्यायचे असेल तर. पण आपण विनाकारण वैयक्तिक होणे टाळावे ही माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे.

चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार. मोदी या व्यक्तीला मतादान करताना काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यामागे मोठा अंतस्थ हेतु वगैरे काही नव्हता. प्रतिसाद अंदाजा प्रमाणेच आले आहेत. लोक भाजपाने जाहिर केलेल्या धोरणांपेक्षा सरकारी कामात सुसुत्रता आणणे, भ्रष्टाचार कमी करणे, महागाई कमी करणे इत्यादी 'अंमलबजावाणी' करणारा नेत म्हणून त्यांना मत देत आहेत. मतदान केल्यावर मोदींनी या वर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी काही कायमस्वरूपी इजा पोचवतील असे धोरणत्मक बदल सुरू केले तर हेच मतदार कदाचित विरोधात असतील अशी -फारच अंधुकशी पण तरी- आशा या धाग्यानंतर वाटु लागली आहे. आभार! धागा १००+ झाल्याने नवे प्रतिसाद वाचणे मला कठीण जाते. त्यामुळे मी या धाग्यावर फारसा येणार नाही. पुनश्च आभार!

मोदींना खड्ड्यात घालायला त्यांच्याच पक्षातील लोक, विरोधी पक्ष, व एम एन सी व इसाई लोकांची लॉबी आदी त्यांना हैराण करेल असे मत Right to recall group 'राहूल मेहता' यांनी इथे आपल्या भाषणात 2012 साली वर्तवले आहे.