चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!
लेखनप्रकार (Writing Type)
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले. साधारण ४०-६० मिनिटांचा प्रवास वेळ कमी झालाच पण प्रवास सुसह्य झाला. आणखी एक जमेची बाजु म्हणजे आता पावसाळ्यात रस्त्यात पाणी भरले असेल का ही धास्ती बाळगावी लागणार नाही!
पूल कधी संपला आणि कुर्ला पश्चिमेत कधी पोचलो ते समजलेच नाही, मात्र पोचल्यावर प्रश्न पडला की अवघा २.९ किमी उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा अंत पाहत, वेळ, इंधन यांची नासाडी करत व नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी उघड्या डोळ्याने पाहत शासनाने दहा वर्षे का घालवली? यातुन बोध घेत यापुढील सर्व प्रकल्प वेळेत पुरे व्हावेत यासाठी सर्व शासकिय यंत्रणा आगाउ पाउले उचलतील का? अनेक शासकिय संस्था म्हणजे महापालिका, केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगर प्राधिकरण, लोहमार्ग आस्थापना यांचा मेळ साधण्यासाठी योग्य ते उपाय/ समन्वय संघटना निर्माण करणे आता अत्यावश्यक झाले आहे. निदान यापुढे तरी हे साध्य होवो ही ईच्छा!
प्रतिक्रिया
कुर्ल्यात माझे आईबाबा राहतात
तुम्हाला पडलेले प्रश्र्न योग्यच आहेत.
नेहमीसारखे सुंदर फोटो असणार
उड्डाणपुलावरून नेहमीपेक्षा वेगळं दिसतं जग!
उड्डाणपूलावरून काढलेले नसले
फोटो बघायला मिळतील…
चेम्बुर सांताक्रुझदेखिल आज
@ मात्र पोचल्यावर प्रश्न पडला
छान बातमी
अय अब साकीनाकाकी बात नै
ही बातमी ऐकून 'हुश्श...'
ही
quadcopter. मधून काढलेले फोटो......!!!!
झक्कास ढंप्याराव!! बोले तो
हे फोटो...
या फोटोवरुन पॄथ्वी गोल आहे हे
हे असलं सगळं गुजरात बद्दल
फोटो आवडले.