✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...

म
माधुरी विनायक यांनी
Tue, 04/15/2014 - 17:10  ·  लेख
लेख
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच. तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते. परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच. खरं तर तीचा खास मूड नव्हता यायचा, पण आई-बाबासोबत तर राह्यचंय, त्यामुळे आलीच सोबत. दर दहा मिनीटांनी ‘आपण कधी पोहोचणार’ चं पालुपद सुरू होतं... आम्ही दोघं आळीपाळीने ‘आत्ता पोहोचू, आलंच, हे काय’ असं सांगून तिला दिलासा देत होतो. असं पाच-सहा वेळा झालं. आता तिने बाबाला आणखी एकदा विचारलं, ‘काय रे बाबा, आलं, आलं म्हणतोस सारखा, कधी पोचणार आपण?’ बाबा म्हणाला, ‘हे काय बाळा, हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं. बस, आत्ता पोहोचू आपण’. तिचं उत्तर, ‘कुठेय? मला नाही ना दाखवलास…’ आणि मग तिने गाडी वळवायचा हट्ट धरला. आधी बाबाला कळेच ना, काय झालंय ते. मग तीच म्हणाली, ‘हत्ती गेला नं बाबा, मला बघायचाय.’ आधी तर बाबाने कचकचून ब्रेक मारला नकळत आणि आम्ही दोघं हसत सुटलो... त्यावर ती आणखीच रूसली. मग तिथे रस्त्यावर थांबून तिला पाणी आणि चॉकलेट देऊन शांत करत ‘हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं’ या म्हणीचा अर्थ सांगितला समजावून आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
14955 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

खी खी खी. स्वराताई, हे गाणं

रेवती
Fri, 04/18/2014 - 18:08 नवीन
खी खी खी. स्वराताई, हे गाणं आधीही फारसं आवडत नव्हतं आता तर ऐकवणारही नाही. हसून पुरेवाट झालीये. मग एक प्रयोग म्हणून माझ्या मुलाला विचारले" काय रे, जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा याचा अर्थ तुला कोणता लागतोय?" त्यावर तो असेच म्हणाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

मराठी म्हणीतला शाब्दिक अर्थ

कंजूस
Fri, 04/18/2014 - 06:56 नवीन
मराठी म्हणीतला शाब्दिक अर्थ मुलं घेतात आणि खरा अर्थ समजावतांना नाकी नऊ येतात (पुन्हा मराठी म्हण ) .तसं पाहिलं तर आता बऱ्याच म्हणी रोजच्या जीवनातील व्यवहारांतून निर्माण झाल्या होत्या आणि त्या गोष्टींच नाहीशा झाल्यामुळे अर्थ कळत नाही . मुलांशी बोलतांना त्यांना आवडणाऱ्या वस्तुचं नाव ऐकलं की त्याचा हट्ट सुरू होतो .कधीकधी वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी सांगतो पण ती गोष्ट त्यांच्या डोक्यातून जात नाही .उदा मरणे याला 'फोटोत गेले '.नंतर कित्येक दिवस फोटोचा धोशा लावतात .
  • Log in or register to post comments

किस्से वाचताना मजा आली.

आतिवास
Fri, 04/18/2014 - 07:22 नवीन
किस्से वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments

माझी २ वर्शाची

जिन्गल बेल
Fri, 04/18/2014 - 11:26 नवीन
माझी २ वर्शाची मुलगी 'टेडी बेअर' चा उच्चार असा काही करते की ते फक्त मलाच कळते....ईतर सर्वाना ती 'जिलेबी' म्हणतेय असच वाटते.....*lol*
  • Log in or register to post comments

पुस्तक छान पिकलयं.....

मिरची
Fri, 04/18/2014 - 14:47 नवीन
माझा मुलगा ३-३.५ वयाचा होता तेव्हाचा किस्सा...हा नेहमी भाजी घेताना बरोबर असायचा आणि भाजीवाल्यांच्या बोलण्याकडे अति बारीक नजर....आणि मग त्यांची नक्कल घरी... एकदा आम्ही पुस्तक प्रदर्शनामध्ये फिरत होतो..तेवढ्यात एका जाड्जूड पुस्तकाकडे बोट दाखवून हा जोरात ओरड्ला..."इकडे ये आई...हे पुस्तक घे...हे छान पिकलयं..." आजूबाजूचे बघायला आणि हसायला लागले....जाऊन बघितंल तर महाराजांच्या चेहर्‍यावर आपण आईची खूप मोठी मदत केल्याचे भाव...आणि साहेबांनी निवडलेलं पुस्तक होतं ज्ञानेश्वरी.....
  • Log in or register to post comments

(No subject)

जिन्गल बेल
Fri, 04/18/2014 - 15:04 नवीन
*smile* :-) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिरची

पिकलंय

यसवायजी
Fri, 04/18/2014 - 15:36 नवीन
पिकलंय 'पिक केलंय' असं म्हणायचं असेल त्याला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिरची

>>> हे पुस्तक घे...हे छान

स्वप्नांची राणी
Fri, 04/18/2014 - 23:15 नवीन
>>> हे पुस्तक घे...हे छान पिकलयं.. >> किती निरागस..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिरची

खतरनाक किस्से एक एक! भन्नाट.

प्यारे१
Fri, 04/18/2014 - 15:52 नवीन
खतरनाक किस्से एक एक! भन्नाट. :) स्वप्नांची राणी ह्यांच्या चिरंजीवांना कृ. शि. सा. न. ज्ञानव ह्यांच्या चिरंजीवांना शि. सा. न. इतर चिल्लर पार्टीला सा.न.
  • Log in or register to post comments

हा व्हिडीओ अजुन कोणी बघितला

सखी
Fri, 04/18/2014 - 20:46 नवीन
हा व्हिडीओ अजुन कोणी बघितला नसेल तर इथे बघा, हे बाळ कसं वाद घातलय त्याच्या वडीलांशी, बहुतेक बाहेर जाण्यासाठी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा