हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच.
तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते.
परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच. खरं तर तीचा खास मूड नव्हता यायचा, पण आई-बाबासोबत तर राह्यचंय, त्यामुळे आलीच सोबत. दर दहा मिनीटांनी ‘आपण कधी पोहोचणार’ चं पालुपद सुरू होतं... आम्ही दोघं आळीपाळीने ‘आत्ता पोहोचू, आलंच, हे काय’ असं सांगून तिला दिलासा देत होतो. असं पाच-सहा वेळा झालं.
आता तिने बाबाला आणखी एकदा विचारलं, ‘काय रे बाबा, आलं, आलं म्हणतोस सारखा, कधी पोचणार आपण?’ बाबा म्हणाला, ‘हे काय बाळा, हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं. बस, आत्ता पोहोचू आपण’. तिचं उत्तर, ‘कुठेय? मला नाही ना दाखवलास…’ आणि मग तिने गाडी वळवायचा हट्ट धरला.
आधी बाबाला कळेच ना, काय झालंय ते. मग तीच म्हणाली, ‘हत्ती गेला नं बाबा, मला बघायचाय.’ आधी तर बाबाने कचकचून ब्रेक मारला नकळत आणि आम्ही दोघं हसत सुटलो... त्यावर ती आणखीच रूसली. मग तिथे रस्त्यावर थांबून तिला पाणी आणि चॉकलेट देऊन शांत करत ‘हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं’ या म्हणीचा अर्थ सांगितला समजावून आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आई गं
आम्हीपण असेच शिकलो .रेल्वेतून
मला वाटले, आता "शेतात मोर
पाच वयाच्या मुलीला दिसेनात .
आवडल मन्नारा मी पयला .
क्लास
+१
"गन्डेलगुल्ली"
हा हा
भारी किस्सा!
माझ्या मित्राची मुलगी याला
हा हा मस्तच, मला पण हा शब्द
माझ्या मुलीचा आणि तिच्या वर्ग
हा हा हा .. लहान मुले नेहमीच
खरय
हाहाहा!
जबरी पकडलं !
एक्का जी
भारी किस्सा आहे.. पण तिला
हो.. व्यवस्थित समजला अर्थ...
अशा घटनांना तर मी रोज तोंड
हा हा हा यावरून एक जोक आठवला.
काय यार तुझ्या आयटमने खूप
बाकी मुलांच्या या वयात
धमाल किस्से!
हो अजून एक आठवलं - माझी
खटपटी
(No subject)
अगदी असाच किस्सा माझ्या
ह्यावर माझ्या
सगळेच किस्से मस्त आहेत :)
हा धागा बघायचा राहिला होता.
धमाल! सगळ्यांचे किस्से एकसे
छान निरागस
सध्या माझा मुलगा जवळ येतो आणि
आमचाही एक किस्सा आठवला-यद्यपि
माझ्या पोराचा 'तो' महान
टाका
टाका टाका, वाट कस्ली बघतांव
नशिब चांगल होत ब्यट्याभाउ तुझ...!
असं होतं खरंच.
सगळे किस्से भारी आहेत .
या जुन्या आठवणी जुन्या
धमाल किस्से...
अंड पाहिजे...
मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन
हुम्म
भेंडी
:))
हासुन हासुन मेलो.