पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच.
तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते.
परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच. खरं तर तीचा खास मूड नव्हता यायचा, पण आई-बाबासोबत तर राह्यचंय, त्यामुळे आलीच सोबत. दर दहा मिनीटांनी ‘आपण कधी पोहोचणार’ चं पालुपद सुरू होतं... आम्ही दोघं आळीपाळीने ‘आत्ता पोहोचू, आलंच, हे काय’ असं सांगून तिला दिलासा देत होतो. असं पाच-सहा वेळा झालं.
आता तिने बाबाला आणखी एकदा विचारलं, ‘काय रे बाबा, आलं, आलं म्हणतोस सारखा, कधी पोचणार आपण?’ बाबा म्हणाला, ‘हे काय बाळा, हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं. बस, आत्ता पोहोचू आपण’. तिचं उत्तर, ‘कुठेय? मला नाही ना दाखवलास…’ आणि मग तिने गाडी वळवायचा हट्ट धरला.
आधी बाबाला कळेच ना, काय झालंय ते. मग तीच म्हणाली, ‘हत्ती गेला नं बाबा, मला बघायचाय.’ आधी तर बाबाने कचकचून ब्रेक मारला नकळत आणि आम्ही दोघं हसत सुटलो... त्यावर ती आणखीच रूसली. मग तिथे रस्त्यावर थांबून तिला पाणी आणि चॉकलेट देऊन शांत करत ‘हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं’ या म्हणीचा अर्थ सांगितला समजावून आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला...
वाचने
15013
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई गं
आम्हीपण असेच शिकलो .रेल्वेतून
मला वाटले, आता "शेतात मोर
In reply to आम्हीपण असेच शिकलो .रेल्वेतून by कंजूस
पाच वयाच्या मुलीला दिसेनात .
In reply to आम्हीपण असेच शिकलो .रेल्वेतून by कंजूस
आवडल मन्नारा मी पयला .
क्लास
+१
In reply to क्लास by अर्धवटराव
"गन्डेलगुल्ली"
हा हा
In reply to "गन्डेलगुल्ली" by ज्ञानव
भारी किस्सा!
In reply to "गन्डेलगुल्ली" by ज्ञानव
माझ्या मित्राची मुलगी याला
In reply to "गन्डेलगुल्ली" by ज्ञानव
हा हा मस्तच, मला पण हा शब्द
In reply to "गन्डेलगुल्ली" by ज्ञानव
माझ्या मुलीचा आणि तिच्या वर्ग
हा हा हा .. लहान मुले नेहमीच
In reply to माझ्या मुलीचा आणि तिच्या वर्ग by खटपट्या
खरय
In reply to हा हा हा .. लहान मुले नेहमीच by तुमचा अभिषेक
हाहाहा!
In reply to खरय by ज्ञानव
जबरी पकडलं !
In reply to खरय by ज्ञानव
एक्का जी
In reply to जबरी पकडलं ! by डॉ सुहास म्हात्रे
भारी किस्सा आहे.. पण तिला
हो.. व्यवस्थित समजला अर्थ...
In reply to भारी किस्सा आहे.. पण तिला by तुमचा अभिषेक
अशा घटनांना तर मी रोज तोंड
हा हा हा यावरून एक जोक आठवला.
In reply to अशा घटनांना तर मी रोज तोंड by आरोही
काय यार तुझ्या आयटमने खूप
In reply to हा हा हा यावरून एक जोक आठवला. by तुमचा अभिषेक
बाकी मुलांच्या या वयात
धमाल किस्से!
हो अजून एक आठवलं - माझी
In reply to धमाल किस्से! by पैसा
खटपटी
In reply to हो अजून एक आठवलं - माझी by खटपट्या
(No subject)
In reply to खटपटी by सखी
अगदी असाच किस्सा माझ्या
In reply to खटपटी by सखी
ह्यावर माझ्या
In reply to धमाल किस्से! by पैसा
सगळेच किस्से मस्त आहेत :)
हा धागा बघायचा राहिला होता.
धमाल! सगळ्यांचे किस्से एकसे
छान निरागस
सध्या माझा मुलगा जवळ येतो आणि
आमचाही एक किस्सा आठवला-यद्यपि
माझ्या पोराचा 'तो' महान
In reply to आमचाही एक किस्सा आठवला-यद्यपि by बॅटमॅन
टाका
In reply to माझ्या पोराचा 'तो' महान by स्वप्नांची राणी
टाका टाका, वाट कस्ली बघतांव
In reply to माझ्या पोराचा 'तो' महान by स्वप्नांची राणी
नशिब चांगल होत ब्यट्याभाउ तुझ...!
असं होतं खरंच.
In reply to नशिब चांगल होत ब्यट्याभाउ तुझ...! by बाबा पाटील
सगळे किस्से भारी आहेत .
या जुन्या आठवणी जुन्या
धमाल किस्से...
अंड पाहिजे...
मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन
हुम्म
In reply to मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन by स्वप्नांची राणी
भेंडी
In reply to हुम्म by इरसाल
:))
In reply to मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन by स्वप्नांची राणी
हासुन हासुन मेलो.
In reply to मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन by स्वप्नांची राणी
खी खी खी. स्वराताई, हे गाणं
In reply to मुलगा तिसरी-चौथीत असल्यापसुन by स्वप्नांची राणी
मराठी म्हणीतला शाब्दिक अर्थ
किस्से वाचताना मजा आली.
माझी २ वर्शाची
पुस्तक छान पिकलयं.....
(No subject)
In reply to पुस्तक छान पिकलयं..... by मिरची
पिकलंय
In reply to पुस्तक छान पिकलयं..... by मिरची
>>> हे पुस्तक घे...हे छान
In reply to पुस्तक छान पिकलयं..... by मिरची
खतरनाक किस्से एक एक! भन्नाट.
हा व्हिडीओ अजुन कोणी बघितला