हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच.
तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते.
परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच. खरं तर तीचा खास मूड नव्हता यायचा, पण आई-बाबासोबत तर राह्यचंय, त्यामुळे आलीच सोबत. दर दहा मिनीटांनी ‘आपण कधी पोहोचणार’ चं पालुपद सुरू होतं... आम्ही दोघं आळीपाळीने ‘आत्ता पोहोचू, आलंच, हे काय’ असं सांगून तिला दिलासा देत होतो. असं पाच-सहा वेळा झालं.
आता तिने बाबाला आणखी एकदा विचारलं, ‘काय रे बाबा, आलं, आलं म्हणतोस सारखा, कधी पोचणार आपण?’ बाबा म्हणाला, ‘हे काय बाळा, हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं. बस, आत्ता पोहोचू आपण’. तिचं उत्तर, ‘कुठेय? मला नाही ना दाखवलास…’ आणि मग तिने गाडी वळवायचा हट्ट धरला.
आधी बाबाला कळेच ना, काय झालंय ते. मग तीच म्हणाली, ‘हत्ती गेला नं बाबा, मला बघायचाय.’ आधी तर बाबाने कचकचून ब्रेक मारला नकळत आणि आम्ही दोघं हसत सुटलो... त्यावर ती आणखीच रूसली. मग तिथे रस्त्यावर थांबून तिला पाणी आणि चॉकलेट देऊन शांत करत ‘हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं’ या म्हणीचा अर्थ सांगितला समजावून आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खी खी खी. स्वराताई, हे गाणं
मराठी म्हणीतला शाब्दिक अर्थ
किस्से वाचताना मजा आली.
माझी २ वर्शाची
पुस्तक छान पिकलयं.....
(No subject)
पिकलंय
>>> हे पुस्तक घे...हे छान
खतरनाक किस्से एक एक! भन्नाट.
हा व्हिडीओ अजुन कोणी बघितला