Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नर्मदेतला गोटा on Sun, 12/18/2011 - 00:29
लेखनविषय (Tags)
भाषा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते. तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते. आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती. एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास. कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ. महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल रवी श्रीनिवास - आंध्र विनोद - केरळ मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक असो जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण उदाहरणे पहायला मिळतात ती अशी अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता हिंदी मराठी सिनेमात सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात समीर + मानसी = रमा विजय + सुचित्रा = सुजय पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो म्हणजे पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही हे नाव मुलाचं की मुलीचं. मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते हरप्रीत कौर वगैरे या उलट गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत नावे पाहायला मिळतात. नावातही एक नजाकत जपली जाते. गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती अभिजीत, मंदार, संतोष म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे. अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते. त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे त्यामुळ मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे
  • Log in or register to post comments
  • 274160 views

प्रतिक्रिया

Submitted by मधुरा देशपांडे on गुरुवार, 04/17/2014 - 20:53

Permalink

काय काय नावे असू शकतात.

काय काय नावे असू शकतात. एका मित्राकडे एकदा गप्पा मारत असताना तो बायकोसमोर म्हणाला, अगं ती ती होती ना प्रेयसी माझी मैत्रीण, तिचे पण असेच काहीतरी अमुक तमुक…शिक्षण तत्सम विषय… मैत्रीण हा शब्द ऐके पर्यंत आम्ही फक्त 'माझी प्रेयसी' हे एवढे ऐकून सगळे अवाक होऊन बघत होतो की बायकोसमोर प्रेयसी चा विषय आणि तेही अजून चारचौघात. आणि बायको यावर शांत. नंतर हा उलगडा झाला की या मुलीचे नाव आहे प्रेयसी. हहपुवा झाली प्रेयसी हे नाव ऐकून.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 04/17/2014 - 21:09

Permalink

भारतातल्या सारखीच परदेशातही

भारतातल्या सारखीच परदेशातही माणसं विचित्र (माझ्या दृष्टीने) नावं ठेवतात. जसे: १. सिडनी २. पॅरिस अशी शहरांवरून ठेवलेली नावं (आपल्या कडे आळंदी असं नाव असतं म्हणे.. कोणी उद्या मुंबई, नालासोपारा ठेवेल!) आणी देशाच्या नावावरून सुद्धा नावं ठेवली जातात. जसे: १. कॅमेरून २. इंडिया ३. एशिया ४. केनया वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/17/2014 - 23:12

In reply to भारतातल्या सारखीच परदेशातही by मराठे

Permalink

माझ्या मैत्रिणीच्या भावाचे

माझ्या मैत्रिणीच्या भावाचे नाव "श्रीवर्धन"लेले आहे. माजी पंत प्रधान श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या नातीचे नाव झांसी रेड्डी असे आहे.( ती माझी विद्यार्थिनी होती रेडीयोलोजीची )
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 04/17/2014 - 21:24

Permalink

यावरून एक विनोद आठवला -

यावरून एक विनोद आठवला - एकदा हवालदार एका मुलाला ट्राफिक सिग्नल तोडल्याबद्दल पकडतो. हवालदार - पावती फाडावी लागेल मुलगा - ठीक आहे हवालदार - नाव सांग मुलगा - प्रद्युम्न दुष्टद्युम्न हवालदार - ठीक आहे आता सोडून देतो पुढच्या वेळेला सोडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/17/2014 - 22:07

Permalink

आरव हे नाव नॉर्थिंडीयनांकडे

आरव हे नाव नॉर्थिंडीयनांकडे ऐकले आहे. एका भारतीय हाटेलात छोटा मुलगा हातात स्यालडमधील काहीतरी तुकडा घेऊन चघळत इकडे तिकडे फिरत होता. आईवडीलही लक्श ठेवून होते. तो एकाएकी गडबडला व ममाऽऽऽ असे रडक्या आवाजात ओरडला. त्यावर त्याची दिल्लीकर असावी अशी आई "आरव बेटा यहाँ आओ." म्हणाल्याने वैताग आला. मला ते नाव अज्याबात आवडत नाही. एवढ्यात आरव हे नाव तीन ते चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकले आहे. तसे मुलींमधील सोनम हे नाव आवडत नाही. बाकी रासलिला, श्लेष्मा नावे चालतील पण आरव आणि सोनम नकोत. सिनेनट्/नट्या यांच्याकडून उधारीवर नावे ठेवणार्‍या आईवडीलांना नावांचे अर्थ माहित असतील असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आरोही on गुरुवार, 04/17/2014 - 22:39

In reply to आरव हे नाव नॉर्थिंडीयनांकडे by रेवती

Permalink

रेवाक्का अग एका हॉलीवूड

रेवाक्का अग एका हॉलीवूड अभिनेत्री ने तीच्य मुलीचे नाव नॉर्थ वेस्ट असे ठेवले आहे...तर एकीने ब्लू हार्पर असे काही तरी आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by सेरेपी on Fri, 04/18/2014 - 01:30

In reply to रेवाक्का अग एका हॉलीवूड by आरोही

Permalink

एका हॉलीवूड अभिनेत्री ने

एका हॉलीवूड अभिनेत्री ने तीच्य मुलीचे नाव नॉर्थ वेस्ट असे ठेवले आहे >> किम कर्दाशियन. ती अभिनेत्री नाहिये. ती नुसतीच 'फेमस' आहे. त्या मुलीच्या वडीलांचं आडनाव वेस्ट आहे (कान्ये वेस्ट) एकीने ब्लू हार्पर असे काही तरी आहे ...>> बियोन्सेच्या मुलीचं नाव ब्लू आयव्ही कार्टर आहे. आता हे सगळं मला माहीत कारण बातम्या वाचायला गेलं की याच 'बातम्या' आधी दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आरोही on गुरुवार, 04/17/2014 - 22:43

Permalink

Cricket Pearl Silverstein

Cricket Pearl Silverstein हे हि एकीच्या मुलीचे नाव आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/17/2014 - 23:16

Permalink

माझ्या वर्गातील मित्राचे नाव

माझ्या वर्गातील मित्राचे नाव "तीर्थंकर" घोष असे आहे आणि त्याच्या वडिलांचे नाव "दीपंकर" घोष. मी त्याला म्हटले कि तुझ्या मुलाचे नाव "भयंकर" ठेव. यावर तो चिडला आणि तीन दिवस माझ्याशी बोलला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/17/2014 - 23:57

In reply to माझ्या वर्गातील मित्राचे नाव by सुबोध खरे

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Fri, 04/18/2014 - 11:25

In reply to माझ्या वर्गातील मित्राचे नाव by सुबोध खरे

Permalink

भयानक आणी भयंकर.

ओळखीतल्या दोन जुळ्या भावंडांची नावे भयानक आणी भयंकर. अशी होती आणी खरच चार पाच वर्षाची ती पोर नावाला जागणारी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 04/17/2014 - 23:52

Permalink

बाकी लेले आडनावाच्या लोकांनी

बाकी लेले आडनावाच्या लोकांनी नाव ठेवताना फार म्हणजे फारच जागरूक राहायला हवं नाही तर पुरू समीर लेले (पु.स.लेले), सुधीर कमलाकर लेले (सु.क.लेले) बिच्चारी पोरांना शाळेत जाम त्रास होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/17/2014 - 23:58

In reply to बाकी लेले आडनावाच्या लोकांनी by मराठे

Permalink

=))

यावरून बरेच भयंकर जोक्स ऐकले होते!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 04/18/2014 - 00:12

In reply to =)) by पैसा

Permalink

मी पण.

मी पण.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Fri, 04/18/2014 - 00:36

Permalink

पुण्यात माझ्या ओळखीतल्या

पुण्यात माझ्या ओळखीतल्या नॉर्थ इंडीयन जोड्प्याने मुली चं नाव " शीवी" ठेवलंय... अर्थ कायतर शिवा पासुन जन्मलेली.. मी त्यांना पोरगी शाळेत जायच्या वयाची व्ह्यायच्या आत महाराष्ट्रातुन शिफ्ट होण्याचं मनावर घ्या असा फुकटचा सल्ला दिला होता.. =))
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 04/18/2014 - 00:40

In reply to पुण्यात माझ्या ओळखीतल्या by आनन्दिता

Permalink

एका सिंधी मैत्रिणीनी मलेश

एका सिंधी मैत्रिणीनी मलेश ठेवलेलं नाव. मग बदलून मल्लेश केलं.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 04/18/2014 - 01:08

In reply to एका सिंधी मैत्रिणीनी मलेश by शुचि

Permalink

एकाने त्याच्या मुलीचं आरती

एकाने त्याच्या मुलीचं आरती नाव ठेवलं पण तिला आर्टी म्हणतात म्हणून बदललं, तर दुसर्‍याने अरविंद असं मुलाचं ठेवलेलं नाव एरविंड या अपभ्रंशामुळे बदललं.
  • Log in or register to post comments

Submitted by _मनश्री_ on Fri, 04/18/2014 - 11:59

Permalink

...........

आमच्या गावी एका बहिण आणि भावाच नाव लाडू आणि जिलबी अस आहे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 04/18/2014 - 12:31

Permalink

श्लेष्मल

म्हणजे बुळबुळीत.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदराव on Fri, 04/18/2014 - 13:26

Permalink

थोडेसे अवांतर

थोडेसे अवांतर माझ्या ओळखीतल्या एकाने त्याच्या लग्नात त्याच्या बायकोचे नाव बदलून " द्रौपदी" ठेवले . आता बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Sun, 04/20/2014 - 20:07

In reply to थोडेसे अवांतर by आनंदराव

Permalink

अहिल्या द्रौपदी सीता |

अहिल्या द्रौपदी सीता | तारा मंदोदरी तथा || पंचकन्या स्मरे नित्यं | महा पातकं नाशनम || जशी जनक राजाची जानकी तशीच द्रौपदी म्हणजे द्रुपद राजाची मुलगी . द्रौपदी हि आद्य पतिव्रतांपैकी एक आहे . मला खरच कळल नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 12/24/2025 - 14:30

In reply to अहिल्या द्रौपदी सीता | by दिव्यश्री

Permalink

मला खरच कळल नाही तुम्हाला

मला खरच कळल नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?
द्रौपदीला पाच पती होते. आई बापाने पाळण्यात दिलेले नाव वेगळे पण लग्नात नावाचा इतिहास न बघता नाव बदलले तर चेष्टेचा विषय होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Mon, 05/12/2014 - 12:37

Permalink

दोन बहिणींची नावे ऐकली

दोन बहिणींची नावे ऐकली देवश्री आणि तेजश्री हे असं नावाच्या शेवटी श्री आलं की डहाणूकर कॉलनीत गेल्यासारखं वाटतं
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 05/12/2014 - 13:46

Permalink

कुठल्याशा पुस्तकात वाचले होते

कुठल्याशा पुस्तकात वाचले होते मधे.. अमेरीकास्थित साऊथ इंडियन कुटुंबाने त्यांच्या मुलाचे नाव साईबाबा ठेवले. हाक मारताना नुसती 'बाबा' म्हणायला लागले. त्या पोराच्या गोर्‍या मित्रांनी बाबाचे बॉब केले आणि बॉब म्हणजे रॉबर्ट. अशाप्रकारे साईबाबाचा रॉबर्ट झाला :):)
  • Log in or register to post comments

Submitted by मालविका on Mon, 05/12/2014 - 13:51

Permalink

छान लेख

माझ्या भाच्याचि नावे: मालविका आनि अवन्तिका मला खुप अवडतात.शिवाय इथे एक नाव आइकल शैलि.
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Mon, 05/12/2014 - 15:09

In reply to छान लेख by मालविका

Permalink

तूमचे आणि भाचीचे दोघींचेही

तूमचे आणि भाचीचे दोघींचेही नाव मालविका गम्मत आहे नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/14/2014 - 02:10

Permalink

अरे वा! हा धागा पुन्हा वर आला

अरे वा! हा धागा पुन्हा वर आला का! माझा मुलगा नुकताच एका मुलाबद्दल बोलताना "तो नै का बाईक राईड करणारा प्रीम" असे म्हणत होता. त्यावर मी "तो भारतीय मुलगा नां, मग प्रीम काय म्हणतोस, प्रेम म्हण ना!" असे म्हणताच याने हसायला सुरुवात केली. ते नाव प्रेम आहे व त्याचा अर्थ हामेरिकनांना कळू नये म्हणून सगळा आटापिटा चालला होता त्या मुलाचा व त्याने बाकीच्या भारतीय मुलांना त्यात सामिल करून घेतले होते. आता या वयात या नावाचा अर्थ मुले वेगळाच लावणार. एका दिप्ती नावाच्या मुलीला डीप टी म्हणतातच, काय करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/14/2014 - 13:29

In reply to अरे वा! हा धागा पुन्हा वर आला by रेवती

Permalink

डीप टी >>>

डीप टी >>> =))
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Sat, 09/06/2014 - 19:58

In reply to अरे वा! हा धागा पुन्हा वर आला by रेवती

Permalink

सध्या परदेशस्थ भारतीयांमधे

सध्या परदेशस्थ भारतीयांमधे 'ध्रूव' नाव फार लोकप्रिय झाले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sun, 09/07/2014 - 12:10

In reply to सध्या परदेशस्थ भारतीयांमधे by नर्मदेतला गोटा

Permalink

माझ्या एक मित्राला मुलाचं नाव

माझ्या एक मित्राला मुलाचं नाव 'ध' वरून ठेवायला सांगितलं होतं तेंव्हा मित्रांनी त्याला सुचवलेली काही नावं - धैर्यधर, धुरंधर, धुवाधार, धपाधप... शेवटी त्याने ध्रुव नाव ठेवलं :) माझा ऑनसाईट म्यानेजर भारतीय आहे - आंध्र चा. त्याचं नाव कोंडा. तो अमेरिकेत आहे आणि मुलीचं नाव त्याने तिथलं ठेवायचं ठरवलं आणि ऍना ठेवलं तर - जबरदस्त नाव होईल - ऍना कोंडा :) टीम मध्ये एक आरती आहे आणि तिचा लग्न झाला चंदन बरोबर. त्यावेळी पब्लिक बोललं होतं आता यांच्या पोरा पोरींची नावं पूजा, अभिषेक, अर्चना, उदबत्ती, अगरबत्ती अशी ठेवली पाहिजेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 12/24/2025 - 14:27

In reply to माझ्या एक मित्राला मुलाचं नाव by नाव आडनाव

Permalink

फार पूर्वी असाही जोक ऐकला

फार पूर्वी असाही जोक ऐकला होता कि लारा दत्ताचे लग्न ब्रायन लारा शी झाले तर तिचे पूर्ण नाव लारा लारा होईल.! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पेरु on Fri, 05/16/2014 - 09:52

Permalink

ऑफिसमधल्या एकाने त्याच्या

ऑफिसमधल्या एकाने त्याच्या मुलीचे नाव शिवोन ठेवलयम shivon means god is gracious अस म्हणतोय तो.
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी शर्मा on Fri, 05/16/2014 - 15:50

Permalink

ऑफिसमधल्या एका मुलीचे नाव

ऑफिसमधल्या एका मुलीचे नाव तमिळसेल्वि आहे. आई-वडिलाना तमिळ भाषेचा खूप अभिमान आहे म्हणून. हे कारण सान्गितले.
  • Log in or register to post comments

Submitted by बहिरुपी on Fri, 05/16/2014 - 17:41

Permalink

अन्वित

माझ्या ओळखीत एकचे नाव अन्वित आहे. अर्थ 'प्रमुख', 'नेता' असा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 05/19/2014 - 11:37

In reply to अन्वित by बहिरुपी

Permalink

प्रमुख? कशा अर्थी? कारण शब्दश

प्रमुख? कशा अर्थी? कारण शब्दश: अन्वित म्हणजे ज्याचा (कशाशीतरी) अन्वय झालेला आहे असा...?
  • Log in or register to post comments

Submitted by बहिरुपी on Wed, 09/10/2014 - 20:00

In reply to प्रमुख? कशा अर्थी? कारण शब्दश by असंका

Permalink

ते काय माहित नाय बॉ!

जरा गुगलुन बघीतल तर अर्थ लिडर असा दाखवला आहे. हि लिंक. http://babynames.merschat.com/index.cgi?function=View&bn_key=90250
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Fri, 05/30/2014 - 22:40

Permalink

आता नरेंद्र नाव ठेवण्याची लाट

आता नरेंद्र नाव ठेवण्याची लाट येइल
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/06/2014 - 23:13

In reply to आता नरेंद्र नाव ठेवण्याची लाट by नर्मदेतला गोटा

Permalink

कैच्याकै लॉजिक

कैच्याकै लॉजिक
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sat, 09/06/2014 - 23:50

Permalink

भुमिती,त्रिज्या,व्यास,परीघ...

भुमिती,त्रिज्या,व्यास,परीघ........... गणित विषय पक्का होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Mon, 09/08/2014 - 02:55

Permalink

हिंदवी - स्वराज

मुलाचे नाव स्वराज ठेवले तेव्हा एका मैत्रिणीने फुकटचा सल्ला दिला - "आता मुलीचे नाव हिंदवी ठेव".... मैत्रिण होती म्हणुन हसण्यावारी नेले.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 09/08/2014 - 08:01

In reply to हिंदवी - स्वराज by रवीराज

Permalink

मैत्रिण होती म्हणुन

मैत्रिण होती म्हणुन हसण्यावारी नेले
मैत्रीण नसती तर???
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Mon, 09/08/2014 - 10:31

In reply to मैत्रिण होती म्हणुन by टवाळ कार्टा

Permalink

बंगल्याचे नाव

माझ्य चुलत बहिणीच्या बंगल्याचे नाव, स्वराज्य आहे आणि मुलीचे नाव हिंदवी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रवीराज on Mon, 09/08/2014 - 15:19

In reply to मैत्रिण होती म्हणुन by टवाळ कार्टा

Permalink

मैत्रीण नसती तर???

तर??? हिंदवी स्वराज्यावर आक्रमण समजुन लढाईच केली असती. (हेपण हसण्यावारीच म्हणतोय)
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on गुरुवार, 02/02/2017 - 18:58

In reply to हिंदवी - स्वराज by रवीराज

Permalink

असतील तुम्ही म्हणताय तशी नावे

असतील तुम्ही म्हणताय तशी नावे नविन समजलेलं नाव हृदित्य राजवाडे
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Sun, 04/23/2017 - 09:24

Permalink

सध्या शर्व शाल्व अशी काही

सध्या शर्व शाल्व अशी काही नावे ऐकायला मिळतात
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Mon, 12/15/2025 - 12:13

Permalink

शिर्तव्या, स्नेत्विज अशी नवीन

शिर्तव्या, स्नेत्विज अशी नवीन नावे ऐकू येत आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 12/23/2025 - 17:54

Permalink

आजच "प्रेंग्नांश" हे नाव

आजच "प्रेंग्नांश" हे नाव असलेलं बॅनरचं ट्रोलिंग कायप्पा वर आलं ! आता काय करायचं या नावाचं सांगा !
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on Tue, 12/23/2025 - 22:53

In reply to आजच "प्रेंग्नांश" हे नाव by चौथा कोनाडा

Permalink

छान. दुसऱ्या मुलाचे नाव "वीर्यांश"

छान. दुसऱ्या मुलाचे नाव "वीर्यांश" असे ठेवता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Wed, 12/24/2025 - 11:05

In reply to छान. दुसऱ्या मुलाचे नाव "वीर्यांश" by उपाशी बोका

Permalink

बहिण झाल्यास

कन्सिव्हा
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Wed, 12/24/2025 - 13:34

Permalink

आजच "प्रेंग्नांश" हे नाव असलेलं

आजच "प्रेंग्नांश" हे नाव असलेलं
एका मित्राने सहा एक वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचे नाव 'ह्रीदांश' (HRIDANSH) ठेवले ते मला अजिबात आवडले नव्हते... पण ह्या "प्रेंग्नांश" पेक्षा ते कितीतरी बरे आहे म्हणायचे 😀 BTW भारी धागा आणि प्रतिसाद आहेत. आधी वाचनात आला नव्हता, धागा वर आणलात त्यासाठी धन्यवाद चौ को... @ उपाशी बोका , मूकवाचक
'वीर्यांश', 'कन्सिव्हा'
😂 😂 😂
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com