Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नर्मदेतला गोटा on Sun, 12/18/2011 - 00:29
लेखनविषय (Tags)
भाषा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते. तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते. आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती. एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास. कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ. महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल रवी श्रीनिवास - आंध्र विनोद - केरळ मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक असो जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण उदाहरणे पहायला मिळतात ती अशी अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता हिंदी मराठी सिनेमात सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात समीर + मानसी = रमा विजय + सुचित्रा = सुजय पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो म्हणजे पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही हे नाव मुलाचं की मुलीचं. मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते हरप्रीत कौर वगैरे या उलट गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत नावे पाहायला मिळतात. नावातही एक नजाकत जपली जाते. गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती अभिजीत, मंदार, संतोष म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे. अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते. त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे त्यामुळ मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे
  • Log in or register to post comments
  • 274160 views

प्रतिक्रिया

Submitted by सूड on Mon, 05/12/2014 - 16:05

In reply to नैवेद्य by योगी९००

Permalink

>>जनरली मुलांची नावे 'अ

>>जनरली मुलांची नावे 'अ'कारान्त असतात. म्हणजे शेवटी 'अ' असते..याला काही अपवाद आहेत का..? येस !! इ अम ओने ओफ थे अपवाद्स!!
  • Log in or register to post comments

Submitted by आरोही on Wed, 04/16/2014 - 15:00

Permalink

हल्लीची नावे मुलींची :अरीयाना

हल्लीची नावे मुलींची :अरीयाना,इशायना,अलीना ,सनाया अर्णव हे सुध्धा मध्ये खूप प्रसिद्ध झालेले नाव ...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/17/2014 - 12:52

In reply to हल्लीची नावे मुलींची :अरीयाना by आरोही

Permalink

अर्णव

अर्णव तरी ठीक आहे. अलीना हे माझ्या माहितीत ख्रिश्चन नाव आहे. मात्र लीना च्या विरुद्धार्थी अलीना असं म्हणता येईल एखादेवेळी. पण अरीयाना, इशायना, सनाया ही नावं ऐकायला बरी वाटली तरी या शब्दांना काही अर्थ आहे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Wed, 04/16/2014 - 15:01

Permalink

सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या

सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे. सध्या नाही हो, अगदी माझ्या जमान्यापासून. तसे अभिषेक बच्चन आणि माझ्या वयात फारसा फरक नसावा. कारण माझ्या आईच्या माहेरचे बिग बी अमिताभचे मोठेच फॅन. त्याने आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवलेय असे समजताच माझेही नाव अभिषेक ठेवण्यात आले. पण चांगलेय नाव. हां आता काही जण त्याचा अभ्या किंवा लाडात येऊन अबड्या करतात, पण चलता है.. मी मात्र माझ्या मुलीचे नाव आराध्य ठेवण्याचे टाळले. तसे सुचवूनही झाले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 04/16/2014 - 16:23

Permalink

आम्ही नावे ठेवतो...

माझ्या भाच्याचे नाव 'शिर्षक' भाचीचे 'प्राप्ती' पत्निचे 'दर्शिका'... नविन बंगल्याच्या नावाच्या शोधात आहे... सुचते का एखादे नविन नाव तुम्हाला?.... प्लीज 'सावली', 'कृपा', 'वीला'...इ. अशा प्रकारची नावे नको.
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on Wed, 04/16/2014 - 16:43

Permalink

नाविन्याची आवड या सदराखाली

नाविन्याची आवड या सदराखाली अनेकदा नामकरण केले जाते आणि मग त्या पोराला किंवा पोरीला आयुष्यभर आपल्या नावाचा अर्थ दुनियेला सांगत बसावा लागतो. मराठी नावंपुढे राव आणि भाऊ शोभते तसे गुजराथी नावांपुढे भाई.. हितेशभाई, रितेशभाई या ऐवजी हितेशराव, रितेशराव म्हणून चालणार नाही.. तशी प्रत्येक काळात काही नावे नव्याने जोर धरतात. पालकही फारसा विचार न करता पुढे आपल्या दिवट्याला राव वगैरे संबोधले जाऊ शकते अशी शंकाही मनात न आणता काहीतरी काव्यात्मक नाव ठेवतात आणि पुढे गोची होते. आमच्या पिढीमधे विजय, विकास, विलास, प्रकाश अशी सुटसुटीत नावे ठेवणार्‍या पालकांचे कौतुक आज करावेसे वाटते. आता हे सगळे विजयराव, प्रकाशराव, विलासराव म्हणून मिरवतात... आमचेच नाव मंदार ठेवायचा अट्टाहास कुणी केला माहीत नाही पण मंदारराव हे काही जमत नाही हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 04/16/2014 - 17:00

Permalink

सहज, आरव.

एकाचं नाव होतं 'सहज'. म्हटलं काय पुढच्या पोरांची नावं 'उगाच' आणी 'मुद्दाम' ठेवणार?? हल्ली 'आरव' नाव ठेवतात. मला फक्त कोंबडं आरवतं एवढच माहित होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/16/2014 - 17:04

In reply to सहज, आरव. by यसवायजी

Permalink

कैच्याकै नावं अस्तेत राव,

=)) कैच्याकै नावं अस्तेत राव, एकदा एका पोरीचं नाव दशमी ठेवल्यावरचा किस्सा जालावरच वाचलेला. म्ह. एक आज्जीबै म्हंटात की इवागं हुडगीऔरदु येन गोत्तागिल्लवा, हुडगी हेसर दशमी इडतारं मत्तेनु भक्री इडिबौदु काणसतदं =)) अर्थात "आज दशमी नाव ठेवलंय, उद्या काय भाकरी नाव ठेवतील" =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/16/2014 - 17:05

In reply to कैच्याकै नावं अस्तेत राव, by बॅटमॅन

Permalink

एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला

एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला इदु बेरे हेळबारदु. बाकी मंदिसलवागि.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 04/16/2014 - 17:49

In reply to एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला by बॅटमॅन

Permalink

तळटीप- आध्यात्मिक लोकांनी हा

तळटीप- आध्यात्मिक लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/12/2014 - 15:56

In reply to एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला by बॅटमॅन

Permalink

झालं ह्यांचं सुरु..

झालं ह्यांचं सुरु...छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव *dash1*
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 05/12/2014 - 17:11

In reply to झालं ह्यांचं सुरु.. by सूड

Permalink

(No subject)

*mosking*
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 05/12/2014 - 16:06

In reply to सहज, आरव. by यसवायजी

Permalink

बाकी आरव च्या बाबतीत सहमत !!

बाकी आरव च्या बाबतीत सहमत !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 05/12/2014 - 16:50

In reply to सहज, आरव. by यसवायजी

Permalink

मुलाचं नाव ठेवावं की नाही हे

मुलाचं नाव ठेवावं की नाही हे ठाऊक नाही मात्र आरव म्हणजे अरण्य. >>> चला कल्पतरुंचे 'आरव'
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 04/16/2014 - 17:07

Permalink

दूरदर्शन

दूरदर्शनवर एका कार्यक्रमाच्या नामावलीत 'आमदार निवास' हे नाव असे.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 04/17/2014 - 00:38

Permalink

अजुन काही सध्याची प्रचलित

अजुन काही सध्याची प्रचलित नावे : काव्या , सान्वी , अनिका , रिया , ईशिता अर्णव , आर्यन , ईशान , आयुष ओळखीतल्या मुलांची काही थोडी वेगळी चांगली नावे- कुशाग्र , अगस्त्य , आदितेय , अद्वितीय , विद्वत, सोहम तरुषी / तरुशी , भार्गवी , मोतिका , सिया , आर्षीया, संघमित्रा, निलांगी, स्वराली एका ओळखीतल्या कृष्णभक्ताने मुलाचे नाव वृन्दावन असे ठेवले आहे. आणि एका मित्राने त्याच्या मुलाचे नाव किन्नर ठेवले आहे. गोडसेजी , घरासाठी : सृष्टी , गोकुळ , इन्द्रधनु ,निरंजन (pure या अर्थी ), शान्ति , परम , अनमोल , दर्पण , वसंत बाकी तुमची आवड , घरा संदर्भात , कुटुंबीयांसंदर्भात तुमचे विचार, भावना समजल्यास नाव सुचवणे सोपे जाईल
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/17/2014 - 12:47

In reply to अजुन काही सध्याची प्रचलित by पक्या

Permalink

हे राम!

किन्नर? नाय म्हणजे त्याचा उद्देश चांगला असेल, पण या संबोधनाला जो अर्थ चिकटलाय तो पहाता.... हम्म...
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/17/2014 - 00:44

Permalink

मला आहुत हे मुलाचे नाव फार

मला आहुत हे मुलाचे नाव फार आवडते. कधी ऐकले नाही कोणाचे पण तरीही.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/17/2014 - 15:26

In reply to मला आहुत हे मुलाचे नाव फार by शुचि

Permalink

@आहुत हे मुलाचे नाव फार आवडते

@आहुत हे मुलाचे नाव फार आवडते.>>> आ'हुत- मंजे काय म्हायत्यै का??? :D यज्ञात टाकण्यासाठी निवडलेला(पदार्थ)! =)) जो अजुन हुत-झालेला नाही..पण लवकरच होणार-आहे..असा! अर्थ माहित न करून घेता "ठेवलेल्या" नावांची अवस्था..असा नविन लेख पाडावा काय??? =)) कॉलिंग- खाटुकमॅन!!! :D
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/17/2014 - 18:54

In reply to @आहुत हे मुलाचे नाव फार आवडते by अत्रुप्त आत्मा

Permalink

गुर्जी आहुती शब्दाचा अर्थ मला

गुर्जी आहुती शब्दाचा अर्थ मला माहीत आहे. पण कार्तिकस्वामीचे एक नाव आहे - आहुत. त्यामुळे मला ते आवडते.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/17/2014 - 19:37

In reply to गुर्जी आहुती शब्दाचा अर्थ मला by शुचि

Permalink

हे बघा -

हे बघा - गंगासुतश्शरोद्भूत आहूतः पावकात्मजः | जॄम्भः प्रजॄम्भः उज्जॄम्भः कमलासन संस्तुतः ||६||
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/17/2014 - 19:56

In reply to हे बघा - by शुचि

Permalink

ठिक आहे..पण तो ही जो "आहूत"

ठिक आहे..पण तो ही जो "आहूत" आहे ना,तो "पावकात्मज" आहे. पावक हे अग्निला विशिष्ट वेळी देण्यात येणारं एक उपमानच आहे. मंजे फिरून गाडी परत भोपळे चौकातच! असो...माझं म्हणणं एव्हढच आहे,की कोणतंही नाव ठेवताना ते फक्त ऐकायला छान वाटतं,म्हणून ठेऊ नये..आणि विशेषतः संस्कृतीतली नावं निवडताना,त्यातला शब्दार्थ/मतितार्थ/आणि संस्कृतीत दडलेला अर्थही (आधी) पहावा. एव्हढच माझं म्हणणं आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/17/2014 - 19:58

In reply to ठिक आहे..पण तो ही जो "आहूत" by अत्रुप्त आत्मा

Permalink

होय मान्य आहे की अग्नीशी

होय मान्य आहे की अग्नीशी संबंधीतच वर्णन/नाव आहे. कार्तिकस्वामीच्या प्रेमापोटी ते नाव आवडते इतकेच :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/17/2014 - 20:04

In reply to होय मान्य आहे की अग्नीशी by शुचि

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 04/17/2014 - 02:36

Permalink

माझ्या मित्राचे नाव त्याच्या

माझ्या मित्राचे नाव त्याच्या वडिलांनी "सम्राट" असे ठेवले आहे. कारण वडिलांचे नाव अशोक आहे. आणि आडनाव कांबळे. संपूर्ण नाव - सम्राट अशोक कांबळे. Rose Mary Marlo असे पण एक नाव आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अव्यक्त on गुरुवार, 04/17/2014 - 04:49

Permalink

नाम महात्म्य

मी माझ्या भावाच्या मुलाचे नाव "शौनक" ठेवले आहे… शौनक हे ऋषी होवून गेले त्याचप्रमाणे शौनक अभिषेकी हे शास्त्रीय गायक तसेच गानसूर्य जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत... एवडेच नाम महात्म्य आहे काय ? ह्या व्यतिरिक्त शौनक चे जास्तीत जास्त अर्थ कोणाला माहित असतील तर इत्थे उधृत करावे…. जेणे करून ज्ञानात भर पडेल… धन्यवाद....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 04/17/2014 - 10:22

Permalink

नावात काय आहे?

@ पकपकपक :- ओघळवरुन हहपुवा लागली. लोक कय कैच्याकै अर्थ माहिती नसताना सुध्दा नावे ठेवुन मोकळी होतात. काही नावे उगाचंच जसे नवरर्‍याने लग्नानंतर त्याच्या नावा प्रमाणे असावे म्हणुन (विनोद्=विनोदिनी) ओढौन ताणुन बनवलेली असतात. कोणी आपल्या मुलाचे नाव पार्थिव कसे ठेवु शकतो. मराठ्यांमध्ये १९८०/९० च्या दशकात संतोष, राजु , संदिप ही नावे जास्त प्रचलित होती. माझ्या पुर्वीच्या एका कंपनीत ७ संतोष, ३ राजु होते. बाकी योगी ९०० यांनी सांगितल्या प्रमाणे अथर्व, सार्थक आणि आर्या त्याच्या जोडीला सोहम ही हल्लीची कॉमन नावे दुरदर्शनवरिल मालिकांमुळे जास्त प्रचलित झालेली पाहायला मिळतात. नावापुढे "अ" विसर्ग लागला की त्याचा अर्थ बदलतो तरी सुध्दा ती नावे कशी काय ठेवतात कोण जाणे जसे अनामिका = म्हणजे ज्या गोष्टीला काही नाव नाही असा सर्व साधारण अर्थ. नावाच्या बाबतीत गुजाराती लोक काही वैशीष्ठेपुर्ण नावे ठेवतात. त्यावरुन एक किस्सा:- एका गुज्जुने आपल्या मुलीचे नांव इच्छा ठेवले होते. एके दिवशी तो घरी कामावरुन लवकर आला. त्याला वाटले आलोच आहोत तर मुलीला जरा स्कुटरवरुन फिरवुन आणु म्हणुन घराच्या फाटकापाशीच गाडी उभी करुन बायकोला मोठ्याने विचारतो " अजी सांभळ (म्हणजे ऐक), इच्छा छे? ती परसदारी काम करत होती तिथुनच जोरात ओरडली "नथी, इच्छा नथी" आणि सारा मोहल्ला जोरात हसला.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 12:57

Permalink

माझ्या माहितीत एकीचे नाव आहे

माझ्या माहितीत एकीचे नाव आहे लिपी :)
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 04/17/2014 - 14:35

In reply to माझ्या माहितीत एकीचे नाव आहे by दिव्यश्री

Permalink

लिपिका

माझ्या माहितीत एकीचे नाव आहे लिपिका!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 04/17/2014 - 15:48

In reply to माझ्या माहितीत एकीचे नाव आहे by दिव्यश्री

Permalink

चांगले आहे मग... तिच्या भावी

चांगले आहे मग... तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' ठेवा. अंक + लिपी = अंकलिपी.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 16:03

In reply to चांगले आहे मग... तिच्या भावी by शिद

Permalink

नाय ओ आल्रेडी लगीन झालंय .

नाय ओ आल्रेडी लगीन झालंय . मला वाटत ती गुज्जू आहे . हतच हाय फारिनला म्हून म्हायती मला . ;) :D
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/17/2014 - 19:35

In reply to चांगले आहे मग... तिच्या भावी by शिद

Permalink

@तिच्या भावी पतिचे नाव 'अंक'

@तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' ठेवा.>>> नको..नको..अंक नको.त्यापेक्षा याचे नाव लिपिक, असे ठेवा. :D मंजे मग लिपिका+लिपिक = अहवाल! =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 04/17/2014 - 20:09

In reply to @तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' by अत्रुप्त आत्मा

Permalink

लिपिका+लिपिक = अहवाल! =))

लिपिका+लिपिक = अहवाल!
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 04/17/2014 - 21:01

In reply to @तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' by अत्रुप्त आत्मा

Permalink

मुलगा झाला की तो लगेच ज्यु

मुलगा झाला की तो लगेच ज्यु.लिपिक होईल!
  • Log in or register to post comments

Submitted by माधुरी विनायक on गुरुवार, 04/17/2014 - 15:44

Permalink

नाम महिमा अगाध आहे...

नाम महिमा अगाध आहे... परिचयातल्या एका मुलाचं नाव तर्पण... तर्पण???
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/17/2014 - 15:56

Permalink

आई {स्मिता}+ बाबा {अनिल} :-

आई {स्मिता}+ बाबा {अनिल} :- मुलाचे नाव {स्मिनिल} आमच्या शाळेत एकदा बाईंनी एका मुला विचारले होते, नक्की तुझे नाव "प्रणय" आहे का ? की प्रणव ? तो म्हणाला प्रणय. त्यावर त्या म्हण्याल्या होत्या स्त्री-पुरुषांच्या प्रेम संबंधाला प्रणय म्हणतात.{आमचं बालमन लगेच मॉडिफाय झालं बघा ! ;) }
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 15:58

Permalink

आत्ताच वाचाल मधुजा . आवडल .

आत्ताच वाचाल मधुजा . आवडल . :) तर्पण??? >>> ??????????????????
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 04/17/2014 - 16:15

In reply to आत्ताच वाचाल मधुजा . आवडल . by दिव्यश्री

Permalink

समिधा असतंय खरं. पण तर्पण?

समिधा असतंय खरं. पण तर्पण? अरेरे. माणूस मेल्यावर त्याच्या (शक्यतो) मुलानं करंगळीशेजारच्या बोटात गवताची काडी अंगठीसारखी गुंडाळून उजव्या (की डाव्या) हाताच्या अंगठ्यावरुन पिंडावर पाणी सोडण्याला तर्पण म्हणतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/17/2014 - 16:24

In reply to समिधा असतंय खरं. पण तर्पण? by प्यारे१

Permalink

कैच्या कै नावं ठेवतात

कैच्या कै नावं ठेवतात तिच्यामारी ! मानव हे नाव सुद्धा मला काही तितकेसे आवडले नव्हते. हा मानव मग ह्याचे आई-बाबा काय आदिमानव का ? माझ्या एका जुन्या चीनी क्लायंट साईडच्या एका बै चे नाव होते :- मेरी मा. ;) जाता जाता :- जर तुम्हाला अल्टिमेट नाव आणि आजच्या काळात पटकन सहज न ऐकायला मिळणार नाव असेल तर चांदोबा वाचा. ;) भरपुर अवांतर :- मी माझ्या पिल्लाला प्रेमाने "कोको" हाक मारतो. {कोको:- कोवळे कोकरु} :)
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 16:28

In reply to कैच्या कै नावं ठेवतात by मदनबाण

Permalink

आदिमानव का ? >>>

आदिमानव का ? >>> :D
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Fri, 04/18/2014 - 00:04

In reply to कैच्या कै नावं ठेवतात by मदनबाण

Permalink

सेम हिअर ... माझ्या एका टिम

सेम हिअर ... माझ्या एका टिम मेट चं नाव सा मा... आधी वाटलं एखादी चीनी सुबक ठेंगणी असेल.. पण प्रत्यक्षात तो एक गोलमटोल बाबा निघाला... त्याला ओ सा मा अशी हाक मारावी अनावर हुक्की यायची... पण .... :(
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 05/13/2014 - 21:04

In reply to सेम हिअर ... माझ्या एका टिम by आनन्दिता

Permalink

@त्याला ओ सा मा

@त्याला ओ सा मा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 16:26

In reply to समिधा असतंय खरं. पण तर्पण? by प्यारे१

Permalink

तेच की . हे मी लिहील नाही .

तेच की . हे मी लिहील नाही . पण त्या शब्दाचा अर्थ माहिती आहे . माझ्या जावेने तिच्या मुलाचे नाव शोएयन्तेन ठेवलं आहे . आजपर्यंत हजार वेळा मला हा प्रश्न पडला कि या मुलाला स्वतःचा नाव व्यवस्थित कधी सांगता येईल . आता तो २-२.६ वर्षाचा आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 04/17/2014 - 21:02

In reply to तेच की . हे मी लिहील नाही . by दिव्यश्री

Permalink

तो मुलगा शाळेत त्याचं नाव 'शो

तो मुलगा शाळेत त्याचं नाव 'शो-अँड-टेल' असं सांगेल!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/17/2014 - 19:37

In reply to आत्ताच वाचाल मधुजा . आवडल . by दिव्यश्री

Permalink

@तर्पण??? >>> हे बरय..मंजे

@तर्पण??? >>> :D हे बरय..मंजे पोरं खेळता खेळता जिन्या/बिन्यावरनं घरंगळलं..तर बाकिच्यांनी "तर्पयामी.तर्पयामी" असे ओ रडावे! =))
  • Log in or register to post comments

Submitted by Prajakta२१ on गुरुवार, 04/17/2014 - 16:35

Permalink

स्लेश्मा/ श्लेष्मा ह्या शब्दाचा अर्थ......

स्लेश्मा/ श्लेष्मा ह्या शब्दाचा अर्थ शेंबूड / नाकातील स्त्राव असा होतो हे कुठेतरी वाचल्याचे आठवते
  • Log in or register to post comments

Submitted by _मनश्री_ on गुरुवार, 04/17/2014 - 19:49

Permalink

...........

श्लेष्मा म्हणजे कफ
  • Log in or register to post comments

Submitted by Prajakta२१ on Sun, 04/20/2014 - 21:20

In reply to ........... by _मनश्री_

Permalink

दुरुस्तीसाठी धन्यवाद

दुरुस्तीसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 04/17/2014 - 20:09

Permalink

एका महाभागाने स्वतःच्या

एका महाभागाने स्वतःच्या मुलीचं नाव रासलीला ठेवल्याचं ऐकल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 04/17/2014 - 20:12

In reply to एका महाभागाने स्वतःच्या by अनुप ढेरे

Permalink

रासलीला

रासलीला
कहर...!!! नवरात्रीचा पराक्रम का काय? =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com