Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आशु जोग on Sun, 07/03/2011 - 01:18
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते. आपला अनुभव काय आहे याबद्दल !
  • Log in or register to post comments
  • 30721 views

प्रतिक्रिया

Submitted by आशु जोग on गुरुवार, 04/10/2014 - 15:14

Permalink

...

पोपट नावाचा एक मराठी चित्रपट येवून गेला त्यातही हाच प्रकार
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 04/10/2014 - 15:46

In reply to ... by आशु जोग

Permalink

अरे

अरे असले कसले चित्रपट बघतोस रे? असले चित्रपट येवून जातात तेच बरे आहे. (नाटकप्रेमी) माई
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 04/11/2014 - 07:36

Permalink

आक्षेप योग्य

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले. एव्हड्यात चांगला ग्रामिण सिनेमा म्हटलं तर फॅन्ड्रीने खुपच वेगळा असा सुंदर अनुभव दिला. क्लास अन मास दोन्हीचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला सिनेमाला. अंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची या कलाकृतीविषयी उत्सुकता शमवायला, दिग्द. नागराज मंजुळे निघाले युरोप दौरयावर . . . . !
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 04/15/2014 - 13:49

In reply to आक्षेप योग्य by चौथा कोनाडा

Permalink

...

फॅन्ड्री पाहणे चालू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on गुरुवार, 04/17/2014 - 20:36

In reply to आक्षेप योग्य by चौथा कोनाडा

Permalink

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे.

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले.
सहमत!!.. सोनाली कुलकर्णीचा आवाज तुपात भिजवलेल्या आणि नन्तर पाण्यात बुडवून मग पेटवायला घेतलेल्या वातीसारखा वाटतो. :) :) :) 'अतुल कुलकर्णी'ने या पिक्चरसाठी खूप मेहनत घेतलीये... ते त्याच्या बॉडीवरून जाणवतेही.... पण "नाच्या"च्या भूमिकेचा खरंतर त्याने पूर्ण विचका केलाये.. असं वाटतं... त्याचा मुद्दाम काढलेला किरटा आवाज, रसभंग करतो... बाकी "जैत रे जैत" मधली स्मिता पाटील .. परफेक्ट वाटते. अर्थात तिचा चेहरा आणि एकन्दर देहबोली आणि भाषा ग्रामीण बाजाला साजेशी होती. आणि त्यांच्याबरोबर डॉ. मोहन आगाशे!!!... आsssssहाssss.. अजुनही म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी ते इतके हॅन्डसम दिसतात...तर 'जैत रे जैत' मधले मोहन आगाशे.... खरोखर कातर-जमातीतला एक रांगडा गडी म्हणून शोभले. हिन्दी आणि मराठी दोन्हीमधला स्मिता पाटलांचा वावर सहज होता. 'उंबरठा' मधल्या स्मिता पाटील..म्हणजे एक करारी स्त्री!!!! आजच्या कोणत्याच अभिनेत्रीत ही प्रतिभा नाही. अपवाद फक्त "धोबीपछाड" मधल्या मुक्ता बर्वे'ची "सुलक्षणा दांडगे".. तिची ती गावठी पद्धतीने "दादाss" म्हणण्याची स्टाईल........ अ प्र ति म !!! तिचं एकन्दर सिनेमातलं बोलणं हे शहरात वाढलेल्या गावंढळ तरूण मुलीचं होतं. तिचं गावंढळ हिन्ग्लिश.. अत्यंत मोहक वाटलं!!!... तिचे ते दोन दात पुढे काढून हसणं.. आणि राग आल्यावर ते दात पटकन आत घेऊन डोळे भिरभिरवणं........ केवळ अप्रतिम!!!!! तसंच "जोगवा" मधली देवदासी- मुक्ता आणि तिची बोली आणि देहबोली.... म्हणजे या सगळ्यावर कळस्स्स्स!!!!..... :) रंगीत पिक्चर्स'मधली सगळ्यात पर्फेक्ट ग्रामीण भाषा वाटते, ती मधू कांबीकरांची!!.. अर्थात येवढ्यात कुठला त्यांचा ग्रामीण बाजा'चा पिक्चर आलेला आठवत नाही. पण "झपाटलेला" मधली त्यांची "लक्ष्याची आई" मनाला खूप भावली. ग्रामीण भाषेला एक सहज लय असते. आणि ती लय पकडण्यासाठी ती अंगात मुरावी लागते. या पिक्चरमधल्या मधू'जींच्या "गप्पे.ए.ए.ए माकडतोंड्या".. सारख्या शिव्या खरोखर नॅचरल वाटतात.. आणि उचित परिणाम साधतात.... काही वर्षांपूर्वीच्या.. कुठल्याश्या पिक्चरमध्ये - बहुधा "घराबाहेर" असावा... त्यात "रीमा लागू" यांच्या तोंडी पण बर्‍यापैकी गावरान भाषा आहे.. पण तितकीशी प्रभावी वाटत नाही. तीच गोष्ट- "स्मिताजी तळवलकर" यांची!!!... खरं सांगायचं तर या दोघींच्याही तोंडी ग्रामीण भाषा तितकीशी शोभत नाही. या दोघी ग्रामीण भाषेत बोलत असतानाही त्यांची ओरिजिनल शुद्धता जाणवल्यावाचून राहत नाही. सध्या काही पिक्चर आणि सिरियल्स मध्ये काम करणार्‍या "सुरेखा कुडची" ऑल्सो व्हेरी इम्प्रेस्सिव्ह!!!!!! कजाग सासू, मुलीला सासूविरूद्ध भरवणारी आई, नवर्‍याला मुठीत ठेवणारी बायको... या सगळ्या त्यांच्या भूमिका बर्‍याचदा ग्रामीण भाषेत बघायला आणि ऐकायला मिळतात...... खूप सुन्दर!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 04/13/2018 - 05:01

In reply to आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. by मृगनयनी

Permalink

जैत रे जैत

जैत रे जैत मध्ये कातकरी लोक असणे अपेक्षित आहे परंतु जे दाखवले आहेत त्यांची भाषा, गाणी वगैरे काहीही कातकरी वाटत नाही. गाणी तर ना धो महानोरांची वर्‍हाडी भाषेतली आहेत. वेषभूषा तरी कातकरी लोकांची आहे का शंकाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 04/13/2018 - 09:04

In reply to जैत रे जैत by हुप्प्या

Permalink

. . .

होय तो ही एक सदाशिव ग्रामीणच चित्रपट होता
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on Fri, 04/11/2014 - 10:15

Permalink

भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात

भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात करण्यासाठीसुध्दा काही स्किल्स अपेक्षित असावेत. निव्वळ याच कारणासाठी आशुतोष गोवारीकरने "लगान" मधे एकही मराठी कलाकार घेतला नाहीये. जितक्या मराठी कलाकारांची ऑडिशन घेतली गेली त्यांना अवधी हिंदी अपेक्षितरित्या बोलताच आली नाही.तसेही MTI (Mother Tounge Influence) कमी करणे सर्वांना शक्य नसतेच. त्यामुळेच इंग्रजी सुद्धा तमिळ, तेलुगु, गुजराती (आणि मराठी पण) लोकांची ओळखू येते :)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 04/11/2014 - 13:12

In reply to भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात by राजो

Permalink

...

असेल असेल... सुहासिनी मुळे तशा दिल्लीबेस्ड आहेत... अर्थात मराठीही छान बोलतात
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 04/16/2014 - 20:25

In reply to ... by आशु जोग

Permalink

त्यांचे मराठी हे एक हिंदी

त्यांचे मराठी हे एक हिंदी भाषिक कलाकाराचे वाटते. एखाद्या भाषेचा लेहेजा , उच्चार शिकून ती बोलणे हे कुठल्याही कलाकाराच्या दर्जावर अवलंबून असते. नसरुद्दिन शहा देऊळ सिनेमात उपकार केल्याच्या थाटात छोटी भूमिका हिंदी उच्चारात मराठी संवाद म्हणून करतो तर नाही म्हणा त्याने राजपूत व्यक्ती रेखा उत्कृष्ट केल्या आहेत. नाना भोजपुरी व्यक्तीरेखा उत्कृष्ट करतो, दिलीप कुमार भोजपुरी उत्कृष्ट बोलतो. तर मंगेशकर कुटुंबीयांनी उर्दू भाषा शिकण्यासाठी ,खास शिक्षक नेमले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by घन निल on Fri, 04/11/2014 - 10:32

Permalink

कृत्रिमता असह्य होते.

+१
  • Log in or register to post comments

Submitted by पांथस्थ on Fri, 04/11/2014 - 14:09

Permalink

अगदी अगदी!

हाच अनुभव येतो जवळपास सगळ्या ग्रामीण ढंगाच्या मराठी चित्रपटात! त्यामानाने "७२ मैल एक प्रवास" ह्या चित्रपटात स्मिता तांबे यांचा अभिनय मला (चांगला) अपवाद वाटला. तुमचे काय मत लोकहो?
  • Log in or register to post comments

Submitted by रघुनाथ.केरकर on Wed, 04/16/2014 - 13:51

Permalink

७२ मैल एक प्रवास

मित्रानो ७२ मैल एक प्रवास हा सिनेमा मात्र ह्याला अपवाद होता......
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Wed, 04/16/2014 - 20:11

Permalink

एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता

एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता लैच आवडली . :D सगळा पिच्चरच आवडला . बाकी लेखकाच्या विचारांशी / प्रश्नांशी सहमत . ( ग्रामीण भाषा ऐकूण माहिती असलेली . )
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 04/17/2014 - 11:38

In reply to एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता by दिव्यश्री

Permalink

+११११

एकदम.. ए भुसनळ्या.. :) एकूण चित्रपट हा स्पूफच्या मार्गाने जाणारा आणि विनोदी असल्याने तिचं बोलणं झकास जमून गेलं आहे. पण परवाच दे धक्का मधले काही धमाल सीन - उदा. "सेनापती आमचे अश्व कुठे आहेत" पाहताना, सक्षम कुलकर्णीचं अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं.. यायाम.. टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली आणि एकूण साधा गाव शोभेल असं दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शन जास्त अपील (मराठी?) झालं..
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 04/17/2014 - 16:51

In reply to +११११ by मैत्र

Permalink

अपील (मराठी?) झालं..>>>

अपील (मराठी?) झालं..>>> मनाला भावलं अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं..>>>++++++++++++++++++++++++++++++++++ 111111111111 हे नेहमीच होत . उदाहरणे आत्ता आठवत नाहीत . नंतर लिहिते . एक आठवल महेश मांजरेकरची बायको, मकरंद अनास्पुरेंची झालेली बायको त्याच शिनेमात . *DASH* माझ तर अजूनही डोक उठत . त्या उलट काकस्पर्श मध्ये ती जास्त आवडली . :)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 09/16/2016 - 11:22

In reply to +११११ by मैत्र

Permalink

...

टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली आता वर्‍हाडी कुठून कहाडलं
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 04/17/2014 - 13:48

Permalink

...

>> टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली टिंग्या हा जुन्नरजवळच्या नारायणगावचा आहे... वर्‍हाडी असेल तर ... प्रश्नच आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 04/17/2014 - 18:41

In reply to ... by आशु जोग

Permalink

कल्पना नाही

मपलं तुपलं ऐकून मला तसं वाटलं. वर्‍हाडी किंवा अस्खलित अहिराणीचा मी काही जाणकार नाही. आणि बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 04/17/2014 - 20:51

In reply to कल्पना नाही by मैत्र

Permalink

असेच बोलतात

बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत
जुन्नर-आंबेगाव तालुक्यात असेच बोलतात (आंबेगाव तालुक्यातला) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 04/17/2014 - 22:15

In reply to कल्पना नाही by मैत्र

Permalink

हो

हो टिंग्यामधली भाषा जुन्नर्/मंचर भागात ऐकलेली आहे. त्यामुळे त्यातील संवाद चपखल वाटले. मला 'देऊळ' मधली गावाकडची भाषासुद्धा अस्सल वाटली होती, जरी ती सहसा चित्रपटांत गावाकडचे लोक बोलताना दाखवतात तशी नव्हती. हायवे वर असलेल्या गावांमधल्या बोलीभाषेत अनेक इंग्रजी, पॉप कल्चर मधले शब्द असतात. तसे बरोब्बर दाखवले आहेत त्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वरालि on गुरुवार, 04/17/2014 - 18:27

Permalink

मला वळू आवडतो…

मला वळू आवडतो… हा चित्रपट मी कधीही कितीही वेळा पाहू शकते. तो डायलॉग ``किती चटणी खाता…. उगा लोकाच्या चेष्टेला भर …`` *lol* तसाच देऊळ चा पहिला अर्धा भाग आवडतो. डायलॉग ``पिंकी पडली… पिंकी….`` आणि ``ये येडा फोफाटा`` *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 09/16/2016 - 09:40

In reply to मला वळू आवडतो… by स्वरालि

Permalink

सदाशिव ग्रामीण

आपण कधी स्वतः खेड्यात राहिला आहात का नसला तर या चित्रपटावर अवलंबून राहू नका सदाशिवातल्या गिरीश उमेश कुलकर्ण्यांनी काढलेले चित्रपट म्हणजे ग्रामीण असा एक सोयीस्कर समज अनेकांचा झालेला दिसतोय पण हा शॉर्ट कट योग्य नाही
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 09/16/2016 - 16:22

Permalink

खटकणारी गोष्ट म्हणजे

खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही सहमत, फारच कमी कलाकारांना म्हणजे बहुतेक सद्ध्या भारत गणेशपुरेलाच वऱ्हाडी नीट बोलता येत असावी, बाकीचे उगाच वऱ्हाडीतसुद्धा ते उचक्या लागल्यागत की की की घुसडत असतात. असो
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Fri, 09/16/2016 - 16:50

Permalink

ग्रामीण / मराठी चित्रपटांचे प्रमुख २ प्रकार

ग्रामीण / मराठी चित्रपटांचे प्रमुख २ प्रकार - १. सैराटच्या आधीचे २. सैराटच्या नंतरचे
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com