✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजकालचे ग्रामीण चित्रपट

आ
आशु जोग यांनी
Sun, 07/03/2011 - 01:18  ·  लेख
लेख
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते. आपला अनुभव काय आहे याबद्दल !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30721 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

आपला अनुभव काय आहे याबद्दल

रेवती
Sun, 07/03/2011 - 06:16 नवीन
आपला अनुभव काय आहे याबद्दल ! असाच!
  • Log in or register to post comments

मराठीला ग्रामीण चित्रपट ही

आशु जोग
Sun, 07/03/2011 - 12:47 नवीन
मराठीला ग्रामीण चित्रपट ही गोष्ट नवी नाही, सुर्यकांत चंद्रकांत, निळुभाऊ फुले यांनी ते गाजवून ठेवले आहे त्यांचा अभिनय सहज, नैसर्गिक वाटत असे. त्या तुलनेत आजचे कलाकार कुठे आहेत
  • Log in or register to post comments

नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने

कानडाऊ योगेशु
Sun, 07/03/2011 - 14:03 नवीन
नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. अतुल कुलकर्णीसारख्या अभ्यासु अभिनेत्याने अशी चूक कशी केली हा प्रश्न मला चित्रपट पाहील्यानंतर पडला होता.
  • Log in or register to post comments

शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी

रेवती
Sun, 07/03/2011 - 21:16 नवीन
शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. हेच म्हणते. नटरंगमध्ये अजूनही काही चुका सहजपणे दिसत होत्या. त्यावेळी फार अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहिला आणि म्हणावे तसे मनोरंजन झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

नटरंग मध्ये अतुल साहेब

इष्टुर फाकडा
Fri, 04/13/2018 - 01:46 नवीन
नटरंग मध्ये अतुल साहेब ग्रामीण बोलण्याचा अभिनय करतात फक्त. बोलायला जमलं नाहीये त्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

ग्रामीण???

मी-सौरभ
Sun, 07/03/2011 - 14:30 नवीन
फार काय बघितले नाहीत त्यामुळे पाआआआआआआआआआअ स
  • Log in or register to post comments

जर एखादा ग्रामीण चित्रपट

तुझ्याच शोधात....
Sun, 07/03/2011 - 18:11 नवीन
जर एखादा ग्रामीण चित्रपट करायचा असेल तर त्यानी तिथे जाउन सवय करायला हवी.. तरच ते नीट्स जमेल..
  • Log in or register to post comments

"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा

आशु जोग
Sun, 07/03/2011 - 23:21 नवीन
"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा बोलत व्हता ती क्वनची ग्रामीन ?" चित्रपटात दाखवली जाणारी ग्रामीन भाषा ही फार नाटकी असते प्रत्यक्षात ती तशी कुठेच ऐकू येत नाही. न चा ण करा, ण चा न करा आत्ता ग बया, आगं बाबो, आंग आश्शी, आरं बाबा असले काही बोला टकुरं डोसकं, मेल्या मुडद्या, बिगी बिगी हे शब्द वापरा की झालं ग्रामीन खेड्यामधे राहीलेला कुणीही माणूस सांगेल ही भाषा खोटी आहे, यांच्या स्वत:च्या मनातली आहे पण शहरात राहीलेल्या माणसांना फसवायला बरी असते ही चित्रपटातील ग्रामीन बोली ग्रामीन म्हणून काही दाखवा, त्यांना ते पटतं
  • Log in or register to post comments

णिशेध

रमेश आठवले
Fri, 04/11/2014 - 13:48 नवीन
मिसळ पावच्या काही मान्यवर सदस्याना कधी कधी ग्रामीण भाषेत प्रतिसाद लिहिण्याची हुक्की येते. त्यांच्या अशा प्रतिसादात बरेच वेळा दिसणारा एक शब्द म्हणजे निषेध च्या ऐवजी णिशेध .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

ग्रामीण भाषा या सदराखाली

विजुभाऊ
Mon, 07/04/2011 - 00:02 नवीन
ग्रामीण भाषा या सदराखाली मकरंद अनासपुरे जे काही बोलतो त्यावरून तर वाटते की तो कॉकने , गेलीक , या भाषा देखील तितक्याच ग्रामीण पणे सहज बोलू शकेल
  • Log in or register to post comments

मज्जा

कार्लोस
Mon, 07/04/2011 - 00:45 नवीन
मराठी सोडा हो जरा भोजपुरी बघायला जाम मज्जा येते आई मिलन कि बेला.
  • Log in or register to post comments

मराठी सोडा हो जरा भोजपुरी

मुलूखावेगळी
Mon, 07/04/2011 - 10:16 नवीन
मराठी सोडा हो जरा भोजपुरी बघायला जाम मज्जा येते
नावे वाचुनच मज्जा येते गवनवां ले जा राजाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कार्लोस

नावे वाचुनच मज्जा येते +१

गणपा
Mon, 07/04/2011 - 13:20 नवीन
नावे वाचुनच मज्जा येते
+१ सहमत... हा हा हा एजुन एक पोस्टर आठवलं "पलना में खेलत ललनवाँ हमार"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

व्हय जी

इरसाल
Fri, 04/11/2014 - 15:35 नवीन
ससुरा बड़ा पइसावाला ! लै जबरी पिच्चर हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अजून एक...

नन्दादीप
Mon, 07/04/2011 - 17:31 नवीन
अजून एक... खतर्नाक नाव... "तोहार सजन हमार"........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल

किसन शिंदे
Mon, 07/04/2011 - 10:09 नवीन
ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल ज्या तथाकथित मराठी सिरीयल धुमाकूळ घालताहेत त्यातल्या सासुला किंवा सुनेला त्रास देण्यासाठी जे खलपात्र घुसवलं जातं ते सुध्दा आत्ता ग बया अश्याच ढंगाची ग्रामीण मराठी बोलतं. उदाहरणादाखल बरेच आहेत...कुंकू, मन उधान वारयाचे...
  • Log in or register to post comments

एक नवी मालीका झी वर येत आहे.

पुंबा
Fri, 09/16/2016 - 15:41 नवीन
एक नवी मालीका झी वर येत आहे. पैलवानाच्या जीवनावर आधारीत असावी असे वाटते. त्या मालीकेतील प्रमुख पात्र अस्सल ग्रामीण भाषा बोलते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सहमत

निल्या१
Mon, 07/04/2011 - 10:35 नवीन
सहमत आहे. आपले बरेचसे कलाकार एकाच साच्यामध्ये बोलत असतात. पात्र बदलले तरी लकबी त्याच राहतात. उदा.सचिन खेडेकर शिवाजीराजे मध्ये जसे बोलतात अगदी तसेच ता-यांचे बेट मध्ये. इकडे पात्राला थोडी ग्रामीण पार्श्वभूमी असूनही टोन मध्ये अजिबात फरक जाणवत नाही. भरत जाधव यांच्या ब-याच भूमिकांमध्ये एकच टोन वाटतो. सचिन खेडेकर व तत्सम लोकांच्या बोलण्याच्या लकबी बद्दल थोडा प्रश्न पडतो. त्यांच्याकडून काही शब्दांमध्ये विनाकारण अ लांबवला जातो. उदा. व्यासपीठ चा उच्चर ते व्यासsपीठ असा करतात. इथे स चा उच्चर विशेष लांबवला जातो. स हलंत नसला तरी तो पूर्ण उच्चरला जात नाही. तो लांबवला म्हणजेच बोली शुद्ध होते असा काही त्यांचा व इतरांचा समज आहे का? तुमची कारs घेऊन तुम्ही आजs कोठे जाणार? असं आपण म्हणतो का? मग शब्दांमध्ये हे असे लांबवलेले हेल कशासाठी? बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही. फक्त ग्रामीणच नव्हे तर प्रत्येक भूमिकेप्रमाणे भाषा, उच्चार, लकबी बदलतात. मराठी कलाकरांना या क्षेत्रात सुधारणा करण्यास बराच वाव आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

बोली

मराठी_माणूस
Mon, 07/04/2011 - 10:44 नवीन
बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो
  • Log in or register to post comments

. . .

आशु जोग
Wed, 04/11/2018 - 14:47 नवीन
मराठी मानूस हाही सदाशिव ग्रामीण चित्रपट वाटतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो

मुलूखावेगळी
Mon, 07/04/2011 - 10:51 नवीन
बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो
-१ मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/09/2011 - 18:49 नवीन
>>> मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये. अगदी-अगदी, आणि स्पेशल अशी ’मराठवाडी’ बोली नाहीहे राव.....! (आणि असेल अशी बोली तर घ्या बरं काथ्याकूटाला विषय) ग्रामीण चित्रपटातील बोली आणि वेषभूषा संशोधनाचे विषय ठरावेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/04/2011 - 10:54 नवीन
बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही. महाराष्ट्रात दर १२ कोसावर बोली बदलते असे म्हणतात. आता साधे कोकणातले उदाहरण घ्यायचं झालं तर. कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.
  • Log in or register to post comments

सहमत !!!

धन्या
Tue, 07/05/2011 - 21:39 नवीन
कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.
अगदी योग्य म्हणालात... (माणगांव, महाड, रोहा तालुक्यांमधील ग्रामिण मराठी बोलणारा) धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सहमत्/असहमत!

धमाल मुलगा
Mon, 07/11/2011 - 14:39 नवीन
मान्य, की दर बारा मैलाला बोली बदलते, बाज बदलतो. त्याबाबत प्रत्यवाय नाहीच. परंतु, प्रत्येक सिनेमा हा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घडणार्‍या वास्तव/काल्पनिक घटनांवर आधारित असतो. तर 'त्या ठिकाणची बोली' ही तर एकमेवच असेल ना? वानगीदाखल असं म्हणूया की अबक नावाच्या सिनेमाचा हिरो हा मालवणचा आहे. सिनेमाचा पुर्वार्ध मालवणातला आहे. तर मग त्या हिरोची, त्याच्या आजूबाजूच्या पात्रांची संवादफेक ही मालवणातल्या मराठी लहेजाचीच हवी ना? की ती नगरी चालेल? कानाला खटकणार ना? प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आहे. >>बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही. ह्याबाबत असहमती वर नोंदवली आहेच. कोल्हापूर जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या सिनेमामध्ये मराठवाड्यातला औरंगाबादी किंवा बीडचा लहेजा योग्य नसतो. पण कोल्हापूरातली मराठी बोली जशीच्या तशी आणणं मात्र १०१%शक्य असतं. अर्थात....दिग्दर्शक, अभिनेते ह्यांची निरनिराळ्या बोलीभाषांवर कष्ट करण्यची तयारी असेल तर आणि निर्मात्याला तेव्हढा वेळ असेल तरच! नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

१०००+

रघुनाथ.केरकर
Fri, 09/16/2016 - 13:29 नवीन
सहमत, चिपलुन , रत्नाग्री, ची मालवणी वेगळिय, आणी तळ कोकणातली मालवणी वेगळिय, सातार्डा-पेडण्यातली मालवणी वेगळिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

छान चर्चा ... सध्या मराठी शी

स्पा
Mon, 07/04/2011 - 10:54 नवीन
छान चर्चा ... सध्या मराठी शी णे मे एवढ्या ढिगाने येत आहेत कि बापरे .... सगळा अनुदान लाटायचा खेळ आहे बास... प्रेक्षकांशी काही देणघेण नसत
  • Log in or register to post comments

ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ?

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/04/2011 - 12:54 नवीन
ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? तुम्ही मराठी मूव्हिज का वॉच करता ?
  • Log in or register to post comments

हे आले मराठी द्वेष्टे.

गणपा
Mon, 07/04/2011 - 13:23 नवीन
हे आले मराठी द्वेष्टे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

किती किती कारणं सांगू ?

गवि
Mon, 07/04/2011 - 14:08 नवीन
ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? तुम्ही मराठी मूव्हिज का वॉच करता ? -महेश कोठारे तळहातावर मूठ आपटून "डॅम इट्" म्हणतो ते ऐकायला. -अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला. -कोल्हापूरच्या कर्दळीच्या फुलांनी भरलेल्या म्युनिसिपल गार्डन्स बघायला. -"तुझी माझी जोडी जमली ग झक्कास पोरगी पटली" अशासारख्या अद्वितीय रचना ऐकायला आणि त्यावर हिरो हिरविणीचा झिम पोरी झिम डान्स बघायला -वैभवलक्ष्मीच्या व्रताने सुटलेली संकटे बघायला -कुंकवाच्या बळकटीच्या साक्षात् अनुभव घ्यायला. आणि किती कारणं सांगू.. ????? आता वेगळे मराठी सिनेमे निघतात असे ऐकतो, पाहतो. त्याविषयी विशेष भाष्य काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अशोक सराफ आणि निवेदिता हेल

किसन शिंदे
Mon, 07/04/2011 - 14:43 नवीन
अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला. हे एक नंबर :D :D :D :D अजुन एक- केवळ स्वतःच्याच सिनेमात महागुरु पिळगावकरांनी हट्टाने गायलेली गाणी ऐकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ह्रुदयी वसंत फुलताना

मैत्र
Sat, 07/09/2011 - 08:17 नवीन
हे सर्वात उत्तम गाणं आहे मराठी कोरिओग्राफीच्या इतिहासातलं असं माझं ठाम मत आहे. :) त्यामुळे गविंना +११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

गवि, कारण पटली नी प्रतिसाद

माहितगार
गुरुवार, 04/17/2014 - 23:01 नवीन
गवि, कारण पटली नी प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खलास!

फारएन्ड
गुरुवार, 04/17/2014 - 23:56 नवीन
गवि, मेलो हसून. तुमचा तो 'निशाणा' पुन्हा वाचायला हवा. जबरी होता तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भाषा आणि 'हिरवणी'

स्मिता.
Mon, 07/04/2011 - 13:41 नवीन
पहिला प्रश्न हा की आज काल एवढे ग्रामीणच चित्रपट का निघतात? त्याकरता काही जास्तीचे अनुदान वगैरे आहे का? या ग्रामीण चित्रपटांत भाषा तर नाटकी असतेच पण त्यातल्या हिरवणी सुद्धा मुंबईमध्ये उच्चवर्गीय भागात राहणार्‍या मुली वाटतात. कित्येक अश्या चित्रपटात दाखवतात की नायक खेडवळ, कमी शिकलेला आणि 'सो कॉल्ड' गावराण भाषा बोलणारा असतो तर नायिका मात्र अगदी नेहमीच कॉकटेल ड्रेसेस घालून, इंग्रजाळलेलं मराठी बोलणारी बोल्ड मुलगी असते. अगदी मुंबई-पुण्यातही मुली पार्टी वगैरे सोडल्यास रोजच्या व्यवहारात असले कपडे घालत नाहीत आणि ग्रामीण भागात राहणार्‍या मुली मात्र कायम अश्या कश्या?
  • Log in or register to post comments

ह्म्म....

धमाल मुलगा
Mon, 07/04/2011 - 16:21 नवीन
वस्तुस्थिती आहे हे खरं. आता त्यात सत्रा लफडी आहेत बघा. म्हणजे कसंय ना, पुर्वीचे ग्रामिण सिनेमे होते त्यात कामं करणारे बहुतांश कलाकार ग्रामिण पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणांचे होते. (मी बहुतांश म्हणतोय..लगेच राजा परांजपे वगैरे नावं तोंडावर फेकायला यायची घाई करु नये.) हा एक मुद्दा आहे. आता मला सांगा, मुंबई अन पुण्यात आयुष्य गेलेल्यांना नवखी बोली कितपत घोळवता येणं शक्य आहे? मग कुठंतरी (कुठंतरी कसलं, सत्राठिकाणी) फाफलतोच बाज. पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? 'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा? मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?
  • Log in or register to post comments

+१

यकु
Mon, 07/04/2011 - 17:05 नवीन
>>>पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? आहेत ना.. चार दिवस पुस्तकं वाचली नाहीत की लगेच घंटाभर मुलाखती देणारे. ... आणि दोन लावण्या काय गाजल्या की गावोगावी जाऊन तोंड नको इतकं उघडं ठेऊन गाणं म्हणणारे गायक पण आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सहमत आहे..

पल्लवी
Sun, 07/10/2011 - 12:02 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अगदी बरोबर

मंदार कात्रे
गुरुवार, 04/10/2014 - 15:28 नवीन
पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? 'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा? मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

...

आशु जोग
गुरुवार, 04/10/2014 - 15:45 नवीन
भाषा शिकून येत असती तर काय पाहिजे होतं सदाशिवपेठेतल्यांनी सदाशिव भाषा बोलावी.. तरच ती नॅचरल वाटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

पूर्वीचे लोक मेहनती आणि दक्ष होते..

योगप्रभू
Mon, 07/04/2011 - 17:13 नवीन
पूर्वीचे कलाकार हे आपल्या कलेबाबत मेहनती आणि दक्ष होते. याची अनेक उदाहरणे आहेत. १)'शेजारी' या प्रभातच्या चित्रपटात गजानन जागीरदार यांना मुस्लिम मिर्झाची भूमिका साकारायची होती. त्यांनी चित्रीकरणाच्या काळात एका मुसलमान मौलवीची शिकवणी लावून नमाज काटेकोर कसा अदा करायचा आणि भाषेत उर्दू लहेजा कसा आणायचा याचे धडे घोटले. परिणामी त्यांचा अभिनय पाहून मुस्लिम प्रेक्षकांनीही तारीफ केली. २) सुलोचनाबाईंनी स्वतःच्या आठवणीत नमूद केले आहे, की सुरवातीला त्यांचे उच्चार ग्रामीण असल्याने शहरी/ब्राह्मणी वळणाची मराठी बोलणे त्यांना कठीण जाई. भालजींनी त्यांना एकदा समजाऊन सांगितले, की खर्‍या कलाकाराला सर्व भूमिका कराव्या लागतात. त्यामुळे शुद्ध उच्चार आणि विविध भाषा शिकून घ्याव्यात. सुलोचनाबाईंनी आपल्या भाषेवर मेहनत घेतली. पुढे त्या अगदी हिंदी चित्रपटांतही सहजपणे रुळल्या. ३) लता मंगेशकरांच्या मराठी साजूक वळणाच्या उच्चारांचा कुणीतरी (बहुधा दिलीपकुमार. चू. भू. दे. घे) उल्लेख केल्यानंतर लताबाईंनी परिश्रमाने आणि हिंदी चित्रपट दुनियेतील उर्दू जाणकारांशी बोलत आपला लहेजा परफेक्ट केला. नंतर त्यांनी विविध भारतीय भाषांमधील गाणी गाताना आपले उच्चार त्या भाषेप्रमाणे आहेत ना, याची कायम द्क्षता घेतली. आजकालच्या कलाकारांना कुठे एवढा वेळ असतो? सगळे कसे प्रोफेशनल. डायरेक्ट स्क्रिप्ट बोलायला तय्यार.
  • Log in or register to post comments

पक पक पकाक, वळू, खबरदार हे

आशु जोग
Mon, 07/04/2011 - 17:38 नवीन
पक पक पकाक, वळू, खबरदार हे चित्रपट खरोखरच वेगळ्या अर्थाने अंगावर काटा आणतात. बाबांनो झेपत नाही ती भाषा बोलता कशाला, आईने शिकवली असेल ती भाषा बोला ना. खबरदारमधे संजय नार्वेकर रसिका जोशी पक पक पकाक - उषा नाडकर्णी आणि बाकी संधी मिळेल तिथे अमृता सुभाष, ज्योती सुभाष या मायलेकी, फेटा घातलेले मोहन आगाशे, जितेन्द्र जोशी, नंदू माधव हे लोक ग्रामीण बोलीचा जो रतीब घालतात तो डोक्यात जातो
  • Log in or register to post comments

आम्ही खेड्यापाड्यातला /

इंटरनेटस्नेही
Sat, 07/09/2011 - 02:47 नवीन
आम्ही खेड्यापाड्यातला / ग्रामीण / शहरी / निमशहरी असा कोणताही मराठी चित्रपट बघत नाही. एवढा पेशन्स आणि मह्त्तवाचे म्हणजे वेळ नाही आमच्याकडे. - इंट्या इंग्लिश.
  • Log in or register to post comments

अरे हो, तुम्ही कार्यव्यग्र

शिल्पा ब
Sat, 07/09/2011 - 07:31 नवीन
अरे हो, तुम्ही कार्यव्यग्र असता नै का!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

वस्तुस्थिती

चित्रगुप्त
Fri, 04/11/2014 - 08:46 नवीन
कामातिरेकामुळे बर्‍याच मराठी लोकांना मराठी चित्रपट बघाण्यास वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे खरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

कामातिरेकामुळे

बॅटमॅन
Fri, 04/11/2014 - 18:17 नवीन
कामातिरेकामुळे
अगदी अगदी. कामातिरेकामुळे अजून काहीच करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ग्रामीण भागातला कामातिरेक हा

प्यारे१
Wed, 04/16/2014 - 19:12 नवीन
ग्रामीण भागातला कामातिरेक हा एक वेगळाच विषय आहे. १९६७ च्या कोयना भूकंपामध्ये बर्‍याच घरांची पडझड झाली. एकदा आमचे तीर्थरुप बोलता बोलता बोलून गेलेले... ६७ च्या भूकंपामुळं नेमकं कोण कुणाचं कोण ते समजलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चित्रपटांचा विषय चालू आहे..

पल्लवी
Sun, 07/10/2011 - 12:10 नवीन
..पण मला "अग्निहोत्र" ही मालिका आणि त्यातलं मुक्ता बर्वेचं काम आठवलं.. फार घसेफोड न करता , बळचकर हेल न काढताही तिने ग्रामिण मुलीची भुमिका छानच वठवली होती. बाकी, कुणीतरी वर सचिन खेडकरांबद्दल केलेल्या विधानाशी सहमत. त्यांच्या अभिनयात्/बोलण्यात तोच तो पणा आलाय खरा..
  • Log in or register to post comments

अतुल

आशु जोग
Sun, 07/10/2011 - 12:46 नवीन
>>अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. शहरी बोलला तर चालेल पण रेकत रेकत आणि अस्तित्वात नसलेली ग्रामीण मात्र फारच हे वाटते
  • Log in or register to post comments

बरोबर आहे

आशु जोग
Tue, 07/12/2011 - 21:56 नवीन
>>प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आह << धमाल मुलगा तुमचे म्हणणे अगदी पटले
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा