Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नर्मदेतला गोटा on Sun, 12/18/2011 - 00:29
लेखनविषय (Tags)
भाषा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते. तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते. आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती. एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास. कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ. महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल रवी श्रीनिवास - आंध्र विनोद - केरळ मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक असो जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण उदाहरणे पहायला मिळतात ती अशी अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता हिंदी मराठी सिनेमात सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात समीर + मानसी = रमा विजय + सुचित्रा = सुजय पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो म्हणजे पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही हे नाव मुलाचं की मुलीचं. मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते हरप्रीत कौर वगैरे या उलट गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत नावे पाहायला मिळतात. नावातही एक नजाकत जपली जाते. गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती अभिजीत, मंदार, संतोष म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे. अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते. त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे त्यामुळ मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे
  • Log in or register to post comments
  • 274160 views

प्रतिक्रिया

Submitted by चिंतामणी on Sun, 12/18/2011 - 08:27

Permalink

बराच विचार केलेला दिसत आहे.

काय नाव ठेवायचे ठरवले आहे??????? :) :-) :smile:
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Sun, 12/18/2011 - 09:38

Permalink

+ मस्त

+ मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 12/18/2011 - 12:54

Permalink

अथर्व हे नाव!!

गेल्या १५ - १६ वर्षांपासून महाराष्ट्रात मुलग्यांसाठी अथर्व हे नाव फार प्रचलित झाले आहे. दर १० मुलग्यांमध्ये १ किंवा दोघांचे नाव अथर्व असावे असा अलिखित नियम झालेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 12/18/2011 - 13:04

Permalink

हल्ली मुलीचे नाव 'कोलावेरी'

हल्ली मुलीचे नाव 'कोलावेरी' ठेवतायत म्हणे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Sun, 12/18/2011 - 13:12

Permalink

अथर्व

खरे आहे. अथर्व सारखेच व्योम,वेदांत,अर्जुन ही लोकप्रिय आहेत. मध्यंतरी मुलींमध्ये श्रेया हे नाव प्रचलित होते. एका पुणेकराने आपल्या जुळ्या मुली-मुलाचे नाव अनुक्रमे थेंब्,ठिपका अशी ठेवल्याचे ऐकले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sun, 12/18/2011 - 21:49

In reply to अथर्व by चिरोटा

Permalink

बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर

बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर ओघळ होताच....
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 12/18/2011 - 23:47

In reply to बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर by पक पक पक

Permalink

पक पक पक

=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 12/19/2011 - 18:14

In reply to पक पक पक by चिंतामणी

Permalink

ह्येका काय म्हनायचा भाउ ?

ह्येका काय म्हनायचा भाउ ? फवारा कि शिंतोडा....?
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 12/18/2011 - 13:53

Permalink

स्लेष्मा नाव कसंय?आमच्या

स्लेष्मा नाव कसंय? आमच्या काळात खंडोजी, येसाजी, रायाजी, बाजी असली नावे मुलांची तर तारा, मंदोदरी, अनुसूया असली नावे मुलींची असायची. आताच्या काळात काय चाल्लेय कुणास ठावूक? - पाषाणभेदजी (अवांतर: मिपा बदलत आहे काय? जास्त सिरेस होते आहे काय? )
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sun, 12/18/2011 - 21:52

In reply to स्लेष्मा नाव कसंय?आमच्या by पाषाणभेद

Permalink

तुम्च्या काळात पोवाडे गायले

तुम्च्या काळात पोवाडे गायले जायचे आता बदनाम मुन्नि , आणि शिला ह्या बायांची गाणी म्हणलि जातात......
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sun, 12/18/2011 - 15:28

Permalink

माझ्या लहानपणी आमच्या

माझ्या लहानपणी आमच्या शेजारी(डावीकडे १ आणि उजवीकडे २),समोर,समोरच्यांच्या शेजारी आणि घरातही (तीर्थरूप) राजेंद्र.जवळपास हे सगळे राजेंद्र एकाच वयाचे होते.जर कोणी वर जायचा कंटाळा नको म्हणून खालून हाक मारली तर चाहोबाजून 'ओ' ऐकायला यायचा, पण ज्या राजेंद्रला आपण हाक मारतोय तो काही यायचा नाही. आत्ता मुलांमध्ये आर्य किवा आर्यन(आर्यनचा अर्थ काय हो?) तर मुलींमध्ये सई हे नाव फार जोरात आहे.कोठेही कार्यक्रमाला जा ४-५ छोट्या छोट्या सया असतातच.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 12/23/2011 - 13:24

In reply to माझ्या लहानपणी आमच्या by किचेन

Permalink

आर्यन..

माझ्या माहीतीप्रमाणे हे सूर्याच्या एका मुलाचे नाव आहे.. माझ्या आईवडीलांनी आम्हां भावंडाची जी नावे ठेवलीत ती मला लै आवडतात.. "शंतनू, अनिकेत आणि चिन्मय".. माझं नाव बोलायला तर आमच्या गावातल्या लै लोकांना त्रास व्हायचा. (का, कोण जाणे?) एका सरकारी माणसाने कुठल्याशा कागदपत्रात हे नाव "चिंध भाई" असं लिवलं होतं.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 12/18/2011 - 16:03

Permalink

अत्ता गेली काही दशकं धार्मिक

अत्ता गेली काही दशकं धार्मिक अभिमानाची जी भरती आलेली आहे...त्यात मुला मुलींना धार्मिक वस्तू,साधनांची नावं देण्याचं भयंकर फॅड आलय---उदा- 'यज्ञोपवित(जानवं),सृवा(यज्ञातली १पळी),समिधा(यज्ञात आहुती देण्याची वस्तू), प्रणीता( यज्ञा भोवती पाणी शिंपडण्याची वाटी)...अशी नावं ठेवण्याचा परिणाम काय होतो यावरुन वि.आ.बुवा यांचा १तुफ्फान विनोदी लेख अठवला...त्यातल्याच कल्पनेचा आधार घेतला तर पुढे काय गंमत उडु शकेल ते पहा- प्रसंग १)या चौघांच खेळताना भंडण झालं तर- समिधा- ए सृवे त्या यज्ञोपविताला हिसडा दे ग एक जोरात,चिटर मेला... यज्ञो- ए सृवडे मला नको ओढू... सृवा- मी स्वतःहुन नै कै ओढत, त्या सम्दीनी सांगितलन मला,,,जळकी मेली समिधा- प्रणीतेनी डोळा मारला म्हणुन ढकलली मी तुला कळ्ळं ! आणी मला जळकी का म्हणतेस गं सृवडे कुसके! प्रणीता-मग तू समिधा एस ना,जळणारच शेवटी... इ.इ. प्रसंग २)हे चौघं विचित्रावस्थेत सापडले तर -इतर त्यांचं वृत्तांकन कसं करतील? १मुलगा- ओ काका--- तुमचं 'यज्ञोपवित' गटारात पडलय पिऊन ,उचला त्याला...च्यायला आंम्हाला त्रास फुकट..! १आज्जीबै-अगं वनिते तुझ्या या तिन्ही कार्ट्यांचं कै खरं नै गंssss... मेल्या तिघी गच्चीत गोंधळ घालतायत... सृवेनी काडी पेटवली,त्यावर समिधेनी शिगरेट पेटवलीन,नी प्रणिता नी त्या आळीपाळीनं झुरके मारतायत वरं ... वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments

Submitted by जमीर इब्राहीम 'आझाद' on Sun, 12/18/2011 - 19:04

In reply to अत्ता गेली काही दशकं धार्मिक by अत्रुप्त आत्मा

Permalink

लय म्हन्जे .......

अत्रुप्त आत्मा, लय म्हन्जे .... लय म्हन्जे ..... लय म्हन्जे लयच भारी..! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 12/18/2011 - 21:53

In reply to लय म्हन्जे ....... by जमीर इब्राहीम 'आझाद'

Permalink

जमीर इब्राहीम 'आझाद', खुप

जमीर इब्राहीम 'आझाद', खुप म्हन्जे.... खुप म्हन्जे.... खुप म्हन्जे खुपच धन्यवाद...! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 12/19/2011 - 08:06

In reply to जमीर इब्राहीम 'आझाद', खुप by अत्रुप्त आत्मा

Permalink

प्रसंग २) म्हणजे अआच्या

प्रसंग २) म्हणजे अआच्या जुन्या आठवणी समजायच्या काय? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 12/19/2011 - 08:34

In reply to प्रसंग २) म्हणजे अआच्या by पाषाणभेद

Permalink

@-२) म्हणजे अआच्या जुन्या

@-२) म्हणजे अआच्या जुन्या आठवणी समजायच्या काय?<<< >>>''म्हणजे इईच्या आठवणींमधले जुने समज'' असं समजा हवंतर...काय!? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sun, 12/18/2011 - 16:49

Permalink

ओवि अशा प्रकाराचे एक नाव

ओवि अशा प्रकाराचे एक नाव इतक्यात ऐकले आहे.....जर मुलगा झाला तर त्याचे नाव पोवाडा,भजन असेही ठेवतील काहि लोकं,मुलीचे नाव विणा तर मग मुलाचे नाव काय तंबोरा,ढोल्,तबला,ताशा असे ठेवणार का..?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sun, 12/18/2011 - 19:56

Permalink

:)

फार पुर्विच एक व्यंगचित्र आठवलं.. चिंटुच्या वयाचा बॅट हातात घेतलेला एक मुलगा त्याच्या मित्राला सांगत असतो पुर्वि मला बाबा सुनील म्हणायचे, नंतर सचिन म्हणु लागले, सध्या विनोद म्हणतात.... (तेव्हां विनोद कांबळी नूकताच फोर्मात आला होता)
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Sun, 12/18/2011 - 19:39

Permalink

आमच्या मुलीचे नाव गार्गी

आमच्या मुलीचे नाव गार्गी ठेवले. ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by केळ्या on Sun, 12/18/2011 - 21:16

Permalink

अजून एक गम्मत...

एका मित्राचे नाव अनंत,बायको अपेक्षा आणि मुलगी झाल्यावर पूर्ती.... बघा कसे वाटते!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 04/17/2014 - 00:59

In reply to अजून एक गम्मत... by केळ्या

Permalink

=)) हाहाहा कसली हसतीये

=)) =)) हाहाहा कसली हसतीये :)
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Sun, 12/18/2011 - 22:27

Permalink

माझ्या सुयोग नावाच्या

माझ्या सुयोग नावाच्या मित्राला प्रतिक्षा नावाची बायको मिळाली. 'प्रतिक्षा' केली की 'सुयोग' भेटतो! :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 12/18/2011 - 22:44

Permalink

नशीब आपल्या राज्यात अशी नावे नाहीत.

धमाल चित्रपटातील एक दृश्य श्रीपेरुम्बदूर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Mon, 12/19/2011 - 09:42

Permalink

उत्तम लेख लिहिला आहे. दिवस

उत्तम लेख लिहिला आहे. दिवस गेल्यानंतर दांपत्य नावातच फार अडकतात. एखाद्या सुकुमाराचे नाव ठेवले जाते, मोठा होऊन गुंड झाल्यावर तो इतरांना नावे ठेवतो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली माने on Mon, 12/19/2011 - 15:25

Permalink

माझ्या मुलाचे नावः

माझ्या मुलाचे नावः श्रिरत्न आहे. कसे वाटते?? अर्थात तशी माझ्या दिरांची इच्छा होती. त्यांच्या मुलाचे नाव श्रिरत्न असावे.पण तसे होउ शकले नाही. आम्ही त्याला "श्रि " म्हणतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 12/19/2011 - 18:26

Permalink

सहजच..

ह्या धाग्यामुळे जस्ट शेअर करावेसे वाटले म्हणून: माझ्या मुलांची नावे आहेत १. अद्वैत २. आदित्य मी आणि माझी बायको 'अद्वैत' आहोत. त्याची खुण म्हणजे माझा मोठा मुलगा म्हणून त्याचे नाव अद्वैत. त्या अद्वैतावस्थेतून जे तेज निर्माण झाले ते म्हणजे माझा धाकटा मुलगा म्हणून त्याचे नाव आदित्य. :) - (नावे ठेवणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 12/24/2011 - 16:13

In reply to सहजच.. by सोत्रि

Permalink

हात्तिच्या मारी.... मला वाटले

हात्तिच्या मारी.... मला वाटले तुमच्या मुलांची नावे क्युबा लीब्रे, ग्रासहॉपर, स्लीपरी निपल, स्क्रूड्रायवर, माई-टाई अशी काहीशी असतील इथे "सेक्स ऑन द बीच" आणि अजुन काही नावे जाणीवपूर्वक टाळली आहेत याची नोंद घ्यावी. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 12/19/2011 - 18:36

Permalink

अथर्व आणि सार्थक

एकेकाळी म्हणजे ८/९ वर्षापुर्वी अथर्व आणि सार्थक ही नावे मुलांमध्ये आणि आर्या हे नाव मुलींमध्ये फार ठेवले जात होते.. माझ्या नात्यातल्या/मित्रांच्या मुलांमध्ये ६ अथर्व ४ सार्थक आणि ३ आर्या आहेत. (आम्ही म्हणून कटाक्षाने ही नावे टाळली...)
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on गुरुवार, 02/02/2017 - 18:37

In reply to अथर्व आणि सार्थक by योगी९००

Permalink

कुठली ठेवली तेही कळू द्या ना

कुठली ठेवली तेही कळू द्या ना !
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 12/19/2011 - 19:16

Permalink

माझ्या एका मित्राने त्याच्या

माझ्या एका मित्राने त्याच्या, बायकोच्या आणि आडनावाचं आद्याक्षर घेउन मुलाच नाव ठवलं बायकोच नाव: प्रतिभा संतोष नार्वेकर (Pratibha Santosh Narvekar ) प्रसंन्ना (Prasanna) आवांतर : स्वत:च्या मुलीचं नाव शोधताना बराच रिसर्च करावा लागला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 12/19/2011 - 19:32

In reply to माझ्या एका मित्राने त्याच्या by गणपा

Permalink

आद्याक्षरे घेऊन लोक स्वत:चे

आद्याक्षरे घेऊन लोक स्वत:चे आयडीपण घेतात असे ऐकलंय अवांतरः कधी कधी ती भावी जोडीदाराची पण असू शकतात. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Mon, 12/19/2011 - 20:05

Permalink

ऐश्वर्या, रिया, खुशी ,

ऐश्वर्या, रिया, खुशी , वेदांत, आर्यन यांचा सुळसुळाट आहे सध्या आमच्या आजूबाजूला
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 12/19/2011 - 20:27

Permalink

अतिशय अभ्यासपूर्ण आणि

अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख. असे ' दर्जेदार' लेख पुन्हा सुरु झाले याचा आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 12/20/2011 - 01:28

In reply to अतिशय अभ्यासपूर्ण आणि by सूड

Permalink

+१

हेच म्हणतो. अश्या प्रकारचे दर्जेदार लेखन हा मिपाचा युएसपी आहे. - मिपावरचा आद्य दर्जेदार लेखक, इंटेश्वर कुलकर्णी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Tue, 12/20/2011 - 10:46

Permalink

माझ्या एका मित्राने मुलांची

माझ्या एका मित्राने मुलांची नावं 'दौहित्र' आणि 'द्वैपायन' अशी ठेवली आहेत !!!! गणपतीची नावं ही ! एका मैत्रिणीने मुलीचं नाव 'नीवा' ठेवलंय. म्हणजे काय माहीत नाही. रियान या नावाचा अर्थ माहीत नाही. पण ओळखीत दोन रियान आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 12/20/2011 - 12:51

In reply to माझ्या एका मित्राने मुलांची by मितान

Permalink

रियान = Ryan??

ते दोन रियान मुले आहेत कि मुली? जर मुले असतील तर कदाचित चेतन भगतच्या 5 Point Someone मधील Ryan या पात्रावरुन घेतले असल्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by michmadhura on Tue, 12/20/2011 - 18:15

Permalink

माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी'

माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी' ठेवले आहे. जवळजवळ महीनाभर मी शोधाशोध करुन हे नाव ठरवले. पण मला या नावाबद्दल अगदी भिन्न प्रतिक्रिया मिळतात. काहीजणांना नाव खूप आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Tue, 12/20/2011 - 18:30

In reply to माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी' by michmadhura

Permalink

स्विनी ?

मंजे ? मन स्विनी तेज स्विनी पण नुसतच स्विनी?
  • Log in or register to post comments

Submitted by michmadhura on Tue, 12/20/2011 - 18:39

In reply to स्विनी ? by शाहिर

Permalink

हो, नुसतंच स्विनी. गुगलवर

हो, नुसतंच स्विनी. गुगलवर अर्थ बघा या नावाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Tue, 12/20/2011 - 18:50

In reply to हो, नुसतंच स्विनी. गुगलवर by michmadhura

Permalink

हे घ्या

meaning of swini असा सर्च केला पहिली लिंक http://wiki.answers.com/Q/What_is_the_meaning_of_marathi_word_swini आली त्यात जे अभिप्रेत आहे तेच म्हणायचे आहे का ? http://www.wordaz.com/swini.html कि या मधे काही आहे ? तुम्ही नाव ठेवलतं म्हणून तुम्हाला विचारला तर गूगल करा म्हणे.. गूगल ने १० पर्याय सांगितले तर त्या मधला कुठला समजायचा ??
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 12/20/2011 - 20:04

In reply to हे घ्या by शाहिर

Permalink

+१

तुम्ही नाव ठेवलतं म्हणून तुम्हाला विचारला तर गूगल करा म्हणे.. गूगल ने १० पर्याय सांगितले तर त्या मधला कुठला समजायचा ??
=))
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 12/20/2011 - 20:07

In reply to हे घ्या by शाहिर

Permalink

चिल शाहिर

सोप्पय. जो पर्याय तुम्हाला आवडेल अथवा चांगला वाटेल तो पर्याय निवडायचा. त्याच अर्थाने ठेवले असेल नाव असं समजायचं. हाकानाका दरवेळेस मुळाशी जाऊन कशाला दुसर्‍याची मते विचारायची? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Fri, 12/23/2011 - 00:05

Permalink

अथर्व आणि पार्थ हे राहीलं

अथर्व आणि पार्थ हे राहीलं होतं. एक पार्थो कुलकर्णी नावाचा छोटा मुलगाही पाहिला होता
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 12/23/2011 - 14:10

Permalink

मी पाचवीत असताना माझ्या

मी पाचवीत असताना माझ्या कॉलनीत ८-१० शुभम जन्माला आले..... तसेच गुजरातेत, माझ्या मित्राच्या बायकोचे नाव विलास असे ऐकले होते.... काही मराठी नावे जे मुले अन मुली दोहोंमध्ये आढळतात प्रितम, स्नेहल, किरण, शीतल
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Fri, 12/23/2011 - 18:23

Permalink

मित्रविंदा

मगधीरा मधलं हे नाव आवडला आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 12/24/2011 - 15:12

Permalink

२००० साली कहो ना प्यार है

२००० साली कहो ना प्यार है रिली झाल्यानंतर बर्‍याच नवजात बालकांची नाव रितिक, रितेश, ह्रितिक अशी ठेवण्यात आली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Wed, 04/16/2014 - 13:00

Permalink

आणिक एक ऑब्झर्वेशन

आणिक एक ऑब्झर्वेशन 'ओवी' नाव असेल तर आडनाव कुलकर्णीच असलं पाहीजे
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 04/17/2014 - 14:33

In reply to आणिक एक ऑब्झर्वेशन by नर्मदेतला गोटा

Permalink

ओवी...

अवो नाय वो, मला एक वोवी द्येसमुक म्हाईत हाय... आन त्यी मईच मुल्गी हाय! काय म्हंता?
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 04/16/2014 - 14:52

Permalink

नैवेद्य

नैवेद्य नाव कसे वाटते...? अजून तरी ऐकले नाही... जनरली मुलांची नावे 'अ'कारान्त असतात. म्हणजे शेवटी 'अ' असते.. (योगेश, विजयसुनील वगैरे..) व मुलींची नावे 'आ' किंवा 'ई" कारान्त असतात. (क्षमा, स्मिता, दामिनी, पल्लवी,).. याला काही अपवाद आहेत का..? उदा : मुलांची नावे - अश्वत्थामा - आकारान्त.. (दक्षिण भारतीय नावे मणी, मुथ्थू वगैरे ईकारान्त) मुलींची नावे - सुमन्,विमल, कमल - अकारान्त
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com