'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी
पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्यांचा ?
अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते.
तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात
पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो
पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते.
आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे
कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती.
एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास.
कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी
इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय
मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो
उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ.
महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात
प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती
नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल
रवी श्रीनिवास - आंध्र
विनोद - केरळ
मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक
असो
जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण
उदाहरणे पहायला मिळतात ती अशी
अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग
संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता
हिंदी मराठी सिनेमात
सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती
तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात
आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात
समीर + मानसी = रमा
विजय + सुचित्रा = सुजय
पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का
त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो
म्हणजे
पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही
हे नाव मुलाचं की मुलीचं.
मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते
हरप्रीत कौर वगैरे
या उलट
गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत
शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत
नावे पाहायला मिळतात.
नावातही एक नजाकत जपली जाते.
गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात
इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल
त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून
काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात
पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती
पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती
अभिजीत, मंदार, संतोष
म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील
बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा
सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे
अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.
अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली
आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते.
त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे
त्यामुळ
मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार
असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे
वाचने
274624
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
बराच विचार केलेला दिसत आहे.
+ मस्त
अथर्व हे नाव!!
हल्ली मुलीचे नाव 'कोलावेरी'
अथर्व
बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर
In reply to अथर्व by चिरोटा
पक पक पक
In reply to बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर by पक पक पक
ह्येका काय म्हनायचा भाउ ?
In reply to पक पक पक by चिंतामणी
स्लेष्मा नाव कसंय?आमच्या
तुम्च्या काळात पोवाडे गायले
In reply to स्लेष्मा नाव कसंय?आमच्या by पाषाणभेद
माझ्या लहानपणी आमच्या
आर्यन..
In reply to माझ्या लहानपणी आमच्या by किचेन
अत्ता गेली काही दशकं धार्मिक
लय म्हन्जे .......
In reply to अत्ता गेली काही दशकं धार्मिक by अत्रुप्त आत्मा
जमीर इब्राहीम 'आझाद', खुप
In reply to लय म्हन्जे ....... by जमीर इब्राहीम 'आझाद'
प्रसंग २) म्हणजे अआच्या
In reply to जमीर इब्राहीम 'आझाद', खुप by अत्रुप्त आत्मा
@-२) म्हणजे अआच्या जुन्या
In reply to प्रसंग २) म्हणजे अआच्या by पाषाणभेद
ओवि अशा प्रकाराचे एक नाव
:)
आमच्या मुलीचे नाव गार्गी
अजून एक गम्मत...
=)) हाहाहा कसली हसतीये
In reply to अजून एक गम्मत... by केळ्या
माझ्या सुयोग नावाच्या
नशीब आपल्या राज्यात अशी नावे नाहीत.
उत्तम लेख लिहिला आहे. दिवस
माझ्या मुलाचे नावः
सहजच..
हात्तिच्या मारी.... मला वाटले
In reply to सहजच.. by सोत्रि
अथर्व आणि सार्थक
कुठली ठेवली तेही कळू द्या ना
In reply to अथर्व आणि सार्थक by योगी९००
माझ्या एका मित्राने त्याच्या
आद्याक्षरे घेऊन लोक स्वत:चे
In reply to माझ्या एका मित्राने त्याच्या by गणपा
ऐश्वर्या, रिया, खुशी ,
अतिशय अभ्यासपूर्ण आणि
+१
In reply to अतिशय अभ्यासपूर्ण आणि by सूड
माझ्या एका मित्राने मुलांची
रियान = Ryan??
In reply to माझ्या एका मित्राने मुलांची by मितान
माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी'
स्विनी ?
In reply to माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी' by michmadhura
हो, नुसतंच स्विनी. गुगलवर
In reply to स्विनी ? by शाहिर
हे घ्या
In reply to हो, नुसतंच स्विनी. गुगलवर by michmadhura
+१
In reply to हे घ्या by शाहिर
चिल शाहिर
In reply to हे घ्या by शाहिर
अथर्व आणि पार्थ हे राहीलं
मी पाचवीत असताना माझ्या
मित्रविंदा
२००० साली कहो ना प्यार है
आणिक एक ऑब्झर्वेशन
ओवी...
In reply to आणिक एक ऑब्झर्वेशन by नर्मदेतला गोटा
नैवेद्य
>>जनरली मुलांची नावे 'अ
In reply to नैवेद्य by योगी९००
हल्लीची नावे मुलींची :अरीयाना
अर्णव
In reply to हल्लीची नावे मुलींची :अरीयाना by आरोही
सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या
सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.सध्या नाही हो, अगदी माझ्या जमान्यापासून. तसे अभिषेक बच्चन आणि माझ्या वयात फारसा फरक नसावा. कारण माझ्या आईच्या माहेरचे बिग बी अमिताभचे मोठेच फॅन. त्याने आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवलेय असे समजताच माझेही नाव अभिषेक ठेवण्यात आले. पण चांगलेय नाव. हां आता काही जण त्याचा अभ्या किंवा लाडात येऊन अबड्या करतात, पण चलता है.. मी मात्र माझ्या मुलीचे नाव आराध्य ठेवण्याचे टाळले. तसे सुचवूनही झाले होते.आम्ही नावे ठेवतो...
नाविन्याची आवड या सदराखाली
सहज, आरव.
कैच्याकै नावं अस्तेत राव,
In reply to सहज, आरव. by यसवायजी
एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला
In reply to कैच्याकै नावं अस्तेत राव, by बॅटमॅन
तळटीप- आध्यात्मिक लोकांनी हा
In reply to एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला by बॅटमॅन
झालं ह्यांचं सुरु..
In reply to एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला by बॅटमॅन
(No subject)
In reply to झालं ह्यांचं सुरु.. by सूड
बाकी आरव च्या बाबतीत सहमत !!
In reply to सहज, आरव. by यसवायजी
मुलाचं नाव ठेवावं की नाही हे
In reply to सहज, आरव. by यसवायजी
दूरदर्शन
अजुन काही सध्याची प्रचलित
हे राम!
In reply to अजुन काही सध्याची प्रचलित by पक्या
मला आहुत हे मुलाचे नाव फार
@आहुत हे मुलाचे नाव फार आवडते
In reply to मला आहुत हे मुलाचे नाव फार by शुचि
गुर्जी आहुती शब्दाचा अर्थ मला
In reply to @आहुत हे मुलाचे नाव फार आवडते by अत्रुप्त आत्मा