डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे.
कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या.
ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo:
दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.
वाचने
23227
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
In reply to पाकातली बोरं by मधुरा देशपांडे
फोटोतली बोरे
In reply to धन्यवाद by हवालदार
छानच हो.
ह्या कट्ट्यावरी शतदा प्रेम करावे.......
हे सर्व पदार्थ तिथे रोज
संपर्कक्रमांक...
In reply to हे सर्व पदार्थ तिथे रोज by खटपट्या
विश्णूजी की रसोई,ओवळा नाका
In reply to हे सर्व पदार्थ तिथे रोज by खटपट्या
धन्यवाद अजया तै
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
हम भी खड़े है राहोंमे
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
बा भिडस्ता, जीडीसीच्या
In reply to हम भी खड़े है राहोंमे by भीडस्त
एक स्तुत्य उपक्रम.
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
धमाल केली...
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला
संजिवनी मंत्र २५००/ ,तर
छान कट्टा आणि वृत्तांत
दाल तडकाचा फोटो बघुन काय काय
सगळ्या अनाहितांचे खुप खुप
निमंत्रण....
In reply to सगळ्या अनाहितांचे खुप खुप by Mrunalini
मस्त्...मस्त...
एकदम सही कट्टा आणि वृतांत
पुण्यनगरीस्थित अनाहितांनो..
चला आपण पण विश्नुजी की रसोईला
In reply to पुण्यनगरीस्थित अनाहितांनो.. by पिलीयन रायडर
पुण्यात पण आहे का ते? मग
In reply to चला आपण पण विश्नुजी की रसोईला by त्रिवेणी
हो आहे. मी जाऊन आले एकदा तिथे
In reply to पुण्यात पण आहे का ते? मग by पिलीयन रायडर
पुण्यातल्या विष्णूजी की
In reply to हो आहे. मी जाऊन आले एकदा तिथे by त्रिवेणी
सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे
In reply to पुण्यातल्या विष्णूजी की by डॉ सुहास म्हात्रे
घ्या... त्रिवेनी ह्यांनी
In reply to सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे by त्रिवेणी
तुम्हीच सांगा...
In reply to घ्या... त्रिवेनी ह्यांनी by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !
In reply to सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे by त्रिवेणी
जमवाच आता! इज्जत का सवाल!!!
In reply to पुण्यनगरीस्थित अनाहितांनो.. by पिलीयन रायडर
अगदी सहमत एकदा ठरवले कि मागे
In reply to जमवाच आता! इज्जत का सवाल!!! by अजया
अनाहितांमध्ये मुंबैकर पुणेकर
In reply to अगदी सहमत एकदा ठरवले कि मागे by आरोही
=))
In reply to अनाहितांमध्ये मुंबैकर पुणेकर by प्यारे१
अजिबात नाही हा ....आणि तसा
In reply to अनाहितांमध्ये मुंबैकर पुणेकर by प्यारे१
त्यापेक्षा मध्यवर्ती ठिकाणी
In reply to जमवाच आता! इज्जत का सवाल!!! by अजया
मुलींनो पाकातली बोर खातांना
त्रिवेनी, पाकातली बोरं तुझी
In reply to मुलींनो पाकातली बोर खातांना by त्रिवेणी
आवडले.
मस्त!!
छान वृत्तांत.
उत्तम!
अनाहिता या ग्रुपचा हा कट्टा
गविकाका या कच्च्या बेसनाचे
In reply to अनाहिता या ग्रुपचा हा कट्टा by गवि
ग्राहकांचा नियोजनाचा अभाव
In reply to गविकाका या कच्च्या बेसनाचे by कंजूस
संक्षिप्त वृत्तांत
बरं जमलय.. पण तरीही कुच तो कम
In reply to संक्षिप्त वृत्तांत by इरसाल
काय कम हय? नै म्ह. साधी शङ्का
In reply to बरं जमलय.. पण तरीही कुच तो कम by पिलीयन रायडर
म्हणुन तर "कुच तो" असं लिहीलय
In reply to काय कम हय? नै म्ह. साधी शङ्का by बॅटमॅन
अरे हे काय आहे!
In reply to संक्षिप्त वृत्तांत by इरसाल
आमी नाय ज्जा !
In reply to अरे हे काय आहे! by पैसा
हेहेहे.
In reply to संक्षिप्त वृत्तांत by इरसाल
चला!
In reply to संक्षिप्त वृत्तांत by इरसाल
स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प
प्रिमो ,माझी प्रतिक्रिया
In reply to स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प by प्रीत-मोहर
हुर्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
अरे व्वा...!!!
बाप्रे
छान व्रूत्तांत. फोटो पण मस्तच
कट्टा एकदम झक्कास
जोरदार कट्टा अन वृत्तांत
मस्तच!