नमस्कार मंडळी,
सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो.
मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्या अर्थाने सक्रिय असणार्या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला
झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो. तर अश्या वेळी ह्या वाढीव मागणीला बंधन घालण्यासाठी पुरवठा बंद केला जातो. थोड्या वेळ पुरवठा बंद झाला की केवळ सदस्य तेवढे राहतात आणि त्यांच्या मागणीला थोड्यावेळात उत्तर देता येते आणि मिसळपाव पुर्ववत सुरू होते. गेले काही दिवस आपण मिसळपाव अचानकच बंद झालेलं आणि लागलीच सुरू झालेलं पाहिलेलं आहे.
एका अर्थाने ही परिस्थिती मिसळपाववरचा वाढता ओघ दाखवते म्हणून चांगली आहे, असं म्हणूया मात्र त्यामुळे सदस्यांना काही वेळा त्रास होतो याचं वाईट सुध्दा वाटतं.
लवकरच मिसळपावचा सेवादात्याच्या क्षमता वाढवण्याचे ठरलेले आहे. त्यानंतर अश्या वाढीव मागणीला सुध्दा आपण उत्तर देऊ शकू अशी आशा आहे.
मिसळपावच्या धोरणानुसार सदस्यांना नेमकं काय होतंय याची माहिती व्हायला हवी म्हणून हे येथे देत आहे.
काही शंका किंवा सुचना असतील तर जरूर कळवा.
धन्यवाद.
वाचने
4348
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे
+१
In reply to हे by बिपिन कार्यकर्ते
काही तांत्रिकी सूचना...
++१
In reply to काही तांत्रिकी सूचना... by मनिष
लॉग इन
In reply to ++१ by आनंदयात्री
इमेज वेरिफिकेशन
In reply to लॉग इन by मनिष
अंशतः सहमत ....
In reply to ++१ by आनंदयात्री
नैसर्गिक अनैसर्गिक
ही कोणाची
In reply to नैसर्गिक अनैसर्गिक by प्रियाली
नवे सदस्य कसे मिळणार
फक्त by default
In reply to नवे सदस्य कसे मिळणार by विजुभाऊ
वाचक मात्र असावे.