लोचा ए उल्फत

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
3 Apr 2014 - 5:33 pm

पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली.
बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला.

कोण आले एवढ्या सकाळी?
दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला.
दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.

पेपर उघडत असतांना, डोळे चोळत चोळत, आज पहाटेच पडलेल्या स्वप्नाचा विचार करत होतो.
अगदी ओळखीचा चेहरा होता तो, हातात पेटी घेऊन गाणे म्हणत रेल्वेत डब्या डब्यात हिंडत होता....!!!

कोणते बरे गाणे होते ते? हो आठवले.
हम तुझसे मोहब्बत करके सनम.... रोते भी रहे...! हसते भी रहे....!!

कोण चेहरा होता बरा तो?

खूप खूप .......विचार केल्यावर आठवले!

अरे हा तर तोच चेहरा आहे, जो सहा महिन्यापूर्वी पण स्वप्नात आला होता!

तेव्हा हाच चेहरा कसला तरी अहवाल हातात घेऊन फाडून कचरा पेटीत टाकतांना दिसला होता....!

तोपर्यंत पेपराच्या पहिल्या पानावर बातमी होती..
Rahul Gandhi’s application for Amethi domicile cancelled

इंटरनेट चालू करून पाहतो तर हि बातमी:5 reasons why Rahul is no son of Amethi

बालकथाराजकारणप्रकटनप्रतिक्रियामाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

3 Apr 2014 - 5:38 pm | टवाळ कार्टा

लेखनविषय::
बालकथा

=))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2014 - 5:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कोण आले एवढ्या सकाळी?
दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला

रोज दूध घेत नाहीस काय रे आयुर्हिता?

सुहासदवन's picture

3 Apr 2014 - 5:53 pm | सुहासदवन

तुम्ही आधी नाव का बदलले ते सांगा...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2014 - 6:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सुहास दवन ह्या शब्दाचा तेवढा अर्थ सांग रे बाबा
(सायंकाळची समई लावणारी)माई

आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या....

तरी पण हे घ्या....
सुहास द वन

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2014 - 10:08 am | प्रकाश घाटपांडे

रमाबाईंना प्रेमापोटी लोक माई नाही का म्हणायचे!

सफरचंद's picture

5 Apr 2014 - 4:15 pm | सफरचंद

दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला - दरवाजा न उघडता कळाले नसतेच कि ??
दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला - का, वेगवेगळे घेण्यास मनाई होती का ??

===========================================================

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 4:18 pm | आत्मशून्य

अरे हा तर तोच चेहरा आहे, जो सहा महिन्यापूर्वी पण स्वप्नात आला होता!

तेव्हा हाच चेहरा कसला तरी अहवाल हातात घेऊन फाडून कचरा पेटीत टाकतांना दिसला होता..

अगागा. ही अधिकृत बालकथा आहे म्हणूनच... अन्यथा....