Skip to main content

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 01/04/2014 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन. (नै काका हल्ली कट्टे जोरात चालतात असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. मराठीसंस्थळांवर एकदा काथ्याकूट यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही मराठी संस्थळांवर यायला लागली. विविध कंपू निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे. उदाहरण म्हणुन.... कशाला?????????????? सगळ्यांना म्हायते की! ;) मराठी संस्थळांवर सर्वच वाईट नाही. काही कंपू चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ गमन करा, कोणी म्हणेल सरळ मराठी संस्थळांवर चपलांचा वापर करुन टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना संपादक मंडळाची धमकी देऊन टाका, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच. विनंती : आमच्याकडे मराठी संस्थळ उघडत नाही, भारीतले ड्यु आयडी नाहीत वगैरे टाळता आले तर टाळावे. (१.जास्त बदल न करावे लागल्याबद्दल प्रा. डॉ. सरांचे हार्दिक आभार. २. मराठी संस्थळ च्या जागी आवश्यक तो बदल स्वतः करुन घेणे ३. उदाहरण म्हणून आजूबाजूच्या आयडींना व्यनि/ खरडी कराव्यात.) सर्वांना पुन्हा एकदा 'फूल'ण्या 'फूलवण्या'साठी हार्दिक शुभेच्छा!

वाचने 13554
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

कुणाला 'फूल'वण्यासाठी ?

मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

औषधोपचार गुंतवणूक कृष्णमुर्ती स्थिरचित्र
अग फुलवा तु फुलवायचे की....

हभप प्यारेबुवा वाईकर आपली महान अध्यात्मिक प्रतिभा अशा विडंबनात वाया घालवीत असल्याचे पाहून मनापासून खेद वाटतो.

In reply to by प्रचेतस

गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व किंवा गेलाबाजार संतांची शिकवण आणि सण असा एखादा धागा अतिशय समयोचित झाला असता.

In reply to by बॅटमॅन

गेलाबाजार संतांची शिकवण
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))))

In reply to by बॅटमॅन

सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

काय डोकेदुखी आहे राव! सध्या स्वयंपाकाचं काम कमी झालेलं दिसतय यांचं! नैतर एवढा वेळ कधी मिळाला नव्हता! ;)

In reply to by रेवती

साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

भुताचा सिनेमा पाहावत नाही आणि फार वेळ मान वळवता येत नाही उत्सुकता आहेच पुढे काय होतंय ?पावलं उलटी आहेत का सुलटी आहेत .