डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)
काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली. निराशेतून सुचलेलं हे कवन, आपणासमोर ठेवतोय, फुटबॉल रसिकांना, त्यातून युनायटेड फॅन्स ना या भावना नक्कीच जास्त समजतील.
(धुनः भातुकलीच्या खेळामधली)
मॅन्चेस्टरच्या युनायटेड ची, हालत केविलवाणी
अर्ध्या मिनिटी घाव लागला, डर्बी लाजिरवाणी ||धृ||
पर्सी बसला, होऊनि जखमी, स्तंभ एक ढासळला
जुना मावळा, रूनी सुद्धा, मुळीच नाही फळला
होता होता गोल होईना, पळे तोंडचे पाणी ||१||
माटा वदला, मला करू द्या, गनिमावरती गोल
संधी येता, परी तयाने, ठरवली ती फोल
हाता तोंडा येता घास, काढुनि घेई कोणी ||२||
वाढत गेले, वैफल्य मग, गडी जाहले हिंस्त्र
फेलैनी ने, वापरले मग, कोपररूपी अस्त्र
एकाएकी होऊ लागले, सगळे इथे अडाणी ||३||
मोयेस होई, लाल बुंद मग, जागीच घाली घिरट्या
तया कळेना, कान पकडुनी, कुणा म्हणावे कारट्या
कापत राही रागाने तो, एकटाच वेड्यावानी ||४||
एक बिचारा, तेथ डी हिया, हतबल लढवी खिंड
गोल कराया, चालून येता, सिटीवाल्यांची झुंड
अखेर खापर त्याच्या माथी, त्याची हीच विराणी ||५||
समय संपता, शिटी वाजली, आणि काय विचारा
तीन शून्य ची, हार जाहली, खेळ संपला सारा
जीजीएमयू, जीजीएमयू, तरीही गाई कोणी ||६||
आहे जरी हा, समय कठीण, झगडती सारे वीर
उभे पाठीशी, फॅन तरीही, अखंड अन खंबीर
मारू उसळी गर्तेतून ही, अमुची रीत पुराणी ||७||
- अपूर्व ओक
-----------
वर म्हटल्याप्रमाणे, या सीजन ला नाही पण पुढच्या सीजन ला नक्कीच कमबॅक होणार अशी खात्री आहे...
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड!
याद्या
4464
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
रोचक.
छान..
ते तर क्रिकेट, बुद्धिबळ किंवा
In reply to छान.. by राजो
नाईस टॅकल
In reply to ते तर क्रिकेट, बुद्धिबळ किंवा by बॅटमॅन
पुढच्या सीजन ला नक्कीच कमबॅक
तब हम हंसेंगे... और बाकी सब..
In reply to पुढच्या सीजन ला नक्कीच कमबॅक by अनुप ढेरे
छान ..
पुढच्या शीजनला ते ना चॅपियन्स
In reply to छान .. by छोटा डॉन
It will get worse before it
In reply to छान .. by छोटा डॉन
काव्य आवडले.... alex
संघ पण बराच दुबळा आहे.
In reply to काव्य आवडले.... alex by विअर्ड विक्स
छगन वाचताक्षणी फुस्सकन हसलो
In reply to संघ पण बराच दुबळा आहे. by अनुप ढेरे
मोयेस स्ट्रगल करतोय... मान्य.
In reply to काव्य आवडले.... alex by विअर्ड विक्स
sangh दुबळा म्हणण्याचे कारण
पहिलं कडवं बर्यापैकी
सुंदर आशय अभिव्यक्ती!
धन्यवाद्
In reply to सुंदर आशय अभिव्यक्ती! by अत्रुप्त आत्मा