Skip to main content

लिहाव म्हणतो काहीबाही ...

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 13/03/2014 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल...नरेंद्र महाराज ...अन्डीवाला...भंगारवाला ...बंद कर ..पोस्ट कर झोप आळी....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4945
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आजवर मिपावर पाहिलेल्या धाग्यांपैकी सर्वात बेष्ट धागा. :)) बादवे - "फुंटी" म्हणजे इटालियनमध्ये "To act (as) or (in place) of another" - म्हणजे डू आयडी :))

१९४ वाचने आणि प्रतिसाद फक्त १? बात कुछ हजम नै होरेली

मी मगाशीच हा धागा वचुन गेले.. पण काय लिहावं हे ही कळेना.. म्हणुन गप गुमान प्यार्‍याच्या धाग्यावर दंगा घातला..

तो संजय दत्त, झायेद खान आणि नथनीवाल्या ऐश्वर्या राय चा शब्द नावाचा शिनुमामासारख्या कसलातरी प्रयोग आठवला.... पु ले शु द्या की न द्या ;)

डोक्याची मंडई झाली वाचुन

क्या बात है ! अजून लिहा !!!!!!!! ( डोकं आपटणारी बाहुली कशी शोधायची ? )

काल रात्री मला स्वप्नात असेच असंबद्ध काहीबाही दिसत होते. मिरजेतलीच एक गल्ली मग कोलकात्यातली झाली, पण त्यात रस्त्यावर अंगकोर वटमधील शिल्पे होती. मध्येच रस्त्यावरून माझा एक मित्र गाडीवरून जाताना दिसला, त्याच्या मागे माझा रूममेट दिसला. (या दोघांनी एकमेकांना अजून प्रत्यक्ष पाहिले नाही.) त्यानंतर मग मी एका देवळात शिरलो, पाहतो तर तमिऴ नाडूमधले कुठलेसे देऊळ होते. त्याच्या तटबंदीजवळचे कडुलिंबाचे झाड दिसले अन डैरेक्ट विजापूरच्या मुलुखमैदानापाशी पोहोचलो. मग कन्फ्यूज्ड होऊन पाहतोय तोवर बॉसचा मिसकॉल. मग जागा झालो, आवरले अन पाहिले तर बॉसचा मिसकॉल नव्हता पण मेल होता.

In reply to by बॅटमॅन

चूक चूक चूक चूक - भालकी आणि कारवार संग्राम - लसणाचा उग्र दर्प - पाय दुमडून शिंकणे वगैरे राहिलं.

In reply to by बॅटमॅन

पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
हा लेख वाचून मी खिक कन हसले. ओळखतो का रे मला तू सम्मित? दहावीत आहेस का रे? परीक्षा झाल्यावर उलट धावायचं सराव कर. गुढघा दुमडून शिंक देऊन बघ कशी मजा येते ते. मी पण दहावीत अभ्यास करायची. जेव्हा गूढ रात्र व्हायची आणि दूर कुत्रे भुंकत असायचे तेव्हा मी चिखल तुडवत एकटीच बाहेर पडायची आणि लिंबाच्या झाडावरून लिंब काढून आणायची.. आणि बसायची चोखत... एकटीच, शांत, आणि मग्रूर.. डोळ्यात पेटायचा अंगार.. आणि श्वास व्हायचा गरम.

मलाही अशी स्वप्ने पडतात . काल रात्री असेच काहिबाहि बडबडत होते . झोपेत बोलण्याची सवय आहे . सकाळी नवरा म्हणाला , " काय काय बोलत होतीस काहि कळत नव्हते , सोफा झाडू उट उठ निघायचे आहे जमीन काकडी खाल्ली फक्त औषध पी जवळचे शॉपिंग मॉल कायतरीच घेतलेस तु निवांत आहे आज गडबदिट मोबाइल विसरले बघ घरी फोन करायला हवा केस विंचरलेच नाहित बाळ सारखे सारखे पप्पा पप्पा करतेय आज काहि सुचत नाहि आहे .. ," आणि सकाळी उठुन बघितले तर तुमचा धागा .

अतृप्त आत्म्याकडुन भुत उतरवुन घ्या,अन्यथा माझ्या शेजारची ओ.पी.डी. येरवड्यातल्या वेड्यांच्या डॉक्टरची त्यांची वेळ घेउन ठेवतो.

दाखवून घ्या ! शुभेच्छा...गेट वेल सून.

एक डोक्टर जो चमडीकी बिमारियोंका स्पेशालिस्ट है वो सपना देखता है के वो टीवी के सामने सो जाता है. बादमे जब वो टीविके सामने जाग जायेगा , उसे ये सपना बिलकुल याद नही रहता.

In reply to by नावातकायआहे

हा ओशन12 मधला माझा अतिशय आवडता प्रसंग आहे. मैट डेमन ला ब्रैड पिट अन क्लूनी खतरनाक येड्यात काढतात xdxdXdXd :)

हापिसात काम न्हवते म्हणुन चिवटपणे धागा परतपरत वाचला (अभ्यास, अभ्यास) एकदा उलट,मग एकदा सुलट पुन्हा सुलट,पुन्हा उलट ----------- --------- ----------- -------- ---------- ---------- ----------- ----------- ----------- मग हार मनली आणि उठुन FC1 ला चहा प्यायला गेलो :(

अंड ..भेंडी . खाजाव्तोय .लावावा मलम खाजेवर...छोटा हत्ती ....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय ...मळलेली चादर ...बिछाना ...रिक्षातील बाई...अन्डीवाला... फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!