✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

म
म्हैस यांनी
Wed, 03/05/2014 - 18:23  ·  लेख
लेख
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे . इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला. किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं. पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे. अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत. त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे. हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
47651 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

भयानक वास्तव....

मुक्त विहारि
Wed, 03/05/2014 - 18:26 नवीन
सुन्न....
  • Log in or register to post comments

हो. वाचुन धक्का बसला होता.

सौंदाळा
Wed, 03/05/2014 - 19:06 नवीन
हो. वाचुन धक्का बसला होता. अशा अनेक घटना होतात. यात डॉक्टरची चुक का हॉस्पिटलची चुक, का खरोखरीचे कॉम्प्लिकेशन हे सामान्य माणसाला कळणे अवघडच आहे. साध्या हॉस्पिटलपासुन ते टोलेजंग मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलपर्यंत अशा घटना होतात.
  • Log in or register to post comments

ह्या बद्दल काल-परवाच वाचले

शिद
Wed, 03/05/2014 - 19:22 नवीन
ह्या बद्दल काल-परवाच वाचले होते पेपर मध्ये... खुपच भीषण प्रसंग ओढवला आहे त्यांच्या कुटुंबावर... :(
  • Log in or register to post comments

ही घ्या लिंकः Techie dies

शिद
Wed, 03/05/2014 - 19:30 नवीन
ही घ्या लिंकः Techie dies after kidney operation, family alleges negligence
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

हे घ्या अजुन एक

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 03/07/2014 - 20:35 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/hospital/articleshow/31557015.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

रोज एक नवीनच

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 03/11/2014 - 13:38 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/5-month-old-is-surviving-in-icebox/articleshow/31833162.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

नुसती हळहळ व्यक्त

जेपी
Wed, 03/05/2014 - 19:27 नवीन
नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपण काही मदत करु शकतो का ?
  • Log in or register to post comments

फक्त हलगर्जीपणा आहे का?

पैसा
Wed, 03/05/2014 - 19:33 नवीन
किडनी काढली म्हणतायत म्हणजे हे त्याहून जास्त काहीतरी मोठे प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments

सरकारी आणि खाजगी दवाखान्यातले

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/05/2014 - 19:58 नवीन
सरकारी आणि खाजगी दवाखान्यातले काही किस्से मी प्रकाशित करणार आहे वाचून थक्क व्हाल
  • Log in or register to post comments

सरकारी दवाखान्यात पैशाचे आमिष

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/05/2014 - 20:06 नवीन
सरकारी दवाखान्यात पैशाचे आमिष देउन अविवाहित मुलाचे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेली निदर्शनास आली होती माझ्या,मी तक्रार केली होती,पण कुणी दाद दिली नाही.
  • Log in or register to post comments

साध्या सर्दीच्या रुग्णाला ct

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/05/2014 - 20:07 नवीन
साध्या सर्दीच्या रुग्णाला ct स्कॅन करायला लावणारा एक महाभाग डॉक्टर आमच्या इकडे आहे
  • Log in or register to post comments

यावरही प्रतिवाद!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 12:05 नवीन
यावरही प्रतिवाद करता येऊ शकेल. तुम्हाला जी साधी सर्दी वाटतेय त्याचं कारण क्रॉनिक सायन्यूसायटिस , नझल पॉलीप यांपैकी काही असू शकतं. अशी शंका आल्यास सर्दीसाठीही सीटीस्कॅन करावा लागतोच. मात्रं याचा प्रतिवाद मी करणार नाही कारण उगाच कटचे पैसे मिळावे म्हणून अननेसेसरी सिटी/ एम आर आय करणारे कित्येक प्रॅक्टिशनर पाहिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम

काहीही गंभीर कारण नसताना icu

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/05/2014 - 20:14 नवीन
काहीही गंभीर कारण नसताना icu मध्ये admit करून पैसे उकळणारा doctor शी माझाही सामना झाला होता.माझ्या आई ला काहीही गंभीर कारण नसताना त्याने icu मध्ये admit करून ठेवले होते.आई रोज सकाळी घरी येउन जेवण बनवी.धुणी भांडी घासून पुन्हा icu मध्ये admit व्हायला जात असे.संध्याकाळी परत जेवण बनवायला घरी येउन भांडी वगैरे घासून परत icu मध्ये admit व्हायला जात असे,किती क्रूर चेष्टा आहे हि
  • Log in or register to post comments

तुम्ही पण महान!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 01:10 नवीन
आयसीयुत जाऊ द्या पण साध्या वार्डात जरी आई आजारी अ‍ॅडमिट असेल तर तिला घरी येऊन धुणी भांडी करू न देण्याची चाड तिच्या मुलांत नसेल का याचे राहून राहून आश्चर्य वाटत आहे. आणि इतकं जर ढळढळीत समोर दिसत असेल तर वर तोंड करून डॉक्टरला 'असे का?' असे का नाही विचारले. की आई घरी येऊन धुणी भांडी करण्याइतकी सक्षम आहे हे तुम्ही डॉक्टरांस कळूच दिले नाही. स्वतःच्या रूग्ण आणि रूग्णाचे नातेवाईक असल्याच्या मुळे आजाराविषयी पूर्ण जाणून घ्यायच्या हक्काबद्दल माहिती करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम

हाहाहा. लै भारि पकडला!

कवटी
गुरुवार, 03/06/2014 - 13:13 नवीन
हाहाहा. लै भारि पकडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

हवेत बाण मारू नका,

मृगजळाचे बांधकाम
Sun, 03/09/2014 - 11:21 नवीन
पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ? हा जो प्रसंग मी सांगितला आहे त्या वेळी मी ११ वर्षाचा होतो,आणि माझी बहिण ८ वर्षाची होती,माझे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असत,आईला बारीक ताप राही,म्हणून दवाखान्यात गेली होती,आता ११ वर्षे हे वय तुम्ही जे काही चाड वगैरे महान शब्द वापरलेत ते समजण्याचे नव्हते.त्या महाभाग doctor ने नंतर खूप वेळा लोकांचा चपलेचा मार खाल्ला आजही खातोय.अवांतर सांगतो.१९९५ साली तो महाभाग doctor झाला आज त्याच्य्कडे १०० कोटी ची property आहे,२ पजेरो कार आहेत,आजही तो सर्दीच्या patient ct स्कॅन करायला लावतो,कारण ती machine त्याची स्वताची आहे,कुठलाही patient आला कि तो त्याला ६५० रुपयाच्या अनावश्यक टेस्ट करायला लावतो.त्याच्या बद्दल मी बर्याच वेळा पेपर मध्ये छापून आणले होते.पण त्याची कातडी गेंड्याची असल्याने त्याला काहीही फरक पडत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नैसर्गिक प्रतिसाद.

प्रभाकर पेठकर
Mon, 03/17/2014 - 14:07 नवीन
पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ?
साती ह्यांच्या मतप्रदर्शनात कांही चुकले आहे असे मला वाटत नाही. 'आपल्या प्रतिसादात 'पूर्ण वस्तुस्थिती' मांडणे हे प्रतिसादकर्त्याचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास उपप्रतिसादकर्ता ती आजच्या घडीची परिस्थिती आहे असेच समजणार. समजा कांही कारणाने किंवा परिणाम लक्षात न आल्याने अर्धवट परिस्थिती विशद केली असेल तर साती ह्यांच्या सारखी नैसर्गिक प्रतिक्रिया आल्यानंतर परिस्थिती विशद करण्यात नम्रता हवी. पूर्ण वस्तुस्थिती समजल्याशिवाय स्वैर मत प्रदर्षण कसे काय करता साती भाव ? आणि ११ वर्षे हे वय तुम्ही जे काही चाड वगैरे महान शब्द वापरलेत ते समजण्याचे नव्हते सारखे ताशेरे अनावश्यक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम

हरी ओम!

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/19/2014 - 19:19 नवीन
मी जे लिहिले ती सदर लेखावरची छोटीशी प्रतिक्रिया होती;लेख नव्हे.पूर्ण वस्तुस्थिती प्रतिसादात मांडण्याची गरजच काय?मला जे सांगायचे होते ते मी पुरेश्या शब्दातच मांडले होते.त्यांना जर शंका होती तर त्यांनी मला सविस्तर विचारून नन्तर मत मांडले असते तर योग्य झाले असते नाही का?त्यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच प्रकारे मी व्यक्त केली आहे.न कमी न जास्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

विषमज्वर नसताना lab चे report

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/05/2014 - 20:18 नवीन
विषमज्वर नसताना lab चे report बदलून १० १० दिवस admit ठेवून भरमसाठ बिल उकळणारे कितीतरी डॉक्टर्स बघितलेत मी.
  • Log in or register to post comments

हा अनुभव!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 01:40 नवीन
हे मात्रं खरं आहे. आणि त्याकरिता रिपोर्ट बदलायचीही गरज नाही. कित्तीतरी फालतू वायरल फिवरमध्ये विषंज्वराची टेस्ट पॉजिटीव येते. आणि टायफॉईडच्या नावाखाली रूग्णाचि पिळवणूक होते. याबद्दल मी मिपावरच टायफॉईडच्या धाग्यावर लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगजळाचे बांधकाम

आत्ता काही वर्षांपूर्वीचा

किसन शिंदे
Wed, 03/05/2014 - 20:27 नवीन
आत्ता काही वर्षांपूर्वीचा आमच्याच चाळीतला किस्सा... आमच्याच बाजूला राहणारी १४ वर्षांची आशा. शाळेत नववीला! सहामाही परीक्षेच्याआधी दिवसाआड ताप यायचा आणि जायचा. आई-वडीलांना वाटलं छोटासा आजार असेल, पण होती कावीळ! आधी साध्या दवाखान्यात नेलं पण काही फरक पडला नव्हता. मग ताप दिवसेंदिवस वाढतच गेला आणि डोळ्यात पिवळसर पणा आल्याचं दिसताच मग कावीळीच्या औषधांनाही सुरूवात केली. त्यातच एक दिवस ज्वर फारच भरला म्हणून रात्रीतून त्यांनी ठाण्याच्या शिवाजी हॉस्पीटलमध्ये आयसीयूत दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं 'काही नाही, एक-दोन दिवसात ठिक होईल'. त्याप्रमाणे तीन-चार दिवसांनी जरा बरं वाटल्यावर तीला घरी आणण्यात आलं, पण त्याच दिवशी दिवशी संध्याकाळी अचानकच आलेल्या प्रचंड तापाबरोबरच तिच्या पोटात उजव्या बाजूला प्रचंड प्रमाणात दुखू लागलं आणि त्यातच रात्रीतून तिची प्राणज्योत मालवली. :( काय झालं? कसं झालं?? आई-वडीलांबरोबरच तिच्या घरातल्यांना काही कळालं नाही. पण मघ घेऊन जायच्या आधी अंघोळ घालतेवेळी तिच्या कमरेस उजव्या बाजूला टाके घातलेले दिसत होते. आणि मागाहून कळालं की तिची किडनी काढून घेतली होती आणि वेदना असह्य होवून तिचा जीव गेला होता. आम्हा सगळ्यांसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या आई-वडीलांना जास्त लढा देता आला नाही. पण तेव्हापासून मनात त्या हॉस्पीटलची मनात भिती बसलीये ती आजतागयत.
  • Log in or register to post comments

बापरे !

सचिन कुलकर्णी
Wed, 03/05/2014 - 20:50 नवीन
केवळ भयानक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

किडनी डोनेशन!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 01:33 नवीन
किडनी डोनेशन म्हणजे काय नखं कापून घेण्याईतकं सोप्पं ऑपरेशन वाटलं का तुम्हाला? मूळात आला पेशंट , कापलं त्याला, काढली किडनी, ठेवली फ्रीजमध्ये आणि मिळाला सीआर एफ चा पेशंट की विकली त्याला असं किडनीच्या बाबत करता येत नाही. काढलेली किडनी रूग्णाला मॅच व्हावी लागते. त्यासाठी आधीच स्क्रीनींग/ मॅचिंग करून ठेवलेला दाता असावा लागतो. इकडे किडनी काढली की लग्गेच दुसरीकडे ओपन केलेल्या रूग्णात ती बसवावि लागते. ऑपरेशनला तीन चार तास लागतात. गूपचूप पाच मिनिटात किनडी काढता येत नाही. मूळात डॉक्टरला किडनी बसवून घेणार्या माणसाला रिजल्ट द्यायचे असतात कारण ऑपरेशनचे चार्जेस (काढणे / घालणे ) रिसीवर देणार असतो. त्यामुळे निरोगी किडनिच बसवण्याचि डॉक्टरचि तयारी असते. अश्यावेळी जाणून बुजून, तापाने आजारीअसलेल्या आणी जाँडीस झालेल्या रूग्णाचि किडनि कोणी रिसीवरसाठी काढुन घेईल हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

माहितीसाठी धन्यवाद!

पैसा
गुरुवार, 03/06/2014 - 08:30 नवीन
एकुणात किडनी काढून घेणे याबद्दल लोकांमधे बरेच गैरसमज आहेत. पण फसवून किडनी काढल्याच्या केसेस तरीही पेपरला अधून मधून येतात. त्याची कारणे बर्‍याच प्रकारची असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

त्याची कारणे!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 12:01 नवीन
त्याची कारणे १. ट्रान्सप्लाण्ट कमिटीची परवानगी न घेताच किंवा खोटी कागदपत्रे बनवून किडनी मिळवणे २. पैसे देऊन किडनी मिळवणे . आपल्या देशात अवयवांच्या खरेदी विक्रीला एवढेच नव्हे तर रक्ताच्याही विक्रीला बंदी आहे. तरिही योग्य डोनर पकडून त्याला पैसे देवून किनडी मिळवल्यास तो गुन्हा ठरतो. ३. डोनरशी लग्नं करून , मग तो/ ती नातेवाईक आहेअसे दाखवून किडनी मिळवणे ४. निरोगी पेशंटला उगीच आजार आहे असे भासवून मग किडनी काढून घेणे. याकरिताही अगोदर रिसीवर शोधला जातो. अजूनतरी किडन्या गोळा करून डॉक्टर कपाटात साठबून ठेवतोय आणि मग आला पेशंट की त्याला विकतोय अश्या प्रकारचे स्कॅम करायची पद्धत निघाली नाही. (रक्त/ स्कीन्/कॉर्निया याबाबत हे शक्य आहे) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपल्या माहीतीबद्दल धन्यवाद!

किसन शिंदे
गुरुवार, 03/06/2014 - 20:29 नवीन
आपल्या माहीतीबद्दल धन्यवाद! पण ही घटना खरंच घडून गेलेली आहे आणि यातला एकही शब्द उगाच काहीतरी टंकायचं म्हणून टाकलेला नाहीये. सदर घटनेला आता १०-१२ वर्षे झाली असावीत. दोन जुळ्या बहिणी...आशा आणि मनिषा!! पैकी आशाचा असा अपघाती मृत्यू झाला नि दुसरी आता लग्न होवून सासरी नांदते आहे. तिच्या भावाशी बोलून या घटनेबद्दल खात्री करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

किडणी/अवयव दान.

प्रभाकर पेठकर
Mon, 03/17/2014 - 14:27 नवीन
किडनी डोनेशन म्हणजे काय नखं कापून घेण्याईतकं सोप्पं ऑपरेशन वाटलं का तुम्हाला?
किडनी डोनेशनची प्रक्रिया कशी असते हे सर्वसामान्यांना माहित नसते. माहिती असणे अपेक्षितही नसावे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस ते ऑपरेशन म्हणजे 'नख कापून घेण्याईतकं सोप' समजतो असा थेट आरोप करणं म्हणजे विनाकारण सर्वसामान्य माणसाच्या 'अकलेची' किव करणे आहे. तसे असता कामा नये. त्यामुळे, वरील वाक्याऐवजी 'किडणी डोनेशन प्रक्रिया फार गुंतागुंतीची असते' अशा वाक्याने सुरुवात करून ती प्रक्रिया समजावून सांगितल्यास रुग्ण आणि डॉक्टर ह्यांच्यातील समजाची दरी कमी होण्यास मदत होईल.
त्यासाठी आधीच स्क्रीनींग/ मॅचिंग करून ठेवलेला दाता असावा लागतो. इकडे किडनी काढली की लग्गेच दुसरीकडे ओपन केलेल्या रूग्णात ती बसवावि लागते.
वरील रुग्ण ३-४ दिवस हॉस्पिटलात अ‍ॅडमिट होती असे जाणवते आहे. ह्या कालावधीत वरील प्रक्रिया शक्य नाही का? मला कल्पना नाही म्हणून विचारतो आहे. मृत्यू पश्चात अवयव दान करतात त्यात किडणी दान करता येते का? तसे असेल तर स्क्रिनिंग/मॅचिंग ही क्रिया रुग्ण (दाता) जिवंत असतानाच करून ठेवायला लागते का? आणि ज्याला दान करायची तो आधीच तयार ठेवावा लागतो का? रुग्ण मेल्यानंतर किती काळात किडणी काढावी आणि ताबडतोब दुसर्‍या रुग्णाला बसवावी लागते? ज्याला मिळणार आहे तो ऑपरेशन थिएटरात बेशुद्ध करून ठेवून दुसर्‍या ऑपरेशन थिएटरात किंवा शवागारात (शवविच्छेदन करतात तिथे) मृत रुग्णाचा देह ठेवून किडणी रोपण केले जाते का? रुग्णाचा मृत्यू आणि दात्याला रोपण करून मिळणे ह्यात जास्तीतजास्त किती तासांचा अवधी असू शकतो? मला स्वतःला देहदान आणि अवयव दान करायचे आहे म्हणून वरील शंका विचारतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

जाँडीस झालेल्या रुग्णाची

स्पंदना
गुरुवार, 03/06/2014 - 03:36 नवीन
जाँडीस झालेल्या रुग्णाची किडनी साधारणत: घेत नाहीत. पण कुणी सांगावं, इकडेही फसवणुक अन तिकडेही फसवणुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

लिस्ट

साती
गुरुवार, 03/06/2014 - 13:33 नवीन
किसन शिंदे यांचा प्रतिसाद वाचून कळव्याच्या राजेशिवाजी हॉस्पिटलला संलग्न असलेल्या महाविद्यालयात एम बी बी एस होऊन मग पुढे नेफ्रॉलॉजिस्ट झालेल्या मित्राकडे विचारणा केली असता मूळात या हॉस्पिटलात किडनी ट्रान्सप्लाण्टची सुविधाच नाही असे कळले. मुंबईत ज्या रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध आहे त्यांची यादी इथे पहा. http://www.karmayog.org/kidney/kidney_11523.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कसल्या सुविधा आणि काय घेऊन

बंडा मामा
Sat, 03/08/2014 - 08:54 नवीन
कसल्या सुविधा आणि काय घेऊन बसलाय तुम्ही.. डॉ.अमित कुमार आणि त्यांचे गुडगाव किडनी स्कँडल ह्या विषयी वाचलेले दिसत नाही. प्लीज गुगल करुन पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

खुप वाईट घटणा घडतायत

आंबट चिंच
गुरुवार, 03/06/2014 - 13:50 नवीन
कमाल आहे पण त्या डॉ. ची मती गूंग होते. खरं तर आपण अ‍ॅलर्ट (दक्ष) राहायला हवे. खरं तर असे काही करण्या पुर्वी आपल्या फॅमिली डॉ.चा सल्ला घ्यावा असे वाटते. ते सहसा फसवत नाही. किसन देवा ही घटना माझ्याच ठाणे शहरातली आणि मला माहीत नाही? मला लिन्क द्याल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मूत्रपिंड रोपण करीत असलेल्या

सुबोध खरे
गुरुवार, 03/06/2014 - 14:39 नवीन
मूत्रपिंड रोपण करीत असलेल्या विविध रुग्णालयात मी ११ वर्षे काम केलेले आहे. दात्याच्या शरीरातून मूत्रपिंड काढणे आणि ते ग्राहकाच्या शरीरात रोपण करणे या दोन्ही क्रिया एकाच वेळेस बाजुबाजुच्या शल्यक्रिया गृहात होत असतात. त्याअगोदर मुत्र्पिंडला एकाच रक्त वाहिनी आहे कि अनेक आहेत यासाठी रुग्णाची अन्जीयो ग्राफी करावी लागते कारण दोन (किंवा अधिक रक्तवाहिन्या असतील तर ते मूत्रपिंड रोपणासाठी चालत नाही. शिवाय मूत्रपिंड रोपण करण्यासाठी डी एन ए जुळतात कि नाही ते पाहावे लागते. यासाठीच जिवंत आणि नात्यातील दाता आवश्यक आहे. असे रस्त्यावरील कोणाचेही मूत्रपिंड घेऊन कोणालाही रोपण करता येत नाही. कावीळ असलेल्या रुग्णाचे तर नाहीच नाही. रण कावीळ बी किंवा सी प्रकारची असेल तर रुग्णाचे यकृत खराब होऊन त्याच्या जीवाला धोका संभवतो. दाता हा पूर्णपणे निरोगी असावा लागतो चार दिवसापूर्वी अतिदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णाकडून कोणीही मूत्रपिंड घेणार नाही कारण ग्राहकाला आयुष्यभर जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते( ग्राहक तोंडाला हिरवे फडके बांधून फिरताना आपण पहिले असेल) ग्राहकाची प्रतिकार शक्ती औषधे देऊन कमी केलेली असते जेणेकरून ग्रहण केलेले मूत्रपिंड तुमचे शरीर त्याग करू नये( transplant rejection) लक्षावधी रुपये देऊन (चोरीचे असले) तरी मूत्रपिंड ग्राहकाच्या शरीराने स्वीकारणे आवश्यक आहेच.ते जर अस्वीकार झाले तर दुसर्यांदा अशी शस्त्रक्रिया करण्यास कोण तयार होईल. आपली माहिती अर्धवट किंवा/ आणि ऐकीव असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

माहीतीबद्दल धन्यवाद सर!

किसन शिंदे
Sat, 03/08/2014 - 20:45 नवीन
माहीतीबद्दल धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भयानक

जेपी
Wed, 03/05/2014 - 20:54 नवीन
भयानक
  • Log in or register to post comments

वैद्यकाचा बाजार आणि त्यातून सुटकेचे मार्ग

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 03/05/2014 - 23:13 नवीन
लेखक डॉक्टर श्रीराम गीत यांचे हे पुस्तक या क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर चांगला प्रकाश पाडते,आणि काही मार्गही सुचवते.
  • Log in or register to post comments

आता या केसबद्दल!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 12:54 नवीन
आता वर लेखात आलेल्या केसबद्दल. त्यापूर्वी हे सांगू इच्छिते की माझा महाराष्ट्रातल्या मेडिककल प्रॅक्टिसशी सध्या काहिही संबंध नाही. मी कर्नाटकात एका दुर्गम गावात प्रॅक्टीस करते. ;) सदर केसचि टाईमलाईन अभ्यासली असता पेशंट पायोजनिक हायड्रोनेफ्रॉसिसने अ‍ॅडमिट झाला होता. त्याला अँटिबायोटिक्स देऊन जंतूसंसर्ग कमी करायचा प्रयत्न केला गेला.(ग्रिडी डॉक्टर्स असते तर आणला की कापला असे वागले असते) मग सर्जरि करिता घेऊन गेले. अश्या केसेसमध्ये सर्जरी करताना सगळी काँप्लिकेशन्स इन्क्ल्यूडींग रिस्क ऑफ हिमरेज आणी डेथ रूग्णाच्या नातेवाईकांना समजावून त्यांची सही घेण्यात येते. या केसमध्ये झालेले इंटर्नल ब्लिडींग हे वन ऑफ द नोन काँप्लिकेशन आहे. याबाबतीत मी त्या डॉक्टरना अपयशि समजेन पण गुन्हेगार नाही. मूळात कोणताच डॉक्टर रूग्णाला मुद्दामुन हार्म पोहोचवेल हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

तुम्ही छान प्रतिसाद देत आहात.

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/06/2014 - 13:00 नवीन
तुम्ही छान प्रतिसाद देत आहात.. त्यामुळे बरेच गैर्समज दुर होत आहेत.. मेडिकल क्षेत्रातील कॉम्प्लिकेशन्स निटसे न समजुन घेता बर्‍याचदा डॉक्टरांवर आरोप होतात.. अशा वेळी एका डोक्टरनी लिहीणं फार महत्वाच आहे..
मूळात कोणताच डॉक्टर रूग्णाला मुद्दामुन हार्म पोहोचवेल हे शक्य नाही.
बरोबर आहे.. मुद्दाम कुणी का कुणाचा जीव घेईल? पण हलगर्जीपणा होऊ शकतो ना? ह्या केस मध्ये तसच चित्र उभं केलं आहे.. जसं की अ‍ॅम्ब्युलन्स नसणे वगैरे.. ह्याला हॉस्पिटललाच जवाबदार ठरवाव लागेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नाही!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 13:20 नवीन
अँब्युलन्स आणि ब्लड बँक असणे हे हॉस्पिटल एस्टॅब्लिशमेंटसाठी नेसेसरी नाही. माझ्या हॉस्पिटललाही स्वतःची अँब्युलन्स नाही. इतकेच नव्हे आमच्या पूर्ण जिल्ह्यात मिळून एक ब्लड बँक (सरकारी) आहे. तिथेही होल ब्लडशिवाय इतर कोणतेही रक्तघटक अ‍ॅवेलेबल नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

चांगले प्रतिसाद

पैसा
गुरुवार, 03/06/2014 - 14:06 नवीन
चांगले प्रतिसाद देत आहेस! म्हणजे या केसमधे जीव वाचवण्यासाठी किडनी काढण्याची शस्त्रक्रिया झाली पण "किडनी काढून घेतली" असा डॉक्टरवर आरोप झाला. सतत असं झालं तर सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टरसुद्धा जराही रिस्क घ्यायला नकार देतील. अ‍ॅम्ब्युलन्स फार कमी खाजगी हॉस्पिटल्सकडे असतात. गोव्यात १०८ नंबरला फोन करून अ‍ॅम्ब्युलन्स ताबडतोब मागवता येते. मुंबईत तशी काही सोय नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

धन्यवाद गं!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 14:47 नवीन
धन्यवाद गं! आमच्याइथे पण १०८ आहे. तिचे ड्रायवर हि सेवा फुकट असतानाही रूग्णं आणि ज्या हॉस्पिटलात नेतात ते या दोघांकडून विनाकारण पैसे वसूल करतात. बाकी ' सेवाभावी' म्हणशील तर ज्यावेळी आमच्या एस्टॅब्लिशमेंटना शॉप अ‍ॅक्ट आणि कन्ज्युमर अ‍ॅक्ट लावला तेव्हाच संपला. आता आम्ही सेवादाते आहोत आणि तुम्ही ग्राहक. मात्रं प्रत्येक धंद्याप्रमाणे इथे सचोटीची गरज आहे. प्रत्येक धंद्याप्रमाणे इथेहि खूप फ्रॉड, अनकाँपिटंट डॉक्टर्स आहेतच . पण प्रत्येकच डॉक्टर फ्रॉड नाही हे लोकांना समजले पाहिजे. मूळात एखादे मिसहॅप झाले तर अर्धवट माहितीवर लोकांना भडकवण्याचे काम होऊ नये. जसे वर कळव्याला त्या मुलीच्या पोटातली किडनी काढून घेतलि म्हणतायत. ही शुद्ध अफवा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म

पैसा
गुरुवार, 03/06/2014 - 15:09 नवीन
आमच्या एस्टॅब्लिशमेंटना शॉप अ‍ॅक्ट आणि कन्ज्युमर अ‍ॅक्ट लावला
तरीही रुग्णाच्या जिवाशी थेट संबंध येत असल्यामुळे जर रुग्णाचा आणि नातेवाईकांचा विश्वास असेल तरच डॉक्टर काही प्रमाणात जबाबदारी घेऊ शकतात. मात्र वरच्या केससारखी कुप्रसिद्धी, मानहानी आणि आरोप यांची जास्त शक्यता असेल तर मग प्रत्येक वेळीच सरळ "केस माझ्या हाताबाहेर आहे, सरकारी रुग्णालयात हलवा" असं सांगणं सुरू होईल. अर्थात डॉक्टर्स १००% वेळा बरोबर असतात किंवा प्रामाणिक असतात असे नव्हे पण निदान प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणार्‍याला अशा प्रसंगात त्रास होऊ नये. मिडियाची भूमिका बहुतेकवेळी सवंग बातम्या तयार करणे एवढीच दिसते. अशा खोट्या बातम्या पसरवणार्‍या पेपर्स आणि चॅनेल्सवर नियंत्रण आणले गेले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

नाही हं साती. किसन देव

स्पंदना
Fri, 03/07/2014 - 07:27 नवीन
नाही हं साती. किसन देव सांगताहेत तो प्रकार मी माझ्या गावात पाहिला आहे. आठव इचलकरंजी रॅकेट. गावात शेतावर काम करणार्‍या कुटुंबातली १५-१६ची मुलगी. काय म्हणे पोटात दुखतय. बहुतेकदा कोल्हापुअरात नेउन दाखवणे वगैरे प्रकार आमच्या कडुन होतात. कधी घरच्या हॉस्पिटलात, कधी गरज असेल तशी स्पेशालिस्ट. घरच्या हॉस्पिटलचे पैसे लावत नाहीत. पण येथे काय झालं, त्या घरातला तिचा काका इचलकरंजीत युनिअन लिडर. तो म्हणाला नाही मी इचलकरंजीत दाखवणार. नेली. परत आली मी ऐकतेय फार मोठ ऑपरेशन झालय, हे ते. मग एक दिवस गेले बघायला. म्हंटल कसल ऑपरेशन? तर अपेंडिक्स काढला. म्हंटल बघु. ते तर दोन टाक्याच होतय हल्ली. तिने ब्लाउज वर केला. कमरेच्या या साईड पासुन त्या साईड पर्यंत कट. अराउंड दहा ते बारा टाके. काऽऽही बोलले नाही. उठुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

इचलकरंजीत किडनी रॅकेट.?

साती
Fri, 03/07/2014 - 15:02 नवीन
मी अगोदर वाचले नाहीय. लिंक आहे का? बाकी इचलकरंजीत किडनी काढून दुसर्‍याला बसवायची सोय असेल हे अतर्क्य वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अपयशी की गुन्हेगार ?

कपिलमुनी
Tue, 03/18/2014 - 17:58 नवीन
सलमान खान ला पण गाडी चालवताना अपयश आला हो .. तो गुन्हेगार नाहीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

(No subject)

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/18/2014 - 18:18 नवीन
*LOL* *blum3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अपयशी की गुन्हेगार ?

सुबोध खरे
Wed, 03/19/2014 - 18:37 नवीन
जेंव्हा डॉक्टर च्या हातून एखादी चूक होते आणि रुग्णाला इजा /मृत्यू होतो तेंव्हा काही गोष्टी पाहणे आवश्यक आहे. १)genuine error of judgement २)mistake -चूक ३) act of omission ४)act of commission ५)criminal negligence जोवर पहिल्या दोन गोष्टी होतात तोवर डॉक्टरला गुन्हेगार मानणे चूक आहे. उदा. एखादा शल्य चिकित्सक सर्व निदान कर्करोग पसरला नाही असे दाखवत असताना पोटाची शल्यक्रिया करतो आणि पोट उघडल्यावर असे जाणवते कि कर्करोग महत्त्वाच्या अवयवात पसरला आहे तेंव्हा त्याला १)genuine error of judgement म्हणता येते (यात सुद्धा नातेवाईक बोंब मारताना पहिले आहेत). किंवा एखादि शल्यक्रिया करताना दुसर्या अगदी जवळच्या अवयवाला इजा पोहोचणे शक्य आहे. उदा. गर्भाशय काढून टाकताना मुत्र्नालीकेला इजा होऊ शकते. हि एक क्षम्य अशी चूक(mistake) आहे आणि जगातल्या १०० % डॉक्टरच्या हातून असे होतेच. यापुढची कोणतीही पायरी म्हणजे रुग्णाची वेळेत शस्त्रक्रिया न करणे ( act of omission ), किंवा गरज नसताना शल्यक्रिया करणे (act of commission मुद्दाम केलेली क्रिया) आणि अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाकडे दुर्लक्ष (मुद्दाम/ बेपर्वाईने) केल्याने त्याचा मृत्यू झाल्यास त्याला अक्षम्य हेळसांड (criminal negligence) म्हणता येईल. यात सलमान खान कुठे बसतो?दारू पिउन गाडी चालवून पदपथावर निजलेल्या काही गरीब माणसाना चिरडले आणि त्याची केस अजून बांद्रा कोर्टातून पुढे गेलेली नाही. आणि अशीच अलीस्तीर परेरा च्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयात निकालही लागला. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Salmans-2002-accident-case-in-magistrate-court/articleshow/14619899.cms "लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात" आता डॉक्टर आणि सलमान खान यांना एकाच मापात तोलणारया माणसाना काय समजवावे? मग ते हलके घ्या म्हणतात तेंव्हा हसून साजरे करा. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लै हुस्शार तुम्ही.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/20/2014 - 23:27 नवीन
तुमच्या आकलनाची कीव करावी तेवढी थोडी! तुम्ही म्हणता, " अपयशी की गुन्हेगार ? कपिलमुनी - Tue, 18/03/2014 - 17:58 नवीन सलमान खान ला पण गाडी चालवताना अपयश आला हो .. तो गुन्हेगार नाहीये.. " साहेब, १.सल्मान खानला गाडी तुम्ही विकत घेऊन दिली नाहित. २.त्याला गाडी चालवायला कुणी शिकवली, की त्याने आरटीओला दोन पाचशे रुपये लाच देऊन लायसन घेतले, याची तुम्हाला माहिती नाही. ३.त्याच्या रस्त्यात तुम्ही झोपायला स्वतःहून गेला नाहीत. ४.त्याला तुमची गाडी चालवायला तुम्ही सांगीतले नाहीत आता, १. ज्या डॉक्टरने तुमच्यावर उपचार केले, तो तुम्हाला घरी बोलवायल आला नाही, की भाऊ, माझ्याकडे ये, अन उपचार घे. २. त्याने शरिरे दुरुस्त करण्याचे योग्य शिक्षण विकत घेतले आहे. ते शिक्षण समाज व सरकारमान्य शाळेत घेतलेले आहे, व ते दुरुस्त करण्याची योग्य परवानगी व अवजारे त्याने मिळवली आहेत. ३.तुम्ही हे सगळे जाणून बुजून एका कागदावर सही करून, तुमच्या वतीने तुमचे शरीर दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्याची परवानगी त्याला दिलेली आहे. ^^हे वाचून तुमच्या आकलनात उजेड पडला का? तुमच्या प्रतिसादाखाली जे लोळताहेत ना, मंदार जोशी? त्यांच्या 'आकलनात' अनेकदा फरक पडावा म्हणून मी इतरत्र प्रय्त्न केलेले आहेत. ते अजूनही लोळतातच आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

याउप्पर,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/20/2014 - 23:30 नवीन
नेक्स्ट टाईम, आजारी पडाल तेव्हा डाक्टरची पायरी चढू नकाच. अनेकदा मला वाटते, की शॉप अ‍ॅक्टचे लायसन लावलेय ना फ्रेम करून वेटींग रूम मधे? तर दुकानदार सांगतात ना? 'तेरे कू नहि बेचनेका. दुसरी दुकान मे जा' असे सांगावे एकदा तरी. तुम्हाला तुमच्या डॉक्टरने हे सांगावे, अशी 'शुभेच्छा' व्यक्त करतो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

दुकान

कपिलमुनी
Fri, 03/21/2014 - 14:51 नवीन
भाउ , पैसे घेतोच ना डॉक्टर ?? फुकत तर विकत नाही ज्ञान ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अपयशी समजेन गुन्हेगार नव्हे..

कपिलमुनी
Fri, 03/21/2014 - 14:50 नवीन
ठीक आहे .. सलमान चे उदाहरणात शब्द्च्छल करता येइल ..पण बस किंवा कोणत्याही प्रवासी वाहनाचा अपघात होतो तेव्हा पोलिस चालकाला दोषी धरतात .. १.तेव्हा चालक येत नाहीत ,भाऊ, माझ्याकडे ये, अन माझ्या गाडीत बसा .. २. त्याने गाडी चालवाय्चे शिक्षण घेतले अहे आणि परवाना पण आहे ३.अणि तुम्ही गाडीत बसता तेव्हा होणार्‍या संभाव्य अपघाताचे अंदाज तुम्हाला असतातच .. तरीही पोलिस अपघाताला ड्रायव्हर लाच कारणीभूत धरतात..आणि गुन्हेगार ठरवतात .. डॉक्टर किंवा ड्रायव्हर कोणीही मुद्दाम हे करत नाही.. त्यांचा प्रयत्न सर्वोच्च सेवा देण्याचा असतो असे माझे मत आहे .. पण आपल्या पेशा मधे निष्काळजी पणा करणे हा गुन्हाच आहे ..ते अप यश नव्हे .. साती यांनी वरती जे लिहिले आहे .. मि त्यांना अपयशी समजेन गुन्हेगार नव्हे.. ते नक्कीच चुकिचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा