✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

प
प्रचेतस यांनी
Fri, 02/14/2014 - 15:15  ·  लेख
लेख
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे. तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच. आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्‍यापैकी निवांत वेळ आहेच. चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
26760 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

"मी" नविन आयडी आहे का?

धन्या
Sun, 02/16/2014 - 10:44 नवीन
"मी" नविन आयडी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खिक्क.

प्रचेतस
Sun, 02/16/2014 - 10:56 नवीन
खिक्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अगं अगं गं गं गं गेली संधी वाया

प्रमोद देर्देकर
Mon, 02/17/2014 - 10:29 नवीन
आयला मोठी दिग्ग्ज मंडळी भेटायला मिळणार म्हणजे पंचयोगच(दुग्धशर्करा वगैरे)जुळुन येणार की. पण आम्ही अभागी. आमच्या मते ही मंडळी म्हणजे महाभारतातील पात्रच जणु. वल्ली :- भीष्म बॅटमॅन( आला तर) :- युधिष्ठिर अत्रुप्त आत्मा :- अर्जुन -------------

स्वगत:-

वल्ली:-आयला भीष्म म्हणजे परत शपथ घ्या अविवाहित राहण्यासाठी

बॅटमॅन:- हं काहीतरी कुट प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे हा परत मी.पा.वर येणारच नाही.

अत्रुप्त आत्मा:- च्यायला मी भुतांवर शरसंधान करतो तर माणसांचे काय? पण साला दौपदीला कुठुन शोधुन *SCRATCH* आणू?.

आयला कांडी टाकली. आता पळा.
  • Log in or register to post comments

आयला सगळं सोडून युधिष्ठिर

बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 12:18 नवीन
आयला सगळं सोडून युधिष्ठिर =)) गेलाबाजार नकुल सहदेवही चाललं असतं की हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

@अत्रुप्त आत्मा :- अर्जुन >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/21/2014 - 12:28 नवीन
@अत्रुप्त आत्मा :- अर्जुन >>> =)) अर्जुन केलत ते बरच झालं...एका अर्थी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

चला तारीख जवळ येत चालली...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/20/2014 - 22:46 नवीन
मुंबईकर कुणी येणार आहेत की नाही?
  • Log in or register to post comments

५०-५०%

प्रसाद गोडबोले
Fri, 02/21/2014 - 13:38 नवीन
माझं नक्की नाहीये , शुक्रवारची वीकेन्ड पार्टी 'मापात' झाली आणि शनिवारी 'व्यवस्थित' आणि 'वेळेत' उठलो तर नक्की ;) !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला जमणार नाही.

भाते
Fri, 02/21/2014 - 11:30 नवीन
१ तारखेला हापिसात जाऊन कळफलक बडवण्याचे काम असल्याने मला दुर्दैवाने :( घारापुरी कट्टयाला यायला जमणार नाही आहे. यावेळी सचित्र सविस्तर वृत्तांत वाचुन मनाचे समाधान करून घ्यावे लागेल.
  • Log in or register to post comments

'मी' कंजूस ,येण्याच्या

कंजूस
Fri, 02/21/2014 - 12:10 नवीन
'मी' कंजूस ,येण्याच्या विचारात आहे . स्वतंत्र पक्ष उमेदवार घासफूसवाले .
  • Log in or register to post comments

खीS S क

प्रमोद देर्देकर
Fri, 02/21/2014 - 12:51 नवीन
खीS S क *lol* चला आता कट्ट्याला शुभेच्छा देवुया ! सर्व पक्षीतिर्थकरांनी कृपया सोनेरी तिर्थ घेताना थोडी हवेत शिंपडावी. इथे "एकच प्याला" चा तळीराम संवाद आठवला. ही ही ही *lol* (कधीच न घेणारा) पम्या
  • Log in or register to post comments

हा हा, हुंबैकरांनी आताच काढता

सूड
Fri, 02/21/2014 - 14:07 नवीन
हा हा, हुंबैकरांनी आताच काढता पाय घ्यायला सुरुवात केलेली दिसतेय. ;)
  • Log in or register to post comments

पुणेकरांच्या दादुलेपणाचा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 02/21/2014 - 19:11 नवीन
पुणेकरांच्या दादुलेपणाचा उबारा.... वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओ बुवा वल्लीदा मुवि

लीलाधर
Sun, 02/23/2014 - 09:27 नवीन
बंदा हाजिर है ओओओओओओओओओओओओ
  • Log in or register to post comments

ओके...

मुक्त विहारि
Sun, 02/23/2014 - 12:05 नवीन
नक्की या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

लिस्ट अपडेट

लीलाधर
Tue, 02/25/2014 - 11:35 नवीन
करावि म्हणतो कशे अपडेट्स वल्ली - Sun, 16 / 02 / 2014 - 09 : 43 आतापर्यंत नक्की झालेले आणि पुण्याहून सिंहगडने येत असलेले सदस्य. मी प्रशांत नाद खुळा अत्रुप्त आत्मा धन्या सौंदाळा सूड पिंगू चिमी -------------------------------------------------------------- उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||
  • Log in or register to post comments

कन्फर्मेशन

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/27/2014 - 12:25 नवीन
मी येतोय ... आणि माझा एक रुममेटही येत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

ग्रेट.

प्रचेतस
गुरुवार, 02/27/2014 - 12:44 नवीन
ग्रेट. ९.४५ पर्यंत सीएसटी किंवा १० पर्यंत गेटवेला पोचच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मला

मन१
गुरुवार, 02/27/2014 - 11:30 नवीन
I want to come. But i could not yet reserve the seat. I do not have much experience to go by train. Nor i m much aware of mumbai. Can someone pls advice? Excuse me for English usage. Bt cant type devnaagari well through mobile.
  • Log in or register to post comments

पुणे स्टेशनला पहाटे ५.१५

प्रचेतस
गुरुवार, 02/27/2014 - 12:42 नवीन
पुणे स्टेशनला पहाटे ५.१५ पर्यंत पोच. स्टेशनवर ५० फक्त आणि धन्या भेटतील. तिकडे सिंहगडचे टिकिट काढ. जनरल मध्ये सिंहगडला जागा मिळेल. नैतर आज तत्काळमध्ये रिजरवेशन मिळतेय का बघ. बहुधा मिळावे. येतांना आपण अ‍ॅडजस्ट करून येऊ नैतर तू एसटीने पण परत येऊ शकशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आमचं येणं यावेळेस होत नाहीसं

मस्त कलंदर
Fri, 02/28/2014 - 10:48 नवीन
आमचं येणं यावेळेस होत नाहीसं दिसतंय. :-( बरेच जणांना माहिती असेल तरीही नवीन जाणार्‍यांसाठी काही माहिती. १. जाण्यायेण्याचे एकत्रच तिकिट मिळते. २. फेर्‍यांचे वडाप(भरली की बंदराहून सुटते) चालू असते, आणि दर दहा-पंधरा मिनिटाला भरतेच. त्यामुळे अर्धापाऊण तास इकडेतिकडे झाला तरी काही फरक पडत नाही. ३. अर्ध्या तासात रपेट किंवा घारापुरी अशा दोन वेगवेगळ्या बोटी/सेवा असतात, त्यामुळे तिकिट घेण्यापूर्वी/बोटीत बसण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. ४. डेकवर जाण्याचा वेगळा आकार पडतो, आधी दहा रूपये घ्यायचे आता बहुधा वीस रू. घेतील. वरून बंदरात आतपर्यंत नांगरलेल्या बोटी, मोठी जहाजे, मधूनच भाभा अणुशक्तीकेंद्र दिसतं आणि छान मोकळी हवा मिळते. ५. जाताना बंदर सोडल्यानंतर दहाएक मिनिटांत एका बेटावर नौदलाची पांढरी इमारत दिसते. त्या दिशेने दुर्बिणी रोखणे, फोतो काढणे असे प्रकार करू नयेत. म्हणे नौदल याची नोंद ठेवतं आणि ज्या बोटीवरून हे प्रकार झाले त्यांवर कारवाई करतं. त्यामुळे बोटीवरचे लोक कुणी असं केलं की जाम ओरडाओरडा करतात. ६. सगळ्यात महत्वाचं- बेटावर प्रसधनगृह पटकन दिसण्यासारखं नाही, खरंतर मला माझ्या २-४ भेटींत कधीच दिसलं नाही. तेव्हा जाण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडियाच्या इथे असलेल्या सशुल्क सेवेचा वापर केलेला इष्ट.
  • Log in or register to post comments

आणि हो, येताना तिथे उभ्या

मस्त कलंदर
Fri, 02/28/2014 - 10:51 नवीन
आणि हो, येताना तिथे उभ्या असलेल्या कोणत्याही बोटीतून परत आलेलं चालतं, आपल्या गेलेल्या बोटीची वाट पाहावी लागत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

चला तर मग...

मुक्त विहारि
Fri, 02/28/2014 - 15:09 नवीन
उद्या सकाळी ठीक ९:३० ला सी.एस.टी. वर भेटू या. समजा काही कारणामुळे उशीर झाला तर थेट घारापुरीला भेटू या.
  • Log in or register to post comments

हे बेस झालं !!

सूड
Fri, 02/28/2014 - 15:16 नवीन
हे बेस झालं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो ना....

मुक्त विहारि
Fri, 02/28/2014 - 15:27 नवीन
कारण पुणेकरांना त्याच दिवशी परतीची गाडी पकडायची आहे. उगाच आपल्यामुळे त्यांचा खोळंबा नको. (मुंबईकरांवर राग काढायला पुणेकरांना निमीत्त मिळायला नको.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>(मुंबईकरांवर राग काढायला

सूड
Fri, 02/28/2014 - 15:34 नवीन
>>(मुंबईकरांवर राग काढायला पुणेकरांना निमीत्त मिळायला नको.) राग सलामत तो निमित्त पचास !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कट्यासाठी गीत...

चौकटराजा
Fri, 02/28/2014 - 16:22 नवीन
कट्टे पे कट्टा कट्टे होडी होडीमे निकली किनकी सवारी ? थोडे खिल्लाडी थोडे अनाडी पेटमे किसके जायेगी ब्र्यान्डी ? मुवी रसीले बुवा रंगीले धन्या टमाटा वल्ली बटाटा गामा बनेगा ऐसा खिलाडी कोण काढील कुणाची खोडी........टर डर, डर टर, डर डर डा ... हार्दिक शुभेच्चा ! अच्चा बाय बाय !
  • Log in or register to post comments

लय भारी....

मुक्त विहारि
Fri, 02/28/2014 - 16:39 नवीन
कधी येताय? थोडी ब्रांडी पिवू अन मजा करू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एन्जॉय एव्हरीबडी

प्रमोद देर्देकर
Fri, 02/28/2014 - 17:18 नवीन

घा रा पु री च्या क ट्ट्याला हा र्दि क शु भेच्छा

  • Log in or register to post comments

+१

शिद
Fri, 02/28/2014 - 18:26 नवीन
आमच्यापण कट्ट्याला अश्याच रंगबेरंगी शुभेच्छा... वृत्तांताची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

सहज आठवले म्हणून...

शशिकांत ओक
Mon, 03/03/2014 - 11:40 नवीन
मित्रा, तू शीर्षकात रंगांची उधळण करून बहार आणलीस... पुर्वी मला ही अशी रंगपंचमी करून धागा सजवायला आवडत असे. मात्र कांहींच्या डोळ्याला ते रंग खुपायला लागले व फर्माईश झाली की आता पुरे ..... म्हणून आता कृष्ण-धवलावरच मला समाधान मानावे लागते. तरीही आपल्या रंगारीपणाचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

जबरदस्तच झाला कालचा घारापुरी

प्रचेतस
Sun, 03/02/2014 - 12:51 नवीन
जबरदस्तच झाला कालचा घारापुरी भ्रमंती कट्टा. पेठकर काका आणि शशिकांत ओक काका यांनी उपस्थित राहून आश्चर्याचा धक्काच दिला. उपस्थित सर्व मिपाकरांचे आभार. आत्मुबुवा लवकरच सविस्तर वृत्तांत टाकतीलच.
  • Log in or register to post comments

फोटो टाका.

यशोधरा
Sun, 03/02/2014 - 12:58 नवीन
फोटो टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो.

प्रचेतस
Sun, 03/02/2014 - 13:13 नवीन
हो. दोन वृत्तांत येतील. मिपाकरांची मौजमजा आत्मुबुवांकडून व् आमचेकडून लेणीदर्शन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा! लवकर टाका वृत्तांत!

अनन्न्या
Sun, 03/02/2014 - 15:28 नवीन
आणि लेण्यांची माहितीसुध्दा! सातवीला असताना एलिफंटाला गेले होते. आता फक्त एवढेच आठवतेय की माकडाने माझ्या हातातली केळी पळवली होती. आणि एकत्र गोल बसून भेळ खाताना आमच्यामधे माकडंही येऊन बसली होती भेळ खायला!
  • Log in or register to post comments

आजकाल

मुक्त विहारि
Sun, 03/02/2014 - 16:03 नवीन
त्यांची मुले पण जास्त हुषार झाली आहेत. शीतपेयांच्या बाटल्या तर पळवतातच, पण शिवाय त्यांचे बूच उघडून, शीतपेयांचा आस्वाद पण घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

मुलांना भेटायला आवडलं असतं....

अनन्न्या
Sun, 03/02/2014 - 22:27 नवीन
पण म्हटलं तुम्ही सगळे जाताच आहात तर प्रगती कळेलच त्यांची!! *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments

त्यांची तशी आमची पण प्रगती

शशिकांत ओक
Mon, 03/03/2014 - 00:43 नवीन
अनन्या, अग, त्यांच्या हुशार मुलांनी बूच उघडून शीतपेयाची चव चाखण्याची प्रगती केली. तहान भागवली व शिवाय पेयाच्या चवीचा आनंद मिळवला. त्यांच्याप्रमाणे आमच्या मुलांनी, पुर्वी फक्त आपली नावे कोरून इमारतींवर आपला प्रासाद सोडायला आवडे यातून प्रगती करून, आता त्या वास्तूचे ऐतिहासिक व वास्तूशिल्पाचे अध्ययन करून त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो हे तथ्य जाणून मिपाचे काही, वल्ली सोबत एकत्र जमून आले...
  • Log in or register to post comments

+१

मुक्त विहारि
Mon, 03/03/2014 - 00:48 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

लवकर वृतांत आणि फटू

प्रमोद देर्देकर
Mon, 03/03/2014 - 10:47 नवीन
लवकर वृतांत आणि फटू येवूद्यात वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

(भटकंती)कट्टा सहीच झाला

स्पा
Mon, 03/03/2014 - 11:27 नवीन
(भटकंती)कट्टा सहीच झाला :)
  • Log in or register to post comments

ए स्पावड्या

लीलाधर
Mon, 03/03/2014 - 12:08 नवीन
पळपूट्या कुठचा अर्धवट मध्येच का निघूण गेळास रे ???!?
  • Log in or register to post comments

पेठकर काका अन ओक काका

आत्मशून्य
Mon, 03/03/2014 - 12:16 नवीन
यांच्या उपस्थितीने ३ना चे ५ स्टार १००% झाले. त्वरीत फटु वृत्तांत येउ द्यावेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा