✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

प
प्रचेतस यांनी
Fri, 02/14/2014 - 15:15  ·  लेख
लेख
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे. तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच. आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्‍यापैकी निवांत वेळ आहेच. चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
26760 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

येणार

स्पा
Fri, 02/14/2014 - 15:33 नवीन
येणार :)
  • Log in or register to post comments

@

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/14/2014 - 15:51 नवीन
@ येणार स्पा - Fri, 14/02/2014 - 16:03 येणार Smile >>> Image removed. Image removed. पां डुब्बा येणार!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
Fri, 02/14/2014 - 15:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आम्हाला पण...

विटेकर
Fri, 02/14/2014 - 16:11 नवीन
आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे आम्हाला पण..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एव्हढा हसलास का रे पां डुब्बा

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/14/2014 - 16:15 नवीन
एव्हढा हसलास का रे पां डुब्बा!? :-/ त यारीत र्‍हा आता! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मस्तानी आण रे बुव्या येताना

स्पा
Fri, 02/14/2014 - 16:19 नवीन
मस्तानी आण रे बुव्या येताना पेंडिंग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आँ?

प्यारे१
Fri, 02/14/2014 - 16:51 नवीन
आँ? बुवा, मस्तानी आहे तुमच्याकडं???? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बुवा, मस्तानी आहे तुमच्याकडं????

मुक्त विहारि
Fri, 02/14/2014 - 17:09 नवीन
का बुवांकडे मस्तानी नको? आजकाल लहान मुलांकडे पण मस्तानी असते. जावु दे, आजकाल पुण्यातली पुरुष मंडळी पण सर्रास मस्तानीचे नांव घेतातच पण बायका पण घेतात. पुर्वीचे पुणे राहिले नाही आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@मस्तानी आण रे बुव्या येताना

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/15/2014 - 00:24 नवीन
@मस्तानी आण रे बुव्या येताना पेंडिंग आहे >>> अजिब्बात नाही. ती तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे! :-/ @बुवा,मस्तानी आहे तुमच्याकडं?>>> आवले..आवले.. =)) काय हे..? कधिच खाल्ली नै का अजून? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तू-पुण्याला आल्यावर देण्याचे ठरले आहे!

मुक्त विहारि
Sat, 02/15/2014 - 08:45 नवीन
हे असे परखड वाक्य लिहून... बुवांनी आपला पुणेरीपणा सिद्ध केला आहे. १. स्पा सध्या तरी पुण्याला येवू शकणार नाही. २. ज्यावेळी स्पा पुण्याला येईल त्यावेळी बुवांना वेळ असेलच असेही नाही. ३. समजा दोघेही भेटले तरी मस्तानी देणारे हॉटेल सुरु असेल असेही नाही. ४. वरील सर्व बाबी विचारात घेतल्या तर.... एकूणच ह्या पेक्षा ठाकूरचा वडा-पाव खाणे योग्य असेच स्पाला वाटेल. महत्वाचा मुद्दा.... इतके सगळे होव्वुन पण. बुवांनी आणि स्पाने मस्तानीची चव पुण्यात एकत्र घेतल्यास , त्या हिरक-क्षणाचा फोटो मिपावर न विसरता टाकणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@इतके सगळे होव्वुन पण.

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/15/2014 - 12:09 नवीन
@इतके सगळे होव्वुन पण. बुवांनी आणि स्पाने मस्तानीची चव पुण्यात एकत्र घेतल्यास , त्या हिरक-क्षणाचा फोटो मिपावर न विसरता टाकणे.>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आत्मु बाबास

मुक्त विहारि
Sat, 02/15/2014 - 13:11 नवीन
धन्यवाद.... आमचा प्रतिसाद शिरियशली न घेतल्याबद्दल... हे इथे असे चालते, म्हणूनच इथे रमण्यांत मज्जा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तारीख तर नक्की ठरली....

मुक्त विहारि
Fri, 02/14/2014 - 15:37 नवीन
चला आता थोडे आयोजन करू या. १. वेळ : ह्यावेळी वेळेला खूपच महत्व आहे.शक्यतो सगळ्यांनी वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे, कारण एखाद्याने केलेला ५/१० मिनिटे उशीर पण आपल्या पुणेकर मिपाकरांना नंतर त्रास दायक ठरू शकतो. २. प्रत्येकाने किमान २ लिटर पाणी आणावे. ३. बाहेर खाण्यापेक्षा, ह्यावेळी आपण घरी बनवलेलेच पदार्थ घेवून जावू या.त्या निमीत्ताने अंगत पंगत पण होईल आणि सुदैवाने दिपक शेठ आहेतच.त्यांच्याकडून आपल्या पदार्थाला मान्यत्व पण येईल. ४. त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक शेठ" ह्यांच्या बरोबर पक्षी-तीर्थ कट्टा करू या का?
  • Log in or register to post comments

त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक

प्रचेतस
Fri, 02/14/2014 - 17:12 नवीन
त्याच दिवशी संध्याकाळी "दिपक शेठ" ह्यांच्या बरोबर पक्षी-तीर्थ कट्टा करू या का?
आम्ही आपले घासफूस आणि कोल्ड्रिंकवाले. बाकी जेवायला खरोखरच वेळ मिळणार नै. त्यापेक्षा मुम्बै स्पेशल भेळपुरी, पंचम पुरीवाला, क्यानन पावभाजी अशी काही हटके ठिकाणं दाखवा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पंचम पुरीवाला

मुक्त विहारि
Fri, 02/14/2014 - 18:27 नवीन
हा सगळ्यात उत्तम पर्याय. पोटभर जेवण आणि माफक खर्च. कारण पाव-भाजी आणि भेळ खावून दुपार साजरी करण्यापेक्षा हे उत्तम. बादवे, मी बटाट्याचे पराठे नक्की आणत आहे.... (आणि जमल्यास छोले आणतो.) खजूराच्या वड्या पण आणयचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खजूरवड्या असतील तर विचार करावा लागेल ....

नरेंद्र गोळे
Fri, 02/14/2014 - 20:50 नवीन
खजूरवड्या असतील तर विचार करावा लागेल ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही दुपारच्या जेवायच्या

अजया
Fri, 02/14/2014 - 21:46 नवीन
तुम्ही दुपारच्या जेवायच्या वेळेपर्यंत पंचमकडे नाही जाऊ शकणार बहुधा.कारण परत गेट वेला येइपर्यंतच तुम्हाला निदान चार वाजतील.बेटावर बरी हॉटेल्स आहेत.तिथे तुम्ही सोबत घेतलेले जेवणही जेऊ शकाल. परत येताना पूणेकराना जवळचे बडे मिया(घासफुसवाल्यांसाठी नाही) कैलासपर्बत ( इलेक्ट्रिक हाऊस )ला भेळ्,लस्सी,आइसक्रीमसाठी नेऊ शकता. कॅननची टेस्ट आता पहिल्यासारखी राहिली नाही. अ‍ॅम्बेसेडर हॉटेलच्या बाजूने मरीन ड्राईव्हला गेलात तर रुस्तूमचे आइसक्रीम जरूर्,जरूर खा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पंचम ओव्हररेटेड आहे. साधा

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 02/16/2014 - 13:28 नवीन
पंचम ओव्हररेटेड आहे. साधा पुरीवाला आहे. खास पुण्याहून येउन तिथे जाण्यासारखे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हेहे...

धन्या
Sun, 02/16/2014 - 13:40 नवीन
ओव्हररेटेड ठिकाणीच पुणेकर जातात. वनगीदाखल काही उदाहरणे: कपडे: कॉटनकिंग किंवा जयहिंद सिनेमा: प्रभात उडुपी रेस्टॉरंट: अभिषेक ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तुम्हाला तो पंचम वाला 'आओ

प्यारे१
Sun, 02/16/2014 - 15:06 नवीन
तुम्हाला तो पंचम वाला 'आओ विमे काका ,बहोत दिनोंके बाद आये' असं म्हणाला नाही त्याचा राग काढताय का काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चांगले हॉटेल

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 02/21/2014 - 14:18 नवीन
जेवायला चांगले हॉटेल हवे असेल तर २-३ सुचवतो. १.सिद्धार्थ कॉलेज समोरील गल्लीत फोर्ट सेंट्रल किवा तेथुन उजवीकडे मोती हलवाई २.फोर्ट सेंट्रलकडुन डावीकडे फिरोजशहा मेहता रोडकडे गेल्यास ललित सुद्धा उत्तम ३.त्याच रस्त्याला महेश लंच होम (नॉन व्हेजसाठी उत्तम,पण व्हेज ही चांगले मिळते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मला काहिहि चालेल

दिपक.कुवेत
Sun, 02/16/2014 - 11:15 नवीन
मुवि......आपण "पक्षी-तीर्थ" डोंबीवलीत करु. मी आहे दोन-तिन दिवस तिथे. बाय द वे कट्टा झाला कि मी तुमच्यासोबतच डोंबीवलीला येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझे दोन पैसे..

मस्त कलंदर
Fri, 02/14/2014 - 18:56 नवीन
आम्ही बहुधा येऊच. काही लोक एकत्र येणार म्हणजे थोडे मागे-पुढे व्हायचेच. मी आतापर्यंत दोन-तीन वेळा एलिफंटाला(ही घारापुरी बेटांवर आहेत, तिथे अजून काही असेल याची शक्यता जवळजवळ नाही, तरीही माझी माहिती फक्त लेण्यांच्या गुहेपर्यंतच मर्यादित आहे) जाऊन आले आहे, त्या माहितीवरून- १. दर पंधरा-वीस मिनिटांना फेरीबोट उपलब्ध असते, शेवटची फेरी तिकडून ५ वाजता सुटते. त्यामुळे दहाचे सव्वादहा झाले तरी जास्त फरक पडावयास नको. २. बेटावर एक-दोन कामचलाऊ रेस्तराँ आहेत, पाणी आणि शीतपेये तिथेही मिळतात. आता आठवत नाही, परंतु मुंबई बेटांवरल्या आणि घारापुरी बेटांवरल्या किंमतीत जास्त फरक आहे असे वाटत नाही. पुन्हा तिथे पायर्‍या बर्‍यापैकी भरपूर आहेत तेव्हा सवय नसलेल्यांना आणि वजनदार लोकांना हे त्रासाचे ठरू शकते. तेव्हा एखादी पाण्याची बाटली बरोबर असल्यास उत्तम. ३. बेटांवर काकडी, बोरे, मक्याची कणसे यांसारखे पदार्थ मिळतात, किंमतीबद्दल वरीलप्रमाणेच. ४. घरून खाण्यापिण्याचे घेऊन जाण्यापेक्षा तिथलेच पर्याय पाहावेत. अ. घरी निवांत ऑर्डर देऊन तयार झालेले पदार्थ घेऊन जाणे आणि स्वतः उठून काहीतरी करून घेऊन जाणे यात बराच फरक आहे. (सूडने तयारी दाखवली आहे, तरीही.. ) ब. स्वयंपाकामुळे निघायाला उशीर झाला असे कुणी कारण देऊ नये म्हणूनही. असो. कट्ट्यास उत्सुक(म.क.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माहितीबद्दल धन्यवाद.

प्रचेतस
Fri, 02/14/2014 - 21:11 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. फेरीबोटी दर १५/२० मिनिटांनी म्हणजे वारंवारिता चांगलीच आहे की. हल्लीच तिथे पायर्‍यांच्या मार्गाव्यतिरिक्त मिनी ट्रेन पण कार्यान्वित झाल्याचे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मिनी ट्रेन काही कामाची नाही.

मस्त कलंदर
Fri, 02/14/2014 - 22:30 नवीन
मिनी ट्रेन काही कामाची नाही. ती फक्त जेट्टीपासून पायथ्यापर्यंत आहे. ते अंतर १००मीटर असेल, फारतर १५०. बाकीच्या पायर्‍या चढायलाच लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली ३र्‍या गुहेनंतर पुढे

स्पंदना
Sun, 02/16/2014 - 09:53 नवीन
वल्ली ३र्‍या गुहेनंतर पुढे जायचा त्रास नका घेऊ. ती नुसती गुहा खोदायचा प्रयत्न केल्याची निशाणी आहे. पाण्यासाठी गुहा सुरु व्हायच्या आधीच सरकारने कूलर बसवलाय. तेथे रिफील करु शकता. अन झाडाखाली बसायला कट्टे आणि भरपूर माकडे आहेत. हो. विसरलच तेथे बसून जेवंणे अशक्य. भयानक ताप आहेत माकडं. अगदी कोल्ड्रिंकची बाटली पायात धरुन हातान तोंडाला लावुन पितात गाढव! (सॉरी माकड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ती गुहा तरी बघायलाच हवी. न

प्रचेतस
Sun, 02/16/2014 - 11:45 नवीन
ती गुहा तरी बघायलाच हवी. न जाणो अजून काहीतरी मिळेलही. बाकी घारापुरीलासुद्धा मर्कंटाचा त्रास असेल असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

शोधक वृत्तीच्या वल्लीना ... हळूच घ्या

शशिकांत ओक
Fri, 02/21/2014 - 13:26 नवीन
शोधक वृत्तीच्या वल्ली ... हळूच घ्या... नामक वल्लीला तिथे जाऊ नका असे सुचवल्याने ते व अन्य संगी साथीदार त्या तिसऱ्या ठिकाणी काय काय दडले आहे असे शोधायला जायला प्रवृत्त होणार हे ओघाने आले.... यावरून हवाईदलातील एक नागालँडचे 'वल्ली' आठवले. कमरेला लावलेल्या कुकरीचा नेम धरून तो रस्त्यावरच्या कुत्र्यांना सहज म्हणून मारत असे. ... त्याचे नाव हरालू होते. त्याला पुर्वपद "हरामी" लावून आम्ही त्याच्या पश्चात नावाजत असू.... अमुक एक 'कर' असा आदेश वरिष्ठांनी जरी दिला तरी तो 'चुप साले ...' म्हणून दुर्लक्ष करी. मात्र 'हरालू तू ये काम कर नही सकता' असे म्हणून त्याला भरीला घातले की महाशय नको ते पराक्रम करायला उद्युक्त असे... असेच एकदा जंगलातील एका गूहेत चढायची गोष्ट गप्पागप्पात भर घालून निघाली. त्यात त्याने १४ किमीवरील उंच ठिकाणी असलेल्या गूहेतून वटवाघळे मारून आणली दाखवायला की मी तिथे गेलो होतो हे सिद्ध करायला....!! ...असे भरीला घालणारे मित्र ही येतील तिथे.... तेंव्हा सावधान....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्लीशेठ, मी पुण्यातूनच निघेन

पिंगू
Fri, 02/14/2014 - 17:32 नवीन
वल्लीशेठ, मी पुण्यातूनच निघेन आणि तेव्हा तुमच्या सोबतच असेन.
  • Log in or register to post comments

वोक्के. सिंहगडमध्ये भेटूच.

प्रचेतस
Fri, 02/14/2014 - 18:07 नवीन
वोक्के. सिंहगडमध्ये भेटूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

आपापल्या घरनं काही बनवून

सूड
Fri, 02/14/2014 - 17:44 नवीन
आपापल्या घरनं काही बनवून आणायचं म्हणता? आम्हाला वेळ आणि साहित्य-साधनं मिळालं तर काहीतरी गोडाचं बनवून आणता येतं का बघू.
  • Log in or register to post comments

जमल्यास पोपटी टीशर्ट घालावा !

आत्मशून्य
Mon, 02/24/2014 - 19:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरं!!

सूड
Mon, 02/24/2014 - 19:36 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

त्यासाठी रेड टीशर्ट हवा

आत्मशून्य
Mon, 02/24/2014 - 19:54 नवीन
!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओक्के.

सूड
Mon, 02/24/2014 - 20:09 नवीन
शिमग्याच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शिमग्याच्या शुभेच्छा !!

किसन शिंदे
Tue, 02/25/2014 - 02:41 नवीन
शिमग्याच्या शुभेच्छा !!
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शिमग्यासाठी चुकिची स्मायली!

आत्मशून्य
Tue, 02/25/2014 - 16:03 नवीन
कंपु सुधा अधुरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

त्यासाठी येलो वापरा!

आत्मशून्य
Tue, 02/25/2014 - 15:59 नवीन
नेक्स्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरं. तू म्हणतो तसं. बास्स??

किसन शिंदे
Tue, 02/25/2014 - 16:12 नवीन
बरं. तू म्हणतो तसं. बास्स??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

नाही.

आत्मशून्य
Tue, 02/25/2014 - 16:15 नवीन
सुड म्हणतो तसं पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कट्ट्याला शुभेच्छा

एस
Fri, 02/14/2014 - 23:50 नवीन
आम्हांस जमणे काही शक्य दिसत नाही. तरी होता होईल तितके मोहिमेला जाऊन मिळण्याचा सांगोपांग यत्न अवश्य केला जाईल. न साधल्यास किमानपक्षी स-प्रतिमा-सविस्तर-वृत्तांताची वाट पाहीनच :-)
  • Log in or register to post comments

माझ्या भ्रमंतीसाठी सॉलीड

आत्मशून्य
Sat, 02/15/2014 - 04:42 नवीन
शुभेच्छा...! वल्ली नेवर डिसपाँईट्स.
  • Log in or register to post comments

मी येणार. माझा कोणाशीच परिचय

निरंजन
Sat, 02/15/2014 - 09:30 नवीन
मी येणार. माझा कोणाशीच परिचय नाही. या निमित्तानी ओळाख होईल.
  • Log in or register to post comments

नक्की या...

मुक्त विहारि
Sat, 02/15/2014 - 09:36 नवीन
तुम्ही रहायला कुठे? मुंबईत असाल तर तुमचा मो.नं. मला व्यनि करा. पुण्याला रहायला असाल तर..वल्लींना व्यनि करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरंजन

मी येतोय.

चिप्लुन्कर
Sat, 02/15/2014 - 11:30 नवीन
भेटूच मग १० वाजता सी ए स टी ला १ मार्च ला , थोडक्यात काय मी येतोय.
  • Log in or register to post comments

मी येणार

जोशी 'ले'
Sat, 02/15/2014 - 13:01 नवीन
मी येणार :-)
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा

यशोधरा
Sat, 02/15/2014 - 13:12 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा ........

मुक्त विहारि
Sat, 02/15/2014 - 13:25 नवीन
ओके.... योग्य ती दखल घेतल्या गेली आहे.... तुम्ही केंव्हा येत आहात? आम्हाला रविवारी हमखास वेळ असतो, शनिवारी वेळ काढता येतो, तर इतर दिवशी फावला वेळ असतोच... आणि तसेही.... डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे.हे वेसांनल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला सुट्टी नाही आहे, नाहीतर

यशोधरा
Sat, 02/15/2014 - 13:34 नवीन
मला सुट्टी नाही आहे, नाहीतर जरुर आले असते. आवडले असते यायला. पुन्हा कधीतरी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अपडेट्स

प्रचेतस
Sun, 02/16/2014 - 09:43 नवीन
आतापर्यंत नक्की झालेले आणि पुण्याहून सिंहगडने येत असलेले सदस्य. मी प्रशांत नाद खुळा अत्रुप्त आत्मा धन्या सौंदाळा सूड पिंगू चिमी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा