✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"वल्लीं" बरोबर....घारापुरी कट्टा....दि. १ मार्च किंवा ८ मार्च..२०१४

म
मुक्त विहारि यांनी
Sun, 02/09/2014 - 11:50  ·  लेख
लेख
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला. वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४.... काही अपरिहार्य कारणा मुळे तारीख नक्की करता येत नाही आहे पण वार मात्र नक्की आहे, आणि तो म्हणजे "शनिवार". सामान्यतः शनिवार हा न-कर्त्याचा वार म्हणून ओळखला जातो.मिपाकर मात्र त्याला अपवाद आहेत.हा कट्टा पण आपण असाच शनिवारी साजरा करणार आहोत. आपले काही व्यावसायीक मित्रगण कार्यबाहुल्ल्यामुळे येवू शकणार नाहीत, ह्याची जाण आहे.पण ते मन मोठे करून (किंवा मन मारुन) माफ करतील. कळावे, लोभ आहेच, तो अशा ज्ञानी माणसांच्या सहवासामुळे अजून नक्की वाढणार पण आहेच. आपला, मुवि.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
6865 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

शुभेच्छा !!!

खटपट्या
Sun, 02/09/2014 - 11:55 नवीन
शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

ओके....

मुक्त विहारि
Sun, 02/09/2014 - 11:59 नवीन
वल्ली शेठ बरोबर असल्याने, माहिती मिळेलच शिवाय फोटो पण टाकूच.... चिंता नसावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मुवि, तोंडघशी पडाल, कट्ट्याला

किसन शिंदे
Sun, 02/09/2014 - 12:07 नवीन
मुवि, तोंडघशी पडाल, कट्ट्याला आलेले मिपाकर तुम्हाला दोष देतील, आलेल्यांची निराशा होईल.... कारण प्रत्यक्ष ठिकाणी हा वल्ल्या तोंडच उघडत नाही. :D :P (ह.घ्या) ;)
  • Log in or register to post comments

>>कारण प्रत्यक्ष ठिकाणी हा

सूड
Mon, 02/10/2014 - 11:45 नवीन
>>कारण प्रत्यक्ष ठिकाणी हा वल्ल्या तोंडच उघडत नाही. सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सहमतीबद्दल सहमत!

प्यारे१
Mon, 02/10/2014 - 12:44 नवीन
सहमतीबद्दल सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रायगडावरचा गाईड आठवला...

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/11/2014 - 00:05 नवीन
रायगडावरचा गाईड आठवला... बिचार्याला परत पाठवले होते आम्ही. नंतर आम्ही बिचारे झालो म्हणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सध्या

तिमा
Sun, 02/09/2014 - 12:17 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मला दोन्हि तारखा

दिपक.कुवेत
Sun, 02/09/2014 - 13:33 नवीन
सुटेबल आहेत. फक्त तारीख नक्कि झाली कि कळवा. आलो कि सविस्तर फोनवर बोलुच.
  • Log in or register to post comments

येस्स....

मुक्त विहारि
Sun, 02/09/2014 - 13:40 नवीन
एकाच सुमारास दोन्ही कट्टे होतील. पुणेकरांना, मुंबईकर सामावुन घेवू शकतील. किंवा त्याच तारखेला संध्याकाळी तुमच्याबरोबर पक्षीतीर्थासकट पण कट्टा करता येईल. प्रभाकर पेठकर काय म्हणतात बघू या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

व्वा व्वा... कट्ट्यांची सुनामी :) :)

सुहास झेले
Sun, 02/09/2014 - 16:22 नवीन
८ तारीख जास्त सुटेबल आहे..... मुंबईहून कोण कसे जाणार ते ठरल्यास येणं जमतंय का नक्की बघेन :) :)
  • Log in or register to post comments

वल्लि बरोबर कट्टा ? वाह वा..!

आत्मशून्य
Sun, 02/09/2014 - 16:25 नवीन
भरपुर शुभेछ्चा. कट्टा अगदी जोमात होउदे.
  • Log in or register to post comments

तू ही येणं अपेक्षित आहे.

किसन शिंदे
Sun, 02/09/2014 - 16:43 नवीन
तू ही येणं अपेक्षित आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

इछ्चा नाही.

आत्मशून्य
Sun, 02/09/2014 - 16:50 नवीन
पण इतरांनी आनंद नक्किच घ्यावा ही अपेक्शा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मुवी ,

जेपी
Sun, 02/09/2014 - 16:45 नवीन
मुवी , कळावे लोभ वैगैरै वाक्य वाचुन मला वाटल की तुमी लाडक्या काका बरोबर गपचीप कट्टा करुन आलात . शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

घारापुरीला अगदी लहानपणीच गेलो

प्रचेतस
Sun, 02/09/2014 - 16:53 नवीन
घारापुरीला अगदी लहानपणीच गेलो होतो त्यामुळे लेण्या आता काहिही आठवत नाहीत. पण एकंदरीत जितके ऐकलेय त्यानुसार वेरूळच्या लेण्यांशी बहुत साम्य आहे त्यामुळे मूर्ती ओळखायला फारसे अवघड जाऊ नये. १ किंवा ८ तारिख हापिसच्या स्केड्युलवर अवलंबून आहे. तरीही ७/८ दिवस आधी कन्फर्म करेनच. ढोबळमानाने आमचा प्लान साधारण असा राहील. शनिवारी सकाळी सिंहगडने आम्ही ९.४५/१० पर्यंत सीएसटीला पोहोचू. (सध्या तरी मी, प्रशांत, धन्या आदी पुणेकर कन्फर्म आहोत) तिथून लगेच गेटवेला. मुंबैकर मिपाकर त्यासुमारास सीएसटी अथवा थेट गेटवेला भेटू शकतील. लेणी बघून साधारण ४/५ पर्यंत परत फोर्टला येणे अपेक्षित आहे. मग थोडावेळ तिथेच भटकून ६.५० च्या सह्याद्रीने अथवा ८.०० च्या महालक्ष्मीने आम्ही पुण्यास परतीच्या प्रवासास निघू.
  • Log in or register to post comments

वल्लीदा, १ तारीख ठरली तर मी

सौंदाळा
Mon, 02/10/2014 - 16:13 नवीन
वल्लीदा, १ तारीख ठरली तर मी पण आहे बरं का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

योग

सुधीर
Mon, 02/10/2014 - 22:06 नवीन
असा योग पुन्हा कधीतरी येईल ही भोळी अपेक्षा! कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचा फारसा बिझ्झी महिना

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/09/2014 - 17:24 नवीन
आमचा फारसा बिझ्झी महिना नसल्यामुळे ९९% येणार आहेच! :)
  • Log in or register to post comments

८ तारखेस मला जमणार नाही. १

बॅटमॅन
Mon, 02/10/2014 - 11:53 नवीन
८ तारखेस मला जमणार नाही. १ तारखेस ठरले तर येऊ शकेन.
  • Log in or register to post comments

मी येतोय

चिप्लुन्कर
Mon, 02/10/2014 - 12:43 नवीन
८ मार्च मी येतोय. कसे कधी भेटायचे ते कळले निदान २ ते ५ दिवस आधी तर बरे होईल . (फोर्ट कट्ट्या सारखा उशीर होणार नाहि यावेळी मु वि साहेब)
  • Log in or register to post comments

कसे कधी भेटायचे ?

मुक्त विहारि
Mon, 02/10/2014 - 16:10 नवीन
वल्लींनी साधारण रुपरेखा दिली आहे. अधिक माहितीसाठी,,,,,(http://www.misalpav.com/comment/reply/26970/553298)वल्लींचा हा प्रतिसाद वाचा. तारीख मात्र ते पुणेकरांना विचारून नक्की करणार आहेत.४/५ दिवस आधी ते तारीख नक्की सांगतील. (खरे तर हा कट्टा खास पुणेकर पाहुण्यांसाठी असल्याने, यजमान मुंबईकरांनी जास्त काड्या न करता, पुणेकरांच्या स्वागताची तयारी करावी.होळी जवळ येत आहेच, शिमगा आत्ता नाही केला तरी चालेल. पुण्यातल्या ओमकारेश्र्वर मंदिरापेक्षा, घारापुरी लेणी जुनी आहेत, असे एकदाच त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे.तस्मात सध्या त्यांच्या सोईने त्यांना येवू देत. जास्त काही बोलले तर, बोरीवलीतील लेणी दाखवू. चला पळावे आता. भरपूर काड्या लावून झाल्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा